सावित्री कशी तू

Savitri


सवित्री कशी तू

ती आपल्या मुलाला घेऊन वट पुजायला निघाली.. सोबत सगळी सागर संगीत तयार करून घेतली...हळद कुंकू, दोरा, अगरबत्ती..फुले...वाट...कापूर...फळ पाच प्रकारचे...सौभाग्य लेणे....आणि तो पैठणी शालू नसली होती जो किती तरी मिनत्या आणि विनवण्या करून करून ,आणि पैसे बाजूला ठेवून..काही पैसे आई कडून घेऊन...हप्त्यावर तो पैठणी शालू घेतला होता.......त्यात त्याने त्याचे पैसे टाकू म्हणून सांगितले होते पण त्याने काहीच पैसे टाकले नव्हते...

दिवसभर उपाशी राहून ते वट सावित्रीचे व्रत तिने पूर्ण करण्याचे ठरवले होते...


मुलाला ही ह्या पूजे बाबत माहिती व्हावी म्हणून त्याला ती सकाळपासून त्याची महती सांगत होती...हे व्रत का करावे...कोणी करावे...कोणासाठी करावे... मग नवऱ्याला आयुष्य मिळते...तोच आपल्या पुढील साथ जन्मासाठी नवरा म्हणून मागावे... हे सगळे सांगत असतांना मुलगा मात्र मन लावून ऐकत होता... आणि त्या आईच्या सांगण्यात खरे पणा आणि बाबांबद्दल तिचे अतोनात प्रेम हे दिसत होते त्याला... आपली आई किती प्रामाणिक आहे... तीच फक्त बाबांवर प्रेम करते पण आपला बाबा तर इतर कोणत्या तरी बाई सोबत रहातो...त्याला आई आवडत नाही म्हणून तो तिच्या सोबत रहात नाही...मग का आई ह्या अश्या माणसाला सात जन्मासाठी मागत असेल..?

आई ," वेद अरे कसला इतका विचार करतोस तू, तुला काही हवंय का ,काही सांगायचे आहे का..? आता आपण ह्या झाडाला फेरे मारले की झाली आपली पूजा...मग तुला आवडते ते फळ घे..मी तुला काहीच म्हणणार नाही हो "

वेद..."आई तू ही पूजा करूच नकोस, कारण बाबा जर आपल्या सोबत रहायलाच तयार नाहीत ,आणि त्यांना तो परिवार आणि ती बाई आवडत असेल तर तू का अश्या नवऱ्याला सात जन्मासाठी मागत आहेस...ते तर तुझी सात कधीच देत नाहीत मग का तुला ते पुढच्या जन्मात ही सोबत हवेत...आणि ती बाई पण तर बाबांसाठी पूजा करतच असेल...म्हणजे पुन्हा पुढच्या सात जन्मात ती तुझ्या आणि बाबांच्या मधात येईल..आणि बाबांचे प्रेम तुला मिळण्याचा ऐवजी पुन्हा पुन्हा तिलाच मिळेल..नको नकोच करू ही पूजा..नको मला पुन्हा ते बाबा..हवे तर मी तुला सात जन्म माझीच आई म्हणून मिळण्यासाठी मी फेरे मारेन...पण आपल्यात बाबा नकोत ..ते कधीच नकोत.."

तिला मुलाच्या बोलण्याची घनता कळली होती..आता किती केले तरी सत्य काय आणि दांभिक पणा काय हे समजण्याचे त्याचे वय होते.. त्याला अजून खोटे सांगून त्याचे विचार परिवर्तन करणे शक्य नव्हते... तो मोठा होत होता...मोठे विचार करत होता... त्याला आईची परिस्थिती उमगली होती....तिने पूजा तशीच ठेवली...पण मुलासोबत फेरे मारले.... देवाला म्हणाली मला सात जन्म हाच मुलगा मिळो..