सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 16

flow of life

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 16

नेहाला जे प्रश्न पडले होते ,त्याची उत्तरे तिला कळत नव्हती, विचार करून करून डोकं सुन्न झालं होतं. आता पुढे काय,सासुबाईंचे शब्द आठ्वत होते , सरोजच आणि रमेशच्ं लग्न होऊन सुद्धा त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे नातं नव्हतं, माझ्या बाबतीत विचार केला तर मला सगळचं आलबेल आहे, सरोज अशी आहे याचा अर्थ असा  नाही की,तिला जगण्याचा अधिकार नाही , मी तिला ही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करीन ,असं म्हणून तिने एक निर्णय घेतला.

संध्याकाळी रमेश आल्यावर चहा पाणी झाल्यावर विषय कसा काढावा,हे तिला कळत नव्हतं.जेवणानंतर बागेत फिरताना ,

नेहा-"मला असं वाटतं की आपण सरोज वर अन्याय करत आहोत "

रमेश-"तुला असं का वाटत ,आपण तर तिला व्यवस्थित सांभाळत आहोत"

नेहा-" मी जर एक स्त्री म्हणून विचार केला तर मला नाही वाटत,आपण तिला लग्न करून या घरात आणलं आहे, तसं पाह्यलं तर तिला लग्नानंतरच काहिच सुख नाही मिळालं,तिचा तुझ्यावर माझ्या इतकाच अधिकार आहे,तिलाही तिच्या वाट्याच सुख मिळालं पाहिजे"

रमेश-"हे सगळं आई तुझ्या डोक्यात भरवून गेली ना,म्हणून तू अशी बोलत आहेस का,परत तिनी तुला काही धमकी दिली का,तू नको टेन्शन घेऊ "

नेहा-" नाही उलट पहिल्यांदा त्या माझ्याशी एका मैत्रिणी सारख्या बोलल्या,त्या मला जे बोलल्या त्यात चुकिच असं काही नाही वाटलं,कधी कधी आपण एखाद्या गोष्टीकडे आपल्याच दृष्टिकोनातून पाहतो,त्यामूळे आपल्याला त्या गोष्टीची दुसरी बाजू समजून घेण्याचा विचारच करत नाही"

रमेश-"स्पष्ट बोल तुला काय म्हणायचं आहे ,तू काय कोड्यात बोलतीयेस मला काही कळत नाही "

नेहा-"रमेश मी ह्या गोष्टीचा स्विकार केला आहे की मी जशी तुझी बायको आहे ,तशीच सरोज सुध्दा आहे ,हे सत्य मी स्विकारल आहे,म्हणून तू तिच्या बरोबर नवरा बायकोचं नात ठेवले तरी चालेल"

रमेश-" मी काय तुला तुझ्या हातातलं खेळणं वाटतो की काय ,जेव्हा पाहिजे तेव्हा तू मला तुझ्या मनाप्रमाणे खेळवत आहे"

नेहा-"असं काही नाही ,मला जे योग्य वाटलं ते मी बोलले"

रमेश-"माझा तर कुणी विचारच नाही करत की मला काय वाटत,लग्न करतानाच मी माझ्या अटी तुला सांगितल्या होत्या,त्या तुला मान्य होत्या म्हणून आपण पुढे गेलो आणि आता जर तू वेगळच्ं काही बोलते आहेस"

नेहा-"माणसाने वेळेनुसार बदलावं,आपल्या वागण्यामुळे जर दुस-यांना आनंद मिळत असेल तर हरकत काय आहे"

रमेश-"म्हणजे माझ्या वागण्यामुळे म्हणजे सरोज बरोबर बायकोच नातं ठेवल्याने तुला आनंद मिळणार आहे का?, मी पहिलीच स्त्री पहातोय ,जी स्वत: हून आपल्या नवा-याला

 दुस-या बाईच्या सुपूर्त करत आहे"

नेहा-"असं काही नाहीये , पण तू तसं केल्याने माझ्या मनातील अपराधीपणाची भावना कमी होईल "

रमेश-"म्हणजे अजुनही तुझं म्हणणं असचं आहे की,तुला बरं वाटावं म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागाव,माझ्या मनाचा काही विचार करणार आहेस की नाही"

नेहा-"मी तुला कधीही फोर्स करणार नाही , पण जर तुझ्या मनात तिच्या बद्दल काही विचार आला तर तू स्वत:ला अपराधी वाटून न घेता तिला तिच्या वाट्याचं सुख दे,दुसरं काही नाही "

रमेश-"तुला माहित आहे ,माझ्या मनात तुझ्या व्यतिरीक्त 

दुस-या कुणा साठी तशा भावना उत्पन्न होत नाही, माझं खरचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग"

नेहा-"हो ,मला माहित आहे,माझही तुझ्यावर आहे"

रमेश-"मग तू अशी का बोलते"

नेहा-"ठिक आहे,इथून पुढे नाही बोलणार,चल उशीर खुप झालाय,सरोज पण वाट पाहत असेल"

नेहा आणि रमेश घरात येतात ,तर सरोज रिमोट हातात धरून सोफ्यावर तिथेच झोपली होती,नेहाने तिला उठवून आत नेऊन झोपविले आणि नंतर त्यांच्या रूममध्ये झोपायला गेली.

रमेश तिचीच वाट पाहत होता.

 नेहा-"तू झोपला नाहिस अजून"

रमेश-"माझ्या हातावर जो पर्यंत कुणाच्या तरी डोक्याच ओझं पडत नाही ना तोवर झोप नाही येत"

तिने हसतच त्याच्या हातावर डोकं ठेवलं , त्याला बिलगली आणि दोघेही हसतच्ं झोपच्या आधीन झाले.

दुस-या दिवशी नेहा आणि सरोज भाजी मार्केट मध्ये भाजी आणायला गेल्या ,सरोजला एकटीला भिती वाटते म्हणून हल्ली नेहा तिला बरोबरच घेऊन जायची.

भाजी घेत असताना नेहाला पाठीमागून कुणीतरी हाक मारली ,तर नेहाने मागे वळून पाहिलं आणि जोरातच ओरडली-"अय्या ,ज्योती तू,कशी आहेस ,किती दिवसांनी भेटली,हॉस्पिटल मध्ये सगळे कसे आहेत,तुमची सर्वांची खूप आठवण येते गं?"

ज्योती-"मी छान आहे आणि हॉस्पिटल मधील पण सगळे छान आहे,आम्ही सगळे तुम्हांला खूप मिस करतोय,एवढी आठवण येत होती तर यायचं होतं की एकदा भेटायला , काही दिवसांची सुट्टी घेऊन घरी राहिल्या आणि नंतर डायरेक्ट कामच्ं सोडून दिलं, कशा आहात आणि ही कोण?"

नेहा -"ही माझी बहीण सरोज , अगं ट्रिटमेंट झाल्यावर डॉक्टरांनी दोन ते तीन महिने आराम करायला सांगितला, मग रिजाइनच केलं ,इतक्या दिवसांची सुट्टी कोण देणार होतं "

ज्योती-"पण तुमच्या बद्दल ऐकून वाईट वाटलं "

नेहा -"काय ऐकलं "

ज्योती-"तुम्हांला आता बाळ होऊ शकत नाही,पण तरी तुमचे सर समजूतदार आहे ,आमचा नवरा असता तर लाथ घालून घराबाहेर काढली असती,कारण आम्ही जिथे रहातो तिथे असचं वातवरण आहे,बायको कमावते ,घरातली सगळी कामे करते ,त्याचं साधं कुणाला काही कौतुक वाटतं नाही,करते तर तुझ्या संसारासाठीच ना ,असं ऐकून घ्यावं लागतं आणि वर टोमणे ऐकावे लागतात ते वेगळेच,जाऊ दे मी का माझं रड्गाणं सांगतीये तुमच्या जवळ हे असचं चालू राहणार, बरं झालं तुम्ही भेटल्या हॉस्पिटल मध्ये रिसेप्शनीस्ट जागा आहे,बघा जमत असेल तर ,आम्हांलाही आवडेल तुम्ही आल्या तर "

नेहा-"बघते रमेशला विचारून काय म्हणतो ते"

ज्योती-"हो चालेल ,चला घरी जाऊन जेवण बनवायचय अजून आता हॉस्पिटल मधून शिफ्ट झाल्यावर डायरेक्ट इकडेच आली"

नेहा-"हो चालेल"

असं म्हणून ज्योती निघून जाते , नेहाही भाजी घेऊन घरी जाते.

संध्याकाळी रमेश घरी आल्यावर ज्योती भेटलेली ते सांगते आणि म्हणते-"बघून येऊ का काय म्हणतात?"

रमेश-" सरोजचं कसं करणार?"

नेहा-"आधी भेटून तर येते ,मग बघू काय ते?"

रमेश-"असही घरात बसून काहीही विचार डोक्यात येतात ,तेव्हढीच बाहेर गेलीस तर तुलाही बरं वाटेल,माझी काहीच हरकत नाही "

नेहा-"ठिक आहे मग,मी उद्या जाऊन येते आणि मी जाईन तेव्हा शेजारच्या काकुंना थोड्या वेळासाठी सरोज जवळ थांबायला सांगते"

रमेश-" ओके ,चालेल"

दुस-या दिवशी सकाळी रमेश नेहमीप्रमाणे ऑफिसला जातो,नेहा शेजारच्या काकुंना सरोज वर लक्ष ठेवायला सांगते.

नेहा हॉस्पिटल मध्ये पोहोचल्यावर ओळखीचे सगळेच तिच्या भोवती गोळा होतात,इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर विचारतात की,कधी पासून येताय.

नेहा-"आता मी सरांना भेटल्यावरच कळेल,मी जाऊन येते "

नेहा सरांच्या केबीन कडे जाते ,दार उघडून विचारते.

नेहा-"येऊ का आत?"

सर-"मिसेस नेहा कशा आहात आता ठणठणीत ब-या झाल्या असाल तर कामावर येऊ शकता,आम्हांलाही तुमच्या सारख्या स्टाफची गरज आहे ,अजुनही सगळे पेशंट तुमच्या बद्दल विचारत असतात"

नेहा-"हो कळलं की जागा आहे म्हणूनच भेटायला आले"

सर-"ते सगळं ठिक आहे,पण तुम्हांला यावेळी मागच्या सारखी एकच शिफ्ट नाही मिळणार.पंधरा दिवस डे आणि पंधरा दिवस नाईट शिफ्ट करावी लागेल, जर तुम्हांला शक्य असेल तरच हो सांगा"

नेहा -"सर मी उद्या कळवते"

सर-"ओके ,चालेल"

बाहेर आल्यावर ती तिची जवळची मैत्रीण स्वातीला भेटायला जाते,स्वातीला नेहा बद्दल सगळी माहिती असते, स्वातीला नेहाला पाहिल्यावर खुप आनंद होतो,ती विचारते-"मग कधी पासून येते?"

नेहा-"अग पण सरांनी पंधरा दिवस डे आणि पंधरा दिवस नाईट हा पर्याय दिला आहे,मला नाही वाटत रमेश हो म्हणेल आणि परत सरोज कडे कोण पाहणार"

स्वाती-"सरोज बद्दल म्हणशील तर एक सुचवू का डे शिफ्ट असेल तर इथे जवळच अश्या मुलींची एक शाळा आहे ज्यात त्यांना वेगवेगळ्या कला शिकवल्या जातात,तिलाही काहितरी नवीन शिकायला मिळेल आणि येता जाता तू तिला सोडू आणि नेऊ पण शकते आणि नाईट असेल तर रमेश घेईलच की तिची काळजी"असं ती डोळा मारुन बोलते.

नेहाने रमेशच दुसरं लग्न केलं आहे असं सांगितल होतं पण त्यांच्यात तसं काही नाही असं सांगितल तरी कुणाचा विश्वास बसणार नाही म्हणून मौन बाळगलेलेच बरे हे धोरण स्वीकारले.

ती जाता जाता शाळेत जाऊन सगळी चौकशी करून घरी आली.

रात्री जेवल्यावर तिने रमेशला सगळं सांगितल ,सरोज बद्दल पण बोलली आणि नाईट शिफ्ट असल्यावर तू असशीलच ना घरात त्यावर तो काही बोलला नाही, तिने परत त्याला विचारले,सांगू ना मग की मी येते.

रमेश-"अग पण तिला रात्री तुझ्या कडून झोपायची सवय आहे त्याच काय "

नेहा-"तू करशील ना ऐडजस्ट प्लीज फक्त पंधरा दिवसांचा तर प्रश्न आहे "

रमेश-"पंधरा दिवस म्हणजे अर्धा महिना झाला ,मी पण नाही राहू शकत इतके दिवस"

नेहा-"एवढं काही लाडात  येऊ नको तू ऑफिसला जायच्या आधी मी घरात असेल"

रमेश-"ठिक आहे"

नेहा-"मी सरोजलाही माझ्या शिवाय झोपायची सवय लावते मग तर झालं ना,खुप दिवसांनी मी परत पहिल्या सारखी बाहेर जाणार तरं बरं वाटतयं"

रमेश-"खुश ना,झोपा आता"

काय घेऊन येईल त्यांच्या आयुष्यात उद्याची सकाळ पाहुया पुढच्या भागात......

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all