विज्ञानाने आपल्या जीवनात नेमका कोणत्या क्षणी प्रवेश केला कुणास ठाऊक, विज्ञाना च्या आगमनानंतर वेळ आणि श्रमबचतीच्या साधनांची रेलचेल झाली. कुकर, गॅस, मिक्सर, ग्राइंडर, हिटर, गीझर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर अशे अनेक प्रकार ! समस्त महिला वर्ग सुखावला.शेतीच्या क्षेत्रातही जबरदस्त क्रांती घडून आली. यांत्रिक नांगर, सुधारित बी - बियाणे, कीटकनाशके, पाण्याचे पंप अशा अनेक सुधारणा झाल्या. असाध्य रोगांवर रामबाण उपाय निघाले. कृत्रिम अवयवांचे रोपण, नाजूक अवयवांची शस्त्रक्रिया यामळे रोग्यांना जीवनदान मिळाले. प्लॅस्टिक सर्जरीमळे कुरूपतेवर सौंदर्याचा साज चढला. वेदनाशामक गोळ्यांनी वेदनेची हकालपट्टी केली.कडाक्याच्या थंडीत रुमहीटर ऊब देऊ लागला. वातानुकूलित खोल्या सज्ज झाल्या.बाहेर ऊन रणरणत असताना, कूलरच्या वाऱ्याचा सुखद स्पर्श अनुभवण्यातली मजा काही औरच ! शीतपेये, आइसक्रीममुळे उन्हाळा सह्य झाला. शीतकपाटांमुळे खाद्यपदार्थांचा टिकाऊपण वाढलं.गृहिणींच्या स्वयंपाकघरातील चूल गेली आणि गॅसची शेगडी आली. पाटा-वरवंटयाच्या ऐवजी मिक्सर आला. नंतर कुकर, टोस्टर, वॉशिंग मशीन ,फ्रिज ,ओव्हन …. अशी अफाट यंत्रसामग्री मदतीला आली. रेडिओ, टीव्ही, मोबाईल फोन, चॅनेल्स, रूम हीटर, गिझर, पेट्रोल चालणारी सगळी वाहने ही तर विज्ञानाची फळे.विज्ञाना मुळेच आपण घर बसल्या व्हिडिओ कॉल वर आपल्या माणसांना बघून त्यांच्याशी बोलू शकतो. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता जग जवळ आले आहे....... नमस्कार... सौ. सोनल गुरुनाथ शिंदे..... ( देवरुख - रत्नागिरी )....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा