Oct 28, 2020
प्रेरणादायक

समाधान ( सत्य घटनेवर आधारित )

Read Later
समाधान ( सत्य घटनेवर आधारित )

( Based on true story )

दिनांक - मार्च २०२०

       संध्याकाळचे ७ वाजून गेले होते. नुकताच पाऊस पडून गेला होता. तुम्ही म्हणाल की पाऊस आणि ते पण मार्च मध्ये?? पण खरच पाऊस पडून गेला होता. वातावरणात थंडगार हवा सुरू होती. मी आणि माझा रूममेट अमर ( पूर्ण नाव अमर सावंत) आम्ही दोघे कॉलेज मधून रूम वर जात होतो. आमचं कॉलेज इतर कॉलेज सारखं नाही आहे . आमच्या गल्लीचा रस्ता आणि मेन हायवे ला जोडणारा रस्ता हा खूप लांबचा आहे. त्यामुळे आम्हाला कॉलेज मधूनच जावं लागतो. कॉलेजला दोन गेट आहेत. पहिला मेन गेट , जिथून आम्हाला संध्याकाळी जाण्यासाठी परवानगी नाही आहे. दुसरा गेट आहे ते म्हणजे कॅन्टीन पासून जो नेहमी उघडा असतो , जिथून आम्ही संध्याकाळी जाऊ शकतो.
  
           आमच्या कॉलेजच्या मागच्या बाजूला  लहानसा रेल्वे स्टेशन आहे , जिथे संध्याकाळी खूप शांतता असते आणि अंधार सुद्धा खूप असतो. स्टेशनला जाणारे लोक सुद्धा आमच्या कॉलेज मधूनच जातात. कॉलेजच्या मागे गणिताचा विभाग आहे आणि तिथूनच दोन पायवाट मागच्या दिशेने जातो , जिथे स्टेशन आणि स्टेशनच्या नंतर आमची गल्ली लागते.

             आम्ही बोलत बोलत गणित विभागासमोर आलो होतो. अंधार खूप होता आणि पाऊस नुकताच पडून गेला होता त्यामुळे थंड वातावरण निर्माण झाले होते. तर दुसऱ्या पायवाटेने जिथून केमिस्ट्री चा विभाग लागतो . तिथून एक मुलगी येऊ लागली. आम्ही गणित विभागाच्या समोर आलो होतो. पहिल्यांदा  तिला बघितल्यावर  आश्चर्य वाटलं. कारण या वेळेला कोणतीही मुलगी कोणत्याच पायवाटेने येत नाही.
ती मुलगी अंदाजे १० वी किंवा ११ वी मधली असेल.

        ती साध्या कपड्यांवर होती आणि ती खूप घाबरत होती . आम्हा दोघांना बघून ती म्हणाली ," तुम्ही मला कॉलेज च्या मेन गेटवर सोडाल का प्लीज??.."
अमर म्हणाला ," ओके... चला." पण मला पडणारा पहिला प्रश्न म्हणजे मेन गेट वर सोडायचा कसा ?.. कारण तिथून जाण्यासाठी आम्हाला परवानगी नव्हती. मग माझ्या मनात होत की आपण दुसऱ्या गेटवर सोडायचा आणि मेन गेटच्या पुढचा रस्त्याचा दिशा दाखवायची . मग आम्ही दोघे तिच्यापुढे होतो आणि ती मागे होती. थोड्या वेळानी ती म्हणाली ." एक कॉल करू शकते का??.. "
अमर म्हणाला की , " हो.." एवढं बोलून तो त्याचा मोबाईल तिला दिला. ती कॉल करू लागली. पण आम्ही पुढे चालत होतो . थोड्यावेळाने ती मोबाईल परत केली. तिच्या बॉडी लँग्वेज वरून कळत होत की तीच अर्जंट काम असेल पण ती घाबरत सुद्धा होती.

        थोड्या वेळानी दुसऱ्या गेट वाट आम्ही पोहचलो . पोहचताच ती म्हणाली की ," तुम्हाला माझ्या काकांचा कॉल येईल त्यांना सांगा की मी मंदिर पाशी आहे, मेन गेटजवळ.."
पण मी म्हणालो ," हा मेन गेट नाही आहे. आम्हाला मेन गेटच्या इथून जाण्याची परवानगी नाही आहे . तुम्ही याच रस्त्यावरून सरळ गेला तर तुम्हाला मेन हायवे मिळेल. "
ती म्हणाली ," ओके.."

       मग आम्ही दोघेही परत आमच्या मार्गी लागलो आणि चर्चा सुरू झाली की ही मुलगी इथून आली कशी ?? आणि का??.. कारण मला याच कॉलेज मध्ये २ वर्ष झाले आहे , पण संध्याकाळच्या वेळेला कोणतीही मुलगी पायवाटेने येत नव्हती.  आम्ही हीच गोष्ट चर्चा करत असताना आम्ही स्टेशन जवळ आलो. अगदी लहान स्टेशन असल्याने तिथे खूप अंधार असतो. स्टेशन जवळ आल्यावर आम्हाला कळाल की ती मुलगी दुसऱ्या पायवाटेने का आली आणि ती एवढी घाबरत का होती??.. कारण तिथे काही माणस मद्यपान करत होते. मग आमच्या लक्षात आल की ही घाबरत का होती. कदाचित दुसर सुद्धा वेगळं कारण असेल पण आम्हा दोघांना तिची मदत करण्याचा समाधान मिळाला.

          कदाचित ही घटना तुमच्यासाठी लहान असेल पण नक्कीच त्या मुली साठी ती घटना खरच लहान नव्हती आणि आज मी मदत करण्याचा जो समाधान आहे ती कुठेच मिळणार नाही.

           आम्ही खूप जनकडून ऐकत असतो की दुसऱ्यांना मदत करा तुम्हाला समधान मिळेल. पण वेळ कुणाला नसतो. तस बघायला गेलं तर दिवसाचे असतात २४ तास त्यातून तुम्हाला वेळ काढावा लागतो. मी सध्या लिहिताना हीच  प्रार्थना  करत आहे की ती मुलगी तिच्या डेस्टिनी कडे पोहचली असेल.

नंतर काही तासांनी त्यांच्या काकांचा कॉल आला ते म्हणाले की " की ती पोहचली आहे आणि thank you... तुमचा खूप खूप आभारी आहे. तुमच्या सारखे माणसं मिळणं आजकाल मुश्किल आहे ."
हे वाक्य माझ्या मनाला ऊब देणारी होती.
????????????

******************************
ऋषिकेश मठपती

या प्रसंगांच्या एक शब्दांशब्द खर आहे.  Based on true story.... आवडला असेल तर नक्की कमेंट करा , आणि कळवा की तुम्ही मदत केली आहे  का???... शेअर करा... धन्यवाद...????????????

Circle Image

Mathapati Rushikesh Irayya

Student

Writing and reading are my hobbies. Mathematics is in my blood.