
अमेय आणि रेवाचे लग्न झाले. लग्न तस साध्या पद्धतीनेच झालं. कारण अमेयच हे दुसरं लग्न होत. त्याची बायको श्रुती ही एक मुलगा झाल्यावर मुलाला सोडून तिच्या x बाॅयफ्रेण्ड बरोबर गेली. अमेय लग्नाला तयार नव्हता पण मुलाकडे बघून त्याच्या आईने त्याला तयार केले.
रेवाचे हे पहिलेच लग्न. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. तिच्या पाठीवर दोन बहिणी होत्या. त्यांच्या लग्नाची अजून जबाबदारी होती. मुलाकडच्यांना कसलीच अपेक्षा नाही आणि घराणं मोठं म्हणून रेवाच्या वडीलांनी रेवाच लग्न अमेयबरोबर केले.
लग्न झाल्यावर रेवा घरात जरा घाबरूनच वावरू लागली कारण एवढं मोठं घर सर्वजन शिकलेले. कोण काही म्हणेल काय? असे तिला वाटत होते. तसेच ती पार्थची म्हणजेच अमेयच्या मुलाची सुध्दा योग्य ती काळजी घेऊ लागली.
आता हळूहळू रेवा घरात रमून गेली. तिला सगळे आपलेच वाटू लागले. तिच्या मनातील भीतीही थोडी कमी झाली होती.
एक दिवस शेजारच्या कदम काकू रेवाच्या सासूकडे आल्या.
कदम काकू “काय पाटील वहिनी येऊ का?”
रेवाची सासू “अरे कदम वहिनी तुम्ही या ना.”
काकू “नाही म्हटलं काय चाललंय ते बघू.”
रेवाची सासू “काही नाही हो. आता रिटायरमेंटला नुसता वाचन आणि आराम. दुसर काय करणार?”
काकू “ते पण बरोबरच आहे की आणि आत्तापर्यंत सगळं केलयच की. आत्ता म्हतारपणी पण काय काम करायचं आहे.”
रेवाची सासू “तसे काही नाही. सकाळी थोडी मदत करते मी. अगदीच बसून वगैरे काढत नाही बाई.”
काकू “बरं ते राहू दे. मला सांगा काल रेवाचा इतका का आवाज येत होता?”
रेवाची सासू “काही नाही हो. आमचा पार्थ काही केल्या ऐकतच नव्हता. मग तिने थोडा आवाज वाढवला. तेव्हा कुठे शांत झाला. खूपच हट्टी झालाय तो.”
काकू “काय? पार्थला ओरडल आणि तुम्ही शांतच बसलात. मी तुमच्या जागी असते तर अस ओरडू दिलं नसतं. बिचारा लहान आहे अजून त्याला काय कळतंय?”
रेवाची सासू “अस का बरं? तुम्ही तुमच्या मुलाला कधी ओरडलं नाही का? मी तर माझ्या अमेयला खूप मारले लहानपणी.”
काकू “अहो रेवा ही सावञ आई आहे. तिला पार्थ बद्दल काय माया असणार? ती उद्या मारायला पण मागेपुढे बघणार नाही. तुम्ही तर सख्खे आहात. तुम्ही का बर ऐकून घेतलंत?”
रेवाची सासू “अहो रेवा तशी नाही. ती पार्थला खूपच माया करते.”
काकू “काय माया करते कळले हो काल? अहो शेवटी सावञ ते सावञच. कसली माया आली त्यांना.”
रेवाची सासू “कदम वहिनी, उगाच काय वाट्टेल ते बोलू नका? रेवा आमची सून आहे. पार्थच म्हणाल तर तो तिचाच मुलगा आहे. सख्या आईला तो नको होता. तिच्यापेक्षा रेवा खूपच माया करते. अगदी सगळं करते ते तुम्हाला दिसत नाही. कालच फक्त दिसलं आणि तेही तो चुकला होता म्हणूनच रागावली. अहो रस्त्यावर एखाद मूल रडत असेल तर आपलं काळीज धडधडत आणि पार्थ तर तिचाच मुलगा. सावञ असला तरी मुलगाच आहे ना आणि चुकल्यावर शिक्षा आईच देते. मायेनेही तिच कुरवाळते.”
काकू “अहो जे मला वाटतं ते सांगितलं. अगदी काळजी वाटली म्हणून”
रेवाची सासू “बरोबर आहे पण आताची पिढी बदलली आहे. ती असे काही मानत नाही. अगदी अनाथ, दत्तक मुलाला देखील जीवापाड जपते. रेवा सुध्दा आजच्या जनरेशनची मुलगी आहे. ती पार्थची खूप काळजी घेते आणि हो गरज असेल तेव्हा ओरडतेही.”
इतक्यात पार्थ आई म्हणत येतो.
रेवाची सासू “पहा कसा आईला शोधत आहे.” असे म्हणताच त्या काकू येते म्हणून निघून गेल्या. रेवा आतून सगळं ऐकत होती आणि तिचे डोळे भरले. काकू गेल्यावर तिने सासूचे मनोमन आभार मानले. तेव्हा तिच्या मनावरील भार हलका झाला.
कथा काल्पनिक आहे. आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.
©® प्रियांका पाटील.