पसारा आवरायचा होता पण मनांतला कसा आवरायचा..? दोन तीन पुस्तकं झटकली न वाचलेली कोरी करकरीत..तीनं ..पुन्हा कपाटांत ठेवायची म्हणून ..धुळीचा अबोल थर जमलेला.. नकळत बोटं फिरवली ..तरी ही चुकार धूळच ती..एकच कपाट आवरलेलं दिसत होतं अगदी नीटनेटकं ..रंगी बेरंगी कव्हर्सच्या डायऱ्या ..एकच गुलाबी रंगातली.. लक्ष वेधणारी ..
तीनं चोरटा कटाक्ष त्याच्या कडे टाकला ..काहितरी लिहीत...होता ..बक ध्यान लागलेलं.. खरं तर हा एका पायावर उभा राहिला तर असाच दिसेल नकळत हसू फुटलं ..
"क्यों ..हसी आ रही है..?"
म्हणजे लक्ष इकडेही आहे तर..!
आवाज न करता हळुच ती डायरी काढली तीनं ..वाचणार इतक्यांत "छोड दो..तुम्हारी मतलब की नही है.."
एव्हाना त्याचा ओरडा खायची सवय झालीय तरीही ..
दोन पावलं मागे आली ती..पण लक्ष पुन्हा पुन्हा त्या डायरी कडे जातच होतं.. " मतलब की नही है..?? हा शब्द आपल्यांत आला कुठून..? मैत्रीतला फक्त विश्वासच होता ..त्यांत तुझं माझं असं काहीच नव्हतं.. काहीही लपवण्या सारखं एकमेकां पासून नव्हतंच.. मग मतलब नाही कसा..?
तीनं अट्टाहासानं ती डायरी उघडली.. पहिली दोन तीन पानं स्मृती चिन्हांची..दुमडलेली..तीच नेमकी समोर ..ओझरतं पाहिलेलं तीनं इतक्यांत मागून डायरी हिसकावली त्यानं.."मराठी कविता..."
तीनं मुद्दाम पाठवलेल्या.. त्याला कधीही न समजतील अशा..
आज ही जपुन ठेवल्यां आहेत यानं..?
तीला ढकलून पुन्हा त्यानं कपाटांत डायरी ठेवली.. कुलूपबंद केली..
"तू कधीच विसरला नव्हतांस.. रोज दोन ओळी तरी लिहीत जावा असं सगळ्यां समोर सांगितलेलंस आज ही आठवतंय किती वर्ष झाली चार की पाच..?
"असं ठरवून लिहीता येतं का..? तीच्या आगावू पणावर फक्त तिरका कटाक्ष आणि ..."
" ज्यांना पटतंय त्यांनी लिहा.." इतकं बोलून रागानं निघून गेलेला तो.." जो लिखना चाहतें हैं है वहीं लिखें औरों से मतलब नही.."
खरंच दोन ध्रुव होतो आपण कधीही एकमेकाला न समजलेले.
किती ही पूल सांधायचा प्रयत्न केला भावनांचा तरी कोसळणाराच..हा विचार तीच्या मनांत डोकावला आणि पहिल्या भेटीतलं तेच वाक्य आठवलं ईतक्या वर्षांनी.." मी मराठीतच बोलणार आहे ..लिहीणार आहे ..तुला काहीही समजलं नाही तरी ही.." ??
©लीना राजीव.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा