साथ स्वतःची (भाग-८)

Marathi katha, Marathi blog, sath swathachi, part 8

      दुसऱ्या दिवशी युक्तीचे रिपोर्ट्स येतात... तिला कॅन्सर च निदान होतं! सगळं छान चालू असताना मधेच आता युक्तीला हा एवढा मोठा आजार होतो! अनामिकाला फार वाईट वाटत असतं! ती सारखं एवढंच बोलत असते; युक्तीला का?? मला का नाही..... तिचं तर अजून सगळं आयुष्य बाकी आहे... आत्ता कुठे सगळं नीट होत होतं, आयुष्याची सगळी घडी नीट बसत होती आणि आता हे! युक्ती पेक्षा जास्त त्रास तर अनामिकालाच होत असतो... अर्थात कोणत्याही आईला त्रास होणारच... तसाच अनामिकाला पण फार त्रास होत होता... युक्ती सुद्धा अनामिकाचीच मुलगी... ती सगळं धीराने घेत होती.... ती आई ला शांत करत म्हणाली; "नको आई त्रास करून घेऊस... आपण उपचार करूया ना... होईन मी बरी... इच्छाशक्ती प्रबळ असली की सगळं होत... नको ग तू त्रास करून घेऊस... तूच जर अशी खचलीस तर मी कुणाकडे बघायचं!" 
        बाजूलाच सगळं ऐकणारे डॉक्टर बोलू लागतात; "खरंच तुमची मुलगी फार धाडसी आहे... इतके पेशंट इथे येतात पण इतकं धीराने कोणी घेत नाही... आणि खरं सांगू का, नका काळजी करू... हिला ब्रेन कॅन्सर झालाय... नुकताच शेवटच्या टप्प्यात प्रवेश झालाय.... पण सुदैवाने जास्त काही कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत... मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतंय कि, एवढ्या शेवटच्या टप्प्यात आजार आला असताना सुद्धा हिला जास्त काही त्रास होत नाहीये आणि शिवाय मेंदूत जास्त गाठी पण नाहीयेत... खरंच हिची रोगप्रतिकारक शक्ती फार छान आहे...आपण प्रयत्न नक्की करू... युक्तीच्या इच्छाशक्तीच्या जोरावरच ती बरी होईल.... फक्त तिला कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण नाही येणार याची काळजी घ्या... कोणतंही टेन्शन येऊ देऊ नका नाहीतर कॉम्प्लिकेशन्स वाढतील..... अजून काही टेस्ट करून घेऊ आपण आणि मग पुढचा उपचार कसा करायचा हे ठरवू..."
        अनामिकाला आता डॉक्टरांच्या बोलण्याने थोडा धीर आलेला असतो! युक्ती अनामिकाला म्हणते; "आई.... तू सगळं नॉर्मल असल्यासारखंच रहा.... मुग्धाची आता नेट/सेट ची परीक्षा आहे.... त्यात तिला हे एवढं मोठं टेन्शन नको..... तिला आपण काही कळू नाही द्यायचं.... हवंतर मी पूर्ण बरी झाल्यावर सांगू तिला पण आत्ता नको...." युक्तीचं बोलणं ऐकून अनामिका म्हणते; "हो बाळा! तू नको आता जास्त विचार करुस.... आत्ता डॉक्टर काय म्हणाले ऐकलंस ना... तू जास्त ताण घेऊन चालणार नाही... लवकर बरं व्हायचंय ना.... मग असं करून नाही चालणार... मी हे फक्त स्मृतीच्या कानावर घालून ठेवते, तिला माहित असलेलं बरं... मी लगेच स्मृतीला घरी बोलावून घेते... अजून मुग्धाला लायब्ररीतून यायला पण बराच अवकाश आहे. असं म्हणून अनामिका स्मृतीला घरी बोलावून घेते... या दोघी पण घरी पोहोचतात! थोड्या वेळात स्मृती घरी येते आणि म्हणते; "काय ग! असं अचानक लवकर घरी ये म्हणून का बोलावलंस? सगळं ठीक आहे ना??" स्मृतीचे शब्द ऐकून अनामिकाला रडू येत! एवढा वेळ दाबून ठेवलेल्या भावना अचानक अश्रूंच्या रुपात बाहेर येऊ लागतात.... स्मृती- "काय झालं अनामिका? का अशी राडतेयेस?? नको रडूस मी आलेय ना आता.. सांग काय झालंय नक्की?" असं म्हणत तिला जवळ घेते. अनामिका रडत रडतच तिला सांगते, आपल्या युक्तीला ब्रेन कॅन्सर झालाय.... स्मृतीला पण काही सुचेनासे होते... तिला हि हा मोठा धक्काच असतो! 
