साथ स्वतःची (भाग-५)

Marathi katha, Marathi blog, sath swathachi, bhag 5

      अनामिकाच नाव announce होतं.... Best women entrepreneur of the year award goes to; अनामिका!!! From अनामिका क्रीयेशन्स..... सगळा हॉल टाळ्यांच्या आवाजाने दणाणून उठतो..... अनामिका स्टेज वर जाते..... तिच्या हातात माईक देतात... मॅम् प्लीझ दोन शब्द बोला.... टाळ्या आणि शिट्यांच्या रुपात सगळेच प्रोत्साहन देत असतात... अनामिका बोलू लागते; "धन्यवाद! ग्राहकांनी ठेवलेल्या अतूट विश्वासामुळेच मी इथं पर्यंतचा प्रवास करू शकले .... पण, आज हे यश फक्त माझं नाहीये.... याचे वाटेकरी आहेत.... माझा स्टाफ ज्यांनी रक्ताचं पाणी केलं सगळ्या ऑर्डर्स पूर्ण करायला... माझी मैत्रीण स्मृती तिने वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं अजून व्यवसाय वाढवायला.... आणि माझ्या दोन्ही मुली सुद्धा.... त्यांनीही कसलीच तक्रार न करता मला सपोर्ट केलाय... मी या सगळ्यांना सुद्धा इथे आमंत्रित करू इच्छिते.... आज मी आहे ही त्यांच्यामुळेच!" पुन्हा टाळ्यांचा कडकडाट होतो... स्मृती, युक्ती, मुग्धा आणि तिचा सगळा स्टाफ स्टेज वर येतात.... टाळ्यांच्या कडकडाटात सगळे पुरस्कार स्वीकारतात.... अनामिका सोडून सगळे जागेवर येऊन बसतात... अनामिकाला परत माईक देतात आणि विचारतात; तुम्ही आज इथवर येऊन पोहोचला आहात... काय सल्ला द्याल या तुमच्या इतर सख्यांना??" 
     अनामिका बोलू लागते; "तोच सल्ला जो मला स्मृतीने दिला! माझ्या आयुष्यात काही असे प्रसंग आले होते ज्यामुळे मी आतून पार तुटून गेले होते.... सगळंच काही मला इथे नाही सांगता येणार पण, नवऱ्याची साथ नसताना दोन लहान मुलींना घेऊन जेव्हा मला खंबीर व्हावं लागलं तेव्हा स्मृतीने दिलेला हा सल्ला... ज्या स्त्री मध्ये विश्व निर्माण करण्याची ताकद आहे ती स्त्री काय स्वतःचं विश्व उभं करू शकणार नाही?? हेच वाक्य होत जे माझ्या मनात कोरलं गेलं... तुम्ही कितीही कठीण प्रसंगात असलात तरी हार मानू नका... स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेऊन जिद्दीने कामाला सुरुवात करा यश तुमचंच आहे!! स्वतःला सावरत स्वतःच स्वतःला साथ देत कामात झोकून देऊन तर बघा... कुणीही अडवू शकणार नाही तुम्हाला यशाचं शिखर गाठण्या पासून.... स्वप्न जगायला शिका... आज जरी भीती वाटत असेल ना मोठं पाऊल उचलायची तरी उद्या तेच तुम्हाला मोठं करणार आहे! सुरुवात लहान करा आणि हळूहळू विस्तार वाढवा.... एखाद्या वटवृक्षासारखं! ज्याची सुरुवात होते बी ने पण विस्तार मात्र पारंभ्या मधून सुद्धा होतोच!" पुन्हा टाळ्यांचा कडकडाट होतो.... अनामिका आज तिथे उपस्थित सगळ्यांचीच प्रेरणा असते.... उपस्थित सगळेच मान्यवर अनामिकाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतात.... सोहळ्याची सांगता होते.... 
       दुसऱ्या दिवशी सगळ्या business मॅगझीन आणि वर्तमानपत्रात अनामिकाच यश ठळक बातमीच्या रुपात झळकत असत! सगळ्यांचे अभिनंदानासाठी फोन यायला सुरुवात होते... आता अनामिकाच्या माहेरून पुण्याहून फोन येतो, समोरून अनामिकाची आई बोलत असते; "अभिनंदन बाळा! किती त्रास सहन केलायस तू हे समजलंय आता आम्हाला सगळ्यांना... तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय... जराही न डगमगता आणि माहेरी काहीही न सांगता तू एकटीच या सगळ्याला सामोरी जात होतीस..." अनामिकाला भरून येतं... जड आवाजात ती बोलू लागते; "थँक्यू आई!! तुम्हाला काही त्रास नको म्हणून काहीही सांगितलं नाही, पहिल्यांदा काहीतरी लपवून ठेवलं!! खरंच सॉरी!" अनामिकाला शांत करत तिची आई बोलू लागते; "आता सगळं नीट चालू आहे ना... बास! आता नाही रडायचं... आमचे आशीर्वाद आहेत तुझ्याबरोबर... थांब तुझ्या बाबांशी बोलून घे." अनामिकाचे बाबा फोन घेतात; "बाळा खूप खूप अभिनंदन! अशीच मोठी हो... खरतर स्मृती ने आम्हाला हे दोन वर्षा पूर्वी सांगितलं होतं... पण तुला कळू न देण्याचा अटीवर! अगं पण असं का केलंस... गरीब असलो तरी पोरीची आणि नातींची जबाबदारी आनंदाने स्वीकारली असती!" बाबांना मधेच तोडत अनामिका म्हणाली; "तस नाही हो बाबा! पण उगाच या मुळे युक्ती आणि मुग्धा सुद्धा खचल्या असत्या... त्यांना खंबीर पणाचे संस्कार नसते मिळाले... म्हणून मी तिकडे नाही आले.. आणि राहिला प्रश्न तुम्हाला आणि आई ला न सांगण्याचा तर तुम्ही छान चारधाम यात्रा, तीर्थयात्रा करण्याचं प्लॅनिंग करत होतात... माझ्या लग्ना आधीपासून तुम्ही खास दोघांसाठी यात्रेला पैसे साठवत होतात हे पाहिलं होत मी.. त्यात जर तुम्हाला मी हे सांगितलं असत तर तुम्ही यात्रा केलीच नसती... तुमचं स्वप्न स्वप्नच राहिलं असत... म्हणून नाही सांगितलं.. सॉरी.. मला तुमच्या या स्वप्नाआड नव्हतं यायचं.. आयुष्यभर तुम्ही दोघांनी माझ्यासाठी खूप केलत... आत्ता कुठे तुम्ही स्वतःच आयुष्य जगत होतात म्हणून मला त्या आड नव्हतं यायच... तुम्ही आणि आईनीच मला शिकवलंत ना कितीही संकट आली तरी घाबरून शस्त्र टाकायची नाहीत!! आता हे तुम्हीच विसरताय..."
        अनामिकाला थांबवत बाबा बोलू लागले; "हो हो बास... तुझ्याशी बोलण्यात कुणीही जिंकू शकत नाही... आता परत मागे वळून नको बघुस... अशीच प्रगती करत राहा..." अनामिका बोलू लागली; "बाबा मी काय म्हणते, तुम्ही आणि आई या ना इकडे चार दिवस... युक्ती आणि मुग्धाला सुद्धा फार आवडेल... तसही तुम्ही अजून घर आणि ऑफिस बघितलं नाहीये... प्लीझ नाही नका म्हणू... हवतर परवा निघा उद्या सगळी तयारी करा..." अनामिकाचे आई - बाबा तयार होतात.... आज तर अनामिका फार खुश असते... आई - बाबांच्या येण्याच्या बातमीने तिचा आनंद द्विगुणित होतो... अनामिका सगळं आवरून कामाला जाते. आज ऑफिस मध्ये जल्लोषाचं वातावरण असत! प्रत्यक्ष प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या सगळ्या महिला सुद्धा तिथे हजर होत्या... अनामिका जशी आत प्रवेश करते त्या बरोबर सगळे एकदम टाळ्यांच्या कडकडाटात तिचं स्वागत करतात... फुलांचा वर्षाव होतो.. अनामिका सगळ्यांना थँक्यू म्हणत मला आज एक मोठी announcement करायची आहे असं सांगते. सगळे ऐकू लागतात... अनामिका:- "खरंतर या यशात तुमच्या सगळ्यांचा पण तेवढाच वाटा आहे... माझ्या एवढीच किंबहुना माझ्यापेक्षा जास्त मेहनत तुम्ही सगळ्यांनी घेतलीत... विशेष आभार तर आपण आपल्या या प्रत्यक्ष काम करणाऱ्या सगळ्या काकूंचे मानुया... यांनी छान quality maintain करून काम पूर्ण केलं...(परत एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट होतो.) या महिन्यात आपल्याला खूप ऑर्डर्स आल्या आहेत आणि या पुरस्कारामुळे अजूनही वाढ होतेय... या पार्श्वभूमीवर मी असा निर्णय घेतलाय कि....... या महिन्यापासून सगळ्यांच्या पगारात १०% ची वाढ होणार आहे...." सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो... जोरदार टाळ्यांच्या सुरात अनामिकाच्या या निर्णयाचं स्वागत होत... हो! हो! पुढे सुद्धा ऐका... आज आपण ऑफिस तर्फे संध्याकाळी पार्टी ठेवली आहे... एक छोटंसं सेलिब्रेशन.. आणि हो या पार्टीच्या आयडियाचं क्रेडिट स्मृतीला जात! 
         आज सगळे अर्धा दिवस काम करून घरी जा आणि संध्याकाळी सहकुटुंब पार्टी साठी रुचिरा हॉटेल मध्ये या... सगळे प्रसन्न मनाने कामाला लागतात.... स्मृती आणि अनामिका तिच्या केबिन मध्ये येतात.. अनामिका स्मृतीला सांगू लागते; "सकाळीच आई - बाबांचा फोन आला होता... तू त्यांना सगळं सांगितलंस हे समजलंय मला... बरं झालं तू आधी पासून त्यांना कल्पना दिलीस नाहीतर आज एकदम शॉक लागला असता ग त्यांना... ते दोघंही परवा येतायत घरी... स्मृती बोलू लागते; "अरे वा! मस्त... बरं झालं काका - काकू येतायत त्यांच्या लाडक्या मुलीचं विश्व बघतील... बरं चल आता पटापट कामं उरकुया परत संध्याकाळची तयारी करायचिये..." स्मृती सुद्धा तिच्या कामाला लागते.... 
क्रमशः....

(टीप:- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही.... यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही.)
         

🎭 Series Post

View all