सावत्र नाही ती तर आपलीच भाग 4
©️®️शिल्पा सुतार
सकाळी प्रियांका नुकतीच आंघोळ करून आली होती . गुलाबी साडी शोभत होती. ती आरश्यात बघुन केस पुसट होती. रघुवीर समोर खुर्चीवर पेपर वाचत बसलेले होते. ते तिच्या कडे बघत होते. तिने त्यांच्याकडे बघितल. ती गडबडली. किचन मधे निघून गेली. पोहे केले. सासुबाईना नेवून दिले. ती त्यांच्याशी बोलत होती. रघुवीर आईला भेटायला आत आले. ती उठून उभी राहिली.
"तुम्ही दोघ फिरून या." सासुबाई म्हणाल्या.
रघुवीर प्रियांका दोघ गप्प होते. ती लाजली. "मी मुलांकडे बघते." ती पटकन किचन मधे निघून गेली.
"काय म्हणते आहे मी रघुवीर. ती नवीन नवरी आहे तिच्या काही अपेक्षा असतिल. तुम्ही दोघ फिरून या."
"हो बघू आई."
"बघू नाही. मनावर घे. "
" तू नाश्ता केला का?" त्याने मुद्दामून विषय बदलला.
"हे काय प्रियांका पोहे देवून गेली. माझ खावून होई पर्यंत ती थांबते. चौकशी करते. माझे पथ्य सांभाळते. व्यवस्थित गोळ्या देते. "त्या प्रियांका बद्दल खूप छान बोलत होत्या.
रघुवीर खुश होते. ते बघत होते प्रियांकाने लगेच सगळं सांभाळुन घेतल. ते बाहेर नाश्ताला येवून बसले.
आज निधीला शाळा नव्हती. ती प्रियांकाच्या मागे मागे होती. तिने त्यांना पोहे दिले. निधीशी ते बोलत होते." काय सुरू आहे निधी बेटा? खेळण पुरे झाल आता. रोज अभ्यास करायच."
"हो मी आई बरोबर करेन." ती म्हणाली.
प्रियांका आत चहा घ्यायला गेली.
"बाबा मला आई आवडते. ती सुंदर आहे."
" आईला त्रास द्यायचा नाही ह. तुझा दादा कुठे आहे." ते इकडे तिकडे बघत होते.
" त्याच खावून झाल आईने त्याला आधीच पोहे दिले होते."
प्रियांका चहा घेवून आली.
" मी निघतो. संध्याकाळी येईल. " त्याने सांगितल. तिने हो मान हलवली.
अनिकेत ट्यूशनला जावून आला. प्रियांका निधीने मिळून देवपूजा केली. घर आवरल. तिचा अभ्यास घेतला. रात्री ती स्वयंपाक करत होती. अनिकेत लक्ष देवून होता. त्याने नंतर गुपचुप येवून भाजीत तिखट मीठ टाकल. आता मजा येईल. आईला सगळे ओरडतील.
प्रियांका ताट करत होती. भाजी एवढी लाल का दिसते आहे. तिने चाखून बघितल खूप तिखट खारट होती. बापरे अस कस झाल? तशी ती सुगरण होती. ती काळजी करत होती. बर झाल कोणाला दिली नाही. नाहीतर सासुबाईंना ती आधी वाढत होती. काय करू? पण मी इतक तिखट टाकल नव्हत. तीने पटकन दुसरी भाजी करायला घेतली.
संध्याकाळी रघुवीर घरी आले. ते आईला भेटायला गेले. "आई जेवण झालं का?"
"नाही आता जेवेन."
" आज का उशीर झाला?"
"माहिती नाही .अजून प्रियांका ताट घेऊन आली नाही. मुलांचा अभ्यास वगैरे घेत असेल ."
तो किचन मधे आला. प्रियांका घाईने आवरत होती.
"आईच जेवण का झाल नाही अजून? तिला गोळ्या असतात." तो म्हणाला.
ती गडबडली. "हो देते. झालच आहे."
" मावशींना सांगून द्यायचा स्वयंपाक. तूच करायला हव अस नाही. सावकाश कर. हळू लागेल. " तो तिची धांदल बघत होता.
समोर भाजी झालेली दिसत होती. तरी ही का नवीन भाजी करते आहे." काय झालं? " त्यांनी विचारल.
तिने काही नाही मान हलवली.
त्यांनी भाजी चाखून बघितली.
"अहो नका खावू."
"इतकी तिखट खारट कशी काय. तू तर चांगला स्वयंपाक करतेस. "
ती काही म्हटली नाही.
" कोणी केल हे?"
"माझी चुकी झाली. " ती हळूच म्हणाली.
त्यांना समजल. नक्की अनिकेतने केल असेल. ते घाईने बाहेर जात होते. ती पटकन पळाली. त्यांना किचनच्या दारात थांबवल. अडवलं." अहो नका चिडू. नका बोलू काही."
" अनिकेतच काम आहे हे. बघतो जरा त्याच्या कडे. "
"असू द्या त्याच्या मनात माझ्या बद्दल राग आहे. त्याला प्रेमाने जिंकाव लागेल." ती म्हणाली.
"पण हे अस चांगल नाही. तो उद्या जास्त नुकसान करेल."
"लहान आहे तो आपण समजून घ्यायला हव. नाहीतर तो अजून चिडका बनेल. एक विनंती होती. तुम्ही त्याला रागवत जावू नका. मी बघते काय करायच ते. " प्रियांका काळजीत होती.
" ठीक आहे तू म्हणते तस. काही वाटल तर सांग. "
हो.
" आईंना ताट द्यायच होत. "
" हो दे मी नेतो."
सगळे जेवायला बसले. अनिकेत गम्मत बघत होता. त्याला वाटल तिखट भाजी खावून सगळे नवीन आईला ओरडतील. पण सगळे छान जेवत होते. त्याने भाजी खावून बघितली. भाजी खूप छान झाली होती. अरे अस कस झाल. तो प्रियांका कडे बघत होता.
" काय देवू अनिकेत बेटा?" तिने प्रेमाने विचारल.
"काही नाही." तो शांततेने जेवत होता. बाबा ही ओरडले नाही म्हणजे हिने कोणाला सांगितल नाही वाटत. चुकलं माझ. ही आई साधी आहे. मावशी का म्हणत होती सावत्र आई त्रास देते, मारते, चटके देते. तो जेवण झाल्यावर तिला मदत करत होता. आई सॉरी एवढच म्हणाला. तिला आणि त्याला समजल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा