साथ गरजेची ... भाग 4

आशा ताईंनी बागेत हास्य क्लब जॉईन केला होता सकाळी त्या तिकडे जात होत्या, तेवढ्या वेळात शांततेत बरीच कामे करून घेत होती नीता,


साथ गरजेची ... भाग 4

©️®️शिल्पा सुतार
.........

बिल्डिंग मधल्या ग्रुपच पिकनिकच ठरल सगळ्या बायका जाणार होत्या, दहा दिवस, सासुबाई हो नाही करत होत्या, मी नाही तर कस होईल या घरात, कोणी काही करत नाही, सगळ घर मीच बघते, त्यांना काळजी होती, काय करू?

"जा आई तू, आम्ही करून घेवू कसतरी, काळजी करू नकोस इकडची, तू तुझ आयुष्य किचन मधे घालवल, आता थोडी बाहेर पड यातून" ,.. आकाशने समजवल.

त्या तयार झाल्या, जाण्याआधी खूप सूचना देत होत्या, चार्ट करून दिला स्वयंपाकाचा,

त्या गेल्यावर काही अडल नाही कोणाच, उलट घरात सगळे छान मदत करत होते, मेन म्हणजे बाबा आनंदी होते, ते कधी नव्हे तर मोकळे सुटल्या सारखे वाटत होते,

नीताची धावपळ होत होती , बाबानी सुचवल संध्याकाळ साठी बाई लावून घेवू, आकाशने काही ऐकल नाही, लगेच बाजूच्या घरातल्या ताईंना सांगितल, त्यांची बाई ते काम झाल्यावर इकडे येत होती, राहू देवू ही बाई, छान काम करते, दोघ बोलत होते,

नीता हसत होती, तिला माहिती होत सासुबाई आल्यावर परत पाहिल्या प्रमाणे होईल, त्या ऐकत नाही अजिबात, लगेच बाईला सांगतील येवू नकोस अस, बघू काय होत ते, आणि सासुबाई घरी असतांना हिम्मत होत नाही या दोघांची, तेव्हा लावली असती ना कामाला बाई. काय होत काय माहिती.

सासुबाई आल्या ट्रीप हून, सगळे व्यवस्थित आनंदी बघून त्यांना राग आला, त्यांना वाटल आपण नाही घरच्यांचे खूप हाल झाले असतिल, आपली वाट बघत असतिल, पण अस काही नव्हत.

संध्याकाळी बाई आली कामाला, त्यांना राग आला, एवढा मोठा निर्णय घेतला या लोकांनी मला न विचारता,.. "हिला का ठेवल कामाला" ,

"मी थकते ऑफिस मध्ये, उशीर ही होतो आता हल्ली म्हणून, राहू द्या तिला, आई तुम्ही नव्हत्या तर खूप हाल झाले म्हणून लावल हिला, तुम्ही करता सगळ, तुम्हाला ही आराम होईल ",.. नीता.

ठीक आहे, त्या खुश होत्या.

बाई गेली,

आकाश आला होता, तो आशा ताईं जवळ बसला होता, "आकाश स्वयंपाकाला बाई गरजेची आहे का? ",

" आई राहू दे तिला तुझी धावपळ होते मग, आता थोड आराम करत जा, मी फ्रेश होवुन येतो, चला जेवायला बसू",.. आकाश.

मुलगा काळजी घेतो आशा ताई खुश होत्या.

"अहो बघितल का आता आपल्या कडे स्वयंपाकाला बाई आहे ",.. आशा ताई.

"ठीक आहे काय हरकत आहे, मुलांना ऑफिस असत, वेळ नसतो, नीता दिवस भर ऑफिस मध्ये असते, रात्री अजून तिला काम द्या, तिने नाही केल तर तुला कराव लागत, म्हणून त्यांनी काही ठरवल असेल , आपणही जरा घरातल लक्ष कमी करायल हव, आता ते दोघ ठरवता ते करू देत जा त्यांना , उद्या पासून फिरायला येत जा माझ्या सोबत, ट्रीपला जात जावू आपण ",.. बाबा.

सगळे जेवायला बसले,

" नीता अग सकाळी तू करशील ना स्वयंपाक ",.. आशा ताई.

" हो आई सकाळच मी करेन पण तुम्हाला गार खायच नसेल तर तुम्ही त्या बाईला दुपारी ही बोलवा",.. नीता.

"नको तुझ्या हातच बर, छान असतो तुझा स्वयंपाक, मी भाजी गरम करून घेईल रोज, संध्याकाळी ती बाई येईल ",.. आशा ताई.

आता थोडा थोडा बदल करत होती नीता घरात, एकदम नाही पण थोड तरी सासुबाई मान्य करत होत्या, होईल ठीक अशी आशा होती नीताला. आकाश होता सोबत, गोड बोलून ते नीट रहात होते.

आशा ताईंनी बागेत हास्य क्लब जॉईन केला होता सकाळी त्या तिकडे जात होत्या, तेवढ्या वेळात शांततेत बरीच कामे करून घेत होती नीता, सकाळच्या स्वयंपाकाच टाइम टेबल अस नव्हत, आता कोणाचीही फर्माईश नुसार नीता जेवण बनवत होती, संध्याकाळी आशा ताई स्वयंपाक काय करायच ते बाईला सांगत होत्या.

थोडी तरी शांती होती घरात,

आकाश नीता ऑफिस मधे प्रगती करत होते, नीताला परफॉर्मन्स बोनस ही मिळाला होता, तिच्या कामावर सगळे खुश होते,

घरात शांती होती म्हणून ती काॅन्स्ट्रेट करू शकत होती.

आधी घरात खराब परिस्थिती होती, पण आकाशच्या मदतीने नीताने ती ठीक केली होती, आशा ताईंनी समजून घेतल, त्या मुळे बर झाल.

घरच्यांची साथ असण गरजेच आहे.


🎭 Series Post

View all