
सवत-एक सामाजिक व्यथा-भाग 5
रमेश गाडीत बसला ,त्याला त्याची आणि नेहाची पहिली भेट आठवली,त्यानंतर एकमेकांसोबत लग्नाआधी घालवलेले क्षण ,किती मंतरलेले दिवस होते ते,दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते,त्यानंतर लग्नाचा निर्णय,ज्यावेळी लग्न झाले तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, पण तिच्या साथीने आज स्वत:च असं घर आहे,गाडी आहे आणि सगळं ठीक आहे, पण मध्येच हे सगळं इतकं पटकन घडलं आणि आयुष्य सगळं विस्कळीत झालं आहे, पण मी सगळं व्यवस्थित करेल , एक मूल दत्तक घेतले की ,तिला तिच्या अपूर्णतेची जाणीव ही होणार नाही,तिला आनंदी पाहून मला आनंद होईल,मी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे.
रमेश सकाळी लवकर घरी पोहोचतो, नेहा त्याला बोलते दगदग झाली ना तुझी खूप, मी आल्याचा चहा करून देते ,मग झोप काढ एक छान, मी तुला दुपारच्या जेवणाच्या वेळी उठवते.चहा पिऊन रमेशला छान झोप लागली.
दुपारच्या जेवणाची तयारी करून ठेवली आणि रमेशला उठवायला गेली, चल उठ रे जेवण झालं आहे,फ्रेश हो मग जेवू ,
तर त्याने तिला हात धरून खेचले आणि म्हणाला येवढी काय घाई आहे,असं म्हणून त्याने तिला आपल्या जवळ ओढलं,ती लाजून म्हणाली,आज रोमँटीक मूड आहे वाटत,त्यावर तो म्हणाला ,का नसावा बायको जर अशी असेल तर असणारच की, असं बोलल्यावर तीही त्याच्या मिठीत विसावते.
जेवताना रमेश नेहाला म्हणतो किती दिवस झाले आपण बाहेर गेलो नाही ,आज संध्याकाळी जाऊ, बाहेरच जेवण करुन येऊ.
असं बोलल्यावर नेहा त्याला म्हणते,किती दिवसांनी आज आपण पहिल्या सारखं बोलतोय,कामाच्या टेन्शन मुळे मी ही तुला जास्त काही विचारलं नाही, आज तुला असं आनंदात पाहून मला खूप बरं वाटलं.
संध्याकाळ दोघांची एकमेकांसोबत छान जाते, आता त्याच्या घरच्यांचे फोन येणही बंद झालेलं असतं त्यामुळे रमेश ही आनंदी असतो.असाच एक महिना कसा निघून जातो ते कळतच नाही.नेहाचही रोजच रूटीन व्यवस्थित चालू असतं.
दोन तीन वेळा आई वडीलांचा फोन येवून गेला, एकदा आईने नकळत तिला विचारले,गावी काय झाल ते जावई बापू काही बोलले का,तर नेहा आईला सांगते की , सासूबाई आता व्यवस्थित आहे आणि आमचही आता पहिल्या सारखं छान रूटीन सुरू आहे.
आई म्हणाली, बघ तुला यायला जमत असेल तर भेटायला ये,आठवण येते ग तुझी. त्यावर नेहा म्हणाली रमेशशी बोलून मी येते, नेहाने रमेश जवळ संध्याकाळीच विषय काढला,मी आई बाबांना भेटून येते,दोन दिवसांत येईल,खूप आठवण येते रे त्यांची, चालेल ना तुला.
अगं का नाही , आईबाबा आहेत तुझे जाऊन ये असं रमेश बोलला , त्यावर नेहाची कळी खुलली .तिला चिडवण्यात त्याला खूप मजा यायची,तो तिला म्हणाला की माहेरी गेल्यावर मला विसरू नको ,तशी ती त्याला बिलगली आणि म्हणाली , असं कधीच होऊ शकत नाही.
आज नेहा खूप खुश होती,वडिलांना ती खूप दिवसांनी भेटणार होती, जाता जाता वाटेत तिने वडिलांना आवडतात म्हणून लाडू घेतले आणि अजूनही दुसरं थोडं खायचं सामान घेतले,दोन तासांचा प्रवास होता पण तोही जास्त वाटत होता.
आलं एकदाच एस टी स्टँड,ती बस मधून उतरली व सगळीकडे नजर फिरवली,कारण ती ब-याच दिवसांनी आली होती,आई वडीलांना सरप्राईज द्यायच म्हणून त्यांनाही कळवल नव्ह्तं,
रिक्षा स्टँड कडे जाऊन तिने रिक्षा केली आणि पत्ता सांगितला.
घराबाहेर रिक्षा येऊन थांबली , तशी तिने हाक मारली,आई,
बाबा तसं सगळे आश्चर्यचकीतच झाले ,बाबा तिला बोलले सांगितले असते तर घ्यायला आलो असतो.
नेहा-"मग मला तुमच्या चेहर्यावर आनंद बघता नसता आला,मला तुम्हांला सरप्राईज द्यायचे होते,मग आवडलं का सर प्राईज"
आई-"एवढं लग्न झाले तरी अजून तू काही बदलली नाही "
नेहा-"पण का बदलायचं "
आई-"ठीक आहे,आता तोंड हातपाय धू,तोपर्यंत मी चहा टाकते"
नेहा फ्रेश होऊन येते ,चहा घेते आणि आईला सांगते, मी आलेच सरोज कडे जावून,
आई - "अगं,नंतर जा, लगेच काय इतकी घाई आहे "
नेहा-"खूप दिवस झाले भेटलोच नाही,तुला माहित आहे ती किती आनंदी होईल मला पाहून"
आई-"बरं बाई जा,पण जेवणाच्या वेळे आधी ये ,आम्ही जेवायला तुझी वाट पहातोय"
बाबा-"आता आली आणि लगेच कुठे निघाली "
आई -"कुठे म्हणजे काय,जिवलग मैत्रिणी कडे,सरोज कडे"
बाबा-"खूप जीव आहे दोघींचा एकमेकींवर ,असाच कायम राहो "
आई-"कसं सांगणार आहोत आपण तिला सारं"
बाबा-"आजचा दिवस जाऊ दे ,उद्या बोलू,किती आनंदात आहे ती पहिलं नाही का"
असं बोलून बाबा म्हणतात,मी जरा बाहेर जाऊन आलो.
इकडे नेहा सरोज कडे पोहोचते, तिला पाहून सरोजला खूप आनंद होतो, ती म्हणते इतक्या दिवसांनी तुला माझी आठवण आली का,ही म्हणते ,नाही गं ,तसं काही नाही, मग झालेले सगळं सांगते.
ते ऐकल्यानंतर सरोज -" तरिही तू मला इतक्या दिवसांत भेटायला नाही आली,मला तुझी खूप आठवण येते"
नेहाने कशी बशी तिची समजूत काढली.
आता ही सरोज म्हणजे एक दोन घर सोडून नेहाच्या आईवडीलांच्या शेजारी राहतात, त्यांची मुलगी ,ती नेहा पेक्षा दोन वर्षानी लहान असेल. लहानपणी कोणीही तिला खेळायला घेत नव्हते, कारण ती थोडीशी मतिमंद होती,नेहा मात्र तिच्याशी जाऊन खेळायची, तिला वेगवेगळ्या गोष्टी सांगायची, खाण्याचे वेगवेगळे प्रकार खाऊ घालायची ,तिच्या कलानं घ्यायची ,त्या मुळे नेहा सरोजची आवडती ताई होती,ती एक दिवस जरी नाही आली तर इकडं सरोज गोंधळ घालायची. दोघीही मोठ्या झाल्या , सरोज मात्र फक्त शरीराने मोठी झाली होती ,हट्ट मात्र लहान मुलांसारखे करायची .
जेवणाची वेळ झाली होती म्हणून नेहा सरोजला समजावून घरी आली, आईवडीलांबरोबर छान जेवण केले ,आईला म्हटली ,जेवण खूप छान झालं होतं,त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले सगळे,आज नेहाला सगळ्यांबरोबर खूप छान वाटत होते. संध्याकाळी तिने रमेशला फोन करून जेवणाची चौकशी केली आणि काळजी घे म्हणाली ,गूड़ नाइट म्हणून फोन ठेवला आणि झोपायला गेली.
तिलाही माहित नव्हतं की दुस-या दिवशी तिच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे.
काय होईल दुस-या दिवशी ते पाहुया पुढच्या भागात.......
रुपाली थोरात