Dec 05, 2021
कविता

शाळा गेट टुगेदर

Read Later
शाळा गेट टुगेदर

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
*शाळा गेट टुगेदर*

परत आल्या गंमतीच्या
आठवणी बालपणीच्या..


सहलीच्या मौजेच्या
डब्यांच्या वाटावाटीच्या....


परीक्षा अन् अभ्यासाच्या
छम छम छडीच्या....


गम गम विद्येच्या
पाठांतर अन् ज्ञानाच्या....


शिक्षकांच्या शिस्तीच्या
गुरूसाठी मान मनापासूनच्या....


स्नेहसंमेलन अन् तालमीच्या
निरागस बालपणीच्या मैत्रीच्या....खुप वर्षांनी सगळे भेटताच
क्षणात आठवणी काढताच....


मन आनंदोत्सवाने भारवताच
जीवनात बालपण परत येताच....


नवी ऊर्मी आली जगण्यात
माणसे एकत्र आताच्या युगात....


मनाने भेटले आनंदाने
वय,टेन्शन कमी झाले गेटटुगेदरने

*सौ. भाग्यश्री चाटी सांबरे ??*
23.10.2021. ©®

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Bhagyashri Yogesh Sambare

Online Business Reseller

MA ENGLISH, MPM WITH FIRST CLASS. Aurangabad. Maharashtra