Say It proudly that I am a loser ( टीम - व्हाट्स इन अ नेम )

This post is all about the depression reasons.

से इट प्राउडली आय एम अ लुझर 

©️ ऋषिकेश मठपती 

           सकाळचा चहा घेताना मला न्यूज पाहण्याची सवय आहे. म्हणून रोजच्या प्रमाणे न्यूज पाहताना एक बातमी मी पाहीली. '23 वयाचा मुलाची आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या...' हे बघून मी विचारात पडलो. इतक्या कमी वयात कोण कसा आपला जीव देऊ शकतो? त्यापेक्षा जास्त अजून एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे; तो म्हणजे कोणी इतक्या कमी वयात का म्हणून आपला जीव देईल?

           खोल वर विचार केला असता असं कळत कि त्या मुलाच्या आयुष्यात खूप मोठ्या समस्या असतील म्हणून त्याने हे पाऊल उचललं असेल. पण, तो एकटाच थोडी आहे कि ज्याच्या आयुष्यात समस्यांचा भडीमार असेल! असे खूप लोक आणि खूप मोठ्या लोकांच्या आयुष्यात हि समस्या असतातच. म्हणून ते आत्महत्या करतात का? हेच जाणून घेण्यासाठी मी इंटरनेट वर सर्च करू लागलो. मला ती माहिती बघून आश्चर्य वाटलं कि दररोज भारतात 384 जण आत्महत्या करतात .म्हणजे दररोज 384 जणांना वाटत कि आपल्या समस्येच समाधान करणार उत्तर नाहीये. अशी कोणती मोठी समस्या असेल कि ज्याच उत्तरच सापडत नाहीये. करिअर ?? प्रेम ?? का अजून कुठली पैश्याची समस्या ?? हि इतकी मोठी समस्या आहेत का कि आपल जीव घेऊ शकेल?

          मला तर वाटत नाही कि खूप मोठी समस्या आहेत जी आपली जीव घेऊ शकतात. मग का म्हणून हे लोक आपले जीव देत असतील? असे कित्येक प्रश्न माझ्या मनात येत होते. म्हणून मग मी खूप विचार करू लागलो. हि माझी सवयच आहे! एवढ्या समस्या तर माझ्याही जीवनात आहेत. पण, मला कधीही असले विचार मनात येत नाहीत.

          कोणताही व्यक्ती समाजात वावरत असताना खूप काही काळजी घ्यावी लागते. त्यातल्या त्यात जर ती व्यक्ती पुरुष असेल, तर समाजात वावरत असताना त्याला एक सकसेसफुल व्यक्ती म्हणून पुढे यावे लागते. का खरच हि एवढी मोठी समस्या आहे कि जीव द्यावा लागेल? खर सांगायचं झालं तर त्यांच्या आयुष्यात अश्या काही घटना किंवा परिस्थिती घडून गेलेली असते कि त्यात ते हारलेले असतात. त्या कोणत्याही घटना असू शकतात . पुरुषांबाबत म्हणायचं झाल तर प्रेमप्रकरण, करिअर किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षेत नापास झालेला असेल किंवा महिलेबाबत समाजातील वाईट घटक जे त्यांना त्रास देऊ पाहत असतात. अश्या कित्येक समस्या घडून गेलेल्या असतात. त्या समस्येतून मनात एक वेगळीच हारलेली भावना निर्माण झालेली असते. ती व्यक्ती ज्या कौटुंबिक वातावरणात लहानाची मोठी झाली असेल त्या वर अनेक बाबी अवलंबून असतात! तिथले वातावरण जर पोषक असेल तर तो सावरू शकतो आणि जर नसेल तर मग त्याच्या मनातील हारलेली भावना अजून वाढते. बाहेरून कितीही शांत वाटत असला तरी आतून मात्र तो दुखावलेला असतो. स्वतःला आयुष्यात अयशस्वी व्यक्ती म्हणून बघत असतो. पण, बाहेर मात्र तो शांत आणि यशस्वी होऊ पाहणारा व्यक्ती दिसत असतो. अश्या व्यक्ती हरल्या असल्या तरी त्यांच्या मनाला ते पटत नसत. ते विचार करतात कि जर आपण सांगितलं कि; ' मी अयशस्वी झालो. तर समाज मला कस बघेल? किंवा लोक मला कस बघतील?'

