
सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 3
रमेश नेहाला टाळत असतो,कारण त्याच्या मनात तर खूप मोठं वादळ उठललं असते. जेव्हा पासून नेहाची ट्रिटमेंट केल्याचं त्याच्या घरच्यांना कळालेल असतं तसं त्याच्या घरच्यांचा त्याला सारखा फोन येत असतो, की आम्ही दोन तीन मुली बघितल्या आहे,त्यातली तू एक पसंत कर .
तो त्याच्या घरच्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करत असतो, की मला दुसरे लग्न करायचे नाही,मी नेहा बरोबर आनंदात आहे,आम्ही एखादं मूल दत्तक घेऊ. पण त्याच्या आईवडीलांचे एकच म्हणणे होते की,आम्हांला आमचं नातवंड हवयं,दत्तक घेतलेले नाही. नेहाला मूल होऊ शकत नाही,पण तुला तर होऊ शकते ना, म्हणूनच आम्ही तुझ्या दुस-या लग्नाचा विचार करत आहोत. रमेश त्यांना म्हणाला , पण मी नेहाला धोका नाही देऊ शकत,माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मी तिला अशा अवस्थेत नाही सोडू शकतं.
त्यामुळे तो खूप डिस्टर्ब होता, ही गोष्ट तो नेहाला सांगू ही शकत नव्हता , म्हणून तो तिला टाळत होता. नेहाला असं वाटतं होतं की काम खूप असल्याने तो असा वागत आहे,आपणही त्याला समजून घ्यायला हवे. एके दिवशी सकाळी त्याला फोन आला की त्याची आई खूप आजारी आहे,ती त्याची आठवण काढत आहे, तो नेहाला म्हणाला,"गावावरुन फोन आला आहे,मला लगेच निघाव्ं लागेल ,आईची तब्ब्येत बरी नाही ". ती म्हणाली,"मी ही येते तुझ्या बरोबर." त्यावर रमेश नेहाला म्हणाला,"मी आधी जातो,जर तसं काही वाटलच्ं तर तू पण ये". ती म्हणाली,"ठीक आहे , तू काळजी करू नको ,त्या होतील व्यवस्थित".
रमेश म्हणाला," मी आज रात्रीच्या गाडीने जातो ,सकाळी पोहोचेल , तिथं काय परिस्थिती आहे हे पाहून तुला फोन करतो".
"ऑफिस मध्ये ही साहेबांना सुट्टीचं सांगावं लागेल ,चल निघतो मी संध्याकाळी लवकरच येईल,माझी कपडे काढून ठेव", येवढ्ं बोलून रमेश ऑफीसला जातो.
संध्याकाळी रमेश ऑफिस मधून लवकर घरी येतो,नेहाने सगळी तयारी करून ठेवली होती,तो आल्यावर ती पटकन चहा ठेवते ,आज किती तरी दिवसांत ते दोघे एकत्र चहा पीत होते.
चहा पिताना नेहा म्हणाली,"अचानक काय झालं आईच्या तब्ब्येतीला ". रमेश म्हणाला,"ते काही बोलले नाहीत फक्त संगितले की एडमिट केलं आहे ,आता तशी बरी आहे पण येऊन जा असे संगितले,तिला तेव्हढेच बरं वाटेल."
जेवण झाल्यावर तो बस पकडायला निघाला तसं नेहा त्याला म्हणते,"पोहचल्यावर फोन कर आणि तब्बेत कशी आहे ते ही कळवं". तो हो म्हणाला आणि निघाला.
गाडीत बसल्यावर विचार करत होता की,असं अचानक आईला काय झालं असेल,विचार करता करता त्याला झोप कधी लागली समजलंच नाही.
त्याला जागं सकाळीच आली ,थोड्या वेळाने तो आता त्याच्या गावी पोहचणार होता, हिरवी गार शेते बघून त्याचं मन एकदम प्रसन्न झाले,लहानपणीच्या आठवणी आठवून तो स्वतःशीच हसत होता. गावात गाडी थांबली,तसा तो गाडीतून उतरला,समोर त्याचा भाऊ त्याचीच वाट पहात उभा होता कारण काल निघण्यापुर्वी त्याने फोन करून गाडीत बसलो हे संगितले होते.
रस्त्यात भावाने विचारलं,प्रवास कसा झाला. रमेश म्हणाला,"ठीक झाला,आईला कोणत्या हॉस्पिटल मध्ये भरती केले आहे,आपण पहिले आईला बघू आणि मग घरी जाऊ".
भाऊ म्हणाला," आधी आपण घरी जाऊ,तू फ्रेश हो मग जाऊ".
घरी पोहचल्यावर रमेश गाडी वरून उतरतो, त्याला म्हणतो,"तू चल पुढे ,मी नेहाला पोहोचल्याचा फोन करतो आणि येतो ,ती वाट पहात असेल फोनची", तो ठिक आहे म्हणून घरात गेला.
रमेशने नेहाला फोन करून पोहचल्याचे सांगितले,तिने विचारलं आई कशा आहे तर तो बोलला मी अजून तिला भेटायला नाही गेलो ,फ्रेश होऊन जाईल, असं बोलून फोन ठेवतो.
घरात जात असतो तेव्हा तो आईला बसलेलं बघून आश्चर्यचकीतच होतो, तिला बघून म्हणतो ,"तू तर एकदम ठणठणीत आहे ,मग असा फोन का केला होता ". अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेहाचे आई वडील ही तेथे आलेले असतात , त्यांना पाहून तो म्हणतो,"तुम्ही इथे , नेहा मला काही बोलली नाही की तुम्ही पण इकडे येणार आहेत."
तिचे वडील म्हणाले ,"तिला यातलं काहीच माहित नाही,तुमच्या आईचा फोन आला म्हणून आम्ही आलो आणि त्यांनी आम्हांला संगितले की यातलं नेहाला काही बोलू नका".
रमेश गोंधळून म्हणाला,"मला तर काहीच कळत नाहीये काय चालू आहे."
तेव्हा त्याची आई म्हणाली,"तुला सर्व लवकरच्ं कळेल,तू आधी फ्रेश होऊन नाश्ता करून घे, मग आपण बोलू."
तो म्हणतो ,"ठिक आहे",सासू सास-यांसमोर आईला जास्त न बोलता फ्रेश व्हायला गेला.
तो जातो तर खरं पण त्याच्या मनात विचार चालू असतो की,आईने मला,नेहाच्या आईवडिलांना असं का बोलावून घेतलं काय चालू आहे तिच्या मनात...
पाहूया पुढच्या भागात....
(परंतु माझ्या मनात नेहमी प्रश्न पडतो की जो समाज स्त्रीला मूल नाही म्हणून पुरुषाचे दुसरे लग्न लावून देतात, त्या उलट जर एखाद्या पुरूष नपुंसक असेल, तर तिला मात्र समाजा समोर काही बोलण्यास परवानगी नसते, त्या वेळी घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो म्हणून त्या स्त्रीने काही न बोलता मात्र वांझोटी म्हणून आयुष्य भर सगळ्यांचे ऐकून घ्यायचं,ही काय स्त्री पुरुष समानता आहे का समाजातली यावर नक्की विचार करा )
रुपाली थोरात