Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

विषय : आणि ती हसली

Read Later
विषय : आणि ती हसली

शीर्षक : साथ प्रेमाची (टीम कोल्हापूर) 

सारिका आणि सूरजची ओळख तशी नवीनच होती, तरीही एका क्षणात तिला त्याच्यावर प्रेम झालं. कारण तो एक फौजी होता अन् तिला फौजी खूप आवडत होते. कदाचित याचमुळे ती त्याच्यावर प्रेम करू लागली. सूरजला पाहून ती मनोमन विचार करायची की,
"फौजीचा रुबाब जरा जास्तच वेगळा असतो, त्यांच्या अंगी देशभक्ती ठासून भरलेली असते. देव करो आणि मला असा फौजी नवरा मिळो." 
तिच्या इच्छेप्रमाणे सूरज तिच्या आयुष्यात आला होता, पण तो सध्यातरी एक मित्र स्वरुपात तिला भेटला होता. तो दिसायला तर छान होताच पण त्याचे बोलणे ही एकदम भन्नाट होते. त्याचे काम पण तो नीटनेटकेपणाने करायचा. तसेच तो सुस्वभावीसुद्धा होता.

तो सारिकाच्या जीवनात आला न् तिच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. तो तिला खूप आवडू लागला होता, पण ती त्याला सांगू शकत नव्हती. कारण तिला त्याला गमवायची भीती वाटत होती. त्याच्याशी बोलताना तिला असे वाटायचे की,
"त्याचे बोलणे कधी संपूच नये. त्याच्याशी सदैव बोलत बसावे. त्याला एकसारखे त्या फौजीच्या वर्दीत बघत बसावे." 

हळूहळू दोघात कधी अशी घट्ट मैत्री झाली कळलंच नाही, सारिकाला त्याचा विचार करताना दिवस झालेला कळत नव्हता की रात्र झालेली कळत नव्हती. सतत त्याचे भास होत होते. जिथे जाईल तिथे तोच दिसत होता.
सूरजचे वर्दीतले रूप पाहून ती देहभान हरपून जायची. त्याचा फोटो तिने तिच्या मोबाईलच्या स्क्रीनला लावला होता.

सारिकाला सूरजबरोबर असताना खूप भारी वाटायचे. जेव्हा ती त्याच्याशी बोलत असायची तेव्हा खुप खुश असायची. कधीकधी तिच्या डोळ्यात पाणी यायचं,पण ते पाणी आनंदाचे असायचं. पण ज्यावेळी त्यांच्यात बोलणं व्हायचं नाही तेव्हा ती खूप उदास असायची. तिला हे जग निरागस वाटायचं.
सूरजची पण अवस्था तशीच होती. तो ही तिला सांगू शकत नव्हता. पण एके दिवशी राहुलच्या मोबाईलवरुन तिने सूरजला फोन केला. आणि त्याला भेटायला गेली तेव्हा तिने त्याला सांगितले की, "सूरज माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझंही आहे का माझ्यावर तितकं प्रेम? लय असतील मनमौजी पण सगळ्या जगात तूच माझा फौजी."
त्याच तिच्यावर इतकं प्रेम असूनही तो आपल्याला अजून बोलला नाही म्हणून हिने पुढाकार घेतला होता. तिच्या प्रत्येक श्वासात तिला त्याचा भास होत होता. तिने तिच्या मनातलं प्रेमाच गुपित बाहेर काढलं होतं कारण तिला असे वाटायचं की त्याने तिच्यापासून कधी वेगळं होऊ नये.
तिचं हे प्रेम तिच्या घरी मान्य होईल की नाही? या भीतीने तिने घरी पण सांगितलं नव्हतं.
पण सारिका सूरजवर खूप प्रेम करते हे काही तिच्या आईच्या नजरेतून सुटले नाही.

तिला एकेदिवशी आईने सूरजबद्दल विचारले,
"सारिका, तुझ्या मनात सूरजविषयी मैत्री सोडून काही वेगळ्या भावना आहेत का? जे असेल ते स्पष्ट सांगून टाक."

आईने स्वतः हा विषय काढला म्हणून मग सारिकाने तिला सांगितले,
"आई माझं सूरजवर खूप प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे."

हे ऐकल्यावर आईने ही गोष्ट सारिकाच्या बाबांना सांगितली,
"अहो ऐकलं का? सारिकाला तो सूरज आवडतो असं ती म्हणत होती आणि त्याच्याशी लग्न करायचं आहे असंही म्हणाली."

तर तिचे बाबा रागानेच नकार देत म्हणाले,
"छे छे! हे कसं शक्य आहे. मला हे अजिबात मान्य नाही. तिचं लग्न मी सांगेन त्याचं मुलाशी होणार."

सारिका आईबाबांचं हे संभाषण दरवाजाआडून ऐकत होती. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रुंच्या धारा वाहू लागल्या आणि ते अश्रू पुसतच ती बाहेर आली आणि म्हणाली,
"बाबा, तुम्ही का नकार देत आहात? मी सूरजशिवाय दुसऱ्याबरोबर सुखी राहू शकत नाही. प्लीज माझं ऐका बाबा."

बाबा रागातच उठून आले आणि त्यांनी तिच्याकडून तिचा मोबाईल हिसकावून घेतला.
यावरून नंतर तिच्या आईचा आणि बाबांचा जोरदार वाद झाला.
सारिकाची आई बाबांना म्हणत होती,
"अहो तिचं एवढं प्रेम आहे तर लावून देऊ ना तिचं लग्न. आपली मुलगी सुखात राहिलं यापेक्षा आपल्याला काय हवं?"

त्यावर सारिकाचे बाबा म्हणाले,
"वेडी आहेस का? कसलं सुख आणि कसलं काय? अगं तुला तिचं सुख दिसतंय, पण मला तिच्यावर ओढवणारं संकट दिसतंय."

आई प्रश्नार्थक चेहऱ्याने म्हणाली,
"संकट, कसलं संकट?"

बाबा म्हणाले,
"अकाली वैधव्य. मला माझ्या मुलीचे लग्न नेहमीच मरणाच्या दाढेत असणाऱ्या व्यक्तीशी नाही लावून देणार. मला तिला बोडक्या कपाळाने पांढऱ्या साडीत बेरंग आयुष्य जगताना पाहायचं नाहीये. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे." \"कोणत्याही मुलीचा बाप हा आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करतोय,\"यात चूक काय आहे

हा विषय सध्या जिथल्या तिथे थांबला होता.
असेच दिवस जात होते. एकेदिवशी सूरज जेव्हा सुट्टीवर आला तेव्हा तो सारिकाच्या आईबाबांना भेटला. त्याने त्यांची किती समजूत काढली तरीही ते तयार झाले नाहीत.
अशातच मग सूरजची सुट्टी संपली आणि तो परत कामावर रुजू झाला, पण त्याचं मन काही केल्या तिथं लागत नव्हतं.
एक दिवस सारिकाने आपल्याच गावात राहणाऱ्या सूरजचा मित्र राहुल फोनवरून त्याला फोन केला. त्या मित्राला माहीत होते की,सारिका आणि सूरज एकमेकांवर खुप प्रेम करतात. राहुल त्यांना खूप मदत करायचा.तिकडे सूरज जोमाने ट्रेनिंग पूर्ण करत होता.
ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तिथे फौजेची शपथविधी घ्यायची असते तेव्हा त्याच्या घरच्यांना बोलावले होते. मग त्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम झाला आणि घरच्या लोकांना भेटायला आला तर त्याला एक आश्चर्यकारक सुखद धक्का बसला. तो समोर पाहतो तो काय! साक्षात त्याची सारिका त्याच्या समोर उभी होती. त्याला तिला घट्ट मिठी मारावी असं वाटलं पण घरचे सोबत असल्याने त्याने स्वतःवर संयम राखला.

आज तो खुप खूष झाला होता. सूरजला घरी न्यायला गाडी आणली होती, त्या गाडीत सूरज आणि सारिका जवळजवळ बसले होते. त्याने तिचा हात त्याच्या हातात घेतला होता. गावातील लोकांनी त्याचं जंगी स्वागत केले होतं. गावच्या वेशीपासून ते त्याच्या घरापर्यंत रांगोळी काढली होती. फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता, हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गावातील मित्रमंडळी त्याला भेटायला येत होते. सगळेजण त्याचं कौतुक करत होते. सारिकाच्या घरच्यांनीही होणाऱ्या जावयाचं जोरदार स्वागत केलं.

दुसऱ्याचं दिवशी लग्नाची रीतसर बोलणी चालू झाली. तिच्या बघण्याचा कार्यक्रम होणार म्हणून ती खुश होती. सारिकाने गडद गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यात ती अगदी सुंदर दिसत होती. बदामी डोळे, बारीक भुवया, चाफेकळी नाक, गालावर नाजूकशी खळी, गुलाबाच्या पाकळीसम ओठ, लांबसडक काळेभोर केस, जणू स्वर्गातील अप्सरा जमिनीवर अवतरली होती.
इकडे सूरज पण तयार होत होता, त्याने फिकट निळ्या रंगाचा शर्ट घातला होता त्यात तो इतका भारी दिसत होता की सगळे जण त्याच्याकडेच बघत होते. मिलिटरी कट मारलेले बारीक केस, सरळ नाक,गव्हाळ वर्ण, सहा फूट उंची, व्यायामाने कमावलेले पिळदार शरीर, असा अगदी राजबिंडं रूप दिसत होतं. सगळेजण सारिकाच्या घरी आले. तिच्या घरच्यांनी पाहुण्यांना सरबत/पाणी दिलं. तेव्हा सारिकाचे वडील सूरजला म्हणाले,
"सूरजराव, आम्हाला माफ करा. आम्ही चुकीचा आणि स्वार्थी विचार करत होतो, म्हणून आम्ही या लग्नाला विरोध करत होतो. पण आता नाही. आम्हाला आज तुमचा अभिमान आहे."

यावर सूरजने उठून त्यांना नमस्कार केला आणि तो म्हणाला,
"अहो तुम्ही माफी नका मागू. आमची नोकरींच अशी आहे की कोणत्याही मुलीचा बाप हा आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करतोय, यात चूक काय आहे. पण आता तुम्ही जो निर्णय घेतलात त्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे."
दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली.

त्यानंतर थोड्या ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर पोह्यांचा मस्त वास सुटला. इतक्यात सारिका पोहे घेऊन आली आणि सूरजला पोहे देताना लाजून हळूच हसली. तेव्हा तिचं लाजणं पाहून सूरज परत एकदा तिच्या प्रेमात पडला. थोड्याच दिवसात लग्नाची तयारी चालू झाली. दोन्ही घरचे लोक लग्नाची कपडे घ्यायला गेले होते, तेव्हा सूरजने सारिकाच्या पसंतीने कुर्ता घेतला होता आणि सारिकाने सूरजच्या पसंतीची पैठणी घेतली होती.
त्यानंतर ते लग्नाच्या आधी एकमेकांना भेटले होते. कारण दोघांनाही विरहाचा हा काळ सोसवत नव्हता.
आणि दोघांच्या आयुष्यातील तो सोनेरी दिवस उजाडला, त्याचं दिवशी सकाळी दोघांची हळद होती. पिवळ्या रंगाच्या साडीत गौरवर्णीय सारिकाचे रूप आणखीनच खुलुन दिसत होते.
हळदी पार पडल्या. आणि ठरल्या मुहूर्तावर दोघांचं लग्न लागू लागलं. ते दोघे पाटावर उभे राहिले आणि एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागले. इतक्यात भटजींनी दोघांमध्ये आंतरपाट धरला. त्यानंतर मंगलाष्टका म्हणत भटजीने शुभमंगल सावधान म्हंटल आणि त्यानंतर वधुवरानी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. आता ते दोघे कायमचे एकत्र आले होते, तेही कधीही न वेगळं होण्यासाठी. सुरवातीला नकाराच्या फेऱ्यात अडकलेल्या सारिका आणि सूरजच्या प्रेमाचा विजय झाला होता. सुरवातीला आता आपण आईबाबांपासून दूर जाणार म्हणून सारिका ढसाढसा रडली. पण आता आपल्याला हवा तो लाईफपार्टनर कायमचा आपला झाला हे तिच्या ध्यानात आलं आणि ती हसली.

सौ. पल्लवी स्वप्निल ढवळे
इचलकरंजी,
सारिका आणि सूरजची ओळख तशी नवीनच होती, तरीही एका क्षणात तिला त्याच्यावर प्रेम झालं. कारण तो एक फौजी होता अन् तिला फौजी खूप आवडत होते. कदाचित याचमुळे ती त्याच्यावर प्रेम करू लागली. सूरजला पाहून ती मनोमन विचार करायची की,
\"फौजीचा रुबाब जरा जास्तच वेगळा असतो, त्यांच्या अंगी देशभक्ती ठासून भरलेली असते. देव करो आणि मला असा फौजी नवरा मिळो.\"
तिच्या इच्छेप्रमाणे सूरज तिच्या आयुष्यात आला होता, पण तो सध्यातरी एक मित्र स्वरुपात तिला भेटला होता. तो दिसायला तर छान होताच पण त्याचे बोलणे ही एकदम भन्नाट होते. त्याचे काम पण तो नीटनेटकेपणाने करायचा. तसेच तो सुस्वभावीसुद्धा होता.

तो सारिकाच्या जीवनात आला न् तिच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. तो तिला खूप आवडू लागला होता, पण ती त्याला सांगू शकत नव्हती. कारण तिला त्याला गमवायची भीती वाटत होती. त्याच्याशी बोलताना तिला असे वाटायचे की,
\"त्याचे बोलणे कधी संपूच नये. त्याच्याशी सदैव बोलत बसावे. त्याला एकसारखे त्या फौजीच्या वर्दीत बघत बसावे.\"

हळूहळू दोघात कधी अशी घट्ट मैत्री झाली कळलंच नाही, सारिकाला त्याचा विचार करताना दिवस झालेला कळत नव्हता की रात्र झालेली कळत नव्हती. सतत त्याचे भास होत होते. जिथे जाईल तिथे तोच दिसत होता.
सूरजचे वर्दीतले रूप पाहून ती देहभान हरपून जायची. त्याचा फोटो तिने तिच्या मोबाईलच्या स्क्रीनला लावला होता.

सारिकाला सूरजबरोबर असताना खूप भारी वाटायचे. जेव्हा ती त्याच्याशी बोलत असायची तेव्हा खुप खुश असायची. कधीकधी तिच्या डोळ्यात पाणी यायचं,पण ते पाणी आनंदाचे असायचं. पण ज्यावेळी त्यांच्यात बोलणं व्हायचं नाही तेव्हा ती खूप उदास असायची. तिला हे जग निरागस वाटायचं.
सूरजची पण अवस्था तशीच होती. तो ही तिला सांगू शकत नव्हता. पण एके दिवशी राहुलच्या मोबाईलवरुन तिने सूरजला फोन केला. आणि त्याला भेटायला गेली तेव्हा तिने त्याला सांगितले की, "सूरज माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझंही आहे का माझ्यावर तितकं प्रेम? लय असतील मनमौजी पण सगळ्या जगात तूच माझा फौजी."
त्याच तिच्यावर इतकं प्रेम असूनही तो आपल्याला अजून बोलला नाही म्हणून हिने पुढाकार घेतला होता. तिच्या प्रत्येक श्वासात तिला त्याचा भास होत होता. तिने तिच्या मनातलं प्रेमाच गुपित बाहेर काढलं होतं कारण तिला असे वाटायचं की त्याने तिच्यापासून कधी वेगळं होऊ नये.
तिचं हे प्रेम तिच्या घरी मान्य होईल की नाही? या भीतीने तिने घरी पण सांगितलं नव्हतं.
पण सारिका सूरजवर खूप प्रेम करते हे काही तिच्या आईच्या नजरेतून सुटले नाही.

तिला एकेदिवशी आईने सूरजबद्दल विचारले,
"सारिका, तुझ्या मनात सूरजविषयी मैत्री सोडून काही वेगळ्या भावना आहेत का? जे असेल ते स्पष्ट सांगून टाक."

आईने स्वतः हा विषय काढला म्हणून मग सारिकाने तिला सांगितले,
"आई माझं सूरजवर खूप प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे."

हे ऐकल्यावर आईने ही गोष्ट सारिकाच्या बाबांना सांगितली,
"अहो ऐकलं का? सारिकाला तो सूरज आवडतो असं ती म्हणत होती आणि त्याच्याशी लग्न करायचं आहे असंही म्हणाली."

तर तिचे बाबा रागानेच नकार देत म्हणाले,
"छे छे! हे कसं शक्य आहे. मला हे अजिबात मान्य नाही. तिचं लग्न मी सांगेन त्याचं मुलाशी होणार."

सारिका आईबाबांचं हे संभाषण दरवाजाआडून ऐकत होती. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रुंच्या धारा वाहू लागल्या आणि ते अश्रू पुसतच ती बाहेर आली आणि म्हणाली,
"बाबा, तुम्ही का नकार देत आहात? मी सूरजशिवाय दुसऱ्याबरोबर सुखी राहू शकत नाही. प्लीज माझं ऐका बाबा."

बाबा रागातच उठून आले आणि त्यांनी तिच्याकडून तिचा मोबाईल हिसकावून घेतला.
यावरून नंतर तिच्या आईचा आणि बाबांचा जोरदार वाद झाला.
सारिकाची आई बाबांना म्हणत होती,
"अहो तिचं एवढं प्रेम आहे तर लावून देऊ ना तिचं लग्न. आपली मुलगी सुखात राहिलं यापेक्षा आपल्याला काय हवं?"

त्यावर सारिकाचे बाबा म्हणाले,
"वेडी आहेस का? कसलं सुख आणि कसलं काय? अगं तुला तिचं सुख दिसतंय, पण मला तिच्यावर ओढवणारं संकट दिसतंय."

आई प्रश्नार्थक चेहऱ्याने म्हणाली,
"संकट, कसलं संकट?"

बाबा म्हणाले,
"अकाली वैधव्य. मला माझ्या मुलीचे लग्न नेहमीच मरणाच्या दाढेत असणाऱ्या व्यक्तीशी नाही लावून देणार. मला तिला बोडक्या कपाळाने पांढऱ्या साडीत बेरंग आयुष्य जगताना पाहायचं नाहीये. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे." \"कोणत्याही मुलीचा बाप हा आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करतोय,\"यात चूक काय आहे

हा विषय सध्या जिथल्या तिथे थांबला होता.
असेच दिवस जात होते. एकेदिवशी सूरज जेव्हा सुट्टीवर आला तेव्हा तो सारिकाच्या आईबाबांना भेटला. त्याने त्यांची किती समजूत काढली तरीही ते तयार झाले नाहीत.
अशातच मग सूरजची सुट्टी संपली आणि तो परत कामावर रुजू झाला, पण त्याचं मन काही केल्या तिथं लागत नव्हतं.
एक दिवस सारिकाने आपल्याच गावात राहणाऱ्या सूरजचा मित्र राहुल फोनवरून त्याला फोन केला. त्या मित्राला माहीत होते की,सारिका आणि सूरज एकमेकांवर खुप प्रेम करतात. राहुल त्यांना खूप मदत करायचा.तिकडे सूरज जोमाने ट्रेनिंग पूर्ण करत होता.
ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तिथे फौजेची शपथविधी घ्यायची असते तेव्हा त्याच्या घरच्यांना बोलावले होते. मग त्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम झाला आणि घरच्या लोकांना भेटायला आला तर त्याला एक आश्चर्यकारक सुखद धक्का बसला. तो समोर पाहतो तो काय! साक्षात त्याची सारिका त्याच्या समोर उभी होती. त्याला तिला घट्ट मिठी मारावी असं वाटलं पण घरचे सोबत असल्याने त्याने स्वतःवर संयम राखला.

आज तो खुप खूष झाला होता. सूरजला घरी न्यायला गाडी आणली होती, त्या गाडीत सूरज आणि सारिका जवळजवळ बसले होते. त्याने तिचा हात त्याच्या हातात घेतला होता. गावातील लोकांनी त्याचं जंगी स्वागत केले होतं. गावच्या वेशीपासून ते त्याच्या घरापर्यंत रांगोळी काढली होती. फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता, हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गावातील मित्रमंडळी त्याला भेटायला येत होते. सगळेजण त्याचं कौतुक करत होते. सारिकाच्या घरच्यांनीही होणाऱ्या जावयाचं जोरदार स्वागत केलं.

दुसऱ्याचं दिवशी लग्नाची रीतसर बोलणी चालू झाली. तिच्या बघण्याचा कार्यक्रम होणार म्हणून ती खुश होती. सारिकाने गडद गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यात ती अगदी सुंदर दिसत होती. बदामी डोळे, बारीक भुवया, चाफेकळी नाक, गालावर नाजूकशी खळी, गुलाबाच्या पाकळीसम ओठ, लांबसडक काळेभोर केस, जणू स्वर्गातील अप्सरा जमिनीवर अवतरली होती.
इकडे सूरज पण तयार होत होता, त्याने फिकट निळ्या रंगाचा शर्ट घातला होता त्यात तो इतका भारी दिसत होता की सगळे जण त्याच्याकडेच बघत होते. मिलिटरी कट मारलेले बारीक केस, सरळ नाक,गव्हाळ वर्ण, सहा फूट उंची, व्यायामाने कमावलेले पिळदार शरीर, असा अगदी राजबिंडं रूप दिसत होतं. सगळेजण सारिकाच्या घरी आले. तिच्या घरच्यांनी पाहुण्यांना सरबत/पाणी दिलं. तेव्हा सारिकाचे वडील सूरजला म्हणाले,
"सूरजराव, आम्हाला माफ करा. आम्ही चुकीचा आणि स्वार्थी विचार करत होतो, म्हणून आम्ही या लग्नाला विरोध करत होतो. पण आता नाही. आम्हाला आज तुमचा अभिमान आहे."

यावर सूरजने उठून त्यांना नमस्कार केला आणि तो म्हणाला,
"अहो तुम्ही माफी नका मागू. आमची नोकरींच अशी आहे की कोणत्याही मुलीचा बाप हा आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करतोय, यात चूक काय आहे. पण आता तुम्ही जो निर्णय घेतलात त्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे."
दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली.

त्यानंतर थोड्या ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर पोह्यांचा मस्त वास सुटला. इतक्यात सारिका पोहे घेऊन आली आणि सूरजला पोहे देताना लाजून हळूच हसली. तेव्हा तिचं लाजणं पाहून सूरज परत एकदा तिच्या प्रेमात पडला. थोड्याच दिवसात लग्नाची तयारी चालू झाली. दोन्ही घरचे लोक लग्नाची कपडे घ्यायला गेले होते, तेव्हा सूरजने सारिकाच्या पसंतीने कुर्ता घेतला होता आणि सारिकाने सूरजच्या पसंतीची पैठणी घेतली होती.
त्यानंतर ते लग्नाच्या आधी एकमेकांना भेटले होते. कारण दोघांनाही विरहाचा हा काळ सोसवत नव्हता.
आणि दोघांच्या आयुष्यातील तो सोनेरी दिवस उजाडला, त्याचं दिवशी सकाळी दोघांची हळद होती. पिवळ्या रंगाच्या साडीत गौरवर्णीय सारिकाचे रूप आणखीनच खुलुन दिसत होते.
हळदी पार पडल्या. आणि ठरल्या मुहूर्तावर दोघांचं लग्न लागू लागलं. ते दोघे पाटावर उभे राहिले आणि एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागले. इतक्यात भटजींनी दोघांमध्ये आंतरपाट धरला. त्यानंतर मंगलाष्टका म्हणत भटजीने शुभमंगल सावधान म्हंटल आणि त्यानंतर वधुवरानी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. आता ते दोघे कायमचे एकत्र आले होते, तेही कधीही न वेगळं होण्यासाठी. सुरवातीला नकाराच्या फेऱ्यात अडकलेल्या सारिका आणि सूरजच्या प्रेमाचा विजय झाला होता. सुरवातीला आता आपण आईबाबांपासून दूर जाणार म्हणून सारिका ढसाढसा रडली. पण आता आपल्याला हवा तो लाईफपार्टनर कायमचा आपला झाला हे तिच्या ध्यानात आलं आणि ती हसली.

सौ. पल्लवी स्वप्निल ढवळे
इचलकरंजी,

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

@swapallu

Blogger

✍️Intention is very important in every action in my life ✍️

//