Login

साथ दे तू मला -भाग 6

प्रगतीला कळेल का संयूचे सत्य………………..?

    घरी माईंना अचानक चक्कर येते आणि त्या जमिनीवर कोसळतात.. घरात संयु ,माधुरी आणि प्रगती असते. प्रगती जोरजोरात सगळ्यांना आवाज देऊन बोलवत असते..

संयु आणि माधुरी पटकन माईंजवळ येतात.. संयु त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडते तरी हि त्या शुद्धीवर येत नाहीत.. संयुला काय करावं सुचत नसत ,ती प्रवीणला फोन करते पण तोही रागात असल्यानं फोन उचलत  नसतो. प्रवीणची गाडी संयुला घराबाहेरच उभी दिसते.. ती पटकन बाईकची चावी घेते आणि प्रगतीला माईंना मागे धरून बसायला सांगते.. संयु एका किकमध्येच गाडी चालू करते..

प्रगतीला तर काहीच कळत नसते. माधुरी तर स्वतःलाच चिमटा काढून बघते.. आजूबाजूची लोक पण आश्चर्याने बघत असतात.. माधुरी   विकास आणि प्रवीणला फोन  करून माईंना दवाखान्यात नेल्याचे सांगते.

माई वेळेवर हॉस्पटिलमध्ये पोहचतात..

डॉक्टर – ‘’घाबरायचे कारण नाही.. BP  वाढल्याने चक्कर आली ..बरं झालं तुम्ही वेळेवर त्यांना घेऊन आलात...’’

   माई सकाळी गोळी घ्यायला विसरल्या असतात म्हणून त्यांचा BP वाढतो ...

प्रगती- ‘’वहिनी थँक यू! आज तू नसती तर काय झालं असत याचा विचार पण नाही करवत ग!’’

संयु-‘’ अहो, त्यात काय एवढं ! ‘’

प्रगती   प्रवीण आणि विकास ला फोन करून सांगते कि माई आता बऱ्या आहेत..

ते दोघे हि घरी येतात.. तासाभरात माई आणि प्रगती हि रिक्षाने परत येतात... आणि संयु बाईक घेऊन येते..  

प्रवीण तर संयु कडे बघतच राहतो…..

माई तर संयुवर प्रचंड चिडलेल्या असतात..

माई-‘’ सुनबाई तुला अक्कल आहे का नाही? काय समजते तू स्वतःला?’’

हि असली थेरं आमच्याकडं नाही खपून घेतली जाणार! ‘’

माधुरी- ‘’बघा ना माई ,कशी गडी माणसावानी एका दमात गाडी चालू केली आणि हे फरर्र्र्रर्र्रर्र्र .... निघून पण गेल्या..’’

प्रगती- अग वहिनी पण त्यावेळेला माईंना लवकर दवाखान्यात घेऊन जाण महत्वाचं होत आणि वहिनीने  बरोबरच केलं ...तुझ्यासारखी नुसती गम्मत बघत बसली नाही ती...

माधुरी नाक मुरडते...

  प्रवीण- ''माई तुला बरं वाटतंय ना ?''

माई- ''ते BP  का  DP  वाढून मेले असते तरी चाललं असत पण तुझ्या बायकोनं आज गावात जो काय

         तमाशा केलाय त्याच काय? आपल्या घरातल्या बायकांना असलं वागणं शोभत का!

          काय नाचक्की झाली माझी सगळीकडं !"

प्रगती- "अगं माय काय बोलती तू ,तुझं तुला तरी कळतंय का? आणि काय बिघडलं वहिनीने गाडी

          चालवली तर?"

  तेव्हड्यात शेजारच्या दोन-चार बायका माईंना बघायला म्हणून येतात..

शेजारीण -"काय दुर्गाबाई बरं वाटतंय ना आता?"

माई- "व्हय बरय कि!"

शेजारीण- "काय बाई तुमची सून, कसली सुसाट गाडी चालवली तिनं! मानलं पाहिजे तिला!"

    माईंचा पारा अजूनच वाढतो. थोड्या वेळाने शेजारच्या बाया पण निघून जातात..

संयु-'' माई काही चुकलं असेल तर माफ करा मला! पण त्यावेळी तुमचे हाल बघून तुमचा जीव

         वाचवण्याखेरीज  मला दुसरं काही सुचत नव्हतं !''

   माई काहीच न बोलता त्यांच्या खोलीत निघून जातात..

---------------------------------------------------------------------------------------------

प्रवीण- ''संयोगिता, आज तू वेळेत माईला दवाखान्यात नेलं त्यामुळं त्या सुखरूप घरी परत आल्या! तुझे हे

           उपकार.....''

