सत्यवान सावित्रीचा

It's A Story Of Hindu Girl And Muslim Guy's Love


#सत्यवान_सावित्रीचा?

       आज माधवीच्या सहनशक्तीचा अंत झाला  , खूप रडली बिचारी .. ओघवणारे अश्रू थांबत नव्हते कारण तिने तिच्या नवऱ्याला आणि डॉक्टर समीराला रेस्टॉरंट मध्ये एकमेकांच्या हातात हात घेताना बघितलं ,एकमेकांना मिठीत घेताना बघितलं... 
             तिने सगळे कपडे बॅगमध्ये भरले ,बॅग पॅक केली आणि घर सोडून निघाली, तोच तिला दारात अफजल आणि डॉक्टर समीरा दिसले... अफजल आश्चर्यकारक नजरेने माधवीकडे बघत होता, माधवीचे डोळे पाणावलेले होते आणि डोळ्यांत रागही खूप दिसत होता, अफजल माधवीजवळ जाऊ लागला तोच

माधवी - मला थांबवण्याचा प्रयत्न पण करून नकोस✋?
गेले काही दिवस खूप सहन केलं मी, पण नाही आता नाही सहन करू शकणार मी... 

माधवीच्या डोळ्यांतून आसवे वाहत होती ,तरीही ती बोलत होती..

   " अफजल तू भेटलास आणि माझ्या जीवनाला नवा अर्थ मिळाला, तुझ्यासवे गेली तीन वर्षे  प्रत्येक क्षणी मी नव्याने मला शोधलं ... माझ्या सर्वांगावर कोड असणे हे मला पाप वाटत होतं, कोपऱ्यातल्या अडगळीत असलेल्या जाळीसारखी माझी विचारसरणी जर अजूनही तशीच असती तर माझ्या आयुष्याचा कचरा झाला असता...आपल्या लग्नाआधी मी घरी तुझ्याबद्दल सांगू की नको या विचारात असताना तूच मला बोलला की, " कित्येक धगधगत्या  मशाली दृष्टीक्षेपात येण्याआधी  त्या उरात धगधगायला हव्यात " तूच मला आत्मविश्वास दिलास , आणि मी माझ्या कुटुंबाला सोडून तुझ्यासोबत इकडं आपल्या या फ्लॅट मध्ये रहायला आले....तू चिडतोस, रागवतोस, रुसतोस आणि वेळ पडली तर भांडतोसुद्धा पण त्याहीपेक्षा, अधिक तू मला जीवापाड जपतोस असं मला वाटायचं..पण सगळं खोटं निघालं ...बरंच झालं मागच्या महिन्यात माझ्या किडनीच्या आजाराचं निदान झालं ,जेव्हा कळलं की माझ्या दोन्ही किडन्या रिकाम्या झाल्यात तेव्हा पासुन तुझी खरी असलीयत समोर आली... सतत बाहेर असायचा तू ..रात्री उशिरा घरी यायचा आणि मला जवळ सुद्धा घेत नव्हता , नेहमी ही डॉक्टर समीरा आपल्या घरी यायची हल्ली , कधी कधी तर तुझ्या ऑफिसमध्ये सुद्धा ही जायची असं कळलं मला , त्या दिवशी तुझ्या शर्टच्या खिशात मला पिक्चरची दोन तिकिट सापडली, त्या नंतर माझा संशय आजूनच वाढला.. म्हणून आज मी तुमच्या मागावर होते,तर चक्क तुम्हांला मी एकत्र हातात हात घेताना बघितलं आणि एकमेकांना आनंदाने मिठीत घेताना पण बघितलं...अरे एखादा खरंच जर जिवलग असता तर त्याने प्रियसी आता काही दिवसांची पाहुणी आहे हे कळल्यावर तिला जीवापाड जपलं असतं ..परंतु तू तर खूप विचित्र वागलास गेल्या एक महिन्यात.. जणू माझ्यापासून तुझी सुटका झाली या अविर्भावात तूला जगताना पाहिला मी... मला एकटं पाडलंस अफजल तू ?... माझे आधीचे विचारच बरोबर होते सर्वांगावर कोड असणं हे पापच आहे ..

         माझ्या आईने जीव तोडुन मला सांगितलं होतं की, हे फक्त आकर्षण आहे त्या मुस्लिम मुलांचं, प्रेम बिम झूट आहे . अरे तू निदान माझ्या मरणापर्यंत तरी एकनिष्ठ रहायला हवं होतं ....माझी काळजी वाटनं ,माझे लाड करणं वेळोवेळी प्रेम उफाळून येणं हा सगळा फक्त दिखावा होता तर ... खरंच आहे आपला प्रियकर आपल्याला सोडून जाऊ शकतो हे या विश्वातलं भय काही संपणार नाही... तू दाखवलेली सगळी स्वप्नं खोटी होती, दोघांनी घालवलेले सगळे क्षण खोटे होते ,तुझं प्रेम खोटं आणि...तू सुद्धा खोटाच...माझा दम घुटमळत आहे आता या घरात मला अडवू नकोस मला मुकाट्याने जाऊ दे..."

माधवीचं सगळं ऐकून घेऊन ,अफजल ला खूप राग आला..

        माधवीच्या मनातील साचलेला सगळा झरा आज ओसंडून वाहून गेला, त्या झऱ्याला बांध घालणं गरजेचं होतं..

     माधवी जाऊ लागती तोच अफजल तीचा हात पकडतो आणि म्हणतो...

अफजल - कुठं चाललीस ?.. इतक्यावेळ तुझ्या मनातील सगळी भडास बाहेर काढली ना ..आता माझं ऐकुन घे..?

 "  पाहिलंस समीरा हे माझं प्रेम.., किती विश्वास आहे ना हिचा माझ्यावर ,किती छान ओळखलं हीने मला या तीन वर्षात , या तीन वर्षात ज्याप्रमाणे ती माझ्या व्यक्तिमत्त्वानुसार घडत गेली त्या प्रकारे मी देखील तीच्या संगतीने तिच्या नुसार बदलवलं, हिच्या गुणदोषांसह मी सुद्धा हीला स्वीकारलय, जसं ती तीच्या आई बाबाला सोडून आलीय तसं मी देखील मेरे अम्मी, अब्बू को छोड आया हू ये कितनी आसानी से भूल गयी .... मला आज हीचे सगळे शब्द खूप जिव्हारी लागलेत ? ...

    बघता बघता अफजल रडायला लागला आणि तो खाली बसला

डॉक्टर समीरा - भाईजान संभालो खुद को , आता इतक्यादिवस खंबीर राहून आपण सगळं नियोजन केलंय ते असं हार मानून गमवायचं नाही...

माधवी - नियोजन ? कशाचं ?

डॉक्टर समीरा - तुझ्या किडनी बदलाच्या ऑपरेशनचं ..

माधवी - काय ? आणि ते कसं शक्य आहे ?

डॉक्टर समीरा - का शक्य नाही ? असा साथीदार असला की कोणीही आपल्या बायकोसाठी काहीही करू शकतं... ज्या दिवशी अफजलला कळलं तुझ्या दोन्ही निकामी किडण्यांबद्दल  तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन हालली , त्याला त्याचं जग जणू इथेच थांबलय असं वाटलं . तूला गमवायच्या भीतीने ,तुझ्याशिवाय एकाकी राहण्याच्या भीतीने याला खूप गहिवरून आलं होतं, तो माझ्याकडे आला ,मला सगळा प्रॉब्लेम त्याने सांगितला ..गेली एक महिनाभर आम्ही त्यामुळेच सतत भेटत होतो . मीच त्याला सांगितलं, की काही दिवस माधवी सोबत प्रणय करू नको कारण त्याचा परिणाम पूढे उदभवू शकतो ... किडनीसाठी आम्ही खूप ठिकाणी शोधाशोध केली, पण आम्हाला एकही किडनी डोनर सापडला नाही... शेवटी अफजल बोलला की त्याची एक किडनी काढून घे कारण एका किडनीवर सुध्दा माणूस जगू शकतो... पण किडनी बदलवणे सोप्पं नसतं त्यासाठी ती किडनी तुझ्या शरीरामध्ये मॅच होते की नाही तेही बघणं गरजेचं होतं, माझ्याकडे तुझे रिपोर्ट होतेच तर मी त्यावर काम केलं, म्हणून मी अफजलला आज रिसॉर्टमध्ये बोलावलं आणि त्याची किडनी तुझ्यासाठी उपयोगी येऊ शकते हे सांगितलं.. त्या आनंदाच्या आवेगाच्या भरात त्याने मला मिठी मारली आणि तू लगेच सगळा गैरसमज करून घेतला... अगं माधवी अफजलसारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं ..

माधवीने सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि तिला तिच्या चुकीच्या अतिविचार आणि गैरसमजमुळे झालेली चूक कळली ,नकळतपणे ती अफजलला खूप काही बोलली त्यामुळे तिलाच आता खूप वाईट वाटत होतं...

तिने हातातील बॅग बाजूला फेकून दिली आणि लगेच अफजल जवळ खाली बसली ,हाताने दोन्ही कान पकडून भरलेल्या डोळ्यांनी सॉरी बोलली...

माधवी- बोहोत बडी भूल हो गयी रे अफजल   ,मी असंच करते नेहमी ,खूप विचाराने नको ते गैरसमज करून घेत असते आणि नेहमी तुला चुकीचा ठरवते.. प्लिज मला माफ कर

अफजल - तू माझी माफी मागावी म्हणून मी आणि समीरा ने नाही तुला सगळं सांगितलं ,मी तर माझ्या बायकोच्या आयुष्याची वाढ व्हावी या साठी लढतोय ... माझं कर्तव्य आहे ते ...

माधवी- अरे का रे इतका समजूतदार आहेस तू ? मी नक्कीच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार त्यामुळे मला तुझ्यासारखा नवरा या जन्मी लाभला...

दुसऱ्यादिवशी डॉक्टर समीरा ने अफजलची एक किडनी काढून माधवीच्या शरीरात बसवली.. आता दोघेही एकमेकांसाठी परिपूर्ण झाले होते...

समीरा - पाहिलंस माधवी ?.. आज अफजल होता त्यामुळे तुझा जीव वाचला नाहीतर काही महिन्यांनी तुझी परिस्थिती अजून नाजूक झाली असती... कसं आहे ना माधवी, नवरा बायकोच्या नात्यामध्ये एका वेळेनंतर नंतर एकमेकांचा
\" बाप \"  होणं जमलं पाहिजे ..आई  नाही व्हायचं कधी , तिच्यासारखं होणं जमायचं नाही आणि तिच्यासारखं असून चालायचं ही नाही म्हणून बाप ... जबाबदारीचं ओझं नेहमी जपणारा , कर्तव्याला जाणून असलेला , आपला हुंदका आत लपवून पुढे चालणारा.. कारण , काही काळाने एकमेकांची लय जुळत नाहीय की काय ,पार्टनर ला आपलं म्हणणं पटतंय की नाही असं वाटू शकतं ... पण कुटूंब ताकदीवर वर चालतं , एकमेकांच्या लय,ओढ वर नाही ... हे माहिती हवं आणि नेमकं तेच तुमच्या नात्यात अफजल ला  चांगलं जमतं...
   अरे वा नेमकं आज वटपौर्णिमा आहे बघ... ज्या प्रकारे सावित्रीने सत्यवानाचा जीव वाचवून त्याला मरणाच्या दारातून यमापासून सोडवून आणलं होतं अगदी तसंच तुझ्या सत्यावान प्रमाणे अफजल ने आज तुझ्यासाठी जे केलं ते केवळ अशक्य होतं...कोण म्हंटलं सावित्री आता घरोघरी दिसत नाही अहो आपण तीला प्रत्येक नात्यात शोधत नाही..

समाप्त...