Login

सावत्र नाही ती तर आपलीच भाग 3

सावत्र नाही ती तर खुप प्रेमळ आहे
सावत्र नाही ती तर आपलीच भाग 3

©️®️शिल्पा सुतार

अनिकेतच्या मावशीच स्वतःचं लग्न झालेलं नव्हतं. इकडची परिस्थिती चांगली होती त्यामुळे मुलांच्या नावाखाली तिला इकडे यायचं होतं. ती खूप स्वार्थी होती. पण रघुवीरने ते जमु दिल नाही. त्यामुळे तिचा जळफळाट होत होता. ती मुलांना वेड वाकड शिकवत होती.

बाहेर पूजेची तयारी झाली. प्रियांका छान साडी नेसली. तयारी सुरू होती. मुळातच सुंदर ती तयार होवुन अगदी छान दिसत होती. अलका ताई तिच्या सोबत होती.

अनिकेतची नजर चुकवून निधी तिच्या रूम मध्ये आली. प्रियांकाला तयारी करताना बघत होती.

"आई तू खूप छान दिसते. किती सुंदर साडी नेसली आहेस." ती लाजून म्हणाली.

तिने निधीची तयारी करून दिली. पापी घेतली. "चल आपण बाहेर जाऊ. तू पण छान दिसतेस माझ बाळ."

बाहेर गुरुजी आलेले होते. रघुवीर येऊन बसले होते.

प्रियांका आतून आली. तिच्या सोबत निधी होती. रघुवीर बघत होते प्रेमळ आहे ही. त्यांना खूप छान वाटल. प्रियांका निधी अगदी सारख्या दिसत होत्या. गोर्‍या पान. दोघी खुश होत्या.

प्रियांकाच रूप त्यांच्या नजरेत भरल होत. त्यात तीला हिरवी लाल साडी शोभत होती. हातावर मेहेंदी बांगड्या छान दिसत होत्या.

"चला जोडीने पूजेला येवून बसा." गुरुजींनी आवाज दिला.

प्रियांका त्याच्या बाजूला बसली. निधी अजूनही तिच्या जवळ होती.

पूजा सुरू झाली.

"हाताला हात लावा." गुरुजी म्हणाले.

तिने तिचा सुंदर हात त्याच्या हाताला लावला. तो खुष होता. पूजा झाल्यावर दोघांनी मोठ्यांचा नमस्कार केला. सगळ्यांना आवडली होती ही जोडी.

नंतर ती खूप कामात होती. सगळ्यांना जेवायला वाढलं. जेवण झाल. ती आत बसलेली होती. अलका ताई तिच्या सोबत होती. निधी ही. रघुवीर आत आला ती सावरून बसली.

"ताई मी जरा ऑफिसला जावून येतो." प्रियांकाला सांगायच होत. पण त्याने बहिणीला सांगितल.

त्याने तिच्या कडे बघितल. ती खाली बघत होती.

"मी थोड्या वेळाने निघते." अलका ताई म्हणाल्या.

"थांबली असती ताई."

"येईन परत. आता तुम्ही जोडीने या."

"जाण्याआधी अनिकेतशी थोड बोलून घे. तो विचित्र वागतो आहे ." रघुवीर काळजीत होते.

हो.

अलका ताई अनिकेतच्या खोलीत गेली. "मी निघते बेटा."

" आत्या थांब ना. इथे बोर होत. "

" मला जास्त दिवस राहता येणार नाही. नीट रहा .आपल समजून आई सोबत वाग ." त्या म्हणाल्या.

"कोण आई?"

" प्रियांका. अस करु नये बेटा ."

"माझ्या कडून होणार नाही. ती माझी आई नाही. "

" ती चांगली आहे. थोडा बदल झाला आहे बेटा. एडजेस्ट करायच नीट वागायच."

"तीने आल्या आल्या कांड केल. बाबा मला रागवले." अनिकेत चिडला होता.

"तिच्या मुळे नाही तुझ्या वागण्या मुळे रागवले ना. " अलका ताई म्हणाली.

"आत्या तू ही त्या टीम मध्ये आहे का? जा काही बोलू नकोस. "

" नाही मी खर ते सांगितल. हे बघ बेटा आपल्या वर्गात नवीन मुल येतात आपण त्यांना आपल्यात सामावून घेतो ना. उलट ते कधी प्रिय होतात ते समजत नाही. ही पण चांगली आहे. आपल्या घरी नवीन आहे. एक चान्स दे तिला. नीट वागत जा. तिने तुम्हाला त्रास दिला तर मी आहे ना. मग मी तिला सोडणार नाही. पण आधी बघाव लागेल ना. कशी वागते ती. " अलका ताई खूप समजावत होत्या.

" मला काही बघायच नाही. ती नको म्हणजे नको. " तो हट्टी होता.

" तु ठरव कस वागायचं ते. तू मोठा आहेस. " अलका ताई घरी निघून गेली.

आता घरात प्रियांका, दोघ मुल सासुबाई होत्या. संध्याकाळी मावशींनी स्वयंपाक केला. भाजी प्रियांकाने केली. सासुबाईंच ताट घेऊन ती रूम मधे गेली. ती तिथे जरा वेळ बसली. त्यांच जेवण झालं. तिने त्यांना गोळ्या दिल्या. त्या खुश होत्या." चव आहे तुझ्या हाताला. सुखी रहा."

निधी आणि अनिकेतला तिने जेवायला दिल. तेव्हा त्याला समजल भाजी प्रियांका करते. तो पटापट जेवून रूम मधे निघून गेला.

"आई मी तुझ्या सोबत राहू का?" निधी तिच्या जवळ आली.

"हो. पण आधी गोड पापी दे. " ती खुश होती.

"झोप येते."

"चल." ती तिला घेवून आत गेली. तिला झोपवल. तीचा पण डोळा लागला. रघुवीर आला. आईच्या रूम मधे गेला. त्या खुश होत्या. प्रियांकाची तारीफ करत होत्या. "चांगली आहे तुझी बायको. आज तिने भाजी केली. मुलांच ही नीट आवरते. "

रघुवीर अनिकेतच्या रूम मधे गेला. तो अभ्यास करत होता. त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ते रूम मधे आले.

प्रियांका निधीला घेवून झोपलेली होती. कस काय उठवू? जेवली की नाही माहिती नाही. तो बाहेर आला.

मावशी ताट करत होत्या. दोन ताट होते. त्याने त्यांच्या कडे बघितल.

"मॅडम जेवल्या नाहीत."

"उठवा तीला."

मावशी निधीला उठवायला गेल्या. ती बाहेर आली. त्याला बघून गडबडली. पटकन आवरायला घेतल. त्याच ताट केल. ती उभी होती.

"बस. तुझ ताट कर." त्याचा आवाज आला.

"मी नंतर बसते. तुम्हाला वाढते." ती म्हणाली.

"नाही. मी घेईन हव ते."

तीने तीच ताट केल. ती हळू हळू जेवत होती.

" करमत ना इथे?" त्याने विचारल.

हो.

"काही वाटल तर सांगत जा. मोकळ रहा."

हो.

जेवण झालं. ती आवरत होती. नंतर ती आत येवून निधी जवळ झोपली. तो बाहेर बसलेला होता. थोड्या वेळाने तो आत आला. त्या बाजूला झोपला.


🎭 Series Post

View all