Login

सवत माझी लाडकी भाग १

सवत माझी लाडकी भाग 1
"आई ! तुला माहीत नाही आहे. ती..तिचं..तिचे बाबांशी अफेअर आहे ग. अश्या चारित्र्य हीन बाईशी आपण कसे संबंध ठेवू शकतो ?"

आभा अगदी दुखी स्वरात म्हणाली, तसं मानसीनेही आवंढा गिळला. ती आभाजवळ येऊन बसली. आभाला वाटलं, मानसीला धक्का बसला असावा, पण मानसी शांतपणे म्हणाली,

"मला ही गोष्ट गेल्या पंधरा वर्षापासून माहीत आहे आभा. तू ह्यात लक्ष नको देऊस आणि शलाकाला लग्नात न बोलवण्याचा हट्टही नको करू प्लीज..!"

"पण का आई ?"

आभाने अगदी चकित होतं विचारलं. तिला समजेना तिची आई एवढी शांतपणे कसं काय सहन करू शकते. तिच्या डोळ्यातील प्रश्न मानसीला समजला. मग ती आभाला शांतपणे म्हणाली.

"का हे समजून घेण्यासाठी तुला,  ह्याची सुरवात कुठुन  झाली हे समजून घ्यावं लागेल."

मानसी मग पंधरा वर्ष मागे भुतकाळात गेली. एक  चाळीतील छोट्याश्या घरात ती, तिचा नवरा मोहन आणि तिची तीन मुलं व अंथरूणाला खिळलेले सासरे  मोतीबिंदूने आंधळी झालेली सासू असे सात जण राहायचे.

एका वर्षाच्या यशला गेल्या चार दिवसांपासून सरसरून ताप होता. मोहन मात्र घरचा खर्च भागावा म्हणून एका क्लासमध्ये संध्याकाळी शिकवायला गेला होता. सासरे रडणाऱ्या यशची किरकिर ऐकून मानसीला म्हणाले,

"सुनबाई ! मोहन नाही आहे घरी तर तू तरी डॉक्टरकडे यशला घेऊन जा. पोराचं रडणं सहन होत नाही. त्याच औषध बदलून तरी द्यायला सांग डॉक्टरांना."

त्यावर सासूबाईही चिडत म्हणाल्या,

"हो मानसी ! त्या मेल्याला सांग..फीचे पैसे घेतोस..तर उतार पडणारं औषध तरी दे."

मानसीलाही तर कुठे यशची किरकिर सहन होत होती. त्यात आभा आणि सान्वीची भांडण तिचं डोक उठवत होती. सासरे म्हणालेच आहे तर आपणच यशला घेऊन जाऊया म्हणून मानसी यशला घेऊन घराबाहेर पडली.

थोडी बाहेरची हवा लागताच यशलाही बरं वाटलं आणि तो मानसीच्या खांद्यावर झोपी गेला. तशीच मानसी झोपलेल्या यशला घेऊन दवाखान्यात गेली. तिकडे शलाकाही आली होती.

मानसीपेक्षा शलाका वयाने पाच सहा वर्षच लहान असेल पण तिशीतील शलाका अजुनही तरूण पंचवीशीचीच वाटत होती. सावळा रंग असला तरी चाफेकळी नाक , गहीरे नी टपोरे डोळे, लालसर डांळीबी ओठ ,शेलटी अंगकाठी आणि आकर्षक रंगसंगती असलेला पेहराव. त्यामुळे ती समोर असली की पहणारा एकदा पाहिल्यावर तिच्याकडे पुन्हा नजर फिरवुन क्षण दोन क्षण पाहीच. तेच मानसीचंही झालं.

ऑफिसला जाणारी टापटीप पर्स घेऊन ऐटीत बसलेल्या शलाकाला पाहून मानसीला कुठेतरी तिचा हेवा वाटला. मानसीला वाटलं, जर मीही हिच्यासारखी शिकून सवरून नोकरी करत असती, तर आज चांगल्या चाईल्ड स्पेशलिस्टकडे तरी नेलं असतं. किमान पैश्याचा तरी प्रश्न नसता.

शलाका ही गोंडस यशला न्याहाळत होती. तिच्या मनात गोंडस यश पाहून हेच विचार येत होते..जर मला असा मुलगा असता. किती नशीबवान आहे ही . मुलाचं नवऱ्याचं सुख तरी आहे नाहीतर मी.

