"साथ"
भाग 9
" पिहुची आई, पिहू खेळताना पडलीये, रक्त येतंय डोक्यातून " शेजारचा अनिष सांगत आला, तशी राधाच्या पाय खालची जमीनच सरकली. राधा आणि विक्रांतचे बाबा दोघेही खाली पळाले. विक्रांतची आई खूप घाबरली. त्यांना काही सुचेना. राधानी पिहुला उचलून घेतलं तोपर्यंत विक्रांतचे बाबा रिक्षा घेऊन आले.
अनिष च्या आई प्लिज आईंना घरात घेऊन जाता का? मी पिहुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते ,त्यांना धीर देऊन राधा पळत च रिक्षा मध्ये बसते.
विक्रांतच्या आईला काही सुचत नाही, खूप घाबरून जातात त्या माझ एव्हढंस पिल्लू, देवा चा धाव करीत राहतात. पटकन डोक्यात विचार येतो आणि रोहन ला फोन करतात. सगळं सांगतात , रोहन प्लीज मदत करशील का रे?"
रोहन हातातली काम टाकून लगेचच हॉस्पिटलमध्ये पोचतो. राधाला रोहन ला पाहून हायस वाटत. "कशीये पिहू?"
"आत आहे, स्टीचेस घालतायत, डोक्याला खोक पडलीये".विक्रांतीचे बाबा रोहन ला सांगतात.
" पिहू बरी आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. Precaution म्हणून आपण टेस्ट करणार आहात. पिहू ची आई आजिबात घाबरू नका. काही झाल नाहीये. 10 मिन. तुम्ही तिला खोलीत भेटू शकता. फक्त ती घाबरलीये त्यामुळे शांतपणे बोला . ओके?. " डॉक्टर
तिघेही डॉक्टरांच ऐकून जरा शांत होतात. थोड्या वेळात पिहुला भेटतात. "आजोबा, मी पडले" म्हणून पिहू आजोबांकडे बघते. "हो माझ्या बाळा. तुला लवकर बर वाटेल हां. "आजोबा.
राधा पिहुचा हात हातात धरून बसलेली असते." बाबा तुम्ही घरी जा , आई पण काळजी करत असतील. उद्या सकाळी डिसचार्ज देणार आहेतच. "राधा
"हो बाबा , खरच तुम्ही घरी जा आणि मी आहे इथेच. काही वाटलं तर मी फोन करेन"रोहन .
"बरं, ठीक आहे" बाबा घरी जातात, रोहन त्यांना रिक्षात बसवून देतो.आणि मोठ्या आईला सगळ्याची फोन वर कल्पना देतो.
रोहन खोलीत येतो , पिहूला झोप लागलेली असते..रोहन च्या शेजारच्या खुर्चीत राधा बसते. रोहन राधाचा हात हातत घेतो व हलकेच थोपटतो, इतक्या वेळ आवरलेल्या अश्रूंचा बांध तुटतो. आणि राधा रडायला लागते. "रोहन, पिहू ला काही झालं असत तर मी काय केल असत रे . कशी जगले असते मी. पिहू सर्वस्व आहे माझं."
रोहन तिला धीर देत राहतो. रोहनच्या येण्याने राधाला आधार वाटतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी पिहू ला घरी सोडतात, सगळ्या गोष्टींची पूर्तता करून रोहन बिल भरतो. खरतर, विक्रांतचे बाबा पैसे घेऊन येत असतात पण विक्रांतच त्यांना थांबवतो.
तिघेही राधाच्या घरी पोचतात, पिहू ची आजी आल्याआल्या पीहूची दृष्ट काढते.
"मग आमची पिहू खूप स्ट्रॉंग आहे, म्हणत रोहन पिहू ला उचलून घेतो. पण पिहू पुढच्या वेळेस जपून खेळायचं, आणि आम्हाला अस घाबरवायच नाही."रोहन
एक गोड पापा घेऊन राधा तिला आत नेऊन झोपवते.
विक्रांतचे आई बाबा रोहन चे खूप आभार मानतात.
"तुम्ही अस बोलून मला लाजवताय, पिहू माझी आहेच की. "अस म्हणून रोहन त्यांचा निरोप घेतो.
" हो ठीक आहे, तू पण आराम कर , रात्रभर हॉस्पिटलमध्ये जागरण झालंय,दमला असशील. " विक्रांत ची आई रोहन ला म्हणते.
रोहन जायला निघतो, तेवढ्यात राधा त्याला हाक मारते. आणि एक पाकीट हातात देते. "राधा काय आहे हे? इतकी हिशोबी का वागतीयेस."रोहन
" काल तू लगेच धावून आलास, ते उपकार मी फेडू शकत नाही पण ,तू बिलाचे पैसे भरले तेच देतीये मी. तू गैरसमज करून घेऊ नकोस."राधा एवढं बोलून निघून जाते.
रोहन ला राधाच्या अशा वागण्याचा खुप राग येतो. आणि तो तिथून निघून जातो.
रात्री विक्रांतची आई पाणी पिण्यासाठी किचन मध्ये जातात, तर त्यांना राधा एकटीच बसलेली दिसते. तिच्या जवळ जातात, तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात. राधा काय झालं तुला.
विक्रांतची आठवण येतीये का ?, हो म्हणून राधा त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून बसते. मायेने कुरवाळत राधाला त्या म्हणतात," आम्हाला पण विक्रांतची खूप आठवण येते ग, पण परिस्थिती तर आपण बदलू शकत नाही ना ग. रोहन खरच खूप चांगला मुलगा आहे. त्याच्या नजरेत मी तुमच्या दोघींवषयीची काळजी प्रेम बघितल आहे. तुम्ही दोघी त्याच्याबरोबर आनंदात राहाल बाळा, माझं ऐक. तू विचार कर , अजून एक संधी दे स्वतःला."
"आई, मी विचार जरी केला तरी पिहुच काय?विक्रांत ऐवजी दुसऱ्या कोणाला बाबा म्हणून ती स्वीकारेल का? आपल्याला वाटत म्हणून , मला तिच्यावर काही लादायच नाहिये आई. एवढ्या न कळत्या वयात खूप मोठा आघात तिने सोसलाय. आता मला फक्त तिच्या सुखाचा विचार करायचाय. आई होईल सगळं ठीक. तुम्ही झोपा आता, खूप रात्र झालीये." म्हणत राधा पिहू जवळ जाऊन झोपते.
क्रमशः
- ©️®️सौ गौरी विवेक जोशी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा