साथ स्वतःची (भाग-६)

Marathi katha, Marathi blog, Sath swathachi, bhag 6

      दुपारी सगळे आपापल्या घरी जातात.... अनामिका स्मृतीला तिच्याच घरी येऊन तयारी करण्याचा आग्रह करते... मैत्रिणीच्या हट्टापुढे स्मृतीचं काही चालत नाही... अनामिका आणि स्मृती घरी येतात... युक्ती आणि मुग्धा सुद्धा महिना अखेर असल्यामुळे शाळेतून लवकर घरी आलेल्या असतात... अनामिका जेव्हा त्यांना परवा आजी - आजोबा येणार आहेत आणि आज आपण सगळे संध्याकाळी ऑफिस च्या पार्टीसाठी जातोय हे सांगते तेव्हा दोघी खूप खुश होतात.... संध्याकाळी ७ वाजता पार्टी सुरु होणार असते.... घरी येऊन सगळं आवरेपर्यंत ५ वाजतात.... अनामिकाने स्वतः पार्टीचा बेत आखलेला असतो म्हणून ती स्मृतीला तू मुलींना नंतर घेऊन ये मी पुढे जाऊन तयारी बघून येते असं सांगते.... 
        अनामिका पुढे जाते सगळी तयारी छान झालेली असते... सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी तिने स्पेशल गिफ्ट्स आणलेले असतात... ज्यांच्यामुळे आज आपण पुढे जातोय, ज्यांनी पडद्याआड राहून आपलं नाव मोठं केलंय त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे! या भावनेने तिने सगळं काही प्रेमाने अरेंज केलेलं असत! थोड्या वेळाने स्मृती युक्ती आणि मुग्धाला घेऊन येते.... सगळा स्टाफ सुद्धा हळूहळू सहकुटुंब यायला सुरुवात होते.... सगळे आल्यावर अनामिका कार्यक्रमाची सुरुवात करते; "सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद! तुम्ही सगळे इथे आलात.... मला तुम्हाला एक surprise द्यायचं आहे, असं म्हणून प्रत्येकाला गिफ्ट्स देते.... आज अनामिका क्रीयेशन्स नाव मोठं झालं ते फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानेचं! या साठीच हे छोटंसं गिफ्ट आणि हि आजची पार्टी... आपली कंपनी म्हणजे आपलं एक कुटुंबच आहे... मान्य आहे कुटुंबात कुणी कुणाला थँक्यू म्हणत नाही पण कामाच्या बाबतीत जर आपल्या माणसांची जाण ठेवली त्यांना अजून प्रोत्साहन दिलं तर त्यात सगळ्यांचीच प्रगती होते असं माझं ठाम मत आहे... कदाचित या मुळेच माणसं जोडून ठेवता येतात... परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार! अशीच तुमची साथ राहील हि अपेक्षा!" सगळे खुश असतात... टाळ्यांचा कडकडाट होतो... बॉस असूनही जराही गर्व न बाळगता त्यांच्यातलीच एक होऊन वागणाऱ्या अनामिकाचा स्वभाव सगळ्यांनाच आवडतो.... अनामिकाच सुद्धा सगळे तोंड भरून कौतुक करत असतात.... 
          अनामिका म्हणते; "हो... बास.... बास... आज काय फक्त कौतुकानीच पोट भरायचंय का?? चला आता जेवायला जाऊ... सगळे छान जेवून घेतात... कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना देखील अनामिकाचा स्वभाव फार आवडतो.... कसलाही कामाचा ताण न ठेवता सगळे छान एन्जॉय करतात.... पहिलं यश सेलिब्रेट करून आठवणी मनात साठवून अशीच यशाची शिखरं गाठण्यासाठी पुन्हा नव्याने रिफ्रेश होतात... पार्टी संपते... सगळे आपापल्या घरी जातात... दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे छान काम होत! अजून भरपूर काम येत असत....  अनामिकाचे आई - बाबा येण्याचा दिवस उजाडतो.... अनामिका आज ऑफिस ला सुट्टी घेते... मुली सुद्धा हट्टाने घरीच थांबतात, त्यांच्या स्वागतासाठी... आई आम्ही पण आजी - आजोबांना घ्यायला येणार! असं म्हणत तिघी त्यांना घ्यायला जातात... घरी आल्यावर आपल्या एकट्या मुलीने मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःच नवीन घर घेतलं, एक मोठं ऑफिस सुरु करून स्वतःची समाजात ओळख निर्माण केली याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो.... घर फार मोठं नसलं तरी सुटसुटीत आणि छान होत! अनामिका त्यांच्या साठी चहा नाश्ता ची तयारी करू लागते.... युक्ती आणि मुग्धा आजी - आजोबांना घर दाखवून भरपूर गप्पा मारत बसतात.... गप्पांच्या ओघात कधी दिवस संपतो कळतही नाही.... 
        संध्याकाळी स्मृती सुद्धा घरी येते... तिच्याशीही छान गप्पा होतात... स्मृती सुद्धा अनामिकाच्या आई - बाबांना अगदी मुली सारखीच असते! अगदी बालपणी पासून ची ती मैत्रीण नसली तरी अनामिकाच्या लग्ना नंतर तीच जिवाभावाची असते म्हणूनच! कधी आठवडा होऊन जातो कळतही नाही... अनामिकाचे आई - बाबा पुन्हा त्यांच्या घरी जातात.... इथे अनामिका क्रीयेशन अजून नाव कमवत असते... पण आता तिचं हे यश अनुप च्या डोळ्यात खुपायला लागत.... स्वतः पूर्णतः रसातळाला जाऊन सुद्धा अनामिकाची माफी मागायचं तर सोडाच उलट समाजात तिची बदनामी करायला सुरुवात केली... मुद्दाम तिच्या प्रॉडक्ट्स बद्दल खोट्या अफवा पसरवून तिचं काम कमी करू बघत होता... ते म्हणतात ना ज्याला आपल्या पुढे जाता येत नाही तोच मागे राहून पाय ओढतो.... काहीसं तेच होत होतं इथे... पण कोणी परकं नाही तर अनामिकाचा नवराच हे करत होता.... पण सुदैवाने अनुपचं कोणतंही कारस्थान कामी येत नव्हतं.... कर्मावर विश्वास ठेवून अनामिका स्वतःच काम करत होती आणि प्रगती सुद्धा.... 
क्रमशः....

(टीप:- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. यातून कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
         
          

🎭 Series Post

View all