Login

जागतिक तापमान वाढ आणि प्लास्टिक

How We Can Prevent The Plastic Not To Go Into The Environment

                       सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या वस्तू वापरतो याची कधी यादी करून पाहिली आहे का? सकाळी उठल्या उठल्या हातात येणारा टूथ ब्रश किंवा त्यासाठी लागणारी पेस्ट तीही प्लास्टिकच्या ट्युब मधे, बाथरूम मधली आंघोळीची बादली असो नाही तर पाण्याचा मग, साबण ठेवायचं सोप केस किंवा केस विचारायचा कंगवा, फायबरच्या प्लेट , वाट्या , चमचे प्लास्टिकने आपलं संपूर्ण जीवन व्यापून टाकलेलं आहे.

               प्लास्टिकच्या कॅरीबॅग हा एक नवीन संशोधनाचा विषय होऊ शकतो! महाराष्ट्र सरकारने जरी ही \"प्लास्टिक बंदी\" अशी घोषणा केली असली आणि प्लास्टिक बंदी साठी कडक निर्बंध ही लावले असले..... तरीही आपल्या आयुष्यातून प्लास्टिक हद्दपार होणे केवळ अशक्य आहे..... प्लास्टिकची सहज उपलब्धता , त्याचे अमर्याद उपयोग,  आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी त्याची किंमत त्यामुळेच कमी वेळात प्लास्टिक इतकं सर्वमान्य आणि बहुपयोगी झालं आहे.

        आजकाल विविध कंपन्यांचे मॉल्स आणि त्याच्या जागोजागी दिसणाऱ्या असंख्य ब्रांचेस हे भारतातल्या सर्व लहान मोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य चित्र आहे. मॉलमधून वस्तू घ्यावात की नकोत यावर भरपूर चर्चा होऊ शकते पण मॉलमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात त्या कॅरीबॅग पुढे काय होतं?  हा एक संशोधनाचा मुद्दा आहे........ इतरही ठिकाणी धान्य डाळी - साळी आधीच प्लास्टिकच्या पारदर्शक पिशव्यांमध्ये सीलबंद असतात,  ते विकत घेऊन त्याच बील हातात पडेपर्यंत त्या दुकानाच्या किंवा मॉल च्या नावाच्या आणखीन दोन चार पिशव्या आपल्या हातात पडतात.... मॉलमध्ये किंवा भाजी बाजारात आपण जी भाजी विकत घेतो त्याही आपल्याला मिळतात कॅरी बॅग मध्ये..... कधी कधी तर भाजीवाला  \"कॅरीबॅग नाही\" असं म्हणाला,  तर गृहिणी त्याच्याशी भांडण करतात...... भाजीवाल्याकडून कॅरीबॅग मिळणं हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे असे त्यांना वाटतं...... पण कधी विचार केला आहे का की , हे सर्व प्लास्टिक जेव्हा निसर्गात जातं,  पर्यावरणात जातं  त्यामुळे पर्यावरणाची किती हानी होते ?  हे आपण नक्कीच रोखू शकतो.....

  अ. फूड प्रोसेसर, वॉशिंग मशिन्स यांचे 95 टक्क्याहून अधिक टक्के पार्ट्स प्लास्टिक पासून बनतात.

 ब. आजकाल बाजारात मिळणारे टेफ्लॉन चे तवे हा पण एक प्लास्टिकचाच प्रकार आहे . अगदी घरोघरी टेफ्लॉनचे नॉन-स्टीक तवे दिसून येतात.

 क. आपल्याकडे 20 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वर बंदी आहे . परंतु इतर काही देशांमध्ये ही मायक्रोन साइज वरील बंदी वेगवेगळी आहे. बांगलादेशमध्ये 10 मायक्रोन होऊन कमी जाडीच्या सर्व पिशव्यांवर कडक बंदी राबविल्यानंतर कॉटन आणि ज्यूटच्या पिशव्यांचा वापर व मागणी तुफान वाढली.  दुकानातून पिशवी घेण्यापेक्षा आपापल्या पिशव्या घेऊनच दुकानात जाणे लोक पसंत करू लागले.

ड. स्कॉटलंड व इतर काही देशांमध्ये स्वयंपाक घरातील फर्निचर मध्येच प्लास्टिकच्या पिशव्या साठविण्यासाठी व त्यांच्या पुनर्वापरासाठी स्पेशल कप्पा ठेवलेला असतो.

 इ. बहुतांश युरोपियन देशांमध्ये प्लास्टिकचा कचरा विविध ग्रेड नुसार वर्गीकृत करून रिसायकलिंग ला पाठवला जातो . बिस्किटाच्या पुड्यांचे,  कॅडबरीजचे प्लास्टिकचे रॅपर्स एकत्र करून , विशिष्ट पद्धतीने विणून फॅशनेबल पर्सेस बनविण्याचे मोठे मार्केट अमेरिकेत आहे.

 फ. प्लास्टिकच्या पिशव्या पासून शोभिवंत फुले व इतर तत्सम गिफ्ट आर्टिकल्स बनवण्याच्या ही सोयीसुविधा परदेशात उपलब्ध आहेत....

प्लास्टिक निसर्गात फेकल्या जाण्यापासून रोखण्यासाठी  एवढेच करा.......

 १. कमीत कमी बॅग्स मध्ये जास्तीत जास्त सामान टाकून आपण घरी आणू शकतो . काही मॉल्स किंवा मोठे दुकानं एकच मोठ्या आकाराची पिशवी सर्व सामानासाठी देतात . दर तीन-चार वस्तूंसाठी वेगळी बॅग वापरण्यापेक्षा एकाच मोठ्या बागेत सामान आणावे.

२. सामान घरी आणल्यावर या बॅग आपण व्यवस्थित घडी करून , साचवून , गरजेनुसार , परत परत वापरू शकतो , व शेवटी त्या खराब झाल्यावर कचऱ्यात फेकण्या पेक्षा तशाच एखाद्या दुसऱ्या प्लास्टिकच्या पिशवी सर्व बॅगा जमा करून ठेवू शकतो.

३. अशा वापरून खराब झालेल्या,  फाटलेल्या पण एकत्र साठवलेल्या, सर्व बॅग आपण रिसायकलिंग साठी देऊ शकतो.

४. प्लास्टिकची सहज उपलब्धता , त्याचा लवचिकपणा,  आणि अगदी कुठल्याही आकार प्रकारात विविध तर्‍हेची \"रीसायकलेबल\" वस्तू घडवण्याची क्षमता , यामुळे प्लॅस्टिकला आपल्या आयुष्यातून हद्दपार करणे केवळ अशक्य आहे. म्हणूनच प्लास्टिकचा जबाबदारीने वापर व पुनर्वापर हेच आपल्या हातात आहे . पर्यावरणात प्लास्टिक जाण्यापासून रोखायचे असेल तर कचऱ्याच्या विघटना शिवाय व रिसायकलिंग शिवाय पर्याय नाही.


माहिती व फोटो -  साभार गुगल

(. सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)


( वाचकहो तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर आपले मत नक्की कळवा आणि मला फाॅलो करा)

🎭 Series Post

View all