भावनांचे कल्लोळ ही तसेच अनिर्बंध आहेत.. उगीच आलो ईतक्या रात्री ईथे..
खरंतर गरज कुणालाच नाहीये आपली. वैदेहीनं येणारा हुंदका आवरला.. कुठे ही अडकायचं नाहीये आता ..मनाचं सैर भैर होणं आवरायलाच हवं.. माईच्या कपाटातली डायरी हवी होती ..तीनं अलगद कपाट उघडलं..किंचितशी धूळ जमलेली त्यांवर तीनं हलकेच पदरानं डायरी पुसली.
डोळ्यांतल्या अश्रुंनी समोरचं काही दिसेना.. शेवटची आठवण माईची.. इतक्यात मागून कुणीतरी हात धरला ..
"काय चोरती आहेस..?"
"माझ्या खोलीत माझ्या परवानगी शिवाय कुणी आलेलं चालत नाही मला माहीत आहे ना..? "
" हो माहित आहे.. पण मी खरंच काही घेतलेलं नाहीये... "
सौमित्रनं तीला जवळ खेचलं तीच्या डोळ्यांत पहात विचारलं " खरंच काही चोरलं नाहीयेस..? आठवून बघ.."
हातातल्या किल्ल्यांचा जुडगा तीनं मागच्या मागेच टेबला वर ठेवला..
सौमित्रनं तीचा हात अजूनही गच्च धरलेला.. मनगटांवरची पकड आणखीन घट्ट केली त्यानं. "आई गं " म्हणत एका हातानं लपवलेली डायरी सौमित्रच्या समोर धरली वैदेहीनं.
तीचा हात सोडतांना मिश्कील हसला " चोरी और सीना जोरी.."
डोळ्यांत तरळणारं पाणी न थांबवता..तीनं फक्त टिपून घेतलं.. " हाच आळ घ्यायचा रहायला होता फक्त ..." " काही म्हणालीस..?"
" नाही .. स्पष्टीकरण द्यावं असं काहीच नाही माझ्याकडे.. चुकलंच माझं यायला नकोच होतं न विचारता.. तुम्ही माफ कराल अशी अपेक्षा करते.."
"ही माईची डायरी शेवटची पहायला आले होते.. तीनं भजनं आणि गाणी लिहून घेतली होती माझ्याकडून ..शेवटची आठवण तीची.. चोरणार नव्हते ..काहीच..या मृण्मयी आठवणी हृदयांत आहेत जपलेल्या ..आता नाही त्रास होणार तुम्हाला कधीच ..उद्या निघतीय ..बाबा आलेत न्यायला..तीनं पुन्हा एकदा त्या डायरीवरुन मायेनं हात फिरवला.. ह्या किल्ल्या कपाटाच्या बघा काही गहाळ झालंय का तुमचं.."
सौमित्रच्या हातांत किल्ल्या दिल्या त्या निसटल्या हातांतून दोघं एकाच वेळी खाली वाकली.. "क्या करती हो.. ईतनी हडबडी.. पागल हो.. समजूच शकलो नाहीये तुला मी.." "मी आहे तो पर्यंतच पहा .."
तीच्या डबडबून आलेल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करत " उद्या जाणार आहेस..कल्पना नव्हती मला.. थांब ईथेच जाऊ नकोस त्यानं अधिकार वाणीनं सांगितलं.."
अपमान,आणि जीवघेणी अवहेलना थरथरणारा देह.. येणारा हुंदका एका हातांनी दाबून ती फक्त सौमित्रच्या हालचाली न्याहाळू लागली..
कपाटात काहीतरी शोधत होता तो.. ही जीवघेणी शांतता असह्य झाली वैदेहीला.. पळून जावं ईथून दूर कुठेतरी.. पुन्हा येणंच नको मनानं ही ..स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करणं .. खरंच काय चोरलंय मी..? आजीची मैत्रीण माई .. शेवटचं भेटायला बोलावलेलं.. आजीच्या दुखण्यामुळे ती येऊ शकली नाही.. जे सात आठ दिवस होते.. जीव लावावं असं कुणीतरी आहे आपलं आजी सारखंच...ही जाणीव तीव्र होत गेली.. " "माईचं जाणं विसरू शकत नाहीये पण आता थांबण्या सारखं काहिही नाही..
कोणत्या जन्मातलं आहे हे सगळं..? "
"तुमची उलट तपासणी झाली असेल तर निघते मी.."
"नाही झाली अजून.."
" मग जाणार आहेस तर उद्या.. माँ नं परवानगी दिली..? " " हो कुणासाठी थांबायचय ईथे..माझं कोण आहे ..?"
त्यानं खुणेनं थांब म्हणून सांगितलं..
नाजूकशा चणीची बोलक्या डोळ्यांची वैदेही.. एखाद्या विद्ध हरिणी सारखी थरथरत उभी होती.. तीच्या या अशा भित्रट स्वभावावर ही जीव ओवाळून टाकावा.. नाजूकशी चण पाणीदार मोठाले डोळे ..पापण्यांचे अर्धचंद्र भुरळ घालणारे.. एक ओठ दातांत दाबुन हुंदका दाबण्याची तीची जीवघेणी लकब..
काय काय डोळ्यांत साठवावं..?
सौमित्र झटक्यांत पुढे आला.. वैदेहीच्या दोन हातांची ओंजळ केली त्याने..
"आम्ही कुणीच नाही आहोत का..? माईनं तीच्या बांगड्या दिल्या होत्या ..होणाऱ्या नात सुनेला दे म्हणून ते शोधत होतो.. "
"घालणार आहेस का..? सांगू का काय काय चोरलंयस माझं..?"
त्यानं हलकेच कपाळावर ओठ टेकवले वैदेहीच्या ..
"वेडाबाई कुठली.."त्याच्या आश्वस्थ मिठीत स्वतःला कैद करतांना वैदेही च्या डोळ्यातला पाऊस पुन्हा अविरत कोसळू लागला..दाटलेलं मळभ क्षणांत दूर झालं.. ©लीना राजीव.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा