सांवर रे...

एकमेकांसाठी असणं ..ते जपणं.. आणखी काय हवं..?


अस्ताव्यस्त पडलेल्या पुस्तकांकडे तीनं दिर्घ श्वास घेऊन पाहिलं पुन्हा हे कसं आवरायचं.? जीवघेणंय सगळं.. कितीदा मागे लागलोय आपण जरा तरी व्यवस्थित रहा रे.. मी नसेन ..दरवेळेस.. तुझा पसारा आवरायला..तीनं नाजूक मानेला झटका दिला.. हातानंचं बो बांधला .दातांत धरलेली नाजूक पिन केसांत अडकवली.. मानेवर उष्ण श्वास जाणवला ..बांधलेले केस मोकळे झाले . .."राहु देत मी आवरतो नंतर..तू फक्त अस माझ्या साठी.."
"पुरे हं दरवेळेस हेच म्हणतोस ..मला आवडत नाही धांदरटपणा तुझा.. माहीती आहे तुला .."
दोन coffee चे मग आणलेले त्याने टेबलवर ठेवलेले..त्यातला एक तीला देत म्हणाला हे आवरशील सगळं कधीतरी पण मला कसं आवरशील..? " " है मेरे पास फंडा.." आप सुधर भी जाओगे और बाज भी आओगे.."
"वाट पाहीन त्या दिवसाची..त्यानं दोन्ही हातांनी वेढून घेतलं तीला.. तीच्या हातातला मग बाजूला ठेवला.. "बघ कशी झालीय..?"
"मस्त ..तू नेहेमी अशीच पितोस coffee..? " "हो ..का ग ..?"
"नाही मग हरकत नाही मी चहा पीते तेच बरंय.." नाहितर सवय लागेल तुझी आणि coffee ची.." ही ..
"लागू देत मग.. "
" आप के लिए बेवजह ही होना था .. शिकायत ही सही.. आदत में बदल जाने दो."
"अफलांतून शायरी ..खरंच कसं जमवतोस..?"
तीच्या बटांना हातांनी कानांमागे सारत "बताऊँ ..?"
म्हटलं त्यानं आणि त्याच्या तळहातांवर हलकेच चुंबन घेतलं तीनं..
" स्वतःचं विरघळणं सोप्पं नसतं ..निर्ढावलेल्या मनाचा असंयमित कोपरा करकरीत ठेवणं जमवायचं कसं रे..?"
"खूप कोड्यांत बोलतेस तू.. कधी कधी समजत नाहीस.."
"तेच बरंय ..मला समजून घेणारा जन्माला यायचाय.."

हसला खळखळून तो.. "हो का..?"
" हो "
बाहेर वीजांचे कल्लोळ उठले.. खरंतर पावसाचा अंदाजच येत नाहीये .. कधीही कोसळतो बिनबोभाट.. अंगावर येणारा गार वारा श्वासांत भरुन घेतला तीनं .. तूफान कोसळणाऱ्या जलधारांकडे अनिमिषतेनं पहात ती म्हणाली.."असं कोसळयायचंय मला अनिर्बंध .. "
त्याचा हात धरुन खेचत बाहेर आणलं ..
कोसळणाऱ्या जलप्रपातांचे कोवळे थेंब झेलतांना मिश्कील पाहीलं तीनं.. तळहातांवर घरंगळणारे मोती वेचतांना तीची होणारी तारांबळ पहातांना त्यानं चेहेऱ्या वर पडणारे ते अधीर क्षण गोळा केले..
तीच्या वेडेपणांवर हसणं ही तीला रुचणार नाही हे जाणून होता तो.. स्वतःला सावरत त्यानं हळूच तीच्या शेजारी उभं रहाणं पसंत केलं.. "माझं मोकळं आभाळ होशिल.. ?"
तीनं अनपेक्षित विचारलेल्या प्रश्नाला उत्तर काय द्यावं विचार करतंच होता इतक्यांत तीनं त्याच्या डोळ्यांत खोलवर पाहिलं
" ए ,काहीच दिसत नाहीये मला.."
"मी कुठेच दिसत नाहीये.."
" अश्रूंच्या चांदण्यांनी भरुन गेलंय आभाळ
तुझं.."
©लीना राजीव.





🎭 Series Post

View all