A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session06087cdf902a9194bd3e100cbb34d8df7ed53dcd8b998a354e8a0eedeb695da1e771c796): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Satya
Oct 26, 2020
सामाजिक

सत्य

Read Later
सत्य

सत्य:-

 

कॉलेज च्या नोटीस बोर्ड वर ठळक अक्षरात लिहिले होते,  "Congratulations to Meghna Date for achieving 1st rank in whole Maharashtra????"

सगळे कौतुकाचे वातावरण घरात, बाहेर, कॉलेज, मित्रमंडळी,नातेवाईक. सतत अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता आणि मेघना त्यात अक्षरशः न्हाऊन निघत होती. 

आई बँकेत मॅनेजर, वडिलांचा व्यवसाय आणि त्यांची एकुलती एक लेक मेघना. 

लहानपणापासून कायम आणि कायम सगळ्यांचा केंद्रबिंदू ठरलेली ती होतीही तशीच तल्लख बुद्धी, कलागुण संपन्न,लाघवी आणि खेळकर स्वभावाची. जन्मतः  सगळं आलबेल मिळाल्यामुळे हट्टीपणा मात्र नसानसात भरला होता.  कलागुणांना वाव मिळाल्यामुळे वेगवेगळे क्लास केले आणि सगळ्यात पारंगत झाली. या सगळ्यात मुळातच असलेली तल्लख बुद्धी याकडे ही कधीच दुर्लक्ष न केल्यामुळे आज 10वी ला ती महाराष्ट्रात प्रथम आली होती. 

" मनू सार्थक केलास बघ आमच्या जन्माचं " औक्षण करत आई म्हणाली. बाबांनी लगेच स्वतःच हाय लिमिट क्रेडीट कार्ड काढून देत " जा हवं ते घे आणि तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणीना हवं तिथे ने आणि पार्टी कर. "Enjoy your  success My Dear " म्हणत बाबांनी लाड करत तिच्या डोक्यावर हात ठेवला. 

तसा थोडा attitude हा मुळातच होता मग आता तर विचारायलाच नको. आईने गिफ्ट दिलेला नवाकोरा सॅमसंग चा ऍडव्हान्स मोबाईल, बाबाने दिलेली ऍक्टिवा गाडी आणि हातात कार्ड म्हटल्यावर आज सातवे आसमान पे असेच वाटत होते तिला. 

तो दिवस अगदी मनासारखा आपल्या मित्रमंडळीसोबत हुंदडून, खाऊन पिऊन, खरेदी करून तिने Memorable बनवला.

लगेच कॉलेज च्या ऍडमिशन ची तयारी करत फॉर्म भरला. अव्वल असल्याने हवे ते कॉलेज मिळाले, वय आणि कॉलेज याची चाहूल लागल्याने मन मोरपंखासारखे भिरभिरत होते.

दिसायला नाजूक, ठळक नाकीडोळी, आणि कडक राहणीमान त्यामुळे चारचौघात उठून दिसायची.

 सायन्स ला ऍडमिशन घेऊन बघता बघता कॉलेज सुरू झाले. शहरातल्या टॉप कॉलेज ला तिला ऍडमिशन मिळाली होती आणि ते थेट पोस्ट ग्रॅज्युअशन पर्यंत होते. त्यात सायन्स, आर्टस्,कॉमर्स,इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अशी सगळीच क्षेत्रे होती. त्यामुळे मुलामुलींच्या संख्या ही हजारोच्या घरात होती. आपली नवीन बाईक घेऊन ती गेट मधून यायची तेव्हा कित्येकांच्या नजरा वळून तिला बघत असे, याचा नकळत तिला अभिमान वाटत होता आणि मनाचा फुलपिसारा जोरात फुलत होता. आजूबाजूला नवीन मित्र मैत्रिणींचा गराडा त्यामुळे  बऱ्याच गोष्टी नव्याने कळत होत्या. ह्या सगळ्यात हरखून जात होती आणि त्याचा परिणाम नकळतं अभ्यासाकडे व्हायला लागला होता. आता मित्रा मैत्रिणीच्या ग्रुप मध्ये हिंडणे, फिरणे, हॉटेलिंग,ट्रिप्स यात जास्ती रस वाटायला लागला होतं आणि अभ्यास करियर हे ध्यानीमनी पण येत नव्हते. 