    लहान पणापासून आपण आपल्या बाबांना बघतो. त्यांच्यासारखं होऊ पाहतो. पण कधी हा विचार केलात का त्यांनी आपल्या जीवनात किती आणि कोणत्या परिस्थितीत यशस्वी झालेले आहेत. ते सुद्धा तुमच्या वयात असताना कित्येक चुका केल्या असतील, कित्येक अयशस्वी निर्णय घेतले असतील किंवा प्रेम प्रकरण जरी म्हणाल तरी आपले बाबा त्याच्यात यशस्वी आहेत का? हे त्यांच्याही आयुष्यात आलेला असेल. तरीही आपण त्यांच्यासारखा होऊ पाहतो. कोणताही निर्णय, कोणताही अयशस्वी पाऊल आपल्याला तोडून जाणारा असलातरी आपल्याला त्यातून चांगली बाब आपण घेतलं पाहिजे. ती बाब म्हणजे आयुष्य हे कधीही एकसमान नसत. कधी चढ, कधी उतार असत. हे मात्र नक्की कि आपल्या आयुष्यात चढ कम आणि उतार जास्त आहे. एक मात्र लक्षात ठेवा कि आपल्याला फक्त एकदाच चढ बघायचं आहे आणि ती चढ इतकी मोठी असावी कि ती एक भरारी होऊन जावी.

यात अजून एक मुद्दा मला वाटत कि अश्या घटनेला जबाबदार आहे. ते म्हणजे आपल्या कुटूंबाचे वातावरण कसे आहे? तुम्ही म्हणाल कि याचा काय संबंध? जर, एका व्यक्तीच जीवन बघितलं तर जन्मापासून ते मृत्यू पर्यंत कुटुंबाशी निगडित असतं. सुरुवात आई - बाबांसोबत होते आणि शेवट आपल्या नातवंडांसोबत! पण, कौटुंबिक वातावरणच सर्व काही जीवनाचे निर्णय घेऊन जाते. समजा, कि लहानपणापासून एक मुलगा फक्त अभ्यास, शाळा हे करत आहे आणि कुणाशी काहीही संबंध ठेवत नाही. जर, त्याच्या पुढच्या जीवनात त्याला एक अपयश भोगावं लागला तर त्याला सोसण्याची शक्ती त्याच्यात नसेल . मग एक्सामचा अपयश असोत किंवा प्रेमाचं अपयश असोत किंवा पैसेसंदर्भात कोणतही अपयश असोत. तो कुणालाही सांगणार नाही. भले त्याच जीव त्याच्यात जाईल. तो विचार करत असतो कि, 'का सांगू समाजाला कि मी अपयशी आहे, मी एक हारलेला व्यक्ती आहे .' हे विचार करून ते कुणाशी आपली समस्या सांगत नाहीत. मनात एक वेगळीच विचारप्रणाली चालू होते. सतत त्याच समस्येचा विचार त्यांच्या डोक्यात चालू होते. त्यांच्या मनाची संयम, मनाची शक्ती ते त्यात घालवतात. एवढंच नाही, तर मनाची राहलेली शक्ती बाहेरून आनंदात असण्याच्या नाटकात जाते . म्हणून तणावाखालील व्यक्तीचा शोध घेणे अवघड होऊन जात. समाजाला दाखवणारा एक मुखवटा आणि आतील भावना वेगळीच निर्माण झालेली असते. शेवटी ती भावना इतक्या टोकावर जाते कि आत्महत्येशिवाय वेगळा पर्याय त्यांच्यासमोर उरत नाही.

अश्यावेळी एकच उपाय असतो . जेंव्हा आपण अपयशी होतो तेंव्हा गर्वाने सर्वाना सांगायचं कि, ' हो.. आहे मी हारलेला ' ( Say it proudly ," I 'm a loser ") . माहिती आहे तसल्या परिस्थितीत बोलणं जरा अवघड असत. पण ते दुसऱ्याला बोलून वाटून घेऊ शकतो आणि दुसऱ्यांची सुद्धा जबाबदारी तेवढीच आहे कि दुसरे कोणीही त्यांच्यापुढे त्यांची समस्या सांगत असेल तर त्याला आधार देणं, त्याला समजावून सांगणं. जर त्या समस्येचा समाधान आपल्याकडे नसेल तर कमीतकमी त्यांना सहानुभवती देण्याचं काम करावं. हे करण का गरजेचं आहे, तर त्याने त्या व्यक्तीचे मन हलकं होण्यास मदत होत. 

