शाळेतील दिवस

Memorable School Days
अजूनही आठवतो मला शाळेचा दिवस पहिला

त्यादिवशी बराचसा वेळ रडण्यातचं गेला


भिरभिरत्या नजरेने मी पूर्ण वर्ग पाहिला

प्रत्येक चेहरा मला अनोळखी दिसला


काही हसत होते तर काही रडत होते 

माझ्या सारखे समदुःखी एकमेकांकडे कुतुहलाने पाहत होते


भिंतीवरच्या चित्रांनी, फळ्याने लक्ष वेधले

आणि बाईंच्या प्रेमळ शब्दांनी रडणे थांबले


हळूहळू  शाळेत जाण्यास आवडू लागले

अनोळखी चेहरे आता ओळखीचे झाले


छान छान गाणी बोलायला लागले

कखगघ...ही गिरवण्यास शिकले


बाईंनी अंकांची ही ओळख करून दिली

शाळेबरोबर घरी ही उजळणीला सुरुवात झाली


प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये प्रवेश केला

बाई,गुरुजी ऐवजी सर,मॅडम शिक्षकवृंद मिळाला


वाढत्या वर्गाबरोबर अभ्यास ही वाढला

आमच्यातील गुणांना वाव मिळू लागला


ज्ञानी,शिस्तप्रिय शिक्षक आम्हांस लाभले

त्यांच्या मार्गदर्शनाने आमचे भविष्य घडत गेले


काहीसे अभ्यासू,काहीसे खोडकर मित्रमैत्रिणी भेटले

बालपणीचे सुखदुःखाचे क्षण त्यांच्या सोबतीने वेचले


शाळेने आम्हांला खुप काही शिकविले

ज्ञानाबरोबर संस्कांरांचे बाळकडू ही पाजले


अभ्यास आणि परीक्षा सत्र सुरू राहिले

आणि आमचे शालेय शिक्षण पूर्ण होत आले


अखेर तो शाळेतील आमचा शेवटचा दिवस येऊन ठेपला

सर्वांनी शाळेला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला


प्रत्येक जण आपल्या वेगळ्या प्रवासास निघाला

शाळेतील सर्व आठवणी मात्र मनात ठेवून गेला


ज्या शाळेने मला घडविले

त्या शाळेला मी कधी नाही विसरले


शाळेतील आठवणींनी कधी हसतो तर कधी रडतो

 आणि शाळेच्या आठवणींनी पुन्हा बालपणात रमतो