Login

सावित्रीचा वड भाग 3

Story Of
सावित्रीचा वड भाग 3


अविनाश ने आपले ओळखीचे सोर्स अगदी पणाला लावले होते. आपल्या देशात त्याचे सोर्स नक्की यशस्वी ठरले असते पण ही अमेरीका आहे.आणि तेथील असलेले काही कडक नियम आणि बहिणीची काळजी त्याच्या डोक्याला खिंडार पाडत होते.

फोन बंद करून एका आलिशान बंगल्यात सोफ्यावर बसलेली एक 60वयाची वयस्कर व्यक्ती मोठ मोठ्याने हसायला लागली. भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे पाहून ती व्यक्ती गडगडाटी हसत होती..

"काय मग मनोहर राव,,,,नाही,,नाही,,, मण्या,,, हा हा हा हा,,,आता तुझ्या घरादाराची राखरांगोळी होईल रे,, मित्रा तुला दिलेली धमकी मी आज खरी करतोय,,,फक्त थोड्या दिवसात तुझ्या घरादाराला मी खिंडार पाडेल,,,तू केलेल्या एवढ्याशा चुकीची शिक्षा तू मरेपर्यंत तुला आणि तुझ्या मुलांना भोगायला नाही लावली तर हा नावाचा बाजी नाही बाजी..!"

बाजीराव देशपांडे आणि मनोहर पाटील हे दोघे लहानपणापासून चे जिवलग मित्र अगदी एका ताटात खाणारे शाळेला दोघेही एकाच वर्गात होते बाजी नेहमी मास्तरांचा मार खायचा तर मन्या शबास्की हे दोघे मित्र मनोहर उर्फ मन्या आणि बाजीराव उर्फ बाजी दोघांनी एकमेकांना ही नावे दिली होती.घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यात मन्याचे बाबा तो वर्षाचा असतांनाच देवाघरी गेलेले आई शेतमजुरी करायची घरची गुजराण तिच्या मजुरीवर आणि घरातल्या एका दुभत्या म्हशी च्या दुधावर चालायची. बाजीचे आई वडील दोघेही होते बाबा रोज मजुरीवर जायचा आणि आई सावकाराच्या घरात मोलकरीण म्हणून काम करायची. मन्या एकुलता एक असल्याने तो गावातल्या एका हॉटेलात सकाळी सात ते दहा आणि संध्याकाळी पाच ते नऊ काम करायचा दहा ते पाच त्याची शाळा असायची.तसा बघायला गेलं तर बाजी पेक्षा मन्या खूप हुशार होता.आणि कष्टाळू देखील.तर बाजी अत्यंत आळशी मुलगा सकाळी उशिरा उठायचा अजिबात एका कामाला हात लावणार नाही पोठभर खायचं आणि दहाच्या ठोक्याला शाळेत जाऊन बसायचं. अजिबात अभ्यासात लक्ष नाही . सावकाराची मुलगी मालती देखील त्याच्या वयाची त्याच्या वर्गातच बसायची.बाजी दिसायला थोडा सावळा काळेकुट्ट डोळे ,पसरट नाक, मोठे ओठ,आणि भक्कम भरलेली शरीरयष्टी त्याच्या उलट मन्या दिसायला चुणचुणीत,गोरा वर्ण, नाकेल नाक, आणि काळे पाणीदार डोळे जणू एखादा राजकुमार भासायचा.

बालपण झरझर निघून गेलं बघता बघता दोघेही दहावीत आले. बाजी अभ्यासात जेमतेम होता.अजिबात पुस्तक उघडतं नसे.त्यामुळे तो मॅट्रिक पास होईल की नाही याची चिंता त्याच्या आई बाबाला नेहमी सतावत राही.त्यांना रोजच बाजीची काळजी असायची.पण कितीही समजावून सुद्धा बाजी अजिबात लक्ष देत नसे. मन्याच हे वर्ष खूप मेहनती च होत.तरीही तो कधीच कंटाळला नाही उलट तो नव्या जोमाने अभ्यासाला लागला. हॉटेलातले काम देखील तो न चुकता करायचा.घरी जाऊन रात्री जेऊन रोज बारा वाजेपर्यंत कंदीलच्या उजेडात अभ्यास करायचा.त्याच ते चाललेलं कष्ट नियतीला बघवल नसावं.

