सावित्रीचा वड पर्व दुसरे भाग 1

शोध खऱ्या सावित्रीचा
सावित्रीचा वड पर्व दुसरे भाग 1


"मला दूध नकोय मम्मा."

"बेटा,जर तू दूध पिणार नाहीस तर आपण आत्तूकडे जायचं कॅन्सल."

"मम्मा, प्लीज ना मला आत्तूकडे जायचं आहे.शिवला मी प्रॉमिस केलं आहे ना.आज मी नक्की येईन.मग त्याला वाईट वाटेल तो नाराज होईल ना ?"

"आज्जी तू सांग ना मम्माला?."

"मी काय सांगू तुझ्या मम्माला? बाळा तुझी मम्मा ना तुझ्यासोबत मलाही घराबाहेर काढेल..तुझ्या मम्माला मी घाबरते माहित आहे ना निश तुला?"

"आज्जी तू मम्माला घाबरते.?"नीश तोंडावर हात ठेवून हसू लागला.

तर हा आहे आपल्या लाडक्या निशा आणि अविनाश यांचा मुलगा नीश वय वर्ष आठ दिसायला निशावर गेलाय ,तर डोळ्यात अविनाश वर. आपल्या आत्तूकडे अर्थातच आपल्या साविकडे जाण्यासाठी हट्ट धरून बसला आहे.आणि आपल्या आईने नकार दिल्यावर आपल्या आज्जिकडे म्हणजेच मेघना यांच्याकडे तक्रार करतो आहे.

वाचून आश्चर्य वाटलं ना?मेघना यांना गोळी लागली होती.त्यातच त्यांनी डोळे मिटले होते.अर्थातच त्या बेशुद्ध झाल्या होत्या. पाहूया नेमकं पुढे काय झाले?


भूतकाळ…..

हॉस्पिटलला अंबुलन्स पोहचली. ताबडतोब मेघना यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं.त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू झाली. छातीच्या वरच्या भागात अर्थातच खांद्याच्या मधोमध गोळी घुसली होती.तब्बल दोन तास ऑपरेशन चालू होतं. मनोहर रावांची शक्तीच निघून गेली होती.आपली सहचारिणीची झालेली अशी दशा पाहून खरतर मनोहर रावांची अवस्था जीव असूनपन नसल्यागत झालेली होती.

दोन तासांनी डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले.त्याच्याभोवती अख्खी फॅमिली जमली.मेघना याची तब्बेत कशी आहे?हाच प्रश्न सर्वच्या चेहऱ्यावर होता.

"काळजी करण्याचं कारण नाही ऑपरेशन यशस्वी झालं आहे.मिस्टर पाटील माझ्या केबिनमध्ये याल का? तुमच्याशी थोड बोलायचं आहे."

इथे मनोहर सगळी ताकत गळून बसले होते.त्यांना इतका मानसिक धक्का बसला होता की,डॉक्टर नेमके काय बोलले हे समजायला उशीर लागला. पण त्याची ती कंडीशन बघून अवि डॉक्टरांच्या केबिन मध्ये निघून गेला.

"अरे अवि, मी तुझ्या बाबांना बोलावलं होत?"

"हो अंकल पण, बाबाची तब्बेत ठीक नाहीय म्हणून मी आलोय."

"ठीक आहे बैस."

"थँक्यू अंकल,आई ठीक आहे ना ?"

"हो, त्या आऊट ऑफ डेजर आहेत.काळजी करायची गरज नाही पण.."

"पण, काय अंकल?"

"आईला श्वास घेताना त्रास होईल.काही दिवस खूप जपावं लागेल.कोणताही ट्रेस येऊ द्यायचा नाही.आणि हो,काही दिवस सगळ्यापासून त्यांना दूर ठेवा."

"नक्कीच!अजुन काही त्रास नाही ना तिला?"

"नाही अजिबात टेन्शन घेऊ नका.आणि हो मनोहरला खूप मोठा धक्का बसला आहे.त्यालाही थोडे दिवस विश्रांती दे.कामाचा लोड अजिबात त्याच्याकडे देऊ नकोस."

"ठीक आहे अंकल,आम्ही आईला भेटू शकतो का.?"

"अजुन त्या शुध्दीवर आलेल्या नाहीत.त्यांना दुसऱ्या रूममध्ये शिप्ट केलं जाईल.मग भेटू शकता. पण एका वेळी एकट्यानेच भेटा.सर्वजण भेटायला गेलात तर पुन्हा त्या ट्रेस घेतील.आणि त्यांना त्रास होईल."

"हो अंकल."

अवि डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आला.तसा सगळ्यांनी त्याला घेराव घातला. अविने सगळ्यांना डॉक्टर काय बोलले हे सांगितलं आणि मनोहररावांच्या जवळ जाऊन बसला.

"बाबा.."

"हं "

"बाबा,आईचे ऑपरेशन झाले आहे.टेन्शन घेण्यासारखे काहीही झालेले नाही.तुम्ही जर असे शक्ती गाळून बसलात तर आईला धीर कोण देणार?"

"हम्म"

"मला कळतं आईला गोळी लागल्याचा तुम्हाला किती त्रास होतोय, पण आईचे सगळ्यात जास्त प्रेम तर बाबा तुमच्यावर आहे. तुमची ही अवस्था तिला अजिबात बघवणार नाहीय.बाबा तुमच्यावरच्या प्रेमाखातर तुमच्यावरचा वार तिने स्वतःवर झेललाय."

"हो बाळा,मी तिच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली.आणि हेच माझ्या साविच्या जीवावर बेतले होते.पहिल्यांदा माझ्याकडून तिचा विश्वास घात झालाय.अवि,मेघना मला माफ करेल का रे?"

"हो, बाबा आई जास्त काळ तुमच्यावर रागावून नाही राहू शकत.बाबा याबाबतीत तुम्ही माझ्याशी एकदा तरी बोलायला हवे होते.मी काहीतरी पर्याय शोधला असता ना?आपल्या बच्चाची आवस्था जेंव्हा मी पाहिली तेंव्हा माझ्या पायातली शक्तीच निघून गेली होती. इकडे तुम्ही आणि तिकडे बच्चा दोघेही बेडवर झोपून होता. आईच तुमच्या दोघांवर ही खूप प्रेम आहे.उगाच तिला याचा त्रास नको व्हायला म्हणून मी बिझनेस मीटिंग चे कारण पुढे करून अमेरिका गाठली.जर का मी सत्य सांगितल असत तर आईलाही धक्का बसला असता अन् सर्वजण असे गळून गेलेले मला पाहवले नसते.म्हणून मी ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. पण आई हुशार निघाली.तिने मी न सांगताही सर्व माहिती कधी काढून घेतली हे मला सुद्धा कळलं नाही."

"अवि,तू आपल्या कुटुंबामागे एखद्या पहाडासारखा उभा होतास म्हणून तर एवढ्या मोठ्या संकटातून आपण सहिसलामत बाहेर पडलोय."

"हो बाबा पण.."

"बाबा अजूनही आपल्या बच्चाला पुढच्या महिन्यात पुन्हा अमेरिकेला जावे लागेल.कारण अजुन तिची चौकशी पूर्ण व्हायची आहे."

"मग आता?"

"तोवर तुम्ही पूर्णपणे ठीक व्हायला हव आणि आईकडे लक्ष द्यायला हवे.कारण मी बच्चा सोबत असणार आहे."

"हो बाळा,नक्की मेघणाची काळजी घेईन मी"

"थँक्यू बाबा."

"अवि, आपला बच्चा कुठे दिसला नाहीय कुठे आहे ती?"

एका कोपऱ्यात गुडघ्यात डोकं खुपसून रडत होती सावि.

"बच्चा ssss " मनोहरनी हाक दिली.तशी ती मनोहरना बिलगली.दोघा बाप लेकानी तिला मिठीत घेतलं.आता भावाच आणि बाबाचं तिच्या भोवती सरक्षन कवच होत.

क्रमशः…

सविता पाटील रेडेकर
नेसरी.






🎭 Series Post

View all