सवत माझी लाडकी भाग 4.

सवत माझी लाडकी 4
हे सगळं कळल्यावर आभा अजूनच फणफणत आईला म्हणाली,

"म्हणजे आई त्या शलाकाने जाणूनबुजून बाबांना आपल्या जाळ्यात ओढलं"

त्यावर मानसी हसली आणि कडवटपणे म्हणाली,

दरवेळी तिसऱ्या बाईची चूक असते असं का समजतो आपण. विवाहबाह्य संबंध बनवणारा तो तर तेवढाच जबाबदार आहे आणि त्याला संसारात हवं ते देण्यात सक्षम नसलेली बायकोही तर तेवढीच चुकीची असू शकते ना ?

"म्हणजे ? आई कसं का म्हणतेस..प्लीज काय म्हणायचं आहे तुला?

मानसीने आता खोल सुस्कारा सोडला आणि ती आभाला म्हणाली,

"काही गोष्टींची निरगाठ न सोडवलेली बरी असते. तुझं फक्त शलाकाला अजूनही दोष देणं मला पटत नाही म्हणून मी तुला ह्याची सुरवात कशी झाली ते सांगितलं
पण तू अजुनही समजून घेत नाही आहेस म्हणून मी काही गोष्टींवरचा आडपडदा उठवणार आहे.

तू ही आता विवाहीत स्त्री आहेस तर तुझ्यासमोर मी ते सारं बोलू शकतेच. तुझ्यासमोर जे मी उलगडणार आहे त्यातील माणसांना तू तुझे वडील किंवा आई ह्या नात्यांचा चष्मा लावून नाही पाहायचं. तर निव्वळ हाडामासाची माणसे आहे हे समजूनच त्यांना पाहायचं. आहे कबूल ?"

आईच्या अश्या बोलण्यावर आभाची उत्सुकता चाळवली. बहुतेकदा बायका आपल्या सवतीवर खार खातात. त्यांच्या नावाने बोटे मोडतात, पण आई मात्र तिच्या सवतीची भलामण का करत आहे हे तिला समजेना, आणि त्यापेक्षाही मोठा प्रश्न तिच्या मनात होता की आईने कधी शलाकाला जाब विचारला की नाही.

मानसी परत काही वर्ष मागे गेल्या. यशचं आजारपण सरेपर्यंत मोहनने धीर धरला, पण मग त्याच्याने राहवेना. रात्री काम अटपल्यावर मानसी यशच्या पाळजवळच खालती आडवी झाली. इतक्यात मोहनने हाक मारली,

"मानसी वर ये ग..जरा रग आहे पाठीला .बाम लावून दे."

मानसीने मोहनची हाक ऐकून आवंढा गिळला. खरतरं चार रात्रीच्या जागराणानंतर तिला परत काही करायची इच्छा नव्हती. ती म्हणाली,

"मी आभाला पाठवते. ती बाम चोळून देईल."

त्यावर मोहन चिडून म्हणाला,

"आभा नको..तूच ये. लवकर.."

मानसीची सासू हे ऐकून तिला म्हणाली,

"जा मनू ! त्याची मर्जी राख ..बिचारा किती थकून येतो तो. त्याच्याही गरजा आहेत ग."

ह्यावर मानसीला वाटलं, गरज काय फक्त मोहनची आहे ? तिला धड आराम मिळणं महत्वाचं नाही का? मनात नसताना नको म्हणायचा अधिकार तिला का नाही? आणि हे काय तीन मुलं होऊनही ही कसली वखवख आहे मोहनला.

सान्वी होईपर्यंत लावलेली तांबी तिला त्रासच द्यायची, पण मोहनला तिच्या त्रासाशी घेणदेणं नव्हतं..सुरवातीला मानसीने नकार दिला की मोहनचा शरीर संबंधासाठी  असलेला आग्रहाचं अगदी बळजबरीत रूपांतर होई.

खरतरं तिला तिसरं मुलं नकोच होतं. आभाला भावंड आलं, आता कुठेतरी थांबवावं असं तिच्या मनात होतं, पण मुलगा हवा ह्या दडपणाखाली तिने तिसरं बाळंतपण ओढवून घेतलं. त्यातही मोहनने तिला एक दिवस नाही सोडलं. ती पोटूशी असल्याचा विचारही नाही केला.