त्याची आई अचानक आजारी पडली जणू अंथरुणाला खिळली. बिचाऱ्या पोराने हॉटेल मालकाकडून जादा पैसे मागून आईचं दवा पाणी सुरू ठेवली आई बरी होईल हा त्याचा विश्वास फोल ठरला अन् एका रात्री ध्यानी मनी नसताना त्याची आई सुधा या जगातून निघून गेली.

आधीच दारिद्र्याचे चटके सहन करता करता बिचारा पूर्ण खचून गेलेला मनोहर आज आई बापाविना पोरका झाला . काही दिवस बाजीच्या आई वडिलांनी त्याला आपल्या घरी ठेऊन घेतलं.खाऊ घातलं.पणं आधीच दुःखात डुबलेल्या मनोहर ने आपले हॉटेलात ले काम चालूच ठेवले.त्यातून तो हॉटेल मालकाचे उसनवार घेतलेले पैसे फिटवत होता.त्याचबरोबर बाजीच्या घरीही तो चार पैसे देत होताच.

एका रात्री लघुशंकेसाठी तो उठला असताना त्याच्या कानावर बाजीच्या आई बाबांचे शब्द पडले.अन् तो आपले अश्रू पुसण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला.पणं कसं आहे ना दुसऱ्याच्या माराचे घाव आपण सहन करू शकतो पणं शब्दाचे घाव नाहीं सहन करू शकत. कारण बाजी चे बाबा बाजीच्या आईशी भांडत होते.

" त्या पोराला या घरातन बाहेर काढायचं म्हणजे काढायचं "


"आव ना आई ना बाप बिचार एकटं कसं राहील"


"ते मला काय माहीत नाही उद्या हेच पोरग आमच्या मनगुटीवर बसलं म्हणजे "


" अजून महिनाभर राहू द्या मग बघू त्याची व्यवस्था कुठ होते का ते शाळेचं पोर दिवसभर शाळा रात्री उशिरा दमून येत कामाचं पैस बी देतं. दोन चार महिन आसरा देऊ की आपुन"


"ते काय मला माहित नाही उद्याच्या उद्या त्या पोराला इथन बाहेर काढायचं सांगून ठेवतो.."

"आव ऐकून तर घेवा,,,अजुन महिनभर ठेऊन घेऊ आणि मग त्याच्या घरात त्याला पोहचवू त्याच्यामुळ आपल्या पोराचा बी अभ्यास होईल अन् त्याला बी आधार होईल."

"तुला सांगितलं तेवढं कर लई पुढं बोलू नकोसxxxxx"

एक अशिल्ल शिवी हासडली आणि बाजींच्या बाबाने बाजींच्या आईला मारायला सुरुवात केली.बिचारी रडत होती गयावया करत होती.अन् हा बाजी असा काही झोपला होता आपला बाप आपल्या आईला मारतोय याची जरा ही त्याला कल्पना नव्हती.

इथे रडून भागून अंगणातल्या कट्ट्यावर मनोहर केंव्हा झोपी गेला त्यालाही समजले नाही. सूर्यकिरणे तोंडावर येताच त्याला जाग आली .तो उठला गुराची शेण काढून तोंड धुवून तो घरात गेला. जेंव्हा पासून तो इथ राहायला आला होता तेंव्हापासून गूराची शेण तोच काढायचा. त्यांना पाणी चारा घालून अंघोळ करून सात वाजता कामावर जायचा. तिथे दहा वाजता काहीतरी खाऊन मग शाळेत जायचा. दुपारची भाकरी बाजी घेऊन यायचा परत रात्री हॉटेलात जेऊन घरी यायचा. बिचाऱ्याला एक वेळच जेवण द्यायला देखील बाजींच्या बाबाला जड जात होत.त्याचा पगार खायचा ते राहील बाजूलाच तरीही हा मुलगा आपल्या घरात नको म्हणून रोज बायकोला मारहाण करायचा बिचारी बाजींच्या आईला मनोहरच खूप वाईट वाटायचं. पणं मनोहरला बाहेर काढण्यासाठी तीच मन धजत नव्हतं…!


"मावशी मी जातो हॉटेलात"


"आर पोरा चहा देती थांब"


"नको मावशी ,,येतो मी"

" मन्या काय झालं पोरा आज चहा बी नको झालाय तुला बाजी काय बोलला व्हय र"

"नाही मावशी काय बी नाही हॉटेलात पितो आता आणि आजपासून दुपारची भाकरी बी नको देत जाऊ"

"मन्या ,,,खर खर सांग आज तुला काय झालंय पोरा?"

डोळ्यात साठलेल्या आसवांना पुसत तो जड अंतकरणाने बोलला

"मावशी मी आजपासून माझ्या घरात राहायला जातोय रात्री तिकडचं राहीन. "

"पर का?"

"माझ्यामुळ रोज काका तुला मार मारतोय बाजी झोपत असेल पणं मी नाही ग झोपत काका तुला जेंव्हा मारत असतो ना त्याची कळ मला येते आहे..नको ग मावशी माझ्यासाठी भांडत जाऊ मी राहील एकटा माझ्या झोपडीत. पण रोज माझ्यामुळे तुला मी मार खाऊ देणार नाही."

"केवढा हुशार झालास पोरा तुझ्यासारख्या हिऱ्याला देवानं इतक का दुःख दिलं असल तू न मन्या माझ्या पोटी जन्माला यायला हवा होतास "

"आज आई बापाविणा मी पोरका झालोय मावशी पणं तुझ्या रुपात आज मला दुसरी आई मिळाली.त्या वरच्या देवाच लई उपकार आहेत माझ्यावर इत जाइन कधीतरी भेटायला काकाला सांग गेलो म्हणून काय चकल असल तर माफ करा.."

"मन्या,,, "बाजींच्या आईला भरून आलं तिने त्याला पोटाशी कवटाळले.किती ही केलं तरी तिला त्याला सोडायचं नव्हत पणं नवऱ्याचा स्वभाव पाहता त्याला सुरक्षित ठेवणं हेच तिला योग्य वाटलं. दारू पिऊन बिचाऱ्याला आपला नवरा मारेल याची भीती तिला खूप दिवसापासून वाटत होतीच.पणं एकट्याला त्या सून सान झोपडीत ठेवणं तिला पटत नव्हतं.

"पोरा रातच्याला बाजीला झोपायला पाठवत जाईल मी नको काळजी करू"

"मावशी नको मी राहील आता एकटाच तिथं नाही वाटणार भीती परमेश्वर असेल माझ्या पाठीशी"

"आर पोरा नको असा हट्ट करू "

"मावशी हा हट्ट नाही ग ह्याला स्वावलंबन म्हणतात"

मनोहर तिच्या पाय धरले आशिर्वाद घेतला आपलं चार कपडे शालेय साहित्य घेऊन तो घराबाहेर पडला
आपल्या भविष्याची वाट चालण्यासाठी…!


कथेत मी भूतकाळ सांगत आहे काय काय घडल ते..मनोहर आणि बाजी याचे वैर काय आहे हे मी सर्वासमोर उघड करत आहे ही दीर्घ कथा आहे त्यामुळे अजुन खूप वळणे येणार आहेत ती समजून घेण्यासाठी पुढे वाचत राहा …


©® सविता पाटील रेडेकर
नेसरी

🎭 Series Post

View all