सावर रे..२

गरज ही नाही त्याची..तुझा वेळ होणं जमणार नाही या पुढे.. तितका वेळ नाहीये ..तुझी ही गरज नाही राहीली ती..एरवी ही नव्हती.. स्वतःचं कुंपण तूच आखून घेतलंयस.. फक्त लांबून पहाण्याचा अधिकार दिलास.. ती उंची फक्त नजरेनंच मोजता येतीय मला.. ओलांडायचं कुंपण तर विश्वास देत नाहीयेस..मी नेहेमीच परतते खूपसे प्रश्न घेऊन मनांत..
"किती वेळा आवरणार आहेस सगळं..?"
"माहीत नाही ..जितका पसारा करशील तितक्या वेळा.."
" तुझ्या पेशन्सची दाद द्यावी वाटतीय का..? "
" मी अपेक्षा च ठेवल्या नाहीत तशा.. तुझ्या कडून तर नाहीच.."
"तरीही येतेस.. "
" तुला नको असेल तर येणार नाही ईथून पुढे.. माझा टाईमपास होतो म्हणून येत नाहीये मी.."
" तू zigsaw आहेस.. किती ही सोडवायंच म्हटलं तरी न सुटणारं.. Puzzle .. कोडं असंच काहीतरी ."
"चांगली उपमा आहे.."
" हसू नकोस ..सिरीयस आहे मी.."
तीचं हसणं पाहून तो ही हसला उगीचच "काय झालं ..?"
"कुछ भी नहीं .."
"चाय बनाऊँ अद्रक वाली..?"
"ना मैं मना कर सकता हूँ ना तुम मानोगी.."
"बारीश के आसार हैं.."
तूफान का अंदेशा भी... कैसे लौट पाओगी.."
"तुम बेफीक्र रहो.."
"वादळाची भीती घालू नकोस ..जाईन मी.. फक्त स्वतःला सांवर.."
"रुक जाओ फीर.."
" शक्य नाही ते..
गरज ही नाही त्याची..तुझा वेळ होणं जमणार नाही या पुढे.. तितका वेळ नाहीये ..तुझी ही गरज नाही राहीली ती..एरवी ही नव्हती.. स्वतःचं कुंपण तूच आखून घेतलंयस..
फक्त लांबून पहाण्याचा अधिकार दिलास.. ती उंची फक्त नजरेनंच मोजता येतीय मला.. ओलांडायचं कुंपण तर विश्वास देत नाहीयेस..मी नेहेमीच परतते खूपसे प्रश्न घेऊन मनांत..
ज्याची उत्तर तुझ्या कडेही नाहीत,माझ्या कडेही नाहीत.."
"हा चहा तुझा .."
"वादळ शांत झालंय.. जायला हवं मला.."
"किती स्ट्राँग चहा केलायस झिणझिण्या आल्या .."
"हसतेस काय..तुझं लेक्चर परवडलं.."
"ऐक माझं मी सोडायला येतो..फक्त वाघोबाच्या गुहेत बोलावू नकोस.."
"तेवढं सांभाळते मी.. घरी येशील रे परत..घाबरु नकोस वाघोबा सध्या शांतय.."
"तुझं फेवरेट गाणं कुठलं गं ..? नेहेमी गुणगुणतेस.. रीमझिम गिरे सावन मौशमी चं.."
" पहले भी यूँ तो बरसे थे बादल
पहले भी यूँ तो भीगा था आँचल
अब के बरस क्यों सजन सुलग सुलग जाऐ मन .. भीगे आज ईस मौसम में लगी कैसी ये अगन..
"दोन दिवसांवर दिवाळी आलीय... या वेळेचं प्लँनिंग..?"
"काहिही नाही ..खास असं.."
" ए , वाघोबा चिडेल..? मी भेटायला आलो तर..?"
" सांगता येत नाही तू रीस्क घेणार असलास तर ये हरकत नाही पण ..जिवंत परत जाशिल याची मी खात्री देणार नाही .." "बघ तुझं तू ठरव.. "सगळे नग आहेत एकेक घरांत तुमच्या ..सरळ लग्नाची मागणी घालावी..तर वाघोबा पिच्छा सोडत नाही..नक्की अटी काय काय घालेल..?
अर्जुना सारखा मत्स भेद की शिवधनुष्य ..?"
" माझी तयारी आहे, येऊ का..मागणी घालायला..?"
"देख लो..आना चाहो अगर.. कदाचित प्रसन्न होतील वाघोबा.."
आईनं फिल्डींग लावलीय तशी ..तू दादाचा मित्रच आहेस हे माहितीय तीला पण अँरेज कम लव्ह मँरेज की लव्ह कम अँरेंज मँरेज हा प्रश्न फक्त तूच सोडवू शकतोस..
" एक कर फक्त दूसऱ्या कुणाला हो म्हणू नकोस निदान थोडे दिवस तरी.."
"हसतेस काय..?"
"किती इनसिक्युअर आहेस.. स्पष्टीकरण द्यायची गरज वाटतेय तुला..विश्वास ठेवला आहेस मग आणखीन खात्री हवी कशाची..?"
"मला उत्तर मिळालंय माझ्या प्रश्नाचं .."
"बाय द वे ..गुरगुरेल की डरकाळी फोडेल वाघोबा..?"
तीचं अनिर्बंध हसणं साठवून ठेवलं त्यानं..उमललेला निशिगंध दरवळावा तसा तीच्या श्वासांची लयबद्धता पहात राहीला आसूसून..












🎭 Series Post

View all