शहरातल्या उंची कोचिंग क्लास ला तिची ऍडमिशन झाली होती पण तिथे जायचे तेवढेच बुक उघडायचे बाकी वेळ टिंगल टवाळक्या यात आयुष्य सुरू होते. व्हायचा तो परिणाम झाला आणि 12वी मध्ये तिला जेमतेंम फर्स्ट क्लास मिळाला. आई बाबांना वाईट वाटले, पण तिला फारसा फरक पडला नाही. जी मुलगी इंजिनिअरिंग ला जाईल असे वाटले होते तिने BSC ला ऍडमिशन घेतली.

त्याच कॅम्पस मध्ये पुन्हा पुढचे आयुष्य सुरू झाले.

"हाय मिस ब्युटीफुल" एक अनोळखी आवाज आला तसे वळून बघते तर मागच्या बेंचवर नवीन कोणी मुलगा आला होता तो बोलत होता. ती त्याच्याकडे बघतच राहिली, त्याचा तो हँडसम लूक, बोलायची लकब,राहणीमान पाहुन ती पहिल्याच क्षणात लट्टू झाली.

"हाय" म्हणून ती गप्प झाली कारण त्याच्याकडे बघताना पुढे बोलूच शकली नाही.

" माझं नाव नविन राजपूत, मुंबईहून आलोय तुमच्या कॉलेज मध्ये. तुला आजच पाहिले, बाकी हा ग्रुप मला नवीन नाही! तू खरंच खूप स्वीट दिसतेस, वेलकम तो our कट्टा ."म्हणत हसायला लागला. 

भुरळ तर पडली होती तिला, कोण आहेत हे कसे आहेत विचार न करता जॉईन झाली त्यांना. पहिल्याच भेटीत आपल्याला इतके कॉम्प्लिमेंटस दिले यामुळे ती हरखून गेली. वयंच तसं म्हणायचं.

आता रोज तयार होताना आरशासमोर निरखून बघायची, आपल्याला कोणी बघावं या उद्देशाने रोज काहीतरी वेगळं दिसण्याचा प्रयत्न करायची आणि तसे कमी तर काही नव्हतंच.

सगळे एकत्र असले तरी 'नविन' कडे चोरून बघायची, सतत एकत्र असण्याचा प्रयत्न करत असायची. हे नवीन च्या पण लक्षात येत होते, पण तसे न दाखवता तो ती सातत्याने हेच करत राहील असा प्रयत्न करायचा. कधी तिला फुल दे, कधी चॉकलेट दे तर कधी काही अजून असे करत तू पण माझ्यासाठी स्पेशल आहेत हे जाणवून द्यायचा. 

नवीन मुळात एक उडाणटप्पू, बेफिकीर आणि बेजवाबदार मुलगा होता. सगळे कुठेही जायचे म्हटले की हा प्लॅन करणार दाखवणार मी मी  -- पण प्रत्यक्षात मात्र पैसे खर्च करायची वेळ आली की तो मेघना ला पुढे करत असें. काही न काही निमित्ताने शॉपिंग मॉल ला जायचे मेघना च्या नावाखाली तिची न स्वतःची शॉपिंग करायची हे नेहमीचेच झाले होते. भुरळ पडलेल्या तिला फक्त तोच दिसत होता त्याचे वागणे नाही.

पण तिच्यातला हा फरक घरी जाणवायला लागला होता. अभ्यासाचे तर नाव नाही, पण फिरणे , राहणीमान आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे न पुरणार पैसे!

सतत तिचे वाढते खर्च, कमी आहे म्हणून नाही पण अचानक पडलेला फरक जाणवत होता.

" मनू आजकाल काय सुरु आहे हे? रोजचे हजारो रुपये खर्च सुरू आहे. कुठे खर्च करतेय? " न राहवून आईने एक दिवस हटकलेच.

"तू कोण मला विचारणार ? लागतात मला!हे सगळं माझाच आहे ना ?आणि बाबा देतोय तुला काय करायचं?" तीच हे असं बोलणं ऐकून आई तर अवाक झाली, शंकेची पाल मनात चुकचुकलीच.

तिने मेघना च्या बाबांशी पण हा विषय डिस्कस केला पण त्यांनी मनावर न घेता " अगं कॉलेज चे दिवस आहेत करू दे मजा! नाहीतरी सगळं तिचेच आहे." असे म्हणाले. 

ती निरुत्तर झाली पण शंका घर करून बसली. 

खूप प्रयत्न केला पण ती ऐकेना शेवटी एक माणूस हायर करून तिने माहिती काढली. 'नवीन' चा रेकॉर्ड, फॅमिली बॅकग्राऊंड ऐकून ती शॉक झाली.

"मनू तो मुलगा चांगल्या घरचा नाहीय! तो तुझे पैसे बघून तुला फूस लावतोय. नीट विचार कर बेटा, कायम तो दाखवतो तसा तो नाहीये." आई समजावण्याचा सुरात म्हणाली.

पण मेघना वर उलट परिणाम झाला,  तिने सगळे 'नवीन' ला सांगितले. आई दुश्मन असा अर्थ घेऊन ती वागू लागली आणि या  विचाराला नविन खतपाणी घालू लागला. ती घरी खोट बोलायला लागली, आता तर रात्री उशिरा येणे नेहमीचेच झाले.सगळं हाताबाहेर जात होते आणि आईचा जीव तडफडत होता.

शेवटी एक दिवस बाबानीही तिची शाळा घेतली आणि तिला फायनल सांगितले की पुढच्या वर्षी ते तिला पुण्याला शिकायला पाठवणार.

ती नविन ला भेटायला त्याच्या रूम वर गेली, " नवीन मला नाही जायचं ता सोडून. ते मला पुण्याला पाठवणार आहेत. मी काय करू? कसे होईल आपले? मला तू हवाय कायमच बोल ना!"

हीच संधी बघून त्याने रडणाऱ्या तिला आधार देतो असे दाखवून जवळ घेतले, गोंजारले. ती पण त्याच्या मिठीत सुखावली, याच संधीचा फायदा घेत " मेघना मला एकाच मार्ग दिसतोय! आपण पळून जाऊयात आणि लग्न करू, एकदा का लग्न झाले की कोणीच काही बिघडवू शकणार नाही बघ आपले आणि आपण कायम सोबत असू."

तिची कळी खुलली, "आपण आजच रात्री पळून जाऊया"  ती म्हणाली. " अगं ते ठीक आहे ग, पण पैसे लागतील जायला. आपण बाहेर राहु त्याचा खर्च होईल आणि तू तर नवरी होणार मग काय अशी जीन्स वर येशील?" नवीन बोलला.

"त्याची काळजी करू नकोस, आमच्या घरात दोन चार लाख कॅश असते बाबाची बिजनेस ला लागते म्हणून आणि माझ्याकडे माझी चेन आहे ,ब्रेसलेट, रिंगस आहेत ना!" निरागसपणे ती म्हणाली.

त्याच्या चेहऱ्यावर चे छद्मी हास्य तिला कळलेच नाही. 

ठरल्याप्रमाणे त्याच रात्री ती कपडे, पैसे आणि तिचे जे होते ते घेऊन बाहेर पडली.

पळून दोघे गोव्याला गेले. 

"आपण लग्न कधी करायचं?" मेघना कायम विचारत असे आणि तो काही न काही सांगून टाळत असे.

त्याच्या प्रेमात असल्याने तो जे जसे म्हणेल त्याप्रमाणे सगळं सुरू होते.  आपण प्रेमात स्वतःला वाहून देतोच आहोत ही तिची भावना होती तर तिचे सगळं मिळवून पूर्तता करायची हा त्याचा ध्यास होता.

एक महिना झाला होता त्यांना पळून जाऊन, त्याने तिला एक दिवस घरी फोन करून चाचपून पाहायला सांगितले तसे तेही ऐकत तिने फोन केला.

"हॅलो आई ,मी मेघना बोलतेय?" तिचा आवाज ऐकताच आई खूप वैतागून म्हणाली, "माझी मेघना नावाची मुलगी होती पण आता ती नाहीय. तिचे बाबा ती गेल्याच्या धक्क्याने गेले त्यामुळे मी आता सगळं एका संस्थेला दान करून तिथेच कार्य करणार आहे. तू जर तिची मैत्रीण असशील तर तिला सांग की घर नाहीय त्यामुळे येण्याचा विचार ही करू नकोस!"

या उत्तराची तिला अपेक्षाच नव्हती, ती खूप रडली आणि सगळे नवीन ला सांगितले.

"नविन आपण लग्न करूयात ना लवकर! " ती मागे लागली तसे

त्याने " आपण मुंबई ला जाऊ माझ्या घरी आणि लग्न करू "  सांगितले आणि ती खुश झाली.

दोन दिवसांनी ते मुंबई ला रवाना झाले.

तिथे काहीश्या वेगळ्या भासणाऱ्या लोकांच्या मध्ये तिला नेले तसे ती थोडी ऑकवर्ड झाली.

पण " मी आहे ना" अस तो म्हणाला तशी ती निश्चिन्त झाली.

तिथे त्या फ्लॅट वर तिने फ्रेश होऊन थोडे खाणेपिणे झाले. "थकली असशील तर आराम कर, मी येतो बाहेर जाऊन " असे तो म्हणाला.  त्याच्यावर विश्वास असल्याने तिला काही वाटले नाही.

कुठल्या तरी आवाजाने ती झोपेतून उठली तर खूप वेगळी लोक तिला समोर दिसली आणि काही मुली तिच्या कडे बघत होत्या.

" तुम्ही कोण आहेत? नवीन आला नाही का?" तिनं विचारले तसे सगळे हसले.

त्यातील एक मुलगी म्हणाली" मी मीना, नवीन तुला इथे विकून पळून गेलाय!"

ते ऐकल्यावर प्रचंड धक्का लागून ती बेशुद्ध पडली, थोड्या वेळाने जशी शुद्धीवर आली तसं तिला मीना ने सगळं सांगितलं की कसे तिला पण कोणी फसवून इथे आणलं आणि आता ती काय आयुष्य जगत आहे."

हे ऐकून मेघना खूप रडली, आई ची आज तिला खूप आठवण आली, तीच बोलणं आठवलं पण वेळ निघून गेली होती.

सत्य हे होत की आज बाबा जगात नाहीत.  आईने सांगितले त्याप्रमाणे नविन  खरच चांगला मुलगा नाही आणि आपण ज्या ठिकाणी आता आहोत ते जीवन जगण्यासाठी आपण स्वतः कारणीभूत आहोत.

खूप रडली, खूप प्रयत्न केले त्या तिथल्या लोकांना समजवायचा पण त्यांना हे असे काही वेगळे नव्हते त्यामुळे त्यांनी मनावर घेतले नाही.

पण  चांगल्या घरातून आलेल्या मेघना ला असे आयुष्य जगायची तयारी नव्हतीच किंबहुना अशक्यच होती.

हिम्मत करून ,मनाचा हिय्या करून एक दिवस तिने स्वतःला या नरकातून सोडवण्यासाठी तिथल्या एका माणसाशी संधान बांधले. त्याला जे हवे ते दिले आणि तिथून लपत छपत बाहेर पडली. 

प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या पहिल्या ट्रेन ने ती निघाली मुंबईला कायमचे सोडून एका अश्या विश्वात जिथे तिचे कोणीच नव्हते आणि तिचे काहीच नव्हते. ना आई बाबा ना घर पैसा! होती फक्त एक अधांतरी वाट. माहिती नव्हते तिला तिचे जीवन कुठे नेणार होते.

एक हुशार श्रीमंत घरची मुलगी जी महाराष्ट्रात पहिली आली होती आणि आयुष्यात खूप पुढे गेली असती ती चुकीच्या संगतीने, चुकीच्या मार्गी लागून आज ह्या अवस्थेला पोचली हे कटू असले तरी 'सत्य' होते हे तिला आज या धावणाऱ्या ट्रेन मध्ये कळले होते. 

प्रत्येक मागे पडणाऱ्या स्टेशनला पाहत तिला एकच जाणीव होत होती की या कटू 'सत्या' ला केवळ तीच कारणीभूत होती! 

©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!