सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 4

Need to think and try to follow new and good things

सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 4

नाश्ता झाल्यावर आई - "आम्हां सर्वांना तुझ्याशी काही बोलायचं आहे आणि तू असा काही गावाला आला नसतास म्हणून आम्हांला हे सर्व नाटक करावं लागलं ".

रमेश- "तुम्ही जर दुस-या लग्नाबद्द्ल बोलणार असाल तर मला त्याबाबत काही बोलायचं नाही " 

आई-"आम्ही कधी म्हणालो की तू नेहाला सोडून दे,जे काही करायचं ते तिच्या संमतीने होईल, म्हणून तर मी तिच्या आईवडिलांनाही इथे बोलावले आहे , मी  या गोष्टीची त्यांना कल्पना दिली होती, त्यांना संगितले आहे की , नेहाला आम्ही शेवट पर्यंत सांभाळू, सगळया गोष्टीं तिच्याच हातात राहतील,फक्त मुलांसाठी दुसरं लग्न करायचं ,त्यांनाच मुलगी पण पहायला सांगितली त्यांच्या ओळखीतली, की जी नेहाच्ं सर्व ऐकेल,सर्व गोष्टी तुमच्या मनासारखं होतील, म्हणूनच आज ते इकडे आले आहेत, त्यांनी एक स्थळ आणले आहे , नेहाही त्या मुलीला ओळखते.आता बाकीच सगळं नेहाचे बाबा तुम्हीच सांगा."

नेहाचे बाबा- " जे तुमच्या आयुष्यात झालं ते चांगलं नाही झालं,आम्ही कधीच विचार केला नव्हता की,आम्हांला तुमच्याशी असं काही बोलावं लागेल,अशी वेळ कोणत्याच आई वडीलांवर येऊ नये, पण नियती पुढे कोणाचे काहीही चालत नाही,तुमची आई बोलते त्याचा मलाही प्रथम रागच आलेला कारण किती ही झालं तरी नेहा माझी मुलगीच आहे, नंतर जेव्हा तुमच्या सासू बाईंनी समजावून सांगितले की समाजात वावरताना कोणी ही तुम्हांला विचारत नाही की तुम्ही किती यशस्वी आहात,कुणीही प्रथम दर्शी भेटले तर विचारतात,की तुम्हांला मुले किती,याचा त्रास तुम्हां दोघांनाही काही दिवसांनी होईल,कुठे तरी अपूर्ण वाटेल, या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही ही ह्या गोष्टी साठी तयार झालो."

रमेश- " तुम्ही नेहाचे बाबा असुनही असा विचार करता , आम्ही एखादं मूल दत्तक घेऊन त्याला वाढवू ,तेव्हढाच एक अनाथ मूल सनाथ होईल आणि आम्हांला कुणी विचारलं की तुम्हांला मूल किती हे आम्हांलाही सांगता येईल,कुणीही विचारायला येणार नाही की स्वत:च आहे की दत्तक आहे,आता जग किती बदलत चालले आहे , आपणही हे जुने पुराने विचार सोडून नवीन विचार आत्मसात केले पाहिजे, का आपण नेहमीच प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरवात दुस-याने करावी अशी अपेक्षा ठेवतो,आपण का करू शकत नाही ".

आई-" मला तू जे बोलतो ,ते काही पटत नाही, दोघांनाही मूल होऊ शकत नाही असे तर नाही ना,प्रोब्लेम तर नेहा मध्ये आहे,तूला तर मूल होऊ शकते,म्हणून तर आम्ही तूला म्हणतोय की दुसरं लग्न कर, आम्ही तुला हेही म्हणत नाही की नेहाला सोड, कारण आम्हांला कल्पना आहे की तूझं नेहावर किती प्रेम आहे,तू जर दुसरं लग्न केले तर तुम्हाला स्वत:च मूल असेल,नेहाला ही मातृ सुख मिळेल आणि आमच्या नातवंडाला खेळवायला आवडेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलगी आपण नेहाच्या वडिलांनाच पहायला सांगू जी नेहाच्या शब्दाबाहेर जाणार नाही आणि दोघी बहिणी सारख्या रहातील."

रमेशचे बाबा-" मी काही बोलू का ,मी पाहतो आहे की काही वेळापासून तुम्ही सर्व त्याच्या वर दबाव आणत आहात , जर त्याच्या मनात नाही तर तुम्ही त्याला जबरदस्ती का करत आहात,मला वाटते हा विषय येथेच थांबवा, रमेश तू व्यवस्थित विचार करून आम्हांला तुझा निर्णय कळव".

हे ऐकताच नेहाचे आईवडील एकमेकांकडे पाहतात.

रमेश-" आता बाबांनी सांगितल ना विषय बंद आणि आता हा विषय परत कुणीही काढायचा नाही ,मी आताच सांगतो,मला दुसरे लग्न करायचे नाही हे अखेरच्ं" एवढं बोलून तो आपल्या रुम मध्ये निघून जातो.

रमेशची आई-" तुम्ही दोघे जरा आमच्या रुम मध्ये या" असं नेहाच्या आईवडिलांना म्हणते.

नेहाचे वडील तिच्या आईला म्हणतात,किती चांगला जावई आहे आपला. तिची आई बोलते ,हो ना, चला त्याच्या आईबाबांनी बोलवलय्ं ,काय म्हणतात ते तर पाहू.

इकडे रूम मध्ये आल्यावर रमेशची आई त्याच्या बाबांना विचारते, तुम्ही बाहेर असं का म्हणालात ,की हा विषय येथेच बंद, तुमची इच्छा नाही का, त्यावर त्याचे बाबा तिला बोलले , हा विषय आपल्याला वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागेल.

नेहाच्या आईवडिलांना येऊ दे , मग तुला कळेल.

तितक्यात नेहाचे आई वडील तेथे येतात, जवळ जवळ दोन तास त्यांचा विचार विनिमय होतो आणि ते सर्व मिळून काही तरी ठरवतात.त्यानंतर नेहाचे आई वडील चहा घेतात आणि सगळ्यांचा निरोप घेऊन जातात, मग रमेश भावाबरोबर एक शेतात चक्कर मारुन येतो. घरी आल्यावर घरी सांगतो की,मी रात्रीच्या गाडीने जातो ,नेहा वाट पहात असेल.

घरचे म्हणतात आलाच आहेस तर रहा एक दिवस अजून तशीही तू सुट्टी घेतली आहे, तो ठिक आहे म्हणतो.

संध्याकाळी नेहाला फोन करून सांगितलं की उद्या रात्रीच्या गाडीने बसेल ,ती विचारते तर तिला सांगतो की आई आता ठिक आहे , तिला घरी आणले आहे, त्याला असं खोटं बोलताना वाईट वाटत होते,पण तिला सांगून त्याला तिला दुखवायचं नव्हतं.

दुस-या दिवशी गावतल्या मित्रांना तो भेटून आला ,सगळ्यांनी जे झालं त्याबद्दल हळहळ व्यक्त केली , त्यातील एका मित्राने दुस-या लग्नाचा सल्ला दिला आणि त्याच्या दोन जिवलग मित्रांनी मात्र त्याच्या निर्णयाचे कौतुक केले.

त्या दिवशी घरी आल्यावर जेवून त्याने रात्रीची गाडी पकडली,तोवर त्याच्या समोर परत कुणीही लग्नाचा विषय काढला नाही, याला वाटले बरं झालं पण त्याला सोडून काही तरी शिजत आहे ह्याची त्याला भणकही नाही लागली.

काय असेल ते पाहुया पुढच्या भागात...

(खरं तरं आई वडीलांनी त्याच्या निर्णयाचे स्वागत करुन समाजात नवीन आदर्श घालून द्यायला हवा होता, आणि अजून एक गोष्ट मनात आहे जर प्रोब्लेम त्यांच्या मुलात असता तर सुनेच्ं दुसरं लग्न लावून दिले असते का आणि त्यात तिच्या आई वडीलांनी त्यांना मदत केली असती का नक्की विचार करा)

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all