दोघी दोन टोकांवरून आपआपल्या ऩशीबाला दोष देऊन दुसऱ्याच्या परिस्थितीवरून त्यांच्या चांगल्या नशिबाचा हेवा करत होता. एवढ्यात डॉक्टरांच्या असीस्टंटने मानसीला  बोलावलं.

मानसी काहीवेळाने आतून बाहेर आली ती डोळे पुसतच. यशकडे तिने पाहिलं आणि एक हुंदकाच तिच्या ओठातून बाहेर पडला . अगदी मलूल झालेला यशचा तिने पपा घेतला. तिचा आगतिक चेहरा पाहून शलाकाला कुठेतरी गलबलल्यासारखं झालं.

मानसीने यशला बाकड्यावर ठेवलं आणि डॉक्टरांच्याच  इकडून मोहनला फोन लावला.

"हैलो ! मी येशूला घेऊन दवाखान्यात आली आहे. डॉक्टरांनी तीन हजारचं इंजेक्शन सांगितल आहे. माझ्याकडे  एवढे नाही आहेत आहे हो..तुम्ही प्लीज येताना आणा ना !"

त्यावर मोहनने पलिकडून म्हटलं,

"मनू माझ्याकडेही आता पैसे नाही आहेत. ऑलरेडी बाबांच्या उपचारासाठी एडवांस घेऊन बसलो आहे. तू डॉक्टरांना सांग ..आता दे इंजेक्शन. मग मी देतो नंतर..मी क्लास सोडून आलो आहे."

मानसीला मोहनचं बोलणं ऐकतानाही डोळ्यातून अश्रू वाहत होते. आधीच पुर्ण फी न दिल्यामुळे केबिनच्या आत शेलक्या शब्दात डॉक्टरांनी पाण उतारा केलाच होता.
ते यशला तपासताना म्हणालेले शब्द मानसीला डाचत होते.

"मुलं वाढवायला पैसे नाही तर जन्माला का घालतात लोक. आता पैशाअभावी उपचार न होता बाळ दगावतात..मग पुन्हा पाळणा हलवतात. काय म्हणायचं ह्या लोकांना. "

मानसी बिचारी अपमान आणि यशच्या जीवावरच्या संकटाने चिंतित होऊन रडतच क्लिनिकच्या बाहेर निघून गेली. तिला असं रडताना पाहून शलाकाला काहीतरी वाटलं. मानसीच्या नंबर नंतर काही वेळानेच शलाकाचा नंबर आला आणि ती  डॉक्टरांच्या तपासायच्या खोलीच्या आत निघून गेली.

मानसी घरी आल्यावर सुन्न होऊन बेशुद्ध यशला मांडीवर घेऊन घराच्या बाहेर पॅसेजमध्ये पेटीवर बसली होती. आपल्या मुलाला वाचवायला आपण काही करूही शकत नाही ही खंत मानसीच्या मनावर आरूढ होऊ लागली.

आभा आणि सान्वीची मस्ती, रडारड ,चाळीतले आवाज सगळं काही मानसीच्या कानापलिकडे गेलेलं होतं. तिला फक्त यशचा मृत्यु दिसत होता. ती हुंदके देत त्याचे मुके घेऊ लागली. मानसीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिची सासू चाचपडत बाहेर आली.मानसीला रडताना ऐकून तिने विचारलं,

"मनू काय झालं? कशाला रडत आहेस?"

"आई ..इंजेक्शन हवं आहे येशूसाठी. पण पैसे.."

पुढे मानसी काही बोलणार इतक्यात डॉक्टरांचा कंपाऊंडर मानसीच्या घरी आला म्हणाला,

"बाई बाळाला घेऊन लवकर चला. इंजेक्शन द्यायला  डॉक्टरांनी बोलावलं आहे. "

मानसीने हे ऐकल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडला आणि ती सासुला म्हणाली,

"मी !येशूला डॉक्टरांकडे नेऊन आणते. मग सगळं सांगते."

पण मानसीच्या मनात हा प्रश्न होताच की एवढ्या लवकर इंजेक्शनसाठी पैसे दिले तर कोणी दिले.

तुम्हालाही। उत्सुकत्ता असेलच हे जाणून घेण्यासाठी ..तर नक्की पुढचा भाग वाचा.