आजची तरुणपिढी ' प्रेमप्रकरण ' हा मुद्दा खूप गंभीरपणे घेत आहे . १८ वर्ष पूर्ण झाल नसलं तरी त्याला प्रेयसी असते किंवा तिला प्रियकर असतो. जरी असलं तर त्यांच्यात खूप भांडण तंटे होत असतात. त्याच भांडणांमध्ये जर ते दोघे वेगळे झाले, तर दोघांच्या जगण्याच्या शैलीत बदल दिसून येतो. म्हणजे नीट खाणंपिणं न करण, रात्रभर रडणं, अभ्यासातून लक्ष भरकटणे. त्यांना समजवायला हवं कि प्रेम हि काळाची गरज नसते, ती एक भावना आहे ज्यात दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण न वाटता त्या व्यक्तीबद्दल काळजी वाटते. 

मी इंटरनेट वर पाहताना लक्षात आल कि महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त आत्महत्या होतात. हे बघून मला अजून आश्चर्य वाटलं. अयशस्वी होणं म्हणजे कधीही वाईट नव्हे. उदाहरण द्यावं म्हणाल तर महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मोठे व्यक्तिमत्त्व हि आपल्या काळात एक अयशस्वी पाऊल ठेवले होते. ठेवले होते म्हणण्यापेक्षा ठेवाव लागल होत. स्वराज्य ध्वज फडकत असताना त्यांच्यावर असली परिस्थती आली होती कि 40 पैकी 23 किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते. हे एक अयशस्वी पाऊल त्यांना ठेवावं लागलं होत. राजें व्यतिरिक्त बाकी कोणीही व्यक्ती असती तर मनातून खूप खचला गेला असता. पण, महाराज होते म्हणून ते पुन्हा स्वराज्यसाठी लढले आणि बाकीचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. ते जर त्या अयशस्वी निर्णयाला एक वेगळीच लक्ष्य म्हणून घेतले नसते तर कधीच वाढलं नसतं. असे खूप सारे व्यक्तींचा उदाहरण तुम्हाला मिळतील, जे जीवनात अयशस्वी होते पण ते पुन्हा परिस्थितीशी लढले आणि मोठे झाले. आयुष्यात फक्त आपण काम करत जावं. लक्षात ठेवा वेळ ही खूप बलवान आहे. आपली परिस्थिती नक्की बदलेल. फक्त मेहनतीने काम करावं आणि संयम दाखवून जगावं. जीवनात खूप सारे अयशस्वी दिवस येतील पण आपण फक्त एका यशस्वी दिवसाची वाट पाहावी.

लक्षात ठेवा अपयश हि यशाची पहिली पायरी आहे. कोण म्हणतं फक्त यश हे सेलिब्रेट केलं पाहिजे अरे कधीतरी अपयश सुद्धा करा सेलिब्रेट! पुन्हा कधीच त्याचा विचार न करण्यासाठी... कायमचं सोडून देण्यासाठी... हा त्यातून शिकलेल्या गोष्टी नाही हं! पुढच्यावेळी जेव्हा पुन्हा सुरुवात होईल तेव्हा अनुभवाची शिदोरी गाठीशी असेलच! एकदा विचाराची पद्धत बदलून बघा एक नाही अगणित मार्ग निघतील त्यातून बाहेर पडायचे! गरज आहे फक्त दुसऱ्या बाजूने विचार करायची. अरे असं एकही कुलूप नाहीये ज्याची चावी नाही... मग, अशी एक तरी समस्या असेल का ज्याचा उपाय नाही? फक्त स्वतःला समजायचं; "अरे उठ! तू हे नक्की करशील... एकदा पडलं म्हणून काय झालं?" आयुष्याच्या मैदानात तुम्ही तोवर हरणार नाही जोवर तुम्ही स्वतः खेळणं सोडणार नाही... काय मग विचार कसला करताय? करा अपयश सुद्धा मस्त सेलिब्रेट..... आणि उठून खेळा पुन्हा! 

*************************

कसा वाटला आजचा लेख? कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा एक शेअर कोणालातरी नवीन उभारी देऊन जाईल... धन्यवाद!