तिसरा मुलगा झाल्यावर मोहनने नसबंदीसाठी ऑपरेशन केलं तेव्हा तिला किती बरं वाटलं होतं. नवऱ्याचा मानच वाटलं होता, की त्याने तिच्या तब्येतीकडे पाहिलं.
पण खरं कारण मानसीचं नसबंदी ऑपरेशनपेक्षा त्याच ऑपरेशन फुकट होतं वर त्यालाच पैसे मिळाले. 

मानसीला वाटलं, आतातरी मोहन शांत होईल, मात्र तो  मानसीला पुर्वी सारखं रोज संबंधासाठी आग्रह करे. बिचारी मानसी घर ,लागोपाठ बाळंतपणे आणि मुलांचे व्याप बघण्यातच थकून जाई. रात्र होईपर्यंत तिला अगदी शांत झोपावसं वाटे.

मानसीला आता ह्याचा उबग येऊ लागला होता. रात्र झाली आणि मोहन घरी आला की तिला अगदी नकोसं होई. शक्यतो ती मग रात्रीची काम काढत बसे, ज्याने मोहन वाट पाहून झोपी जाईल. पण दरवेळी हे होत नसे. मोहन किती वेळ होवो, तो जागाच राही आणि तिला ओरबाडल्याशिवाय शांत होतच नसे.

अगदी मुलाच्या आजरपणात बायको थकली असेल ह्याची पर्वा त्याला नव्हती. नेहमीप्रमाणे मोहनने संबंध प्रस्थापित केले खरे, पण मानसीच्या थंड प्रतिसादामुळे तो वैतागला.

अश्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर तारूण्याने रसरसलेली अशी आकर्षक शलाकाची प्रतिमा समोर आली. शलाकाबद्दल क्षणिक निर्माण झालेलं आकर्षण आता त्याला तिच्या मोहात पाडत होतं.

मोहन फक्त संधी शोधत होता, शलाकाशी जवळीक निर्माण करायची. शलाकाही घरापासून आणि स्वार्थी नात्यांपासून लांब अशी मनाने एकाकी होती म्हणून ती मन रमवायला सतत मानसीच्या घरी यायची़. मानसीची तर ती खुपच खास मैत्रिण झाली होती. मोहनही तसा चेष्ठा मस्करी करणारा कुणालाही आवडेल अश्या मनमोकळ्या स्वभावाचा माणूस होता.

मानसीच्या मानेवर कधीतरी दिसणाऱ्या प्रेम खुणा पाहून तिला मोहन खुपच रॉमेंटीक वाटू लागला होता. तिलाही कधीतरी अश्या जोडीदाराची स्वप्नं पडायची. तिच्या आजूबाजूला काम करणारे सगळेच लांडग्यासारखे वासनेने भरलेल्या नजरेने पाहायचे..पण मोहन मात्र तिच्याकडे मुद्दाम प्रेमळ कटाक्ष टाकायचा आणि हलकेच नजर चोरायचा़. जणू त्याला ती आवडत आहे पण घर संसार पाहून तो स्वत:ला रोखत आहे.

असचं एकेदिवशी मानसीच्या घरून गप्पा मारून शलाका आपल्या घराकडे निघाली. बाहेर पावसाची लक्षण दिसत होती पण पाऊस अजून सुरू झाला नव्हता.  शलाकाला लक्षात आलं की ती छत्री विसरली आहे. मोहनने ह्याच संधीचा फायदा उचलायचं ठरवलं.

शलाका बाहेर पडल्यावर मोहनही छत्री घेऊन लगेच बाहेर पडला. शलाका आता अर्ध्या वाटेवर होती. अचानक पावसाची सर सुरू झाली तसे शलाका आणि मोहन काहीसे भिजले गेले. मग मोहनने पटकन धावत येऊन शलाकाच्या डोक्यावर छत्री धरली.

दिसायला आकर्षक मोहन शलाकालाही पहिल्या नजरेतच आवडला होता. आता मात्र एकाच छत्रीत ती त्याला अगदी जवळून पाहत होती. भव्य कपाळ ,सरळ नाक, एकदम गुळगुळीत दाढी आणि सिगरेट न पिणारे असे क्लीन ओठ व कोरीव मिशी असलेले हसरे डोळे डोळ्यांवरून हळूच गालावर येणारे तृषार्त थेंब शलाकाला मर्दानी सौंदर्याचं एकदम जवळून दर्शन घडवत होते. मोहन काय बोलत आहे हे तिच्या कानावर जातच नव्हते.