संयु मधेच प्रवीणचे बोलणे थांबवते

संयु- ''अहो,काय बोलता तुम्ही? माई माझ्या कोणी लागत नाहीत का? असं बोलून तुम्ही मला परकं

        केलंत!

प्रवीण- "तस नाही ग पण काय बोलू ते मलाच कळाना  झालाय !"

संयु- "मग काहीच बोलू नका ! मी माईंना   काहीतरी खायला बनवून त्यांना खाऊ घालते!"

प्रवीण- "बरं ! मी पण येतो !"

संयु- "माई माझ्यावर चिडलेल्या आहेत ! मला त्यांची नाराजी दूर करायची आहे त्यामुळं मला एकटीला

       जाऊ द्या!"

     संयु जेवण घेऊन माईंच्या खोलीत जाते. आता संयुला माईंच्या जेवणाची विशेष काळजी घ्यावी लागणार होती.. डॉक्टरांनी जेवणात मिठाचे प्रमाण कमी करायला सांगितले होते.. आणि गोळी एकही दिवस चुकवू द्यायची नव्हती..

माई काहीशा नाराजीच्या सुरातच बोलतात...

"संयोगिता , ठेव तिथं ते ताट आणि जा माझ्या मुलाकड लक्ष दे ,त्याच्या जेवणाचं बघ...!'

         आज पहिल्यांदाच माई संयुला सुनबाई  न म्हणता संयोगिता म्हणतात त्यामुळं तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसतो...

पण तोहि  काही क्षणांकरता.....

माई-" काय सुनबाई, मीठ संपलय का घरातलं ?हे कसलं आळणी जेवण दिलयं! एक घास तरी घशाखाली

        उतरलं का?"

संयु- "माई डॉक्टरांनी तुम्हाला मीठ खाऊ नका सांगितलंय! म्हणून थोडे दिवस तरी असच जेवण खावं

        लागणार!"

माई- "आता तू ठरवणार का मी काय खायचं आणि काही नाय ते?"

         धाकली सुनबाई मीठ घेऊन लगोलग ये!

संयु - "माई अहो ऐका जरा !  तुम्हाला त्रास होईल!"

             संयु पटकन प्रवीणला बोलावून आणते ...माई फक्त प्रवीणच ऐकतात हे तिला पण एव्हाना माहित झालं होत...

प्रवीण- "माई थोडे दिवस दम काढ! आता BP  जास्त आहे आणि आता अजून वाढला तर दवाखान्यात ऍडमिट करायची वेळ येईल ! मी तुला शब्द देतो तुला बरं वाटायला लागलं कि मी स्वतः तुझ्या आवडीचं जेवण बनवून खाऊ घालील...!"

माईंना प्रवीणच म्हणणं पटत.. आणि त्या पथ्यपाणी पाळायला तयार होतात ....

माईंच्या रूममधून बाहेर आल्यावर

संयु- "तुम्हाला कस काय जमत माईंना कॉन्व्हिन्स करायला? म्हणजे माईंना पटवून द्यायला ?"

प्रवीण- "संयोगिता कस आहे ना, माणसाचं वय जस जसं वाढत जात तस तसं त्यांच्यात लपलेलं लहान मूल बाहेर यायला लागत ! त्यामुळं आपल्यालाही त्यांना समजून घ्यावं लागत अगदी लहान मुलासारखं !"

                  संयोगिता खूप इंप्रेस होते प्रवीणच्या बोलण्यावर.. जे नॉलेज  पुस्तकातून तिला मिळालं नव्हतं ते आज प्रवीण ने अनुभवातून तिला दिल होत...

संयु प्रवीणला जेवायला वाढते आणि प्रवीणच्याच विचारात मग्न होऊन जाते... तेव्हड्यात प्रगती येते.

प्रगती- “वहिनी, कुठं हरवलीस ? माझ्या दादाचं स्वप्न बघते का ?”

संयु भानावर येते ... प्रवीण आणि संयु दोघेही लाजतात....

प्रगती- “तुझा मोबाईल देते का माझा क्लास सुरु होईल आता!”

संयु- “हो घ्या! बेडरूम मध्ये आहे !”

प्रगती बेडरूम मध्ये जाते..

संयु च्या मोबाईल मध्ये तर UPSC  चा बराच डेटा आणि अँप्स प्रगतीला दिसतात.

प्रगतीला काहीच कळत नसतं, नक्की हा वहिनीचाच मोबाईल आहे ना ?

पण वहिनीला काय करायचं ह्या UPSC च?

प्रगतीला कळेल का संयूचे सत्य………………..?