          स्मृती कसंबसं स्वतःला सावरत अनामिकाला शांत करते आणि युक्ती कुठे आहे विचारते. अनामिका सांगते; ती आत झोपली आहे... डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने तिला झोप लागली आहे. खरंतर मी हि गोष्ट ऐकल्या ऐकल्या खचले होते... पण, या पठ्ठीने मलाच समजावलं आणि मी होईन ग बरी म्हणून विश्वासाने मला सांगत होती. शिवाय आपण हे मुग्धाला कळू द्यायचे नाही असं ही बजावलं... म्हणून मी तुला लवकर घरी ये सांगून बोलावून घेतलं... परत मुग्धा आल्यावर आपल्याला बोलता नसत आलं! पण तुला बघितलं आणि सगळं अवसान गळून पडलं माझं! आतल्याआत खूप त्रास होत होता. त्यात आता ही लपवा छपवी करावी लागणार आहे. अनामिकाला थांबवत स्मृती बोलू लागते; "बास आता नाही रडायचं! तुला कणखर व्हावच लागणार आहे नाही तर मुग्धाला हे सगळं कळायला वेळ नाही लागणार. युक्तीचे सगळे रिपोर्ट्स आणि डॉक्टर चे प्रिस्क्रिपशन्स मला दे मी माझ्या घरी ठेवते म्हणजे मुग्धाच्या हाती काही लागायला नको आणि तिने गोळ्यांचं काही विचारलंच तर सांग युक्तीला ब्लड प्रेशर मुळे होतंय सगळं त्याचंच औषध आहे. आपण एकदा सेकंड ओपिनियन सुद्धा घेऊया!" 
         सगळं ऐकून घेऊन अनामिका म्हणते; बरं ठीक आहे तू म्हणतेस तसंच करूया. खरंच तू आहेस म्हणून जरा आधार वाटतोय! थांब मी युक्तीच्या सगळ्या रिपोर्ट्स ची फाईल आणून देते आत्ताच तुझ्या पर्स मध्ये ठेव परत मुग्धा आली तर पंचाईत नको. असं म्हणून अनामिका स्मृतीला युक्तीची फाईल आणून देते. एवढ्यात मुग्धा घरी येते. मुग्धा:- हॅलो स्मृती मावशी! काय आज इकडे कशी वाट चुकली आपली? 
स्मृती:- अगं काही नाही ग सहजच! एका न्यू क्लायंट सोबत मिटिंग आहे तर जरा प्रेसेंटशन कसं करायचं वैगरे वैगरे डिस्कशन करायचं होत म्हणून! 
मुग्धा:- बरं! चालू दे तुमचं काम. अरे हो आई दिदी कशी आहे आता? काय होत होत तिला? एवढं का डोकं दुखतंय तीच? गेलेलात ना तुम्ही डॉक्टर कडे? काय म्हणाले डॉक्टर?
अनामिका (उसनं अवसान आणत स्वतःला कसंबसं सावरत) :- हो जाऊन आलो आम्ही डॉक्टर कडे. जास्त काही नाही तिला पित्त झालंय खूप आणि ब्लड प्रेशर पण लो झालंय. होईल थोडे दिवसात ती बरी! बरं जा तू हात पाय धुवून घे मी तुझ्यासाठी चहा टाकते. 
मुग्धा:- बरं ठीक आहे! दिदी पण ना माझ्या पेक्षा तीच माझं टेन्शन जास्त घेते! मग काय होणार बी.पी. लो नाही होणार तर काय?... असं बडबडत ती फ्रेश व्हायला जाते. ती गेल्यावर अनामिका पटकन डोळ्यातलं पाणी पुसते. स्मृती:- बघ अनामिका, आता असं सारखं सारखं डोळ्यात पाणी आणून चालणार नाही. सावर स्वतःला... नाहीतर मुग्धाला सगळं कळेल! जा आता पटकन चहा टाक आणि नॉर्मल राहायचा प्रयत्न कर.... हो कळतंय मला हे फार अवघड आहे पण मुग्धाच्या भविष्यासाठी करावंच लागेल. जा पटकन तोंडावर पाणी मार आणि नेहमी सारखं वाग!.. अनामिका होकारार्थी मान हलवून पटकन सगळं नॉर्मल असल्या सारखं दाखवते. मुग्धा फ्रेश होऊन येते. चहा पाणी होतं... स्मृती सुद्धा तिच्या घरी जाते. 
क्रमशः.....

(टीप:- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून यातून कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

🎭 Series Post

View all