अनामिकाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंन दिवस भरारी घेत असतो. अशीच काही वर्ष निघून जातात.... अनुपच्या कटकारस्थानाचा काहीही परिणाम तिच्या व्यवसायावर होत नाही हे बघितल्यावर तो सुद्धा शेवटी हार मानतो आणि सगळं थांबवतो... त्याच आयुष्य तर एकदम हालाकीत जात असत! ना कोणी काळजी घेणारं ना कोणी आपुलकीने चौकशी करणार! अगदी विराण झालेलं आयुष्य एकट्यानेच ढकलण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा मार्गच नसतो! मध्यंतरीच्या काळात युक्तीचं शिक्षण पूर्ण होत! मुग्धा सुद्धा अंतिम वर्षाला असते. आता युक्ती सुद्धा अनामिका बरोबर त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी आईला मदत करत असते. त्यात युक्तीने MBA केल्या मुळे लेटेस्ट techniques ची चांगलीच माहिती असते त्यामुळे
नविन नविन technology योग्य वापरुन व्यवसायाला नविन दिशा मिळत असते.
अनामिका क्रीयेशन्स च्या मालकिणीची मुलगी असूनही ती तिथे सुरुवातीला Management trainee म्हणूनच काम करत होती. तिचा हा निर्णय कष्टानेच पुढे जायचं या आई च्या संस्काराला अगदी साजेसा असतो! सगळे जण कौतुकाने या निर्णयाचं स्वागत करतात. स्मृती आणि अनामिकाचा अनुभव त्यात आता जोड असते युक्तीच्या नवीन कल्पकतेची! पूर्ण महाराष्ट्रात अनामिका क्रीयेशन्स नाव गाजत असत! मुग्धा सुद्धा तिच्या शिक्षणात जराही कसर ठेवत नव्हती... नेहमी सगळ्या परीक्षांमध्ये पहिली येत होती.. कला शाखेतून शिक्षण घेत असताना ती प्रोफेसर व्हायची तयारी सुद्धा करत होती! अतिशय हुशार असणारी मुग्धा नेहमी आपल्या ज्ञानाचा उपयोग इतर मुलांना सुद्धा व्हावा म्हणून जोमाने फार आधी पासूनच नेट/सेट च्या परीक्षेच्या तयारीला लागली होती.
इथे अनामिका, युक्ती आणि स्मृती हे त्रिकुट आपला विश्व वाढवत होत, तर तिकडे मुग्धा आपलं विश्व निर्माण करत होती. रोज कॉलेज सुटल्यावर लायब्ररीत बसून वेगवेगळ्या पुस्तकातून ती नोट्स काढूनच घरी येत! असेच छान दिवस चालले होते. मुग्धाची सुद्धा पदवी परीक्षा होते... तिच्या कॉलेज मध्ये ती कला शाखेतून पहिली आलेली असते! तिच्या जिद्दीने आणि मेहनती स्वभावामुळेच उत्युंग यश तिला प्राप्त झालं होतं!अनामिकासाठी तर हा अगदी गर्वाचा क्षण असतो.... दोन्ही मुलींनी तिच्या कष्टाचं चीज केलेलं असत! त्यांच्या वयाच्या इतर मुलांना तर आई - बाबा दोघांचा सपोर्ट आणि साथ मिळत होती पण युक्ती आणि मुग्धा तर कसलीही तक्रार न करता नेहमी खुश राहत होत्या.... आता पुढे प्रोफेसर व्हायचं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं! आता मुग्धा ऍडमिशन सुरु होण्याची वाट पाहत असते... अखेर तो दिवस उजाडतो मुग्धाच ऍडमिशन होत.... तिच्या मनासारख्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो... अर्थशास्त्रात तिला मास्टर्स करायचं असत... सगळी प्रोसेस पूर्ण होते..... कॉलेज सुरु होत... त्या बरोबर मुग्धाची वाटचाल तिच्या स्वप्नांच्या दिशेने सुरु होते..... तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा फर्स्ट क्लास ने पूर्ण होत! आता खरी खिंड लढवायची असते ती नेट/सेट च्या परीक्षेची!
तोवर इथे अनामिका युक्तीच्या मागे लागते तुझं २४ वय होऊन गेलंय आपण तुझ्यासाठी स्थळं बघूया बघे पर्यंत वेळ जाईलच.... माझ्या आयुष्यात जे झालं ते मी तुमच्या आयुष्यत नाही होऊ देणार व्यवस्थित चौकशी करेपर्यंत सुद्धा वेळ जाईल... तू फक्त तयार हो.... यावर युक्ती नेहमी नकार देई.... युक्ती- "अगं आई नको ना एवढी घाई करू..... आत्ता सध्या मी तयार नाहीये याला... बघू नंतर... अजून मला आपली कंपनी मोठी कारायचिये.... अगदी परदेशात सुद्धा आपल्या कंपनीची ओळख निर्माण करून मोठं करायचंय.... मला अजून थोडा वेळ दे... आणि खरं सांगू का मला लग्न नाही करायचंय... प्लिझ माझ्या मागे नको ना लागूस...." अनामिका सगळं शांतपणे ऐकून घेते आणि म्हणते बरं ठीक आहे तू आत्ता तयार नाहीयेस पण नंतर मैत्रिणींची लग्न झाली की तूच म्हणशील मला पण लग्न करायचंय.... घे तुला हवा तेवढा वेळ....
सगळं काही सुरळीत चालू असतं! पण सगळं नेहमी सुरळीत चालू राहिलं तर ते आयुष्य कसलं ना! अचानक एके दिवशी युक्तीचं फार डोकं दुखायला लागत आणि सारखी चक्कर येऊ लागते.... सततच्या कामाच्या ताणाने किंवा पित्तामुळे होत असेल म्हणून ती दुर्लक्ष करते आणि लिंबू सरबत पिऊन पडून राहते.... संध्याकाळी अजून त्रास होऊ लागतो म्हणून शेवटी ती आई ला सांगते! दोघीं डॉक्टर कडे जातात..... डॉक्टर सुद्धा औषधं लिहून देतात आणि थोडे दिवस आराम करायला सांगतात.... तरीही फरक नाही पडला तर दोन दिवसांनी येऊन दाखवा म्हणून सांगितलं... दोन दिवसांनी सुद्धा जास्त काही फरक पडत नाही.. औषध घेतलं कि तेवढ्या पुरतं बरं वाटायचं मग परत ये रे माझ्या मागल्या.... म्हणून अनामिका युक्तीला पुन्हा डॉक्टर कडे घेऊन जाते... डॉक्टर काही टेस्ट करायला आणि MRI काढायला सांगतात...
क्रमशः....
(टीप:- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. यातून कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणाला दुखावण्याचा हेतू नाही.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा