व्याकुळता..

A Short Poem


*व्याकुळता ही...!!

व्याकुळता ही आपल्याच मनाची..
कधीतरी आपल्यालाच समजेल का...?
आपल्याच ह्रदयाची आर्त साद..
कधीतरी आपल्यालाच ऐकू येईल का...?
स्वत:वरच निरागस कोवळ प्रेम ..
कधीतरी स्वतःजवळ व्यक्त करता येईल का...?
वेड लावणारे आपलेच छंद..
कधीतरी आपल्यालाच जोपासता येतील का...?
धावपळीच्या या जीवनात स्वतः ला..
कधीतरी एक क्षण विश्रांतीचा देता येईल का...?
गजबजलेल्या जगाच्या या तूफान गर्दीत..
कधीतरी स्वतः ला शोधता येईल का...?
की... की "व्याकूळ" व्हावं लागेल
त्या मधुर मनाला...
स्वतः वरच प्रेम व्यक्त करायला...?

- हर्षदा नंदकुमार पिंपळे