Oct 28, 2020
प्रेम

साथ भाग 3

Read Later
साथ भाग 3

साथ
भाग 3


   राधा रोहन ला खुप आवडायची, पण कधी बोलून दाखवलं नाही, अमेरिकेत शिकायला गेला ते ठरवून की परत आलो की राधा ला मनातलं सगळं सांगायचं आपलं प्रेम व्यक्त करायचं, पण त्याआधीच तीच लग्न झाल. रोहन मनातल्या मनात घुसमट होता. राग येत होता त्याला स्वतःचा की आधी राधाला त्याने सांगितलं असत तर आज चित्र कदाचित वेगळं असत, राधा आज त्याची असती, पण तिला तरी किती घाई होती लग्नाची, 2  महिनेच होते  मी परत यायला , बोललो नसलो तरी जाणवत नसेल का तिला माझा प्रेम. पण आता काही करू शकत नाही. खुश आहे ती नवरा मुलगी संसारात. तिला काय फरक पडलाय माझ्या आनंदाचा ...जाऊदे मला बघायचं पण नाही तिच्याकडे....  विचार करून रोहन काम करत बसतो.

   खाली सगळे गप्पा मारत नाश्ता करतात , सुलेखा आता एक फक्कड चहा होऊन जाऊदे .....स्वातीचे बाबा स्वातीच्या आईला म्हणतात. आहो 10 मि. पूर्वीच घेतलात ना चहा ? अगं राधा आलीये ना , मग इस खुशी मे एक चहा तो बनता है। तुम्हाला तर कारणच हवं असत चहा प्यायला, सगळे हसायला लागले त्यांचं बोलणं ऐकून,तेवढ्यात मोठी आई(स्वातीची काकू) म्हणते थांब सुलेखा मे करते चहा , म्हणत काकू किचन मध्ये जातात आणि राधा ही त्यांच्या मागे जाते. 

    हे घे म्हणत मोठी आई राधाच्या हातावर लाडू ठेवतात..
    " व्वा , रव्याचा लाडू!" म्हणत राधा अगदी खुश होते
    "हो ग आपल्या घरात तुला आणि रोहन ला फक्त आवडतात असे रव्याचे ओला नारळ घालून केलेले लाडू, जेव्हा जेव्हा रोहन साठी करायचे तेव्हा मला तुझी नेहमी आठवण व्हायची." काकू
    पटकन राधा त्यांना बिलगते मोठी आई खूप छान झालेत लाडू.
   " अगं एक कप कॉफी पण करायचीये रोहन साठी".

"काय ? मोठी आई रोहन घरात आहे? मग आला का नाही इतका वेळ? आहे कुठे '?...राधा

"ऑफिस च काम करत बसलाय... तू एवढी कॉफी नेऊन दे ना त्याला. वरती गेलीस की डाव्या बाजूची खोली. दारावर लिहिलंय don't disturb, पण आपण वाजवायच दार"....दोघी ही हसु लागतात.

  कसला आहे ना हा रोहन , आला पण नाही खाली, कुचका, इतका काय काम ? कदाचित त्याला कळलं नसेल मी आलीये ते.. चकित होईल मला बघून...विचार करत करत राधा रोहन च्या खोलीत जाते.

  कॉफी चा वास आल्यावर मग ना वळत रोहन म्हणतो, thank you  आई खरच कॉफी हवीच होती मला . राधा ला बघून म्हणतो " तू का आलीस , आई कुठे आहे?"

  " राधाला ला वाईट वाटत, sorry  त्या चहा करत होत्या इतरांसाठी म्हणुन मी आले.तूला आवडलं नाही का मी आले म्हणून?"
  रोहन ला आपली चूक कळते , आपण पटकन अस बोलायला नको होत, तो राधाला म्हणतो तस नाही , कशी आहेस राधा ?

 छान आहे तू कसा आहेस रोहन?

 मी एकदम मस्त, एन्जॉय करतोय लाईफ. ? बर आता थोडं कामात आहे, आईला सांग मे दुपारी जेवणार नाहीये, ब्रेकफास्ट भरपेट केलाय . भूक लागली तर नंतर खाईन. आणि लॅपटॉप मध्ये डोकं घालून बसतो.
राधा खोलीतून बाहेर जाते.
सॉरी राधा, पण काय करू मला नाही बोलायचंय तुझ्याशी.

राधा खाली येते...सगळ्याच्या गप्पांमध्ये मिसळून जाते...मनात विचार चालूच असतो.का वागला असेल रोहन अचानक असा?

   पिहू , स्वातीची दोन मुलं आणि नेहा यांच्या मध्ये अगदी रमून गेली होती. मम्मा, नेहा aunty नि मला बघ किती काय काय दिलय, अगं aunty काय मावशी म्हण...राधा नेहाला म्हणाली

 आग माझी मूल म्हणतात ना सगळ्यांनाuncle aunty त्यामुळे पिहू पण म्हणत असेल. स्वाती म्हणाली


"राधा ताई आज राहा ना ग, बच्चे कंपनीला घेऊन बागेत जायचा प्लॅन आहे " अक्षय म्हणाला. मी नेहा आणि सायली(अक्षय ची बायको) आम्ही जाणार आहोत पिहू ला पण घेऊन जायचंय , संध्याकाळी मस्त चाट चा प्लॅन करू icecrem घेऊन येतो. तू घाई नको करुस हा जायची आज राहा. मग सगळेच राधाच्या मागे लागले राहा राहा.
" बर आईंना काळवते फोन करून." राधा, पिहू एकदम खुश झाली आणि शिव आणि श्रेया बरोबर खेळायला पळाली.

  दुपारी सगळ्याची जेवण झाली मूल नेहाच्या मागेच होती. नेहा मावशी त्यांची लाडकी झाली होती.

   सगळे आपल्या खोली गेल्यावर राधा मोठ्या आईच्या खोलीत गेली. "मोठी आई येऊ ?" राधा


   अगं विचारतेस काय, ये बस...राधा मोठ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून अश्रूंना  वाट मोकळी करून देते. मोठी आई ,कस वाढवलत हो तुम्ही रोहन ला एकट्याने. माझी खुप कसरत होते. चेहऱ्यावर वागण्यात खंबीर आहे असा दाखवत राहते पण मनात खूप घाबरलीये मी. कशी मी वाढवू पिहू ला, आई आणि बाबा दोन्ही रोल कसे निभावू. थकून जातीये मी. तुम्ही कुठुन बळ आणल एवढं मला सांगा ना. विक्रांत नाही या जगात यावरच अजून माझा विश्वास बसत नाही, पिहू ला कस सांगू कस मोठं करू मोठी आई मी. एक वर्ष कस गेलं मला कळत नाही , फक्त दिवस ढकलतीये मी. आई बाबा सासू सासरे याना माझे अश्रू दाखवून दुःखी करत नाही मी, पण मनात खूप त्रास होतोय मला.

  राधा डोळे पूस बघू , इतकी गुणी माझी राधा तरी देवानी माझ्यासारख दुःख तुला का दिल. राधा मुलांसाठी खंबीर राहवत लागत बाळा, पिहू चा विचार कर. राधा पिहू लहान आहे अजून तू दुसर लग्न कर. आता काळ बदललाय, समाज खूप पुढे गेलाय. मी एकटीने काढलं आयुष्य पण तू विचार कर. सोबतीची गरज असतेच ग. माझ्या सासूबाई म्हणजे माई म्हणायच्या मला, तुझी तयारी असेल ना सुलभा तर मी तुझं दुसर लग्न करून द्यायला तयार आहे. पण तो काळ वेगळा होता. आता सगळं बदल आहे बाळा. आंम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत.

  "अरे रोहन तू इथे के करतोस?"स्वाती
  
  "मला भूक लागली होती म्हणून आईकडे आलो होतो" स्वाती जा ना मला काहीतरी खायला आणून दे खोलीत प्लीज. अस म्हणून रोहन खोलीत जातो.

 

  क्रमशः

©️®️ सौ गौरी जोशी

 

Circle Image

Mrs Gauri Joshi

Homemaker

I am homemaker, mother, and pharmacist by education but not working now a days. Reading is my passion.