साथ दे तू मला -भाग 5

प्रवीणचा निर्णय काय असेल ? तो संयुला माफ करेन का?

             विकास आणि माधुरीचा खोटेपणा मनात घेऊनच संयु आणि प्रवीण घरी येतात.घरातले सगळे दोघांची जेवणासाठी वाट बघत असतात.

माई- “लई उशीर केलात आज शेतावरन येयला ! चला सुनबाई पण वाढायला घ्या….भूक लागली असेल माझ्या लेकराला !”

सगळे जेवायला बसतात.

माधुरी-“ माई गाडीसाठी थोडेफार पैसे लागले तर द्या! कायेन आता ह्यांना कामावर जायला लई त्रास होयला   लागलाय बघा!

भाऊजींची गाडी नेली असती पण काय ना ती भाऊजींना सारखी लागती नाहीतर तीच नेली असती !”

माई-“ हा.. हा.. देते मी मला जमलं तेव्हड ! काळजी नसावी!”

माधुरी मनातल्या मनात खूप खुश होते.

संयु रागातच माधुरीकडे बघते. जेवण झाल्यावर घरातली सगळी कामे उरकून संयु व प्रवीण माधुरीच्या रूममध्ये जातात. तेथे विकास पण असतो.

प्रवीण – “आम्ही आता RTO  ऑफिस मधून आलो,तर …..

विकास- “काय ?”

प्रवीण- ‘’माझं ऐक आधी ! तिथं तर हि गाडीचं तुझ्या नावावर नाही असं म्हणत होते !’’

विकास- ‘’अरे दादा खोटं बोलतात ते!’’

प्रवीण ‘’-अरे त्यांनी मशीनवर चेक केलय!’’

संयु-‘’हो भाऊजी, त्यांनी कम्पुटरवर बघूनच सांगितलकी ती गाडी आता कोणी तरी शिंदेच्या नावावर आहे!’’

शिंदेंचं नाव ऐकताच विकास आणि माधुरी पुरते घाबरतात.  माधुरी तर मटकन खालीच बसते..

संयु-‘’शिंदेनी सांगितलं कि तुम्ही ती गाडी त्यांना विकली म्हणून !’’

प्रवीण  -‘’खरंय कारे हे?’’

विकास-‘’वहिनी,दादा,मला माफ करा! पण प्लिज माईंना यातलं काही सांगू नका! ‘’

असं म्हणून तो प्रवीणचे पाय धरतो. विकास खूप घाबरतो.

प्रवीण-‘’ अरे माईंना सांगायचं असत तर तुझ्याशी बोलायला इथं आलोच नसतो! तुला कळतंय का तू किती खोटं बोलला माईंशी ते! जर माईंना यातलं काहीबी कळलं तर माईंचा तिच्या लेकरांवरचा इश्वास उडलं!

तिने असले संस्कार केलेत का रे आपल्यावर?

तुला जराशी बी भीती नाय वाटली का रे कि हे सगळं माईंना कळलं तर तिची काय अवस्था होईल! अशी तुझी काय मजबुरी होती कि तुला असं काही करायची दुर्बुद्धी सुचली?’’

विकास पुरता खजील झाला होता. तो खाली मान करून उभा होता. त्याच्या तोंडातून एक शब्द  निघत नव्हता...

माधुरी- ‘’भाऊजी अहो चुकलं ह्यांचं माफ करा याना! पगारपाणी नाही तर घरखर्चाला पैसे कुठून आणायच? माईंना काय तोंड दाखवायचं ?

घरात खर्चायला पैसे द्यायचे कुठून म्हणून यांनी असं केलं!’’

विकास तर अवाकच होतो. माधुरी एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोलतीये असा विचार करतो...

प्रवीण- ‘’अरे विकास बाळा ,तू तुझ्या भावाला एकदा सांगून तर बघायचना ! बोलल्याने बरीच कोडी सुटतात आणि मी नाही बोललो असतो का तुला? तुझ्या अशा वागण्यानं माईंना किती त्रास होतोय!

 काय………. कळतंय का?’’

संयु- ‘’जाऊद्या, आता इथून पुढं जे काही असेल ते प्रश्न आपण एकत्र बसून सोडवू!’’

विकास-‘’ बरोबर आहे वाहिनी तुमचं!’’

एवढं बोलून संयु आणि विकास स्वतःच्या रूममध्ये निघून जातात. ते गेल्यावर माधुरी

माधुरी- ‘’अहो यांचं डोकं तर एक्सप्रेस सारखं फास्ट चालतंय कि! बर झालं मी त्यांना खोटं सांगितलं नाहीतर आज आपलं काही खर नव्हतं ! चांगलच वाचलो आज! आणि माईना आपण जीव तोडून जरी सांगितलं असत तरी त्यांना भाऊजींचच खर वाटलं असत...

नाहीतरी भाऊजींवरच त्यांचा जास्त जीव आहे..’’

विकास- ‘’अग ह्या वहिनींनी डोकं लावल असणार नाहीतर दादाला काय कळतंय यातलं!’’

माधुरी- ‘’अहो नक्कीच काहीतरी झोल आहे! RTO ची आयडिया  ह्यांच्या डोक्यात कशी आली ? मी नक्कीच शोधू काढणार!’’

----------------------------------------------------------------------------------------------------

संयु- ‘’आपण यातलं काहीच माईंना सांगायला नको! थोड्या दिवसांनी त्या पण विसरून जातील... शेवटी आपलं कुटुंब एकत्र राहणं पण तर महत्वाचं आहे. या सगळ्यामुळं माईंना खूप त्रास होईल आणि त्यांचा विकास भाऊजींवरचा विश्वास पण उडून जाईन!

त्यामुळं हा विषय इथंच सोडून देऊ!’’

प्रवीण- ‘’बरं ते जाऊदे! तुला उद्याची स्वयंपाकाची तयारी नाही का करायची?’’

    प्रवीण रोज संयुला एक रेसिपी सांगतो आणि ती तो शेतात गेला कि वहीत लिहून ठेवते आणि तशाच पद्धतीत स्वयंपाक करते आता तिला बराच स्वयंपाक येऊ लागला होता..

संयु –‘’मला तुम्हाला एक महत्वाची गोस्ट सांगायची आहे!’’

प्रवीण –‘’आज  नको ,नंतर सांग!’’

संयु- ‘’अहो पण...!’’

प्रवीण-‘’ नको उद्या सांग! सकाळी लवकर उठायच आहे शेतात लवकर जायचं उद्या! ‘’

शेजारच्यांची मोजणी हाय ...’’

संयु उद्या कोणत्याही परिस्थिती प्रवीणला तिच्या शिक्षणाबद्दल खर खर सांगणार असते.. तिला असं खोटं मनात ठेऊन खूप गिल्टी वाटत असत..

--------------------------------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी-

प्रवीण शेताची कागदपत्र शोधात असतो पण त्याला कपाटात वेगळीच पिशवी सापडते ज्यात  संयुची शाळेची मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट्स असतात. ते सगळे बघून प्रवीणला मोठा धक्काच बसतो ….

हे असं होऊच शकत नाही तो मनाशीच बोलतो….

संयोगिता तर फक्त पाचवीचं शिकली  पण कागद काय खोटं बोलतात का?

तेव्हड्यात संयु तिथे येते.

ती त्याला खर सांगायला आलेली असते पण त्या आधीच प्रवीणला सगळं कळलं असत...

संयु- ‘’अहो, मी तुम्हाला हेच सांगणार होते. पण त्याआधीच तुम्हाला कळलं सगळं!’’

प्रवीण – ‘’तुम्ही मला इतक्या दिवसात का नाही सांगितलं?’’

इतके दिवस तुम्ही खोटं वागलात माझ्याशी!’’

संयु- ‘’अहो, मी तुम्हाला खूप वेळा सांगायचं प्रयत्न केला पण...’’

प्रवीण- ‘’अजून काय काय लपवलंय माझ्यापासून?’’

संयु-‘’हेच कि मी ग्रॅज्युएट आहे!’’

प्रवीण- ‘’मग तुम्ही माझ्यासारख्या अडाणी कमी शिकलेल्या माणसाशी कस काय लग्न केलं?’’

संयु-‘’त्यावेळची परिस्थितीच तशी होती... माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता, पण...’’

 प्रवीण-‘’लग्न म्हणजे तुम्हाला काय पोरखेळ वाटलं का?’’

एवढं बोलून संयूचे काहीच न ऐकताच प्रवीण तिथून शेतात निघून जातो, त्या प्रसंगाच्या नादात तो गाडी पण घेऊन जात नाही तसाच चालत जातो..

प्रवीण शेतात पोहचतो. त्याचे डोळे पाणावलेले असतात.. त्याला खूप वाईट वाटत असते कि संयुने काही पर्याय नसल्याने जबरदस्तीच आपल्याशी संसार थाटलंय. ती एवढी शिकलेली! आपण तिच्यापुढं काहीच नाही.. आपण असं अडाणी असल्यानं ती आपल्याला उद्या सोडून गेली तर? असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात येतात..

प्रवीणचा निर्णय काय असेल ? तो संयुला माफ करेन का?

🎭 Series Post

View all