सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 19

inner feelings are also important

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 19

दुस-या दिवशी सकाळी नेहा हॉस्पिटल मधून घरी जायला निघते,तिच्या डोक्यात विचार घोळत असतात की माहित नाही,घरी गेल्यावर मला काय पाहावे लागेल,नंतर ती मनात ठरवते आणि देवाचं स्मरण करून बोलते,जे असेल त्याला हसत सामोरं जाण्याची शक्ती दे.

इकडे सरोज छान झोपलेली असते ,रमेश ला मात्र साडे सातला  जाग येते ,तो बघतो तर तो सरोजच्या रूममध्ये असतो ,त्याला आठवते ,सरोज रडत होती म्हणून तो तिथेच सोफ्यावर झोपला होता,तो उठतो आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन    किचन मध्ये येतो आणि दोघांसाठी मस्त पैकी कॉफी करून नेहाची वाट पाहत असतो तितक्यात बेल वाजली म्हणून तो दार उघडायला जातो . दार उघडतो तर समोर नेहा असते.

रमेश-"गुड मॉर्निंग,जा फ्रेश होऊन ये कॉफी केली आहे "

नेहा -"अरे वा ,कॉफी रेडी आहे ,आलेच मी"

जाता जाता ती थोडी रिलैक्स होते की तिने विचार केला तसं काही नाही,रमेश नेहमी सारखा नॉर्मल आहे.

ती फ्रेश होऊन येते आणि कॉफ़ीचा कप हातात घेऊन बसते.

नेहा-"सरोज झोपली आहे का अजून"

रमेश-" हो ,बरं झालं तू मला रात्री म्हणाली तिच्या कडे बघून ये ,नाहीतर ती तुझी आठवण येते म्हणून रात्रभर रडत बसली असती"

नेहा-"अरे तिला एकटीला भिती वाटते म्हणून बोलली मी"

रमेश-"तिला समजावल तरी तिला झोप येत नव्हती मग मी तिला म्हटलं ,मी इथे सोफ्यावर झोपतो तेव्हा कुठे ती झोपली "

नेहा-"तिला पहिल्यांदा असं एकटीला सोडून निघून गेली,मलाही थोडं वाईट वाटतं होतंं,जाऊ दे झोपू दे तिला तू आवरून ये तोवर मी तुझा डबा बनवते"

रमेश-"अगं राहू दे,मी खाईल काहितरी बाहेर "

नेहा-"मी आमचंही जेवण तुझ्या डब्या बरोबर करते ,नंतर सरोजला सोडून आल्यावर झोपेल "

रमेश-"ठिक आहे "

नेहा डबा बनवत असते ,तेव्हा सरोज तिथे येते.

नेहा-"उठलीस"

सरोज-" हो ,ऊठून आंघोळ ही केली,तू कधी आलीस"

नेहा -"झाले दहा  मिनीट,कॉफी घेऊन आताच जेवण बनवायला सुरुवात केली ,तुला पण सोडायच आहे,आल्यावर झोपेल,तुला नाष्टा देते तू कर तोवर"

सरोज-" करेल मी नंतर तुझ्या बरोबर "

नेहा -"बरं ठीक आहे "

असं म्हणून नेहा रमेशचा आणि सरोजचा डबा भरते,तोवर रमेश येतो,तो नाष्टा करुन डबा घेऊन ऑफिसला जातो.

नेहा सगळं आवरते ,आंघोळ करुन येते ,देवपूजा करून मग दोघी मिळून नाष्टा करतात ,नेहा सरोजला शाळेत सोडवायला जाते.

 सरोज-"आजही आपण बागेत जाणार ना."

 नेहा -"हो जाऊ ,आजही मी तुला लवकर न्यायला येईल खुश आणि असं झोपताना रडायचं नाही ,रमेशनी सांगितलं मला तू रात्री रडत होती ते"

सरोज-"तुझी आठवण येत होती म्हणून,आता नाही रडणार"

नेहा -"चल बाय,बाय साक्षी"

नेहा घरी येवून झोपते.

साक्षी-"दिलं तू रमेशला कार्ड,आवडलं का त्यांना"

सरोज-"नाही ,काल ताईला सोडवायला गेलो आणि मी विसरून गेली,आता आज देते"

संध्याकाळी नेहा आणि सरोज बागेत जाऊन आल्यावर नेहा जेवण बनवत असते ,इकडे सरोज तिच्या बैगेतल कार्ड काढून त्यावरुन हात फिरवत विचार करते ,आवडेल ना रमेशला, तितक्यात तिथे नेहा येते ,ती कार्ड ठेवतच असते.

नेहा-"आपलं  ठरलय ना की फ्रेंडस् मग काय लपवतेय"

सरोज-"अगं काही नाही ,मी तुला बोललेली ना ,रमेश साठी कार्ड बनवलं आहे ते आहे" असं म्हणून दाखवते.

नेहा उघडून पाहते ,त्यात आत आय लव्ह यु लिहिलेलं असतं,ती सरोज कडे पाहते.

