Oct 21, 2020
स्पर्धा

साथ दे तू मला -भाग 7

Read Later
साथ दे तू मला -भाग 7

       प्रगतीला संयुच्या मोबाईलमध्ये UPSC  शी related  अँप्स दिसतात.

त्यामुळे ती पुरती चक्रावून गेलेली असते.   तिच्या मनात असंख्य प्रश्न येतात.. पण या सगळ्यांची उत्तरे फक्त

संयु च देऊ शकणार होती..

       तेवढ्यात तिची ऑनलाईन क्लासची  वेळ सुरु होते..  क्लासमध्ये तिचे आज लक्षच लागत नाही..तिच्या डोक्यात नुसता संयूचा विचार सुरु असतो...

कधी एकदाचा हा क्लास संपतो आणि ती संयुकडे जाते असं तिला झालं होत...

“हुश्श .....! संपला एकदाचा क्लास.....!” असं म्हणत ती तडक उठते आणि संयुला आवाज देते...

“वहिनी अगं कुठाय तू?”

घरभर शोधलं तरी संयु काय तिला कुठेही दिसत नाही. आता शेवटचा पर्याय गच्चीवर जाऊन बघणे..   

घरात कुठे दिसत नाही म्हणल्यावर गच्चीवर असू शकते वहिनी असा विचार करत ती एक एक पायरी भराभर चढतच गच्ची वर पोहचते... संयु तिथे कुंड्यामधील झाडांना पाणी देत असते...

प्रगती- “वहिनी इथे आहे होय तू ! आख्ख घर पालथं घातलं तू शोधायला...!”

संयु- “घरात काही काम नाहीये तर म्हणलं जरा झाडांना तरी पाणी देऊन होईल..

बघा ना कशी टवटवीत झाली आहेत...’’

प्रगती- “एक विचारू का तुला ?”

संयु- “हो विचारा ना ...!”

“मला सांग तुझ्या मोबाईलमध्ये या अँप्स कशा काय ग...?”

 मोबाईल संयुच्या समोर धरतच प्रगती तिला विचारते.  संयु पुरती गोंधळते.  तिला काय बोलावे सुचतच नसते.

संयुच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघून प्रगती काय समजायचे ते समजून जाते.

तिला कळते कि संयुने नक्कीच काहीतरी मोठं सिक्रेट ठेवलय पण काय ते तिला संयुकडूनच ऐकायचे असते.

संयु- “मी हे सगळ्यांना सांगणारच होते पण मला भीती वाटत होती.. माई काय विचार करतील? त्यांना वाटेल मी खोटं बोलले त्यांच्याशी…… ..तुम्हा सगळ्यांशीच..!”

प्रगती-“ तू किती शिकली आहेस मग?”

संयु- “याच वर्षी ग्रॅज्युएट झाले. distiction  मिळाले मला..!”

आता  प्रगतीचा आनंद गगनात मावेना ...

प्रगती संयूचे दोन्ही हात घट्ट पकडते आणि तिला गोलगोल फिरवतच म्हणते, “ व्वा वहिनी, ग्रेट आहेस तू!  खरंच का ग तू ग्रॅज्युएट आहेस? आज मी खूप खुश आहे कारण माझी एकतरी वहिनी शिकलेली आहे..

राहिला प्रश्न माधुरी वहिनीचा तर ती पण तशी नववी पर्यंत शिकली आहे..”

संयु-“ पण माईंना हे कधीच नाही आवडणार! त्यांना हे कळलं तर घरात भूकंप येईल.. पण मला त्यांच्यापासून काही लपवायचं नाही…”

प्रगती- “वहिनी ,तू माईंना आत्ताच काही नको सांगू, जेव्हा कळायचं तेव्हा कळू दे!”

संयु- “हे अस खोटं मी मनात ठेवून नाही राहू शकणार …….मला असा झालाय कधी मी मनमोकळं करेन माईंजवळ..!”

प्रगती-“ पण वहिनी त्यानंतर काय होईल याची काही आयडिया आहे का तुला?’’

“            मी माझ्या आईला चांगली ओळखते! तिला खोटं सहन होत नाही म्हणून मी म्हणते तिला कळायचं तेव्हा कळूदे!”

संयुला कळत  नसत काय करायला हवं! पण हे माहित होत कि सत्य काही जास्त दिवस लपून राहत नाही.

माईंना सांगून  टाकू कि प्रगतीच ऐकू ? अशा द्विधा  मनस्थितीत संयु अडकली असते..

 

प्रगतीला अजून काही विचारायचं असत तितक्यात तिला कोणीतरी गच्चीवर येत असल्याची चाहूल लागते.

ती नजरेनेच संयुला खुणावते.. दोघीही गप्प बसतात... प्रगती दारात जाऊन बघते तर तिथे माधुरी आलेली असते.

माधुरी-“ काय वन्सं काय गप्पा रंगल्या होत्या लाडक्या नणंद भावजयीच्या ?”

आणि मी आल्यावर  एकदम गप्प का बसलात..? काय सिक्रेट हाये का?”

प्रगती- “आमच्यात काय सिक्रेट असणार आहे ग ?”

माधुरी- “नाय म्हणलं एव्हडा भलामोठा राजवाडा सोडून वर गच्चीवर येऊन बोलायलात म्हणून आपलं विचारलं ! उग आपली शंका...!”

प्रगती- “वहिनीकडे काम होत जरा………, म्हणून  तिला शोधत गच्चीवर आले होते...”

तेवढ्यात माई संयुला आवाज देत असतात ....

माधुरी- “जाऊबाई माई कव्हापासून शोधायल्यात तुम्हासनी...! जावा पटकन बघा काय काम आहे ते....!”

संयु गेल्यावर माधुरी

आज काय खरं नाही जाऊबाईंचं ...! असं हळूच पुटपुटते..

 

 

संयु भराभर पायऱ्या उतरत खाली येऊ लागते. माई पण तिथंच तिची वाट बघत उभ्या असतात.

तिला एवढ्या भरभर पायऱ्या उतरताना बघून

माई- “ए sssss चेन्नई एक्सप्रेस..........  कुठं ....?”

     “एवढ्या घाईत कुठं निघाली ...?”

संयु -“ तुम्ही आवाज दिलात ना म्हणून..!”

माई- “अगं पण अशी कुत्रा मग लागल्यावानी का पळती..! थोडं दमाण पायऱ्या उतरत जा ना !

पडली बिडली म्हणजे...!”

माईंच्या रागवण्यातही त्यांची माया संयुला कळत होती....

माई-“ सुनबाई, माझ्या मैत्रिणीला काल नातू झाला बघ!

माझी इच्छा कधी पुरी करणारेस तू?

 तुझ्या ध्यानात आहे ना मी तुला काय सांगितलं होत?”

संयु-“ हो माई लक्षात आहे माझ्या !”

एव्हडं बोलून माई निघून जातात. तेवढ्यात प्रगती अणि माधुरी पण येतात.

 

 

 माधुरीला ऐकायचं होत कि कोणत्या खजान्याबद्दल माई संयुला सांगतात पण प्रगतीने तिला गप्पामध्ये गुंतवल्यामुळे माधुरीला खाली जाताच आल नव्हतं..

माधुरी माई गेल्यावर  संयुला पण विचारते पण ती पण काहीच उत्तर न देता निघून जाते..

माधुरीचा नुसता तिळपापड होतो...तिला जाणून घ्यायचं होत नक्की माईंनी काय सांगितलं असेल संयुला !

 

 

 

 

 

                 संयूचे मन आता प्रवीण च्या घरात रमू लागले होते.पण ती तिची स्वप्नं  विसरली नव्हती..

    कधी माईंना खरं कळलं आणि पुढे घरात काय सुनामी येईल याची कल्पनाच तिला करवत नव्हती. नियतीनं आपल्या आयुष्यात पुढं काय मांडून ठेवलं असेल याबाबत तिला कसलीच पुसटशीदेखील कल्पना नव्हती..

    प्रवीण पण त्याच्या समजूतदार,मनमिळाऊ स्वभावाने संयूचे मन जिंकू लागला होता. प्रवीण तर संयुच्या प्रेमात होताच पण संयुच्या मनावरही प्रवीणच्या प्रेमाचा मोरपीस फिरू लागला होता..

    माईंना खरं कळलं तर तिच्या स्वप्नापेक्षा प्रवीणपासून दूर जाण्याची भीतीच तिला जास्त सतावत होती...

   प्रवीण तर लग्न झाल्यापासून खूपच बदलला होता.. शेतातून घरीपण लवकर येऊ लागला होता..

प्रविनमधला हा बदल माईंच्या लक्षात यायला वेळ लागला नाही…..

          संयुच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल आदर तर होताच पण त्यात ती हुशार मनमिळाऊ आणि शिकलेली असल्याने तिच्याबद्दलचा  आदर त्याच्या मनात आणखी  वाढला होता..

            रात्री घरातल्या सगळ्यांची जेवण उरकली होती. किचनमधली काम पण संयु आटपत होती.. तेवढ्यात माई तिथं येतात.. संयु एकटीच काम करत होती..

माई- “माधुरी आणि प्रगती कुठाय दिसत नाहीत!”

संयु- “इथेच होत्या त्या ..आताच गेल्या बहुतेक..!”

माई माधुरी आणि प्रगतीला आवाज देतात.. “कुठं मेल्या दोघी पण ..?”

लवकर स्वयंपाकाच्या खोलीत यायला सांगतात

दोघीही ताबडतोब हजर होतात.. माधुरीला तर चांगलाच घाम फुटलेला असतो.. माधुरीचा कामचुकारपणा तर माईंच्या केव्हाच लक्षात आला होता.. आणि आता तर संयु आल्यामुळं तिच्यावर कुठलीच जबाबदारी राहिली नव्हती.. संयु काही तक्रार न करता घरातली सगळी काम करायची…..

माई तिघींना पण घरातली काम वाटून देतात.. त्यात संयुकडे सकाळी नाश्ता बनवून शेतात प्रवीणला मदत करायची आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायची जबाबदारी होती..

आणि माधुरीला दुपारचा स्वयंपाक आणि रात्री किचनची आवराआवर होती.. उरलेली कामे प्रगतीकडे सोपवण्यात आली होती..

माधुरीला काही हे पटलेलं नव्हतं माधुरीला तर वाटल संयुनेच काहीतरी चुगली केली आहे..  पण सासूपुढे तिचा आवाज निघत नव्हता ..

तिघीही उद्यापासूनच हे वेळापत्रक FOLLOW करणार असतात....

 

 

       सगळी काम उरकून संयु रूममध्ये येते.

“सांग कधीं कळणार तुला भाव माझ्या मनातला .......?”

मोबाइलवर गाणं सुरु होत..

प्रवीण डोळे मिटून संयुच्या विचारात मग्न होता .. संयु आलेली पण त्याला कळलं नाही..

गाण्याचे बोल कानावर पडताच संयु थोडीशी लाजली आणि हसली.. एक स्मितहास्य करताच तिच्या गालावर एक नाजूक खळी पडली... जणू काय प्रवीणने हे गाणं मुद्दामच तिच्यावर डेडीकेट करण्यासाठी लावलाय असं तिला वाटू लागलं..

संयु बेडवर येऊन प्रवीण शेजारी थोडे अंतर ठेऊन बसते. तेव्हा तो भानावर येतो आणि गाणे बंद करतो..

“अहो, राहूद्या ना ! छान आहे कि गाणं!” संयु म्हणते..

प्रवीण – “त्यापेक्षा तूच एखाद गाणं म्हणून दाखव कि..!”

संयु अजूनच लाजते

संयु- "मला नाही येत गाणं म्हणता आणि माझा आवाज पण चांगला नाही.."

प्रवीण – “ठीक आहे जशी तुमची इच्छा.. तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी..?”

संयु- “हो मी माईंना उद्या माझ्या शिक्षणाबद्दल सगळं सांगून टाकते..”

प्रवीण- “हो पण तू नको मी सांगेन वेळ आल्यावर..!”

संयु- “पण आज ना उद्या तर सांगावेच लागनार ना ! मग उद्याच का नको?”

 

प्रवीण- “असा आततायीपणा करून चालणार नाही मी तिचा मूड बघून बोललं या विषयावर तिच्याशी..”

संयुला काही हे पटत नाही ती उद्याच माईंना सगळं खरं सांगायचं ठरवते..

 

 

 

 

संयुबद्दल सगळं कळल्यावर माई कशा रिऍक्ट होतील?  काय निर्णय घेतील ?

 

 

 

Circle Image

Pooja Dhiwar

pharmacist

i like to express my thoughts through writting...