सावर रे... (भाग १)

Short and sweet love story.. who have a romance, drama and tragedy...

© शुभांगी शिंदे

सावर रे…. (भाग १)

समारंभ संपवून कबीर बाहेर पडला…. गार्डने गाडीच दार उघडून दिल… कबीर गाडीत बसला तसा रेवाने मेसेज दिला की आपल्याला तडक हॉस्पिटलला जायच आहे…. आणि कबीरचा फोन त्याला परत दिला…. कबीर फोन घेऊन चेक करतो…

कबीर : हॉस्पिटलला का??? (फोन बघुन) वीस miss calls??? रेवा????

रेवा : सर मलासुद्धा नक्की माहीत नाही… पण दिपक सरांनी ताबडतोब हॉस्पिटलला येण्यास सांगितले..

कबीर : मग मला आधी का नाही सांगितलं????

रेवा : सर मी सांगणारच होते पण तुमच नाव announced झाल आणि तुम्ही speech देण्यासाठी स्टेजवर गेलात…. दिपक सरांना परिस्थिती कळली तेव्हा तेच म्हणाले की नंतर सांग म्हणून…

कबीर : हममम् (काहीच बोलत नाही)

गाडी एकदाची हॉस्पिटल जवळ येऊन थांबते… त्यांना रिसीव्ह करायला already काही लोक उभे असतात… ते त्यांना ICU वॉर्ड मध्ये घेऊन जातात…. बाहेर कबीरची आई बसलेली असते… कबीर तिच्या जवळ जातो तसा आई एकदम हंमबरडाच फोडते….

आई : (रडत कबीरच्या खांद्यावर डोक ठेवून) कबीर!!! आपली दी… बघ ना.. अरे.. काय झालं…???

कबीर : आई… शांत हो… मी आलोय ना… काहीही होणार नाही आपल्या दीला….

आईला शांत करून रेवाला तीची काळजी घेण्यास सांगतो … आणि दिपकला नक्की काय घडलय हे विचारतो….

दिपक : तु फोन उचलत नव्हतास… म्हणून आईने मला कॉल केला…. नेहा ने आत्महत्येचा प्रयत्न केला….

कबीर : काय ?? पण का?? दी अस का करेल???

दिपक : तिच्याजवळ ही चिठ्ठी सापडली… त्यात तिने अस लिहीले आहे की प्रेमात मला दगा मिळाला आहे… त्याने प्रेमाच खोट नाटक केलं आणि मी त्याच्या प्रेमात सर्वस्व हरवून बसले… मला आता जगायच नाहीए…

कबीर : (अतिशय रागात) कोण आहे तो हरामखोर?? जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात असू देत मी त्याला शोधून काढेण….

इतक्यात डॉक्टर बाहेर येतात…. आणि नेहा ठिक असल्याचे सांगतात…. फक्त आत्ता तिला आराम करु देत, तिला त्रास होईल असे कोणतेही प्रश्न विचारू नका… तिची मानसिक परिस्थिती ठीक नाही आहे…. so please take care of her…. येवढ बोलुन ते निघून जातात….. कबीर दाराच्या काचेतून आत पाहतो तर नेहा शांत बेडवर पडलेली असते….

डिस्चार्ज मिळून घरी आल्यावर कबीरने आईला आणि नेहाला त्याच्या आत्याकडे दुबईला पाठवले… जेणेकरून हवापालटही होईल आणि नेहा तिच्या जुन्या आठवणीतून दूर राहिल….

दोन महिन्यानंतर…. दिपकच्या मोठ्या भावाची लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी होती… कबीरही तिथे आला होता… दिपक सोडून पार्टीत कोणीच त्याच्या ओळखीचे नव्हते…

कबीर पार्टी न्याहाळत असतो… ब्लॅक पॅण्ट, हलका क्रीम कलरचा शर्ट, हातात Rollex watch, Tom Cruise स्टाइलचा हेअर कट आणि हातात ड्रिंक्सचा ग्लास… अगदी साऊथच्या अल्लू अर्जुन सारखा हँडसम…. पार्टीत बर्‍याच मुली त्याच्यावर फिदा झाल्या होत्या…. हातातल ड्रिंक्सच ग्लास संपला म्हणून तो काउंटरवर गेला आणि दुसरा ग्लास उचलला त्याच वेळी अजून एक हात तोच ग्लास पकडून होता… नजर गेली तर नाजूक असा हात गोरापान दूधाच्या मलाईसारखा मुलायम… लाल नेलपेंट नखांवर चढवलेली, हातात खड्यांच्या कडा…. त्याची नजर आता त्याच हाताच्या बोटांवरून थेट वर चढत गेली…. स्लिव्हलेस आॅफव्हाईट कुर्ता त्याला सोनेरी रंगाची मोत्याची डिझाइन…. पाठीवर रोल केलेले  मोकळे केस आणि कानाला फोन…. ती एकीकडे फोनवर बोलत होती आणि दुसऱ्या हाताने ते ज्यूसच ग्लास पकडून होती… कबीर तिची एक झलक पाहण्यात इतका हरवला की त्याच्याही लक्षात नाही आले की ते दोघेही एकच ग्लास पकडून आहेत… फोनवर बोलता बोलता ती मागे वळली तशी त्याची प्रतिक्षा संपली.. उभट चेहरा, लांब सडक नाक, काळेभोर पाणीदार डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजुक ओठ…

तिने कानाला लावलेला फोन बाजूला केला आणि कबीरला पाहिल… तो ज्यूसचा ग्लास तसाच सोडून तोंड वाकडं करून निघून गेली… इतक्यात दिपकने येऊन कबीरच्या खांद्यावर हात ठेवत त्याला भानावर आणले….

दिपक : काय मित्रा कुठे हरवला???

कबीर : (भानावर येत) कुठे काय?? काही नाही…

दिपक : पाहिल मी…. काया!!! काया देशमुख… दादाच्या खास मित्राची बहीण…

कबीर : हममम…

दिपक : पण आपली डाळ नाही शिजणार….

कबीर : म्हणजे???

दिपक : तिला बिझनेसमन नाही आवडत…

कबीर : (हसून आश्चर्याने) ये क्या बात हुई???

दिपक : अरे पण तु इथे ज्युस काउंटरवर काय करतोयस??? आपली स्पेशल सोय तिकडे आहे… एक एक लार्ज हो जाए??

आणि ते दोघे बार काउंटरवर जातात… इथे काया पार्टीत जाम बोअर झाली आहे.. ती सतत तिच्या दादाला इथुन लवकर निघण्याचा आग्रह करतेय… कायाचा दादा राजेश देशमुख आणि दिपकचा भाऊ… बिझिनेस पार्टनर आहेत शिवाय चांगले मित्र सुद्धा आहेत…  काही वेळाने दिपक आणि कबीर सुद्धा तिथे येतात… कबीरची ओळख करून दिल्यावर त्यांच्या सहज बिझिनेसच्या गप्पा सुरू होतात तशी काया वैतागून निघून जाते….

काया आज सकाळी जरा घाईतच निघत असते कारण आज तिच्या पेंटिंगच exhibition होत… तिने दादालाही आठवणीने उपस्थित राहण्यास सांगितले पण नेहमीप्रमाणे तो त्याच्या फोनमध्ये व्यस्त होता… ड्रायव्हरला सुचना देऊन ती exhibition center ला निघाली… अर्ध्या रस्त्यावर येऊन गाडी अचानक धक्के खाउ लागली… ड्रायव्हरने खाली उतरून गाडी चेक केली..

ड्रायव्हर : मॅडम गाडीचा गॅसकीट उडाला आहे…

काया : काय??? काय उडालाय?? (काहीच न कळल्यामुळे)

ड्रायव्हर : गाडी गॅरेजमध्ये न्यावी लागेल….

काया : Ohh no…. shittt…. ( रागात गाडीला लाथ मारून)

थोडा विचार करून कॅब बुक करते… पण कॅब यायला पण पंधरा मिनिटे लागणार होती… त्यामुळे ती अजूनच चिडते… तेवढ्यात एक काळी स्कोडा गाडी बाजूला येऊन थांबते… त्या गाडीतून दिपक बाहेर पडतो….

दिपक : Good morning Kaya…. इथे काय करतेस ??? (मुद्दाम चिडवत)

काया : (आणखी चिडून) morning walk करतेय… दिसतय ना??…. गाडी बिघडली आहे माझी आणि मला urgently… Exhibition center ला जायच आहे…

दिपक : Just chill…. हव तर मी सोडतो… On the way च आहे….

काया काहीच ओपशन नसल्याने त्याच्या गाडीत बसते… गाडीत ड्रायव्हर सीटवर कबीर बसलेला असतो… तो तिला hii करतो पण ती इग्नोर करते…

दिपक : कसल exhibition आहे.. ??

काया : paintings च…

दिपक : Ohhh really… आम्ही पण येतो…

कबीर : आपल्याला मीटिंगला जायचे आहे… हा फालतू टाईम पास नको… माहित नाही ते चित्र विचित्र रेघोट्या ओढलेले त्या कागदाला काय म्हणून लोक न्याहाळत असतात कोण जाणे….

काया : (आता तिला जरा जास्तच राग येतो) तुम्हाला नाही कळणार ते….

थोड्याच वेळात ते लोक सेंटरला पोहचतात… कबीर नाही म्हणत असतानाही दिपक त्याला आत घेऊन जातो आणि एक एक करत पेंटींग पहात असतात… एव्हाना बऱ्यापैकी गर्दी जमलेली असते… ते दोघ एका पेंटिंग जवळ येऊन थांबतात… काया पण तिथे येते…. दिपक त्या पेंटिंगची तारीफ करत असतो तसा कबीर एक एक नुक्स काढायला लागतो…. काहीही हे काय रेघोट्या मारल्या आहेत आणि लोक हे लाखो रुपये खर्च देऊन विकत घेतात…. तुला सांगतो जर कोणी खरच हुशार असेल तर या अशा रंगोट्या विकत घेणार नाही…. दिपक कबीरला शांत करतो कारण त्याला माहित असत की ह्या कायाच्या पेंटिंग आहेत….

काया : (रागात जाऊन कबीरला मागे खेचत) Hey Mr.. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जाऊ शकता… दिपक तुझ्या फ्रेंडला इथुन घेऊन जा….

दिपक : okkk we are going….

इतक्यात तिचा मॅनेजर तिथे येतो…. आणि तिच्या सर्व paintings विकल्या गेल्याच सांगतो… काया खूप खुश होते…. जवळपास पन्नास लाखाला तिच्या paintings विकल्या जातात पण खरेदी करणार्‍या माणसाने त्याच नाव गुप्त ठेवलेले असते …. मॅनेजरने दिलेला पन्नास लाखांचा चेक ती मोठ्या अटीट्युड ने कबीरला दाखवते… आणि परत नाक उडवून तिथुन निघून जाते…. कबीर तिला बघून मनोमन हसतो….

इथे बिझिनेस प्रपोजलमूळे राजेश आणि कबीरची ओळख वाढत चालली होती… अशाच एका बिझिनेस प्रॉफिटमूळे राजेशने त्याला आणि दिपकला घरी जेवणाचे आमंत्रण दिले… ठरल्याप्रमाणे दोघेही राजेशच्या घरी आले… दारावर बेल वाजली तर कायाने दार उघडले…. समोर कबीरला बघून तिला रागच आला पण मागून राजेश आला आणि त्यानेच त्यांना आमंत्रण दिलंय हे सांगितल्यावर ती तिचा राग तात्पुरता आवरते… कबीर आत येतो तसा काया मागून त्याला चिडवते हे कबीरच्या लक्षात येऊन तो मागे वळतो तस ती काहीच नसल्याच भासवते…

काही औपचारिक गप्पांनतर ते चौघे जेवायला बसतात… आज कबीरची चांगलीच खोड मोडायची अस ठरवून काया मेडला काही सुचना देते…

राजेश : चला सुरूवात करुया….

कबीर : हो… (आणि समोर असलेल सुप प्यायला लागतो)

तसा त्याला ठसका लागतो… (अती तिखट असल्यामुळे)

राजेश : Are you okk????

काया : (प्लान वर्क झाला म्हणून खूश आणि कबीरला चिडवून) तिखट जमत नाही वाटतं….

कबीर समजून गेला की कायानेच हे केल आहे पण तो काही न बोलता गप्पपणे सूप पीत राहतो… सूप खूपच तिखट होत… नाका तोडांतून पूर्ता धूर निघत होता… कबीरचे डोळे लाल झाले होते आणि डोळ्यातुन पाणी येत होत…

काया आधी तर मनोमन खूप खुश होती पण आता कबीरची अवस्था पाहून घाबरली होती कारण दादाला जर कळल तर आपली खेर नाही हे तिला माहीत होतं… एक बाउल सूप संपवल्यावर कबीरचा संयम तुटला आणि त्याने wash basin चा रस्ता विचारला त्याला राजेशने दिशा दाखवताच तो पळत सुटला… बेसिनमध्ये जाऊन त्याने गार पाण्याचे थबके तोंडावर मारले… फ्रिजच गार पाणी गटा गटा प्यायला…. तोंडाची नुसती आग आग झाली होती…. काय कराव काहीच सुचत नव्हतं… खिशातला रुमाल काढून त्याच्यात तोंड दाबल…. पण सगळ व्यर्थ…. बर्फाचा तुकडा तोंडात कोंबला आणि डोळे मिटून ती आग शांत होण्याची वाट पाहू लागला….

त्याची गंमत पाहण्यासाठी त्याच्या मागोमाग आलेली काया आता त्याची तडफड बघून कासावीस झाली होती पण तस न दाखवता तिने गुळाचा खडा त्याच्यासमोर धरला… त्याने तिच्याकडे पाहिलं… तिने पुढे केलेल्या हाताला धरून तिला स्वतःकडे ओढल आणि काही कळायच्या आत आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले… तिने स्वतःला सोडवण्याचा अतोनात प्रयत्न केला पण पुढची दोन मिनिटे तरी तिला ते जमल नाही…. काही क्षणाने त्याने तिला सोडल आणि त्या हातातला गुळाचा खडा आपल्या ओठांनीच तिच्या तळहातावरुन उचलून खाल्ला…. 

कायाने रागाच्या भरात त्याच हाताने त्याच्या गालावर आपली पाच बोटे उमटवली….तसा तो कायाच्या अजून जवळ जाऊ लागला… आता काया थोडी चलबिचल झाली…. आता हा काय करणार या विचाराने ती आपल पाऊल मागे टाकत असते… तसा तो आणखी जवळ जाऊ लागला…. तसा मागून राजेशचा आवाज ऐकू आला…. तसे ते दोघेही परत जागेवर येऊन बसतात…

राजेश : कबीर…. Any problem???

कबीर : काही नाही…. सूप खरच खूप छान आहे…. आवडला मला… (कायाकडे बघून गोड हसत)

काया : (रागात ) घ्याना अजून थोड सूप….

कबीर : नाही नाही ठीक आहे… माझ पोट भरल…. (घाबरून)

जेवण झाल्यावर दिपक आणि कबीर घरी जातात…. काया सुद्धा थोड्यावेळाने झोपायला जाते… पण तिला सारख बैचेन वाटत असत… न राहवून सारखा मगाजचा किसचा प्रसंग आठवत असतो… त्याचा तो स्पर्श, त्याच्या परफ्यूमचा मंद सुवास तिला बैचेन करत असतो… मोठ्या मुश्किलीने तिला शांत झोप लागते…. 

रात्री अचानक तिला जाग येते…. शरीर पूर्ण घामाघूम झालं होतं ती अस्वस्थ होऊन उठून बसते…. घड्याळात बघते तर बारा वाजायला दहा मिनिटे बाकी असतात… घश्याला कोरड पडल्यामुळे ती पाणी प्यायला जाते पण टेबलावरच्या जग मध्ये पाणी संपले होते म्हणून ती उठून किचनमध्ये जाते… फ्रिजमधली पाण्याची बाटली घेऊन तहान भागवते…. परत रुममध्ये जाण्यासाठी मागे वळते तर समोर कबीर उभा असतो….

काया : (एकदम दचकून) तु इथे आणि या वेळेस???

कबीर : (मिश्किल हसत) सुप खूपच तिखट होत… म्हणून परत तोंड गोड करायला आलोय…. आता तुला नाही सोडणार….

काया : (थोडी घाबरून) हे बघ मी दादाला बोलावीन…. तु जा इथुन…

कबीर : बोलव…. तो गार झोपला आहे… (परत हसून तो कायाच्या जवळ जातो… )

काया त्याला तिथून जाण्यासाठी सांगत असते पण तो अजूनच तिच्या जवळ जातो… आपला उजवा हात तिच्या कमरे भोवती घेऊन तिला स्वतःच्या जवळ ओढतो… कायाच्या चेहर्‍यावरून घामाची धार ओघळून मानेवर उतरते… ती आता पूर्ती घाबरते… तो तिला अजून आपल्या जवळ ओढून आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवायला जातो तशी ती दादा…. दादा… म्हणून जोर जोरात हाक मारु लागते…. आणि….. आणि…. घाबरतच झोपेतून उठते…. आपण स्वप्न बघत होतो हे तिच्या लक्षात येत…. डोळे चोळत घड्याळ बघते तर घड्याळात बारा वाजलेले असतात…

Happy birthday to you… 

Happy birthday to you… 

Happy birthday… happy birthday… 

Happy birthday to you….

काया : दादा…. (अगदी लाडिक)

राजेश : Happy birthday काऊ…. (कायाला मिठी मारून)

काया : Thank you…. दा…. (समोर सजवून ठेवलेले गिफ्ट पाहून) आsss… हे सर्व माझ्यासाठी?? Love you भाई… Thank you….

राजेश : You’re welcome बच्चा… झोप आता सकाळी उघडून बघ सगळे गिफ्ट्स…. ( आणि तो दार लावून जातो)

काया एक मस्तपैकी आळस देते आणि आपण स्वप्न पाहत होतो हा विचार करून मनोमन हसते… समोर लहान मोठे गिफ्ट्स सजवून ठेवले होते त्यावर एक नजर फिरवते… अचानक तिची नजर एका ठिकाणी येऊन थांबते… समोर एक गडद लाल रंगाच गुलाब असत सोबत छोटस ग्रिटींग… त्यावर एक मजकूर लिहीलेला असतो….

A beautiful rose for a beautiful woman…

Happy birthday Kaya….

रोझ आणि कार्ड बघून ती खूप खुश होते… ते फूल आणि कार्ड असच हृदयाला कवटाळून ती बेडवर पडते… कोणी दिल असेल हे??? याचाच विचार करत झोपी जाते…

सकाळी अगदी हॅपी हॅपी मूड मध्ये ती उठते… छान तयार होऊन आरशात स्वतःलाच न्याहाळत असते…आणि स्वतःशीच बोलते…. “Happy birthday Princess…” स्वतःलाच आरशात बघून flying kiss देते…

बाहेर हॉलमध्ये येते तिथे एक गुलाबांच्या फुलांचा गुच्छ आणि एक मोठ चॉकलेट ठेवलेल असत…. पुन्हा एक मेसेज….

Again a beautiful roses for a beautiful Princess…. 

तुझ्यातला या चॉकलेट सारखा गोडवा या फूलांप्रमाणे बहरत राहो….

काया या सगळ्या सरप्राइज ने खूप खुश होऊन जाते… पण दिवसभर बर्थडे सेलिब्रेट करायला कोणच नसत… दादा आॅफीसमध्ये बिझी… संध्याकाळी पार्टी आणि पार्टीत गेस्ट कोण तर दादाचे बिझिनेस फ्रेंडस… How borring…

आपल्या कॉलेज फ्रेंडसना घेऊन मुवी आणि शॉपिंगला जाते… संध्याकाळी घरी आल्यावर दादा तिला तयार होण्यास सांगतो… आज बर्थडे बाहेर सेलिब्रेट करु अस सांगून तिला तयार होण्यास सांगतो… काया सुद्धा जास्त आढेवेढे न घेता छान तयार होऊन येते…

लेमन कलरचा ओफ शोल्डर लॉंग प्रिंसेस गाउन… पीनप करून मोकळे सोडलेले केस… कानात हिर्याचे स्टडस्…. हातात साजेसा wrestle… अगदी परी सारखी दिसत होती ती… राजेश तिला एका ठिकाणी घेऊन येतो… गाडी पार्क करण्याच्या बहाण्याने तिला एकटीलाच आत जाण्यास सांगतो… डोअर कीपर दार उघडून देतो तशी ती आत जाते… सगळीकडे धुकट असा प्रकाश असतो… ती आसपास नजर फिरवते… सगळीकडे तिच्या exhibition वाल्या पेंटिंग्ज लावलेल्या असतात… ती हॉलच्या मध्यावर येऊन थांबते… तिथे तीच पोर्ट्रेट असत… ती मनोमन विचार करते की माझ इतक सुंदर चित्र कोणी काढल… त्या चित्रात तिचा तोच फर्स्ट लुक होता जो पाहून कबीर घायाळ झाला होता…. 

ती मागे वळून बघते तर समोर कबीर उभा असतो… तिचा हात हातात घेत…. तुझ्या कलेची कोणी बोली लावावी हे मला नाही पटत म्हणून मीच ती सगळी ठेवून घेतली… तुला त्या दिवशी पार्टीत पाहिल आणि तिथेच माझी विकेट पडली…. त्या दिवसापासून तुला हुबेहुब या चित्रात उतरवण्याचा प्रयत्न करतोय बघ जमलाय का?? 

I love you काया…. I love you so much… आणि सगळीकडे प्रकाश होतो.. सगळे टाळ्या वाजवायला लागतात… राजेश कायाला सांगतो की हा सगळा सरप्राइज प्लान कबीरचा होता… त्याच तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याला तुझ्याशी लग्न करायच आहे…

कबीर कायाला त्याने आणलेला डायमंड सेट तिला गिफ्ट देतो… तस गर्दीतून आवाज येतो अरे असा हातात काय देतो तिच्या गळ्यात माळ…

सगळे त्याला चीअर करायला लागतात… तो नेकलेस एका हातात घेतो दुसऱ्या हाताने तिच्या मानेवर हात फिरवत तिचे केस बाजूला करत नेकलेस तिच्या गळ्यात घालतो… त्याच्या स्पर्शाने ती शहारून जाते…

काया लाजेने चूर होते.. एक नजर कबीरकडे बघते आणि नजर चोरत दूर पळायला बघते तस कबीर तिच्यासाठी गाणं गातो….

सुनो ना संगेमरमर….

कि ये मीनारें …..

कुछ भी नहीं है आगे तुम्हारे 

आज से दिल पे मेरे राज तुम्हारा 

ताज तुम्हारा…..

सुनो ना संगेमरमर 

कि ये मीनारें 

कुछ भी नहीं है आगे तुम्हारे 

आज से दिल पे मेरे राज तुम्हारा 

ताज तुम्हारा

काया पळत जाऊन कबीरला बिलगते…. दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावतात…

इथे बर्थडे पार्टी संपवुन काही दिवसांच्या आतच कबीरच्या इच्छेनुसार ते दोघे रजिस्टर मॅरेज करतात… आज कायाला सगळं खर सांगून टाकू असे दिपक कबीरला सुचवतो पण कबीर टाळाटाळ करतो… कबीरला कोणाचातरी फोन येतो आणि तो तडक काहीही न सांगता निघून जातो… जाताना दिपकला कायाची काळजी घेण्यास सांगतो….

क्रमशः

(हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.. काही त्रुटी असल्यास तेही कळवा.. कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल

🎭 Series Post

View all