सरोज-"नव-याला जे कार्ड देतात ,त्यात असचं लिहिलं होतं,आय लव्ह यू असं तुझ्या कार्ड मध्ये ही लिहिलं,असं कसं ते नाही कळाल "

नेहा-"अगं ज्या माणसावर आपण प्रेम करतो,त्यासाठी आपण लिहितो"

सरोज-"हो का , पण रमेश नाही प्रेम करत माझ्यावर मग मी का देऊ"

नेहा -"काळजी करण म्हणजेही प्रेमच असतं "

सरोज-"ठिक आहे मग मी देते आज संध्याकाळी"

रमेश ऑफिस मधून आल्यावर चहा घेत असतो ,तेव्हा सरोज तिथे येऊन उभी राहते आणि हात मागे असतात .

रमेश-" काय लपवत आहेस?"

सरोज-"काही नाही "

नेहा-"अरे तिने ग्रीटींग बनवलं आहे तुझ्यासाठी द्यायच असेल ते" किचन मधून नेहा बोलते.

रमेश-"तू स्वत: बनवलस का,अरे वा"

सरोज कार्ड त्याच्या हातात देते ,तो पाहतच असतो तितक्यात नेहा त्याला दुरून सांगते, घे म्हणून.

तो घेतो ,आणि उघडून पाहतो ,त्यावर लिहिलेलं वाचत असतो आणि सरोज कडे पाहतो.

सरोज-"तुम्ही आमची किती काळजी घेता ना म्हणून "

रमेश हसून म्हणतो छान आहे,अजून काय काय शिकली आहेस.

सरोज-"दिवे,आकाश कंदील , वेगवेगळे ग्रीटींग शिकणार आहे ,साक्षी सगळ्यांना शिकवते"

नेहा-" आता सरोज आपल्याला पण शिकवेल काही दिवसांनी,चला माझी वेळ झाली,सोडवायला येताय ना "

दोघेही तिला सोडवून येतात, रमेश सरोजला म्हणतो मी तुझ्या रूममध्ये सोफ्यावर झोपतो,मग लागेल ना तुला झोप.

ती हो म्हणते,असेच दिवसां मागून दिवस जात असतात.

नेहाची नाईट शिफ्ट संपून डे शिफ्ट सुरु होते,आता रमेशही खुश असतो. असेच दोन तीन महिने निघून जातात.

असचं एकदा नेहाची नाईट शिफ्ट असते तेव्हा लाईट जाते ,म्हणून फैन बंद झाल्याने सरोज जागी होते आणि घाबरते ,जोरजोरात हाक मारते,रमेश कुठे आहेस ,रमेश तिचा आवाज ऐकून जागा होतो , अंधार पाहून त्याच्या लक्षात आलं की लाईट गेली आहे,तो म्हणाला बेडवरच बस ,मी आहे इथे,मेणबत्ती पेटवतोय .

सरोज तिथेच बेडवर बसून म्हणाली,लवकर लाव.

रमेशने मेणबत्ती पेटवून बेडच्या शेजारी असलेल्या टी पॉय वर लावत होता,तेव्हा सरोजने जाऊन त्याला मागून पकडले आणि म्हणाली ,तू कुठे जाऊ नकोस .

तो सरळ झाला आणि म्हणाला मी इथेच आहे,कुठे नाही जात ,मेणबत्तीच्या प्रकाशात सरोज मध्ये त्याला नेहा दिसत होती आणि तिने तिची मिठी अजून घट्ट केली होती ,त्या क्षणी रमेशचा स्वत: वरचा ताबा सुटला आणि त्याने सरोजला नेहा समजून जे नको व्हायला हवे होते तेच झाले ,थोड्या वेळाने लाईट आल्यावर त्याने पाहिले तर सरोज त्याच्या शेजारी झोपलेली होती ,त्याला क्षणभर काही कळले नाही आणि आता त्याच्या लक्षात आले की ,आपण नेहा समजून सरोज सोबत होतो,हा विचार करून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली,मी एवढी मोठी चूक कशी केली , मी नेहा शिवाय दुसरा कोणाचा विचारही करू शकत नाही,आता मी नेहाला सामोरं कसं जाणार या विचाराने  त्याची झोप उडाली,त्याला स्वत:च्या नजरेतून उतरल्यासारखे झाले होते.

कशी बशी सकाळ झाली,तो उठला आणि आवरून साडे सात वाजताच ऑफिसला गेला,नेहाला मेसेज टाकला की अर्जंट कामामुळे ऑफिसला जात आहे. नेहा नेहमीसारखी घरी आली, बेल वाजवली पण दार कुणी उघडले नाही,फोन करायला फोन हातात घेतला तर रमेशचा मेसेज वाचला ,मग तिने तिची चावी काढून दार उघडलं. फ्रेश होऊन आली आणि चहा ठेवण्याआधी सरोज उठली आहे की नाही,ते पाहायला गेली तर बेडशीट वरचे डाग पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की काय झालं असेल,तरी ती विचार करत होती की लवकर जायचयं तर फोन करून सांगण्या ऐवजी असं मेसेज का केला हा प्रश्न तिला पडला होता,त्याचे उत्तर तिला सरोजच्या रूममध्ये तिला मिळाले होते,तिला क्षणभर समजेना की कसे रिआक्ट करावे,ती दोन मिनीटं तिथेच बसली ,मग तिने सरोजला झोपू दिले आणि चहा ठेवला . चहा पिता पिता ती विचार करत होती,त्यांना एकांत मिळावा म्हणून तर तिने नाईट शिफ्ट घेतली होती,मग मला वाईट का वाटत आहे .

मी तर कधीच रमेशच्ं आणि सरोजच्ं नातं स्विकारलं आहे ,तरी त्याच्यात अपराधीपणाची भावना आहे,त्याला यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. 

असा विचार करून ती सरोजला उठवायला जाते ,का ग सरोज रमेशनी रात्री तुला त्रास दिला का ,हो झाला थोडा पण आपल्या दोघींना बाळ तर मिळेल ना आता ,मग ठिक आहे.

नेहा-"हो मिळेल ना"

सरोज-"मग आपल्या बाळाला आपण दोघी छान सांभाळू"

तिचं असं बोलणं ऐकून नेहा विचार करते ,किती निरागस आहे ही.

नेहा -"तुला आज सुट्टी घेऊन आराम करायचा असेल तर करु शकते."

सरोज लगेच तिला मिठी मारून बोलते -"चालेल माझी ताई."

नेहा-"एवढा मस्का लावण्याची गरज नाही"

असं म्हणून दोघी सगळं आवरतात आणि नाष्टा करतात.

नेहाला सारखं वाटत असत की रमेशला फोन करावा.

ती फोन लावते पण तो फोन उचलत नाही,मेसेज पाठवतो ,की मी नंतर फोन करतो,मी मिटींग मधे आहे. त्यावर नेहा ,ओके मेसेज पाठवते.

परत त्याचा दुपारी मेसेज येतो ,आता परत मिटींग आहे,मी डायरेक्ट तुला सोडवायला येईल.

नेहाला कळून चुकलं होतं की तो तिला टाळतोय ,पण अपराधी पणाच्या भावनेने की आता तो बदललाय हे तिला कळेना.

रात्री तो येतो आणि बाहेरून फोन करतो ,बाहेर ये मी तुला सोडवतो.

नेहा-"तू आत ये मला तुझ्याशी थोडं बोलयचं आहे "

रमेश विचार करतो -"नेहाला काही कळल असेल का ?"

रमेश आत येतो.

रमेश-"काय बोलयचं होतं "

नेहा-"मला माहित आहे की,काल काय झालं आहे,तू स्वत:ला त्यासाठी दोषी मानू नकोस,मी तुला याआधीच सांगितल आहे की ,तुझं आणि सरोजच नातं मी स्वीकारले आहे आणि मला या गोष्टीचीही कल्पना आहे की त्या गोष्टीचा तू आपल्या रिलेशनवर काही परिणाम होणार नाही आणि खरं सांगायचं तर मी नाईट शिफ्ट जॉब तुम्हा दोघांना एकांत मिळावा म्हणून करत आहे,कारण मला माहित आहे की मी घरात असताना तू सरोजचा विचारही करणार नाही, काल जे घडल ते मला आधीच अपेक्षित होतं"

रमेश-"मला कधीही असं वाटलं नाही ,परंतु आज असं वाटलं की मी तुझ्यावर खूप अन्याय केला.मला माफ कर नेहा,खरं सांगतो सरोज मध्ये मला तुच दिसत होती आणि मग मी सगळं विसरून गेलो,जेव्हा लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झाला होता"

नेहा-"ठिक आहे ,तू एवढा विचार करू  नकोस"

नेहा-"मी आधीच तुला सांगितलय की मला तुमचं रिलेशन मान्य आहे मग तू ही गोष्ट एवढी मनाला लावून घेऊ नकोस आणि स्वत:च्या मनातली अपराधी पणाची भावना काढून टाक आणि मला माझा नेहमी हसणारा रमेश हवाय"

रमेश -" तुझं म्हणणं खरं आहे ,पण माझंच मन मला खातय"

नेहा-"हे बघ तू काहीही चुकिच वागलेला नाहिस,लग्नाची बायको आहे ती तुझी,तुझं काही अफेअर नाही आहे की तू ही गोष्ट एवढी मनाला लावून घ्यावी,आता हा विषय इथ संपला"

नेहा सरोजला हाक मारते आणि म्हणते,चला आता मला सोडा आणि दोघे एकमेकांची काळजी घ्या.

सावरेल का रमेश अपराधी पणाच्या भावनेतून,आता रमेश बदलेल का, सरोज आणि नेहाच्या रिलेशन मध्ये याचा काही परिणाम होईल का हे पाहुया पुढच्या भागात....

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all