ती तर मोहनला न्याहळ्यात अगदी गुंग झाली होती. इतक्यात वेगाने येणाऱ्या गाडीला पाहून मोहनने  तिला कमरेतून स्वत: जवळ घेतली आणि एक गिरकी घेऊन तिला नुकतेच डबकं बनत चालेल्या पाण्याच्या चिखली पासून वाचवलं. त्या काही क्षणात साडी नेसलेल्या शलाकाला कमरेला झालेला मोहनचा स्पर्श अगदी वेडावून गेला.

त्यात चिखल उडाल्याने मोहनचे कपडे मात्र खराब झाले होते. . मोहनने पाहिलं की शलाका एका छत्रीत खेटून चालताना त्याच्या स्पर्शाला विरोध करत नव्हती. उलट तिच्या चेहऱ्यावर एक चोरटे स्मितहास्य होते. शेवटी एका छत्रीत एकामेकांना खेटूनच ते शलाकाच्या घरी पोहचले
आता घरी पोहचल्यावर निघताना मोहनने अगदी कुडकुडण्याच नाटक केलं. ते पाहून शलाका म्हणाली,

"  तुम्ही खुपच भिजला आहात हो आणि  तुम्हाला थंडीही वाजत आहे. घरी या आणि गरमागरम चहा पिउनच घरी जा. तिथपर्यंत पाऊसही थांबेल. "

मोहन ह्याच संधीची तर वाट पाहत होता. त्याने ते हसतच मान्य केलं. शलाका तशीच किचनमध्ये चहाच आधण ठेवायला आत गेली आणि मग मोहनही आत आला.
शलाका थोडीशी दचकली, पण मोहन म्हणाला,

"तुम्ही पण तर भिजला होतात. चला दोघं एकत्र बनवू.."

त्यावर शलाका हसली आणि म्हणाली,

" अहो नुसता चहा तर बनवायचा आहे. "

"पण फक्त चहाने खरचं का भागणार का ? असं विचारून मोहनने शलाकाच्या नजरेला नजर दिली. मोहनच्या अश्या नजरेने शलाका मोहरली आणि परत छत्रीत असताना पाहत होती तशीच पाहू लागली. ते पाहून मोहनचा धीर चेपला. त्याने तिचा हात हातात घेतला. जशी त्याला अपेक्षा होती तसं शलाकाने त्याचा हात काढला नाही. मग मात्र मोहन तिला आवेगाने आपल्या मिठीत घेतले .

तिला विचार करायची संधी न देताच तिला मानेवर आपल्या ओठाने स्पर्श करू लागला. हव्या असलेल्या कामुक स्पर्शाने शलाकाचाही ज्वराग्नी पेटला आणि ती स्वत:ला काबूत ठेवूच शकली नाही. शलाकाही मोहनला प्रतिसाद देऊ लागली. शेवटी मोहनला जो प्रतिसाद नी आवेग मानसीकडून मिळत नव्हता,  तो आता अगदी भरभरून शलाकाकडून मिळू लागला होता.

आता शलाका आणि मोहन एक दिवसाआड भेटू लागले. त्यासाठी मग ते वेगवेगळ्या कामांचे बहाणे शोधू लागले. कधी  मोहनच्या स्पर्धा परिक्षांसाठीचा अभ्यासाची तयारीचं निमित्त तर कधी त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी वेगवेगळ्या धर्मदायी संस्थाना दिलेल्या भेटी.

घरात मात्र शलाका मानसीची जिवाभावाची मैत्रिण आणि तिच्या मुलांची मावशी म्हणूनच वावरत असे. कोणालाही मोहन आणि शलाकाच्या विवाहबाह्य संबंधाची शंका आली नाही..पण म्हणतात मांजरीने कितीही डोळे मिटून दुध प्यायलं तरी जग बघतचं. तसचं मोहन व शलाका ह्यांच्या संबंधाची कुणकुण मानसीच्या कानावर पडलीच.

एका शेजारणीने मोहन व शलाकाला एका थेटरमध्ये कोपऱ्यात एकमेकांच्या हातात हात घालून बसलेलं पाहीलं. ते ऐकून मानसीच्या पायाखालची जमीनच हलली.

********************************
"मग तू काय केलं आई ?"

"तू शलाकाला जाब विचारलास का ?"


काय केलं असेल मानसीने हे जाणून घेण्यासाठी पुढचा व अंतीम भाग वाचा.


क्रमश:

©®वृषाली गुडे


🎭 Series Post

View all