सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 14

Traditon of society

सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 14

मागच्या भागात आपण पाहिलेच की ,तीन महिने ट्रिटमेंट करुनही यश आले नाही,मग नेहाच्या सासूला थोडा संशय येतो आणि ती चार पाच महिने नेहा कडे येवून रहायचं ठरवते.ती गावावरुन नेहा कडे रहायला येते,नेहा सासूला असं अचानक आलेलं पाहून विचारते,तुम्ही अश्या अचानक कश्या काय आल्या.

सासू-"मला माझ्या मुलाच्या घरी रहायला यायला तुझी परमिशन घ्यावी लागणार का?"

नेहा-"नाही मला असं म्हणायच नव्हतं"

सासू-"मग काय म्हणायच होतं , सरोजला बघायला आली"

सासू-"कुठे आहे ती"

नेहा-" आहे ,बोलावते तिला"

सासू सरोज कडे पहात राहते,तिने पंजाबी ड्रेस आणि त्यावर पिन करुन ओढणी लावलेली असते.

सासू-"तुम्ही तुमची सावली पाडू नका तिच्यावर ,नाहीतर बरोबर राहून तुमच्या सारखीच व्हायची".

नेहा-"म्हणजे "

सासू-"इतके दिवस तुम्ही ड्रेस घालत होतात ,आता तिलाही शिकवलं म्हणून म्हटले"

नेहा-"तिला साडी सांभाळणं कठीण होत होते म्हणून रमेशनेच सांगितल"

रमेशचं नाव घेतल्यावर त्या काहीच बोलल्या नाहीत.

सासू-"आम्हाला चहा ठेवा थोडा,प्रवासाने थोडं डोकं दुखतय"

नेहा-"हो ठेवते"

असं बोलून ती चहा ठेवायला जाते, चहा ठेवता ठेवता असा विचार करत असते की,का आल्या असतील ह्या ,आता या महिन्यात ट्रिटमेंट पण घेता येणार नाही,कधी जाणार आहेत काय माहिती,त्या असल्यावर मोकळेपणाने राहता पण  येत नाही . रमेशला पण नाटकं करावे लागते.

नेहा चहा घेऊन त्यांना देते, त्या विचारतात-"जेवायला काय बनवत आहेस".

नेहा-"तुम्ही सांगा काय बनवू"

सासू-"तसं तुझ्या हाताला छान चव आहे ,काहीही बनव,सरोजलाही बनवायला शिकवा हळू हळू "

नेहा-"ती थोडी वेंधळी आहे म्हणून गैस जवळ जाऊन द्यायला भीती वाटते "

सासू-"ठिक आहे,मला वाटलं तेवढीच तूला थोडी मदत होईल "

नेहा-"मला सवय आहे तिच्या असं वागण्याची,मला तिच्याकडून तशी अपेक्षाही नाही "

सासू-"तुला काही सांगावं लागत नाही,तू म्हणाली म्हणून रमेश लग्नाला तयार झाला आणि तू त्याला माझ्या अटीबद्दल सांगितले नाही हे पण बरं  झालं"

नेहा-"मला तुमच्या मुलात आणि तुमच्यात कोणत्याही प्रकारचे वितूष्ट निर्माण नव्हते करायचे"

सासू-"मी जरा पडते "

असं म्हणून ती झोपायला जाते.नेहा जेवण बनवते ,जेवल्यावर सगळे टिव्ही पाहत असतात,सासू नेहाला विचारते आज सरोजचा सहावा दिवस आहे ना, नेहा हो म्हणते ,मग रमेश तिच्याकडे झोपायला जाईल ना,नेहाला त्यांच्यासमोर हो म्हणावे लागते.

संध्याकाळी रमेश आईला पाहून आश्चर्यचकीत होतो, तो विचारतो ,असं अचानक,त्याची आई म्हणते,असचं तुमची सगळ्यांची आठवण येत होती म्हणून आले ,पण तुम्हांला मी आलेल्याचा आनंद नाही झाला वाटतं,रमेश म्हणाला ,असं काही नाही ,तुझं घर आहे तू कधीही येऊ शकते ,जितके दिवस  राहायचं राहू शकते.

रात्रीची जेवण वैगेरे झाल्यावर रमेश त्याच्या रूममध्ये नेहमी प्रमाणे जायला लागतो,तर त्याची आई म्हणते ,तू आज सरोजच्या रूममध्ये झोपायला जा,तो एक मिनीट नेहा कडे पाहतो आणि त्यांच्या रूममध्ये जातो. नेहा सगळं आवरते आणि सासूला सांगते ,जातील मी पाठवते त्यांना .

हे ऐकताच सासूला थोडसं विचित्र वाटत,त्यांना सरोज मध्येही तसा काही बदल झालेला दिसत नाही,पण त्या काही बोलत नाही.

नेहा रूममध्ये जाते आणि रमेशला समजावते की,त्यांच्या समोर हे नाटक करावं लागेल नाही तर तुला माहित आहे ना,त्यांचा स्वभाव कसा आहे ते. रमेश उठतो आणि सरोजच्या रूममध्ये झोपायला जातो,नेहमी प्रमाणे तो सोफ्यावर झोपतो आणि सरोज बेडवर ,सरोजला यात काही वेगळे वाटत नाही.

दुस-या दिवशी सकाळी रमेश ऑफिसला गेल्यावर सासूबाई नेहाच लक्ष नाही हे बघून सरोजच्या रूममध्ये जाते,तिला सगळं व्यवस्थित ठेवलेलं दिसतं,ती सरोजला बोलते ,रूम छान ठेवली आहे,सरोज बोलते ,नेहा ताईच आवरते.

सासू-"तू कुठे झोपते "

ती बेडवर हात ठेवते.

सासू-"आणि रमेश कुठे झोपतो?"

ती सोफ्याकडे बोट दाखवते आणि तिच्या बोलण्यात थोडी पण लाजेची भावना नसते,हे ऐकताच तिला सगळं कळून चुकले होते.

ती या विषयावर नेहाशी बोलयचं ठरवते,पण लगेच नाही ,अजून थोडे दिवस थांबून बोलू असा विचार करते.

असेच आठ दहा दिवस जातात ,रोज रमेश सरोजच्या रूममध्ये झोपायला जायचा आणि रोज सासू तेच प्रश्न सरोजला विचारायची आणि तिला म्हणायची ,मी रोज जे विचारते,ते आपल्यातल्ं सिक्रेट,नेहाला पण नाही सांगायचं ,त्यांचा आवाज इतका जरब होता की ,खूप वेळा सरोजला नेहाला सांगायची इच्छा व्ह्यायची पण त्यांचा चेहरा  डोळ्यांसमोर आला की ती शांत व्हायची,नेहालाही असं वाटायचं तिला काही बोलायचं आहे पण ती घाबरते ,नक्की काय हे तिलाही कळेना. 

तिच्याशी काही बोलायचं तर सासूबाई त्यांना एकत्र एकट्या सोडत नव्ह्त्या. 

नेहा आणि रमेश दोघांना  ह्या महिन्यात ट्रिटमेंट नाही करता आली म्हणून वाईट वाटलं,पण काही पर्याय नव्हता.

रमेश असचं जेवता जेवता गप्पा मारत असताना विचारतो,आई कधी जाणार आहे,कारण त्यालाही आता सोफ्यावर झोपायचा कंटाळा आलेला असतो.

आई-" का रे कंटाळा आला का माझा "

रमेश -"नाही तसं काही नाही ग"

आई-"तू जेवल्यानंतर माझ्या रूममध्ये ये ,मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे "

रमेश-"इथेच बोल ना काय बोलयचं ते"

आई-"नाही नंतर बोलू"

नेहा विचार करत असते की,ह्या वेळी ह्या माझ्याशी जास्तच गोड बोलत आहे,काय चाललय्ं यांच्या मनात,काय बोलतील या रमेशला,सगळे प्रश्न अनुत्तरित होते,सगळ्याची उत्तरे रमेश कडूनच मिळतील भेटून आल्यावर.

