साठवण आठवणींची

आठवण ही अशी ठेव आहे.. जी विसरता ही येत नाही आणि परत देता ही येत नाही..
मनात काहूर माजलं होतं . जीवनाच्या अजाणत्या वळणावर आलेली ही भयानक कातरवेळ होती. नकोशी असलेली.. कधी न विचार केलेली .... दुःखद.... सगळे कसमे- वादे खोटे ठरलेले होते... असंख्य स्वप्नांचे मनोरे चुटकी सरशी जमीनदोस्त झाले होते.. मनाला अनामिक हुरहूर लागली होती.
तुझा तो स्पर्श. ती घट्ट मारलेली मिठी. सगळं आठवलं की अंगाला कंगोरे येतात आणि मग सगळं कठीण होऊन बसतं. कशी सांभाळू मी स्वतःला? कशी सावरू स्वतःला? हृदयाचे ठोके कधीही वाढतात. छाती दाटून येते. श्वास भारी होतो.
मनात वेदनेच वादळ कोसळतं.. .. जे माझ्या मनातल्या मनात घुसमळत.. हातातून हात कसे सुटले? ... नात्यांचे जाळे कसे विस्कटले? कळलंच नव्हतं.. एकमेकांत इतकं समावल्या नंतरही आपण विरहाच्या अग्नीत राख झालोत... जीव घेणा विरह...चूक तुझीच!!!!
तरीही मनं तुझ्यातच अडकलंय... भेटीची ओढ अजूनही स्वस्थ बसू देत नाही... अनामिक हुरहूर मनाला चटके लावून जाते ... मनात परत परत वाटतं एकदाचा तू बरसावा.... मनसोक्त..... त्यात मी नाहून निघावी. मनाला चटके लावणारी ती खूण नकळतं पुसली जावी. आशेच्या नव किरणाने आयुष्य उजळून निघावं. मनातील बैचैनी कायमची दुर सारली जावी.. नवा आत्मविश्वास जागा व्हावा.. मिलनाची शाश्वती मिळावी...
अजूनही आठवते आपली पहिली भेट. पावसाच्या पहिल्या थेंबाच्या स्पर्शाने मातीच्या दरवळलेल्या सुगंधाप्रमाणे... व्याकुळ होऊन किनाऱ्याला बिलगणाऱ्या समुद्राच्या लाटेप्रमाणे... चंद्राच्या शीतल छायेत चमचमणाऱ्या ताऱ्याप्रमाणे...
सगळं आठवलं की शहारतं अंग... अस्वस्थता शिगेला पोचते.. हा अनर्थ कसा घडला? काय हेचं लिहिलं असावं काय नशिबात राहून राहून प्रश्न पडतो?? उत्तर न मिळाल्याने अजून मनं खचतं.. मिलनाची आतुरता आणखीन घट्ट होते.
किती कठीण ना ही कातरवेळ... तिला घालंवण खूप अशक्य... आज परत वाटतं तू अचानक बरसावा .... अजाण वादळासारखा... मला प्रफुल्लित करावा.... नव्या पालवी सारखा... सललेल्या जखमेला शांत करावा एकदाचा ...
कदाचित आता हे शक्य नसावं. तुझं माझ्या आयुष्यात परतण माझं त्यात हरवणं! ऊन - सावलीचं मिलन होऊन आत्म्यास शांत करणं...
कसं आहे आपल्या आयुष्यातील आपल्या आवडीची, प्रेमाची , जवळची, आत्मीयतेची व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक निघून गेली की सगळं असह्य वाटतं. त्याच्या पाऊलखुणा आयुष्यातून पुसून टाकणं सहज शक्य नसतं. मग असंख्य प्रश्न रोज मनाला छळू लागतात ...कळतंच नाही ही ईश्वरी इच्छा मानावी की विधिलिखित? ते तोच जाणतो.
पण तो कधी न भरणारी जखम कायमची देऊन जातो. एक क्षण मी सगळं स्वीकारायला तयार ही आहे पण त्या आठवणींचं काय? ज्या वेळोवेळी मन व्याकुळ करतात. मनाच्या वादळाला पेलण दिवसेंदिवस कठीण होतं चाललं आहे..
कधी तरी वाटतं तू अचानक यावा... माझा हात हातात घेऊन मला धीर द्यावा.. मी बेफिकीर तुला मिठीत घ्याव... मनसोक्त तुला बिलगून रडावं... मनातील सगळं तुला सांगून मोकळं व्हावं... एकदाचा सगळा कस तुझ्याजवळ व्यक्त करावा...
त्यालाही वाटतं असेल काय असं? त्यालाही आठवण येतं असेल काय माझी? कधी तरी नकळत त्याच्याही डोळ्यातून अश्रू पाझरत असतील काय? माझा स्पर्श आठवून तोही मोहरत असेल काय? गुलाबाच्या कळीला बघून माझ्या गालावरची खळी त्याला आठवतं असेल काय? रोज नाही पण कधी तरी त्याला माझी आठवणं येत असेल...

आज चार वर्षे झाली तरीही तो अजूनही मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात सलत असतो... एखाद्या नं भरणाऱ्या जखमेप्रमाणे .... कितीही मलम लावलं तरी न सोकणाऱ्या घावाप्रमाणे...

तो जस्ट आताच गेला ऑफिसला...
माझा लग्नाचा नवरा...
तसं लय प्रेम आहे त्याचं माझ्यावर..
जीव ओततो...
त्याचं मीच पहिलं प्रेम..
त्याच्यासाठी मीच त्याची राणी..
दिल तो पागल है ची माधुरी...

कोणी कसं इतकं प्रेमळ असू शकतं...
हृदय मुठात येईल तेवढं असतं ...
पण त्याच प्रेम मात्र आभाळा एवढं..
कधी कधी विश्वासच बसत नाही..
एवढं नशीब माझं..
काही न मागता जग पायथ्याशी आणून ठेवतो..
अगदी कल हो ना हो च्या शाहरुखसारखा...

तो घरातन बाहेर पडला कि घर खायला धावतं...
किती एकटं वाटतंय... काही तरी करायला हवं..

तिने कातर वेळ घालवायला एफ. एम. लावला...
पेश करते है आजचा दिलकश गाना ..
उन सभी जवा दिलो के लिये...
जिसकी धडकने अपनी महबुबा के लिए..
जोर शोर से धडकती हैं...!!!

"ला ला ला ला..
ला ला ला... आआआ..
ला ला ला..
ला ला ला... आआआ
तू तू हैं वही दिलं ने जिसे अपना कहा..
तू हैं जहाँ मैं हू वहाँ...
अब ते ये जिना तेरे बिन हैं सजा...

गाणं सुरु होतच तिच्या डोळ्यातन
खळखळ अश्रू ओसंडू लागले...
ती राज - सिमरनची प्रेम कथा...
ती रुसव्या - फुगव्याची चांदणे...
ती राजा - राणीची जोडी...
ते अजाण दिवस चुटकी सरशी..
डोळ्यांपुढे आलेत...

ते सोन्याचे क्षण ...
कॉलेज चा पहिला दिवस...
नजरेची जुळवा जुळवं..
पहिला नशा.. पहिला खुमार...
लव्ह ऍट फर्स्ट साईट ..

अगदी त्याला बघताच क्षणी...
माझं वेड मन त्याच्यावर भारावलं...
एकमेकांना नजरेत भरून हृदयाच्या कप्प्यात साठवलं...
अगदीच प्यार किया तो डरना क्या वाला प्यार...

रोज नव्याने भेटणं...
एकमेकांच्या प्रेमात परत परत हरवणं..
प्रेमाच्या गुंत्यात आपसूकच गुरफटत जाणं ..
अगदी दो जिस्म एक जान...
लागी तुमसे मन की लगन...
लगन लागी तुमसे मन की लगन..
वाली मोहब्बत..

त्याचा सहवास मला हवा हवासा वाटायचा...
तो सोबत असला कि,
वेळ नेमका वेगाने धावायचा...
कितीही धरून ठेवला...
तरीही हाती न लागायचा...

अजूनही आठवतं...!!!!!
कॉलेजच्या फेअरवेल डे इव्हेंट मध्ये...
त्याने तिला बघून हेच गाणं म्हंटल होतं...
तिच्या डोळ्यात डोळे घालून..
तू... तू हैं वही...
दिलने जिसे अपना कहा...
आवाज अगदी गोड..
जणू काळीज हाती घेऊन...
प्रेमाचा इजहार करीत असावा...

तिनेही सामना केला त्याच्या प्रेमाचा...
तीही लाजली ऐकताच...
उफफ्फफ...
काय रोमांचक दिवस होते...
आठवून...
क्षणात मनाला काटा रुतला...
अंग शहारलं...

कसा असेल तो....?
त्यांनतर मी त्याला कधी विचारलं नाही
अन्
कधी त्यानेही जाणून घेतल नाही...
रात गई बात गयी..
कदाचित असंच असेल त्याच्यासाठी..

परत भेटला सुद्धा नाही...
एकदा भेटला असला तर...
नजरेत कैद करून ठेवलं असतं त्याला...
वेळेला मुठीत आवळून धरलं असतं...
सूर्याचा अस्त थांबवला असता...
पण असं काहीच झाल नाही...
त्याने परत वळून बघितलंच नाही...
तुम कौन हम कौन...

पण असं का झालं असावं..
सात जन्माची साथ गाठ मिनिटात का तुटली असावी...
सोबत जगण्याचे कसमे-वादे, प्यार-वफा...
सगळं सरता शेवटी खोटं ठरले ...
उरलं ते फक्त्त खरं आयुष्य...
ज्यात स्वप्नांना वाव नसतोच...
फक्त्त कॉम्प्रोमाईज...

अजूनही असं का वाटतं...
तो हाक मारीत असावा..
माझी आठवण काढीत असावा..
विसरावं काय त्याला...?
मनातून का जात नसावा...?

त्याचा जातानाचा चेहरा...
मी अजूनही नयनांच्या पाकळ्यात कैद करून ठेवला आहे...
जणू तो हृदयाच्या अगदी जवळ आहे...
पण आज का कुणास ठाऊक त्याची आठवण का येते आहे...?

आईच्या शब्दाचा मान राखून त्याने...
विधवा मामे बहिणीशी लग्न केल...
तू महान आहेस...
मन राखणं तुला चांगलंच जमतं...
पण माझं काय माझं मनं नुसतंच तुझ्यासाठी झुरतं...

ती बघतं होती शून्यात...
तो सापडला होता तिला नयनात...
तेवढ्यात....

फेसबुक मेसेंजर एक मॅसेज आला...
तिने सहज उघडून बघितलं...
राम...... चा मेसेज....!!!!!
जणू...
तेरा नाम मैने लिया हैं यहाँ...
मुझे याद तुने किया हैं वहाँ...
असंच झालं...
चार वर्षांनंतर...
आज पहिल्यांदा त्याचा मेसेज आला...
एवढे दिवस काही अत्ता पत्ता नव्हता..
आणि आज अचानक त्याचा मेसेज...

"आज मला मुलगी झाली!!!
अगदी तुझ्यासारखी आहे!!!
तुझंच नावं ठेवलंय....
"प्रिया"...
मी खूप आनंदी आहे...
तू पण आनंदी रहा!!!"

वाचून ती ढसाढसा रडू लागली...
ध्यानी नाही आणि मनी नाही...
ती त्याची मनातूनं आठवण काढत होती...
आणि तेवढ्यात त्याचा मॅसेज आला...
लकीरा विचं लिखदी क्यू जुदाईवाला दर्द...

असं ही होतं...
बरं का...!!!
आठवण ही अशी ठेव आहे...
विसरता ही येत नाही अन् परत देता ही येत नाही!!!