Oct 28, 2020
प्रेम

साथ भाग -8

Read Later
साथ भाग -8

"साथ"

भाग 8

     रोहन, राधा सगळ्यांच रुटीन चालू असत. रोहन एक दिवस निश्चय करतो मनातलं सगळं सांगून टाकायचं राधाला, किती दिवस लपवून ठेवू. राधाच्या मन वळवण्याचा प्रयत्न तर करायलाच हवा. एक दिवस राधा त्याच्या घरी येते. मोठ्या आई ला भेटायला. मोठी आई नेमकी बाजारात गेली असते. रोहन ला संधी मिळते. 
   "  राधा आई येईलच इतक्यात, बस मी अपल्यासाठी कॉफी बनवून आणतो, इतकी मस्त करतो ना की तू इतर परत परत मागशील. " रोहन 
    रोहन दोन कप घेऊन येतो. " खरच रे कॉफी चा खूप सुंदर सुगंध दरवळतोय."राधा
    "मग तुला वाटलं काय, स्वतःचीच काय तरीफ करायची म्हणून मी कोणाला सांगत नाही"रोहन 
  "  बर बर असुदे " राधा , आणि दोघेही हसतात.

  "राधा , तुला आठवतात का ग आपले कॉलेज चे दिवस, तू स्वाती बरोबर अभ्यासाला यायचीस, आपल्या परीक्षा मागे पुढेच असायच्या. आपण एकत्र अभ्यास करायचो. खूप सुंदर मैत्री होती आपली, पुढे काही कारणामुळे आपली कुटुंब दूर गेली, पण लांबून ही सवांद होताच, मग मी अमेरिकेत गेलो, पण आपण एकमेकांना नेहमी ईमेल करायचो. "रोहन
  " हो आठवत की रे, पण सगळे खुप बिझी होत गेले, आठवण येत नव्हती असा नाही, पण मागे पडत गेलं सगळं".राधा

  "एक विचारू, तू मला खुप आवडायचीस,पण धाडस झाल नाही सांगायचं, तुला जाणवलं नाही का कधी माझं प्रेम? मी ठरवलं होत की परत आलो की तुला सांगायचं, मी स्वतःच्या पायावर उभा राहिल्यावर तुला मागणी घालायची. पण त्या आधीच तुझ्या लग्नाची बातमी कळाली. खुप कोलमडलो मी. कामात गुंतवून घेतलं स्वतःला." रोहन

   "रोहन , जाणवत होत मला , पण खात्री नव्हती. स्थळ येत होती, आणि आई बाबा ना नकार देण्याचं काही कारण ही नव्हतं. विक्रांत च स्थळ आलं, सगळंच अनुरूप होत. सगळयांनाच पसंत होत. मी काय सांगून नकार देणार होते.जे देवाने आपल्या आयुष्यात लिहून ठेवलय ते ते घडत. आपण त्याचा स्वीकार करणं हेच आपल्या हातात आहे" राधा
   "राधा, मग विचार कर देवाने आपली भेट परत का घडवली असतील? देवाच्या मनात असेल आपलं पुन्हा एकत्र येणं. राधा मला तुझ्याशी लग्न करायचंय. पिहू ला माझी मुलगी म्हणून या घरात आणायचय, तू प्लीज हो म्हण. "रोहन
   राधा चकित होते, रोहन अस काही बोलेल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं...शांतपणे राधा रोहन ला म्हणते" नाही रोहन, मला माझं आयुष्य पिहुच्या सोबतीने घालवायच आहे. उद्या कोणाला माझ्या पिहुच ओझं वाटता कामा नये. पिहू माझी जबाबदारी आहे. मला कोणावर लादायची नाहीये. तू परत असा विचार करू नकोस. तुला खूप चांगली मुलगी मिळेल जोडीदार म्हणून , माझा विचार सोड. जे देवाने माझ्या नशिबात लिहिलंय ते मी स्वीकारलं आहे, त्यामुळे तू दया भावनेने अस काही वागू नको. प्लीज. येते मी, मोठ्या आईला सांग मी येऊन गेले."

  राधा आज जरी तू मला निरुत्तर करून गेली असलीस तरी मी हिम्मत हारणार नाही, मी तुझं मन वळवण्याचा प्रयत्न करत राहीन.

 

क्रमशः

- ©️®️सौ गौरी जोशी

   


     

  
  

Circle Image

Mrs Gauri Joshi

Homemaker

I am homemaker, mother, and pharmacist by education but not working now a days. Reading is my passion.