सगळे जेवल्यावर नेहा सगळं आवरते ,सवयी प्रमाणे सरोजला झोपवायला जाणार असते ,नंतर लक्षात येते की,सासू बाईं समोर कसं जाणार,ती अशीच सरोजच्या रूम मध्ये चक्कर मारायला जाते , सरोजला विचारते-"तुला झोप लागते ना"

ती म्हणते -"हो येते ,हे असतात ना आणि लाईट पण चालू ठेवतात,त्या कधी जाणार आहे."

नेहा-"का ग ,काय झालं "

सरोज-"काही नाही पण त्यांची भिती वाटते "

नेहा-"अगं काही नाही करत त्या ,त्याही माणूसच आहेत"

सरोज-"पण नेहमी तुझ्यावर ओरडत असतात,खडूस आहेत एक नंबरच्या,त्या नसल्या की आपण किती छान राहतो"

नेहा-"अगं असं नाही बोलायचं,सासूबाई  आहेत त्या आपल्या,चल झोप आता "

सरोज-"तू झोपवं ना त्या आल्यापासून तू इकडे जास्त येतच नाही,प्लीज "

नेहा मग तिला झोपवते आणि तिच्या रूममध्ये जाते ,जाता जाता पाहते तर अजुनही सासुबाईंच्या रूमचा दरवाजा बंद असतो ,काय एवढं बोलत आहेत ,कुणास ठाऊक.

ती तिच्या रूम मध्ये येऊन रमेशची वाट पाहत असते,कारण काय बोलल्या हे जाणून घेतल्या शिवाय झोप कशी येणार.

ती रमेशची वाट पाहत बसते.

रमेश थोड्या वेळाने येतो,ती म्हणते मला वाटल्ं, तू सरोजच्या रूममध्ये जाशील झोपायला, तो म्हणतो,मी बिलकूल मजाक करण्याच्या मूडमध्ये नाही ,आईला सगळं कळालय ,मग आता नाटक कशाला करायचं.

नेहा-"कसं काय "

रमेश म्हणाला मी रूम मध्ये गेलो .

आई-"सरोजशी तुझं जमतं ना व्यवस्थित,काही प्रोब्लेम आहे का ?"

रमेश-"नाही काही नाही"

आई-"सरोजच्या रूममध्ये सोफा कशासाठी,नेहाच्या रूममध्ये तर नाही आहे."

रमेश-"तुला काय म्हणायचं ते स्पष्ट बोल"

आई-"तुला मी गावाला जाण्याची घाई झाली आहे कारण सोफ्यावर झोपायची तुला सवय नाही आहे ,बरोबर ना"

रमेश-"म्हणजे नाही तसं काही नाही,तू रहा आरामात तुला राहायचं तितकं "

आई-"प्रश्न माझ्या राहण्याचा नाही ,तू अजून सरोजला स्विकारलं नाही त्याचा आहे,अरे तू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलं आहेस तिच्या बरोबर आणि नेहाला याबद्दल काही प्रोब्लेम नाही,मग तू का असं वागतो"

रमेश आईला त्याच्या आणि नेहाच्या लग्नाआधी झालेलं बोलणं त्याची लग्न करण्याची अट याबद्दल सांगतो आणि दोन तीन महिने झाले ट्रिटमेंट घेतली ,पण तीही अयशस्वी झाली ,हे सगळं सांगतो.

आई-"मला तर काय बोलाव हे कळत नाही,ठिक आहे तू नेहा कडे जाऊ शकतो,नाटक करण्याची काही गरज नाही,माझी नजर तशी अनुभवी आहे,सरोज कडे पाहून मला लग्न झालेल्या स्त्रीमध्ये जे बदल होतात ,ते काहिच जाणवले नव्हते,म्हणून मी तुमच्या वर लक्ष ठेवून होते,ठिक आहे ,जा आता तू"

मग मी निघून आलो.

रमेशची आई झोपता झोपता विचार करून झोपली की,उद्या आपण नेहाशी या विषयावर बोलू.

काय बोलेल रमेशची आई नेहाशी , हे पाहू पुढच्या भागात....

रुपाली थोरात 


 

🎭 Series Post

View all