भाग 6
रोहन ला काही सुचेना, आईला काय झालं अचानक, डोक्याला हाथ लावून बसलेला. यापूर्वी आई अशी कधीच वेगळी नाही माझ्याशी , आज अचानक काय झालय. कस सांगू आईला मला राधा आवडते,आणि मी इतर कोणाचा विचार नाही करू शकत, आईला समजलं असेल का राधा बद्दल? म्हणून ती अशी वागली असेल का, एक ना अनेक विचार रोहन च्या मनात येऊन गेले. टॅबल वरचे फोटो त्याने न बघताच भिरकावले.क्षणभर नजर त्या फोटो वर गेली आणि रोहन आनंदानी ओरडला....पळतच आईला मिठी मारली,आई आई आई!!! I love you. आणि हात धरून तिला खोलीत घेऊन आला.
आईचा हात हातात धरून आनंदाने रोहनला पुढे काय बोलाव सुचत नव्हतं....रोहनच्या आई म्हणाल्या....रोहन तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे बाळा, आणि मुलगी राधा सारखी असल्यावर मी नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. रोहन पण तुला आधी राधाच्या कलेने घ्यायला हवं, ती आयुष्यात आलेल्या वादळाने होरपलेली आहे. झाडाची मूळ जशी वादळ पाऊस कशातच झाडाची साथ सोडत नाहीत तशीच तू तिला जाणीव करून द्यायला हवीस की तू ही तिची कायम साथ देशील.
रोहन स्वातीला तिच्या मनातलं राधाबद्दल च प्रेम सांगतो. स्वाती पण खूप खुश होते. मैत्रणींच्या आयुष्याची सुरुवात नव्याने होणार याचा तिला खूप आनंद होतो.पण कोणीच राधाला याची ओळख द्यायची नाही अस ठरवतात.
स्वाती जाणार म्हणून राधाच येण-जाणं वाढत. आणि राधा आणि रोहन मधील दुरावा पण कमी होत जातो. पिहू सगळ्यांची लाडकी होऊन जाते. शेवटी स्वाती ऑस्ट्रेलियाया जायचा दिवस उजाडतो. राधा पिहू तिला निरोप द्यायला घरी जमतात.स्वातीची आई आणि काकू राधाला बजावतात स्वाती नाही म्हणून यायचं टाळू नकोस, पिहू पण आमची नात च आहे."परत लवकर ये ग स्वाती" म्हणत दोन्ही मैत्रिणी गळाभेट घेतात.
स्वाती जाते पण रोहन ला बजावून सांगते राधाला माझी वहिनी म्हणून लवकर आण. लवकर तिला मनातलं सांग. रोहन ला मानसिक बळ मिळतं आणि राधाला मनातील भावना सांगण्यास तो योग्य संधीची वाट पाहतो.
क्रमशः
©️®️ सौ गौरी विवेक जोशी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा