सावत्र नाही ती तर आपलीच भाग 6 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
रघुवीर समजूतदार होते त्यांना माहिती होत प्रियांका मुलांना छान सांभाळते. " मला पण थोड बोलायच होत. " ते म्हणाले.
" सांगा ना. " ती त्याच्या कडे बघत होती.
" सगळे तुझे लाडके झाले मीच राहिलो. आपला विचार कधी करणार. "
ती लाजली.
" आपण फिरायला जावू या का? आपल नात ही पुढे नेऊ."
"घरी कोण बघेल? मुल राहत नाही माझ्या शिवाय. आईंकडे बघाव लागेल." तिने सांगितल.
" मी अलका ताईला बोलवून घेतो. "
" निधीशी बोलाव लागेल. नाहीतर मुलांना ही घेवून जावू."
" ठीक आहे ठरवू. आज निधीला तिच्या खोलीत झोपव."
ती मुलांना जेवायला देत होती. त्या बरोबर रघुवीर सोबत रहायच तिला टेंशन आल होत. बाकीच्या लोकांसोबत तर केल एडजेस्ट, हे कस होईल. तसे हे चांगले आहेत.
" निधी बेटा आज दादा सोबत रहायच ह . "ती म्हणाली.
" हो आई. बाबा काम करत बसतात. लाइट चालू ठेवतात मग मला झोप येत नाही. सकाळी शाळा असते." निधी म्हणाली.
रात्री ती आवरून रूम मधे आली. रघुवीर आत टीव्ही बघत होते. त्यांनी उठून दार लावून घेतल. ती तीच आवरत होती. "झाल असेल तर इकडे ये प्रियांका."
ती जवळ जावून बसली.
" मुल झोपली का? "
हो.
" अनिकेत, निधी छान रहातात तुझ्या जवळ तू प्रेमळ आहेस. "
ती छान हसली.
"नुसती प्रेमळ नाही तर तू खूप सुंदर आहेस हुशार ही ."
"अहो तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला. मुलांना माझ्या वर सोपवल म्हणून हे शक्य झाल. "
रघुवीरने तिला मिठीत घेतल. दोघांनी सोबत वेळ घालवला.
सकाळी प्रियांका आवरत होती. अनिकेतचा फोन वाजत होता तो बोलत होता. आज मावशी भेटायला येणार आहे. त्याने सांगितल. दोघ मुल खुश होते.
रघुवीर काळजीत होते. सुमन चांगल वागत नाही. आता मुल प्रियांका सोबत चांगले वागत आहेत. तर ही का येते आहे ते समजत नाही.
मावशीने मुलांसाठी खूप खाऊ घेवून आली. दोघ मुल नुसते प्रियांकाची तारीफ करत होते. सुमन मावशीला राग आला. ते तिघे त्यांच्या रूम मधे बसलेले होते. प्रियांका किचन मधे कामात होती.
रघुवीर मुद्दाम लवकर आले. "मूल कुठे आहेत?"
"त्यांच्या रूम मधे आहेत."
ते तिकडे गेले.
"नवीन आई खूप आवडलेली दिसते आहे तुम्हाला अनिकेत निधी. मी काय सांगितल होत लक्ष्यात नाही का. निधी लहान आहे. अनिकेत तू ही त्या प्रियांकाच्या बाजूने झाला." सुमन मावशी दोघांना रागवत होती.
"आई चांगली आहे. जीव लावते. मला मदत करते. " अनिकेत म्हणाला.
"नाही सावत्र आई चांगली नसते. तिला बाळ होई पर्यंत ती तुमच बघेल. नंतर त्रास देईल. मारेल. चटके देईल. घराबाहेर काढून देईल. तुमचे बाबा ही तीच ऐकतात ना? "
हो. दोघ मुल घाबरले होते.
रघुवीर आत आले. सुमन मावशी घाबरली.
"काय खराब शिकवते आहे तू मुलांना. लाज नाही वाटत का? किती चांगली आहे प्रियांका. मुलांच किती करते. सुमन तू हे चुकीच करत आहे. मुलांनो मावशीच ऐकु नका. तुमची आई छान आहे ना."
"हो बाबा." दोघ मुल बोलले.
अनिकेत ही चिडला . "ती आई आमची आहे तिच्या बद्दल काही बोलायच नाही मावशी. "
" तुझा उद्देश काय आहे सुमन तो मला चांगल समजला आहे. मुलांना चुकीच्या गोष्टी शिकवते. वाईट वागते. नीघ आता. या पुढे या घराची पायरी चढायची नाही." ते चिडले होते.
ती गेली.
" मुलांनो मावशीने सांगितल ते ऐकायच नाही. अस छान रहायच. तुमची आई तुमच्या वर खूप प्रेम करते ना. तिला त्रास द्यायचा नाही. "रघुवीर त्यांना समजावत होते.
हो बाबा.
" अनिकेत निधी चला जेवायला. " प्रियांकाने आवाज दिला.
ते डायनिंग टेबल वर येवुन बसले. सासुबाई ही बाहेर येवून बसल्या . प्रियांका त्यांच्याशी बोलत होती.
" सुमन ताई कुठे गेल्या?" ती विचारत होती.
" मावशी गेली ती आम्हाला चुकीच शिकवत होती. बाबा तिला ओरडले." निधीने सांगितल.
सगळे गप्प होते. प्रियांका रघुवीर कडे बघत होती. "काय झालं?" तिने विचारल.
"काही नाही. त्या सुमनला इकडे येवू द्यायच नाही. "
"चला मुलांनो आज तुमच्या साठी काय केल आहे. पाव भाजी कोण कोण खाणार?" दोघ मुल तिच्याशी प्रेमाने बोलत होते.
सासुबाई, रघुवीर खुश होते.
"आई आम्ही पुढच्या आठवड्यात फिरायला जाणार आहोत. " रघुवीर सांगत होते.
दोघ मुल बघत होते.
"मुलांनाही नेणार आहोत."
ये.... मुल ओरडले. जेवण झाल. मुल त्यांच्या रूम मधे गेले. सासुबाई ही झोपल्या. प्रियांका रूम मधे आली. ती आवरत होती.
"खुश ना मग?" रघुवीर प्रियांका कडे बघत म्हणाले.
" हो मुलां शिवाय मजा नाही. "
" आमचा ही विचार करायचा तिकडे. छान वेळ घालवायचा. "
हो. ती लाजून म्हणाली.
"अहो तिकडून आल्यावर मी एक दिवस आईकडे जावून येईन."
हो जा.
"निधीला घेवून जाईन."
"हो जा. तुझ्या पुढे बोलायची माझी हिम्मत आहे का."
ती लाजून त्याच्या मिठीत शिरली." या लग्नाचा निर्णय बर झाल घेतला. चांगले आहेत हे. " ती विचार करत होती.
हे तीच कुटुंब होत. त्यात ती सावत्र नव्हती तर तिच्या मुलांची प्रिय आई होती. नवर्याची लाडकी बायको होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा