Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

साथ त्याची तिला

Read Later
साथ त्याची तिला
कथेचे नाव_" आणि ती हसली"
विषय_, साथ त्याची तिला
फेरी_ राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा.

"खबरदार….. तिला कोणी हात लावाल तर….!"
एक खणखणीत आवाज घुमला तसा सारा गाव आवाजाच्या दिशेने पाहायला लागला.


खाली मान घालून उभारलेल्या तिने मान वर करून त्याच्या कडे पाहिलं….डोळ्यात साठलेल्या पाण्यातून तिने त्याला डोळे भरून पाहिलं अन् तिच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरलं आणि तब्बल तीन वर्षांनी आज ती हसली….!!!

होय खरे आहे कॉलेजच्या त्या शेवटच्या पेपरा दिवशी घरी परतत असताना देहासाठी हापापल्या चार नराधमांची त्या कोवळ्या पोरीच्या शरीरावर घाणेरडी नजर पडली आणि त्या नराधमांनी त्या कोवळ्या पोरीवर सामूहिक अत्याचार केले अन् झाडीत टाकून निघून गेले.

झालेल्या शरीरावर असंख्य जखमा अन् झालेला.
.रक्तस्राव यामुळे बेशुद्ध झालेल्या तिला कुणीतरी दवाखान्यात अॅडमिट केलं होतं पणं पेशंट ची अवस्था पाहता पोलिसांना बोलवण्या व्यातिरिक्त डॉक्टरांनी ती केस हाती घेतली नाही.डॉक्टरांनी पोलिस स्टेशन ला याची माहिती दिली पाच एक मिनिटात एक रुबाबदार पोलिस अधिकारी आणि त्याची टीम हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.पेशंट कडे पाहताच त्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात झरझर पाणी साठल पण आपण वर्दिवर आहोत याची त्याला क्षणात जाणीव झाली.आणि त्याने पेशंट वर तातडीने उपचार करण्याची सूचना केली.
तिलाअतिदक्षता विभागात नेण्यात आलं आणि तो समोरच्या खुर्चीवर विसावला…!
मनात हजार प्रश्न गुंजन घालत होते दुपारी तर ती त्याच्याशी बोलली होती पणं घरी जाताना कोणीतरी हे कृत्य केलं असणार याची त्याला खात्री पटली.डोळ्यात आग साठली "ज्याने हे केलं त्याला मी अजिबात सोडणार नाही माझ्या कीर्तीला अशा अवस्थेत मी नाही पाहू शकत"मनातच बोलत होता समजावत होता त्याच्या हदयाला.

हो… हो किर्तीच होती ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती ती.आज तिच्या परीक्षेचा शेवटचा दिवस होता तो शेवटचा पेपर देऊन ती घरी परतत असतानाच आज नशिबाच्या अनोख्या परीक्षेला तिला सामोरं जावं लागलं होत.शेवटी नशिबाचा खेळच असतो असा…!

रात्र रात्र जागून अभ्यासाची केलेली तयारी पाहिलेलं
पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न आजच्या या प्रकारामुळे अंधातरी होण्याच्या मार्गावर जाऊन ठेपल होत.

"सर पेशंट शुध्दीवर येत आहे पण खूप रक्तस्राव झाल्यामुळे त्या अशक्त आहेत शिवाय झालेल्या प्रकारामुळे त्यांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शुध्दीवर आल्यावर त्या कशा प्रकारे प्रतिसाद देतील यावर पुढची ट्रीटमेंट केली जाईल" डॉक्टर सांगून निघून गेले.
आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर भीती दाटून आलेली कसे सांगणार तिला ? जरी झाल्या प्रकाराची सगळी तिला जाणीव असली तरी मनावर झालेल्या घावांच काय? शरीरावर झालेल्या जखमा पुसल्या जातील पणं मनावर झालेल्या जखामांच काय? आई बापाने कर्ज काढून पोरीला शिकवलं जस सोनं जपून ठेवावे तसे तिला आजवर सोन्यासारखी जपली त्या मायबापाच्या मनाचं काय?

थोड्या वेळातच ती शुद्धीवर आली हळू आवाजात ती बोलली,
क,,र,,,ण,,,स,,र,,
तिचा एक एक शब्द त्याच काळीज चिरतहोता.इतक्या सिरियस कडिशन मध्येही ती त्याच नाव घेत होती.

थोड्याच वेळात तिचे आई बाबा हॉस्पिटलमध्ये आले करणने त्यांना एका शिपायाला घरी जाऊन बोलावून आणण्यास सांगितले होते.
आपल्या मुलीला काय झालं असेल या विचारानेच त्यांना भीती वाटतं होती शेवटी आई वडिलच ते काळजी तर वाटणारच दुपारी येणारी मुलगी रात्र झाली तरी आली नाही म्हटल्यावर शोधा शोध सुरू करून दमलेले ते शेवटी त्या पोलिसाने परिस्थिती सांगितल्यावर हतबल झालेले दोघे.

"मामा मला तुमच्याशी बोलायचं आहे बाहेर या"
करण एक वेळ कीर्तीला पाहून रूम बाहेर पडला.

"बोला साहेब"

त्यांचा हात हातात घेऊन करण बोलू लागला.
"मामा तुमच्या सोबत कोणाचं वैर,तुमचं कीवा कीर्तीला आजपर्यंत कोण त्रास देत होत का??"

"साहेब आमच्याशी तर नाही पण कीर्तीला त्या पाटलांचा सद्या लई त्रास दित व्हता पोरीन कधी सागितलं न्हाई पणं तिच्या सोबत शाळेला जाणाऱ्या पोरींन येऊन सांगितल तवा आम्हाला ठाव"

"कधी सांगितल होत तुम्हाला कीर्तीच्या मैत्रिणीने?"

"परवा"

"पाटलांच्या घरचे काही संबंध आहेत का तुमच्यासोबत?"

"आव साहेब आमचं हातावरच पोट पोटापाण्यासाठी त्यांच्या शिवारात राबावं लागत तवा आमची पोट भरत्यात"

"तुम्हाला त्या पाटलाच्या मुलावर संशय आहे का आज जे काही घडले त्या मागे त्या मुलाचा तर हात नसेल ना?"

"मला बी तसच वाटतय ह्या मागं तो सद्याच हाय"

"त्याच लग्न झालेय का?"

"व्हय अवंदाच झालय बघा पर लई दारुडं हाय लई मारत बायकोला"


"तुम्ही काळजी करू नका मी आहे तुमच्या सोबत तुमच्या मुलीला काहीही होणार नाही.जा आत लक्ष ठेवा किर्तिवर मी करेन सारा खर्च नका काळजी करू.."


"आमच्या सारख्या गरिबावर लई उपकार हाईत साहेब तुमचं"

"अहो मा"
तो पुढे त्यांना मामा बोलणार तेच त्याने त्याचे शब्द अडवले कारण तो एक अधिकारी म्हणून वर्दी वर होता त्यामुळे कर्तव्यावर असताना कोणतेही नाते तो जोडणार नव्हता भले तो मामा म्हणत असता पणं किर्ती बरी झाल्यावर तिला लग्नाची मागणी तो घालणार होता तेही रीतसर आता जर तो काही बोलला असता तर आधीच स्वाभिमानी असलेली ती लोकं तो जी काही मदत करणार होता ती मदत ही नाकारत असते म्हणूनच या विषयावर बोलणे त्याने टाळले होते.

लवकरच या प्रकारचा छडा तो लावणार होता.आधी त्या सद्याला अटक करून तो बाकीच्या लोकांना पण अटक करणार होता.
इकडे कीर्तीची तब्बेत ठीक होत होती.पणं मनावरची जखम मात्र जैसी थी.करण मात्र रोज तिला भेटायला यायचा. ती मात्र त्याच्या सोबत बोलायला संकोचायची कारण अब्रू गेली होती तिची. त्याचा तिने धसकाच घेतला होता. चार दिवसांनी कीर्तीला डिस्चार्ज मिळणार होता. तोवर करण तिची जीवापाड काळजी घेत होता. करणने कीर्तीच्या आईवडिलांच्या मनात आपल्याविषयी एक आदरयुक्त भावना कीर्तीच्या काळजीच्या रूपाने दाखवली होती.त्यांनाही वाटायचं की कीर्तीला जर असा नवरा मिळाला तर एकुलत्या एक लेकीच नशीब फळाला येईल त्यांच्या मनातलं तर कधीच खरे झालेलं होत पण अजूनतरी कीर्ती किंवा करण यांनी एकमेकांसमोर आपले प्रेम व्यक्त केलं नव्हते.

ज्या दिवशी किर्तीवर बलात्काराची घटना घडली त्याच दिवशी करण तिला प्रपोज करणार होता. पण अचानक त्याला कामावर जावं लागलं होत. एक तासापूर्वी करणने तिला एका कॉफी शॉपचा अड्रेस देऊन तिथं थांबण्याची विनंती केली होती.त्यालाच महत्त्वाचं काम आल्यामुळे तो तिला सांगितलेलं विसरूनच गेला होता. दोन तास त्याची वाट पाहून
अखेर कीर्ती त्याला फोन लावणार होतीच त्याचवेळी तिच्या फोनची बॅटरी संपून फोन ऑफ झाला होता. तिच्यासोबतच्या पोरी पण पुढे निघून गेल्या असल्याने ती एकटीच मागे राहिली होती. सावज शोधणाऱ्या त्या नराधमाना अखेर ती एकटी असल्याने संधी चालून आली होती…गावाच्या नाक्यावर बस थांबताच गावाच्या अलीकडे लागणाऱ्या ओसाड डोंगरावरून जात असताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता.

आज कीर्तीला डिस्चार्ज मिळाला होता .तिला घरी सोडण्यासाठी करण स्वतः जाणार होता सगळे सामान पॅकिंग झाल्यावर हॉस्पिटल बाहेर पडताच करणला कमिशनर साहेबांनी एका महत्वाचा केसेस साठी फोन करून तातडीने दुसऱ्या शहरात निघण्याची सूचना दिली. जरा तातडीने निघायचं असल्याने त्याने दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला कीर्तीच्या कुटुंबाला घरी सोडण्यास सांगून तो आपल्या कामासाठी निघून गेला .

जशी गावात गाडी आली तशी शेजाऱ्या पाजाऱ्यानी कीर्तीला दूषणं द्यायला सुरुवात केली.नको नको त्या टीका तिच्यावर होऊ लागल्या.

अब्रू गेली म्हणून बायका टोमन मारू लागल्या.कोण लग्न करणार म्हणून हिनवू लागले.

त्या सर्वांच्या टीकेला कंटाळून आज पर्यंत तिने बंद खोलीत कोंडून घेतलं होत.

सकाळीच पाटलाचा सद्या आणखीन चारपाच मुलांना घेऊन कीर्तीच्या घरी आला होता.आज तब्बल तीन वर्ष होत आले होते. त्या घटनेला ज्या घटनेमुळे तिची सारी स्वप्न, तीच आयुष्य बरबाद झालं होत.
त्या दिवसासून तिच्या मनात बाहेरच्या जगात जगायची इच्छाच मरुन गेली होती.त्या दिवसापासून कीर्ती जणू हसणं विसरून गेली होती.

आज तीन वर्ष झाली ज्याच्यावर ती मनापासून प्रेम करत होती .तोच तिला एकदाही भेटायला आला नव्हता. म्हणून खूप वाईट वाटलं होतं कीर्तीला.
पाटलाच्या राजकारणातल्या वरच्या ओळखीने सद्याला अटक केल्याचा बदला म्हणून करण ची तडकाफडकी बदली त्याच दिवशी म्हणजेच कीर्तीला ज्या दिवशी डिस्चार्ज मिळाला होता त्याच दिवशी करण्यात आली होती.
हे कीर्तीला माहित नव्हत तरीही कीर्तीच्या शेफ्टी साठी करण ने त्याच गावात आपली माणसे ठेवली होती. ही बाब मात्र कोणालाच माहित नव्हती.रोजचा दिनक्रम तिकडे करण ला रोज माहिती पडायचा.

त्याच्याच माणसांनी जे सद्याच्या मागावर होते त्यांना आज सद्या जे काही षडयंत्र घडवणार होता .ते समजलं होत.लगेच ते त्यांनी करण च्या कानावर घातलं होत त्यामुळे करण रात्रीच्या फ्लाईटने इकडे यायला निघाला होता. कीर्ती मात्र या सगळ्या पासून अनभिज्ञ होती

सद्याने कीर्तीला धरून घराबाहेर आणले तिचे आई बाबा सद्याचे पाय धरुन गयावया करत होते.
तरीही त्या नराधमाला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हत.

ज्या मुलीने त्याला पोलिस स्टेशन ची वारी करायला लावली तिला अख्या गावा समोर विनय भंग करून बदनाम करणार होता तो.आज आजपर्यंत कीर्तीने सद्याशी लग्न करण्यास नकार दिला होता ,मध्यंतरी कीर्तीला सद्या स्वतः शी लग्न करण्यासाठी धमकावून ही गेला होता पणं कीर्ती आपल्या मतावर ठाम होती.

गावातली म्हातारी खेतारी,तरुण पोरं,आंधळ्या ना पण आज कीर्तीच शरीर बघायला जणू नवीन डोळे उगवले होते. बायका मात्र डोळ्याला पदर लाऊन तिच्यासाठी देवाचा धावा करत होत्या. तर काही बायका असच पाहिजे म्हणून कुजबुजत होत्या.जसा कीर्तीच्या पदराला सद्याने हात लावला तसा करण वाऱ्याच्या वेगाने तिथं आला.

कीर्तीचा पदर सद्या च्या हातून काढून घेऊन तिच्या अंगावर घालून तो तिच्यासमोर उभा राहिला…

"अरे तुझ्या तर ,तुझी बदली केली तरीही इथं पुन्हा तू कसा आलास?"

"का "हे गाव काय तुझ्या बापाचं आहे ?" करण च्या आवाजात कमालीची जरब होती.

"ए..कोण बे तू माझ्याच गावात येऊन माझा बाप काढणारा?"

"या निष्पाप मुलीची अब्रू लुटलीस ते लुटलीस आता काय हवे तुला ते आज साऱ्या गावा समोर तू तिला बदनाम करत आहेस?"

" तुला काय करायचं मी काहीही करेन चार चौघात हिने माझा अपमान केला, लग्नाला मागणी घातलेली मी साफ नकार दिला, हिने म्हणून हिला बदनाम करणार
आज मी .

"कीर्ती तू तुझे जगाला तोंड ही दाखवणार नाहीस याची आज खबरदारी घेणार" हसणाऱ्या सद्या च्या सणसणीत कानाखाली बसली.
तसे त्याने वर मान करून पाहिले. करण रागाने लालबुंद झाला होता.जमलेले सारे लोक ज्या पद्धतीने किर्तिकडे पाहत होते ते पाहून त्याला साऱ्या गावाचा राग यायला लागला. त्याच ठिकाणी एक छोटंसं देऊळ होत त्या देवासमोर असलेली कुंकवाची वाटी हातात घेऊन तो कीर्ती समोर उभा राहिला .त्यातलं कुंकू हातात घेऊन ते तिच्या भागांत घातलं खिशातील मंगळसूत्र काढून त्याने ते तिच्या गळ्यात घातलं.

तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या.करण ने तिची मान वर केली अन् बोलला,

"आज पासून तुझ्यावर कोणाची टीका करायची हिम्मत करणार नाही.की तुझ्या शरीराला कोणी हात लावणार नाही.आज पासून तू माझी बायको कीर्ती किरण भोसले असशील अन् उद्याची भावी आयपीएस अधिकारी."

कीर्तीचे आई वडील ही सर्व पाहून भारावून गेले. ज्या डोळ्यांनी त्यांनी करण आणि किर्तीच लग्न व्हावे अस स्वप्न पाहिलं होत. ते आज सत्यात उतरलं होत. कीर्तीने एकदा करण कडे डोळेभरून पाहिल.आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्रा कडे पाहून तिने समाधानाने डोळे मिटून घेतले आणि डबडबलेल्या डोळ्यांनी आई वडिलांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञ झाल्याचे भाव पाहून तिच्या ही चेहऱ्यावर स्मित पसरलं. अन् आज तबब्ल तीन वर्षांनी अखेर ती आनंदाने **हसली**

समाप्त…
©® सविता पाटील रेडेकर नेसरी
तालुका_गडहिंग्लज
जिल्हा_कोल्हापूर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//