सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 12
दुस-या दिवशी सकाळी रमेश थोडा उशीराने जागा झाला, मग त्याच्या लक्षात आले की,आपण आपल्या रूम मध्ये नसुन सरोजच्या रूम मध्ये आहोत ,त्यानी बेडकडे बघितले तर सरोज छान झोपली होती,त्याने तिला न उठवता , त्याच्या बेडरूम मध्ये आवरायला गेला,इकडे नेहा त्याचीच वाट पहात होती, तो आल्यावर ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती,जसा काही त्याने काही गुन्हा केला,रमेश तिच्याकडे लक्ष न देता बाथरूम मध्ये निघून जातो .
सासू सासरे घरात असल्यामूळे तिला नाष्टा करायचा होता, म्हणून ती किचन मध्ये गेली,तिथे सासूबाई आल्या, त्या तिच्यावर खूष होत्या,त्या म्हणाल्या मी तुझे उपकार कधीही विसरू शकणार नाही,परंतु तुला एक सांगायच आहे,मी आत्ताच सरोजच्या रूममध्ये जाऊन आली,तिथली परिस्थिती पाहून,मला असे वाटते की,काल रात्री काहीच नाही,असं पण,त्यांना आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल,एक काम कर ,काही दिवस रमेशला तुमच्या रूम मध्ये झोपू दे ,सरोजची पाळी आली की त्याला तिकडे पंधरा दिवस झोपायला पाठवत जा,म्हणजे आपल्याला पटकन गोड बातमी ऐकायला मिळेल,असं बोलून त्या बाहेर गेल्या.
नेहाने पटापट नाष्टा भरला आणि बाहेर घेऊन गेली,सगळ्यांना टेबल वर नाष्टा दिला आणि चहा घेऊन आली तो पर्यंत सरोज पण आवरून आली होती,ती म्हणाली,ताई मला पण दे,तितक्यात रमेशही आला ,तो सरोजच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला,त्याचे नेहा कडे लक्ष नव्हते अस नाही पण त्याने तसं दाखवलं नाही.
त्याने त्याच्या आईबाबांना विचारलं,आवरल्ं का तुमचं मी जाता जाता वाटेत तुम्हांला बसून देतो आणि मग ऑफिसला जातो, नेहा आईबाबांच सामान घेऊन ये, नेहाही त्यांच सामान घेऊन येते,त्यांच्या समोर उगीच कशाला काय बोलयचं म्हणून शांत बसते.
नाष्टा झाल्यावर सासूबाई नेहाला -" भोळी आहे पोरगी तिची काळजी घ्या,आणि सांगितल्या प्रमाणे करा,चला येतो आम्ही"
ते गाडीत बसून निघून गेल्यावर नेहा आत येते ,सरोज तिला रात्रीचा किस्सा सांगते,ते ऐकून नेहाला बरे वाटते.
सरोज-"ताई माझी केस विंचरून दे ना ,छान पोहे केलेले तू,मला तुझ्या हातचे पोहे खुप आवडतात"
नेहा-" हो देते,किचन आवरून येते"
सरोज-" मी माझ्या रूम मध्ये आहे" असं म्हणून निघून जाते.
खरं तर कालच्या प्रसंगा नंतर नेहाला सरोजचा खुप राग आला होता,पण जेव्हा ती रात्रीच सगळं सांगते ,तेव्हा तिला हायसं वाटतं, तिला एकटीलाच सगळी कामं करावी लागतात म्हणून पण ती मनातल्या मनात चिडलेली असते, सरोज जेव्हा तिला केसांबद्दल बोलते ,तेव्हा तिच्या लक्षात येते की,हे तर आपल्याला आधी पासूनच माहित आहे,मी उगाचच त्या बिचारी वर चिडली आणि रमेशच्या बाबतीत चुकीचा विचार केला.
काम आवरल्यावर ती सरोजच्या रूम मध्ये जाते,पहाते तर खूप पसारा असतो ,ती सरोजला ओरडते , तू लहान आहेस का पसारा करायला.
सरोज-"सॉरी ताई ,मी ते आवरायला गेले आणि ते सगळं पडलं"
नेहा-"पण तुला काय गरज होती ,वरती चढायची,लागलं असतं ना तुला"
नेहा सगळं आवरते आणि तिची केस विंचरायला घेते.
सरोज-"ताई,एक विचारू का,सगळ्यांना एकच बायको असते, मग आपल्याच घरात का दोन बायका"
नेहाला काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हते,पण काहितरी उत्तर द्यावे लागेल नाही तर ती शांत बसणार नाही.
नेहा-"तुला माझ्या कडे रहायला यायचे होते ना म्हणून तुला लग्न करून आणले"
सरोज-"मी अशीच येऊन राहिली असती"
नेहा-"तू आता कायमचं माझ्या सोबत राहणार,असं तुला राहता नसतं आलं ना म्हणून"
सरोज-"अरे बापरे,असं असतं काय "
नेहा-"झाले तुझे प्रश्न विचारून,आता आपल्या साठी जेवण बनवते , तो पर्यंत तू हा मोबाइल वर गेम खेळ आवडतो ना तुला,की माझ्या बरोबर येतेस ?"
सरोज-"नाही मी खेळते"
नेहा जेवण बनवायला किचन मध्ये जाते, जेवण बनवताना,सासूबाई बोललेल्या गोष्टी आठवतात,किती सहजपणे सांगून गेल्या पंधरा दिवस इकडे आणि पंधरा दिवस तिकडे,लगेच वाटणी पण करुन टाकली, माझा जरी निर्णय आहे, तरी मी माझ्या डोळ्या समोर दुस-या कोणा बरोबर नाही पाहू शकत, दुसरं मन म्हणत होतं ,तूच तर हट्टाला पेटली होतीस,रमेश तर नाही म्हणत होता आणि त्याची अट ऐकून मनातून आनंद झालेला , आता शेवट पर्यंत निभवाव लागेल.
दुसर मन म्हणत होते,तू खूप मोठी चूक केली आहे,आता हळूहळू रमेश तुझ्या पासून दुरावेल.
भाजी करपण्याच्या वासाने ती विचारातून बाहेर येते आणि पटकन गैस बंद करते.
चांगली चांगली भाजी काढून घेते ,पोळ्या करते आणि सरोजला बोलवून दोघी जेवतात, ती सगळं आवरेस्तोवर सरोज तिथेच बसते , नंतर दोघी झोपायला जातात. सरोजच्या रूममध्ये दोघी झोपतात, झोपण्याआधी नेहमी प्रमाणे सरोजचे प्रश्न विचारणे सुरु होते.
सरोज-"एक विचारू हे तुला पण त्रास देतात का,त्रास देतात म्हणजे काय करतात"
नेहा-" हे कोण"
सरोज-" नव-याच नाव घ्यायचं नसतं असं आईनी सांगितल,आपले हे"
नेहा-"अग ,लग्न झाल्यावर असचं असतं आणि तसं केलं की बाळ होतंं"
सरोज-"मग तुला नाही झालं अजून "
नेहाच्या डोळ्यांत पाणी आलं,पण ती स्वत:ला सावरते आणि म्हणते -"देवाने माझं ते सुख हरवून घेतले "
सरोज-"मला तुला असं रडताना पाहून, बरं नाही वाटत,देवा तू माझ्या ताईला आनंदी कर"
नेहा-" माझी गुणाची सरोज "
सरोजला झोप लागते,नेहा तिच्या कडे बघून विचार करते ,खरचं किती निरागस आहे ही मी उगाचच तिच्यावर चिड चिड करत असते,तिला तर बाहेरच जग कसं आहे ते सुध्दा माहित नाही.
संध्याकाळ होते , तर नेहा दोघींना चहा करते , सरोज म्हणते,ताई बिस्किट ,नेहा म्हणते ,आज नाही आहे , उद्या आणू,असं म्हटल्यावर सरोज शहाण्या मुलासारखा चहा पिते.
नेहा तिला टीव्ही लावून देते ,तिचा फेव्हरेट कार्टून शो आणि
ती स्वयंपाकाची तयारी करते.
तितक्यात रमेश ऑफिसमधून येतो , त्याला घरात शिरताना कार्टूनचा आणि त्या बरोबर हसण्याचाही आवाज ऐकू येतो,तो आत येऊन पहातो तर सरोज जोरजोरात कार्टून पाहून हसत असते,नेहमी प्रमाणे तो किचन मध्ये जाऊन डबा ठेवतो,नेहमी प्रमाणे नेहा त्याला चहाचं विचारते आणि चहा ठेवते.
तो फ्रेश होऊन येतो आणि चहा पीत असतो ,तेव्हा नेहा येते आणि विचारते ,फोन आलेला का पोहोचल्याचा ,तो हो आला होता असं बोलतो.
रमेश-"हिला कार्टून येवढे आवडतात ,पुढचं काही माहित नाही ,पण सध्या तरी हिच्या रुपात घरात लहान मूल असल्या सारखं वाटतयं"
नेहा-"हो रे ती खूपच निरागस आहे "
जरा वेळ दोघेही तिच्या बरोबर कार्टून पाहतात,नंतर जेवून झोपायला जातात,सरोज नेहाला म्हणते,मला झोप येइस्तोवर माझ्या शेजारी झोप, रमेश डोळ्यानेच तिला हो म्हणतो.
नेहा सरोज झोपल्यावर त्यांच्या रूममध्ये येते,रमेश पुस्तक वाचत असतो,तो तिला बघतो आणि विचारतो -"झोपली का?"
नेहा-"हो, तू रात्री माझा फोन का नाही उचलला?"
रमेश-" तू मला एवढी त्रास देते,मी फोन नाही उचलला तर तुला एवढा त्रास झाला, सरोज रीतसर बायको आहे माझी आणि तू त्यासाठी संमतीपत्र दिले आहे "
नेहा-"इथं मी टेन्शनमध्ये आहे आणि तूला मजा सुचते का"
रमेश-"आता काय झालं "
नेहा सकाळी त्याची आई काय बोलली ते सांगते.
रमेश-"तू टेन्शन घेऊ नकोस,मी उद्याच डॉक्टरांशी फोनवर बोलतो ,मग आपण जाऊन भेटू आणि IUI कधी आणि कसं करायचं ते विचारू, झोप आता"
नेहा झोपण्याआधी देवाला नमस्कार करुन म्हणते -"जसं ठरवलं आहे तसं सगळं होऊ दे"
पण जिथं ठरवल्यासरख्ं होईल ते काय जीवन आहे ,त्यात चढउतार हे असणारच.
काय असतील ते चढ उतार हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा.
आणि तुमच्या कमेंट वाचायला मला आवडते ,लिहायला अजून हुरुप येतो .
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा