Oct 22, 2020
स्पर्धा

साथ दे तू मला -भाग २

Read Later
साथ दे तू मला -भाग २

      प्रवीण शेतकरी मुलगा .. अगदी लहानपणापासूनच त्याला हि आवड होती. विहिरीवर पोहायला जाणे, गुरांच्या मागे धावत सुटणे,नांगर हातात घेणे,ट्रॅक्टर चालवणे हे त्याचे छंद ..पण शाळा  म्हणाल कि लांब पाळायचा! अभ्यासाचं आणि  त्याच काही कधी जमलंच नाही म्हणून तर तो फक्त सहावी पर्यंतच शिकला. शिकला कसला त्याला बळच वरच्या वर्गात ढकलला.. घरात आईला सगळी मदत तो करायचा ..आईचे कष्ट त्याला पाहवत नसायचे. घरची परिस्थिती तर तशी खूप चांगली पण आईला घरातलं आणि शेतातील पण बघावं लागायचं.हि तीन भावंडं.. प्रवीण थोरला, नंतर विकास आणि लहान बहीण प्रगती...विकास चांगला शिकला होता आणि नोकरीला होता,त्याच गेल्याच वर्षी लग्न झालं होत..आणि प्रगती अजून कॉलेजला होती..

        प्रवीण कमी शिकलेला आणि त्यात कसली नोकरी पण नाही, त्यामुळं त्याला स्थळ तर बरीच यायची पण कुठेच योग जुळून येत नव्हता.. कधी मुलीला कमी शिकलेला नवरा नको असायचा तर कधी दुर्गाबाईंना म्हणजेच माईना मुलगी पसंत पडत नसायची.  प्रवीणची आई दुर्गाबाई त्यांना सगळे माई म्हणायचे. माई मोठी कडक शिस्तीची.. तिच्या परवानगीशिवाय घरातलं पान पण हलू शकत नव्हतं! प्रवीणचे बाबा गेल्यानंतर आईनेच तर तिन्ही मुलांना लहानच मोठं केलं कोणाचीही कसलीच मदत न घेता .. प्रवीण पण थोरला असल्यानं जबाबदारीतून कधी मागे सरला नाही.. शेतातली सगळी काम तो आनंदाने करायचा....भावाचे अन बहिणीचे शिक्षण,लग्न  घरखर्च सगळंच तो बघत होता..

         माईंना आता प्रवीणच्या लग्नाचे वेध लागले होते. नातेवाईकांमध्ये चर्चा होऊ लागली. आजूबाजूचे गावातले लोक चर्चा करू लागले कि का करत नाहीत याच लग्न.. हा कमी शिकलेला, याला मुलगी भेटणार तरी कशी ?यंदा कर्तव्य आहे कि नाही?

माईंना या सर्वांची तोंड बंद करायची होती पण प्रवीणचे लग्न कुठे जमत नसल्याने त्या खूप चिडचिड करत होत्या.. त्यांना त्यात ब्लडप्रेशर चा त्रास सुरु झाला..माई दादांच्या फोटोपुढे उभी राहून रडत होती, प्रवीण तर एवढा भोळा! कस होणार याच? याला चांगली मुलगी मिळालीच पाहिजे. तिने ताबड्तोब निर्णय घेतला जोशी गुरुजींना बोलावून घेतले आणि प्रवीणला मुलगी बघण्यास सांगितले....

       इकडे संयुच्या घरी आनंदाची बातमी मिळाली,तिच्या दादाचे प्रोमोशन होऊन त्याची विदेशात ट्रान्सफर झाली होती आणि शिल्पा वाहिनीनेही आनंदाची बातमी दिली होती घरी बाळ येणार होते .. घरात एकदम उत्साहाचे वातावरण झाले होते पण प्रॉब्लेम असा होता कि कंपनीने सध्या विदेशात त्याच्या एकट्याचीच सोय केली होती आणि शिल्पाला इथेच राहावं लागणार होत.. शिल्पाला रडू आलं.. एकीकडे सचिनचं स्वप्न पूर्ण होत होत तर दुसरीकडे शिल्पाला नेऊ न शकण्याचं दुःख होत.. आई वडिलांनी हि गोष्ट हेरली आणि संयुला विचारले," हे घर विकून आपण शिल्पाची जाण्याची सोय केली तर तुला चालेल का?" संयुने निस्वार्थीपणे लगेच होकार दिला .. पण शिल्पाला आणि सचिनला हे मान्य नव्हते.. खूप समजून सांगितल्यावर घरच्यांच्या हट्टापुढे ते दोघे काही करू शकले नाहित आणि सचिन आणि शिल्पा अमेरिकेला गेले..

      संयूचा अभ्यास नियमित सुरूच होता. त्यातचच पूर्ण देशात करोना संकट आले.. लोक खूप घाबरून गेले.. त्यातच संयुच्या आई बाबाना करोना ची लागण झाली. त्या दोघांची तब्येत गंभीर झाली होती. डॉक्टरांनी त्यांना icu मध्ये ठेवले होते .. लोकडाऊनमुळे सचिनला हि येणे शक्य नव्हते.. परिस्थिती हाताबाहेर गेली होती.. डॉक्टरांनी हात टेकले होते. हाताशी असलेला सगळा पैसा संपला होता, संयु एकटीच होती.. अशातच तिच्या बाबांचे जवळचे मित्र काळेकाका मदतीला धावून आले.. पण ते दोघे वाचले नाहीत.. त्यांनी आणि काकूंनी संयुला धीर दिला ..तिला घरी घेऊन गेले.. एक महिना होऊन गेला सचिन व शिल्पा फोनवर संयुची चौकशी करत होते. संयु अजूनही दुःखातून सावरली नव्हती. काळे काकांना हि आता जबाबदारीतून मुक्त होयचे होते.. त्यांनी सचिनला संयुच्या लग्नाबद्दल विचारले.. तर तो येऊ शकत नसल्याने तुम्हीच सर्व बघा बोला..काळेकाकांनी लोकडाऊनमध्येच संयूचे लग्न लावून द्याचंच असं ठरवलं... पण संयु लग्नासाठी तयार नव्हती.. पण काकांच्या घरी तरी किती दिवस राहणार होती ती! आणि दादा पण परत कधी येणार हे पण निश्चित माहित नव्हते.. सगळं होत्याच नव्हतं झालं होत.. तिच्यापुढे लग्न करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता...शेवटी संयु लग्नासाठी तयार झाली!  काळेकाकांनी जोशी गुरुजींना बोलावून घेतले आणि संयूसाठी मुलगा बघायला सांगितलं.. त्यावर गुरुजींनी त्यांना प्रवीणचे स्थळ सुचवले..पण प्रवीण कमी शिकलेला आणि शेतीचा व्यवसाय करत असल्याने संयु होकार देईल कि नाही याची त्यांना शंका होती.  पण संयुने होकार दिला.. पण तिला घरातलं आणि शेतातील कुठलंच काम येत नव्हतं.. पण प्रवीणला मात्र घरातली सगळी कामे परफेक्ट जमत होती..

      प्रवीणचे शेतातले काम सुरूच होते..त्याला चांगले उत्पन्न मिळत होते..संयूचे स्थळ गुरुजींनी दुर्गाबाईंना सुचवले आणि माई लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांना घेऊन या बोलल्या..काळेकाकांना घेऊन गुरुजी प्रवीणच्या वाड्यात आले.. संयु तशी दिसायला सुंदर होती.. तिचा फोटो बघताच माई म्हणाल्या," मुलगी तर अगदी नक्षत्रासारखी आहे, पण तिचे गुण पण तर बघितले पाहिजेत ना! मी एक सांगते मला घर सांभाळणारी मुलगी पाहिजे सून म्हणून , जास्त शिकलेली मुलगी काय करू मी? हि किती बुक शिकली आहे? घरातली काम जमतात का पण हिला?"

आता जर माईंना कळलं कि हिला घरातलं काहीच येत नाही तर हे स्थळ काय जमणार नाही हे काळेकाकांना माहित होत. काकू लगेच बोली" जास्त काही नाही फक्त पाचवी शिकली ती ! ते पण बळबळच पण घरातलं  सगळं जमत तिला!"

माई-"मग ठीक आहे पण मला मुलगी प्रत्यक्षात बघितल्याशिवाय काय निर्णय द्यायचा नाही..आम्ही उद्या येतो मुलगी बघायला "

काका काकू वाड्याच्या बाहेर आले, त्यानं मुलगा पसंत होता. त्यांनी सचिनला फोन केला आणि सगळं सांगितलं सचिनला.. आपल्या बहिणीसाठी कमी शिकलेला मुलगा नको होता पण त्याला टेन्शन जास्त या गोष्टीच होत कि हिचा कसा निभाव लागणार या घरात?

पण संयु लग्नाला तरीपण तयार झाली, काकूंकडून ती स्वयंपाकातील थोडंफार शिकून घ्यायला लागली !

 चहा पोह्याचा कार्क्रमाची सर्व तयारी झाली.. दुर्गाबाई काळेकाकांच्या घरी आल्या..

काका-"नमस्कार या बसा"

माई संयुला बोलवायला सांगतात..संयु चहा घेऊन येते.माई खुश होतात संयुला बघून..

 माई-"बस पोरी , नाव काय तुझं ?"

संयु- "संयोगिता !"

माई- तुझ्या आई बाबांबद्दल कळलं ,खूप वाईट वाटलं ,आज जर ते इथं असते तर परिस्थिती काही वेगळीच असती!"

संयुला खूप रडू आलं.. माईंनी तिला जवळ घेतलं तिचे डोळे पुसले ,तिला धीर दिला आणि विषय बदलला ..

माई-"तुला काय काय येत?"

काळे काकू-"अहो काय येत नाही ते विचारा! सर्वगुणसंपन्न आहे आमची संयोगिता! घर बघा किती नीटनेटकं ठेवलं तिने..तुमचा वडिलोपार्जित वाडा पण बघा चमकू लागेल आमच्या संयूचा हात लागला कि!"

संयु काहीच बोलत नाही ..

काळे काकू विचारतात " मुलगा का नाही आला ?"

माई- माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मी ज्या मुलीशी सांगेल तिच्याशी डोळे झाकून लग्न करणार आहे तो!"

दुर्गाबाईंना संयु पसंत पडते.. गुरुजी म्हणतात चार दिवसांनी लग्नाचा चांगला मुहूर्त आहे.. नंतर सहा महिने एकही मुहूर्त नाही. चार दिवसांनी लग्न करायचे ठरले. आता वेळ खूप कमी राहीला होता .. सगळी तयारी करायची होती.. चार दिवसांनी लग्नाचा दिवस उजाडतो.. प्रवीण आणि संयोगिता चे लग्न निर्विघ्न पार पडते...

Circle Image

Pooja Dhiwar

pharmacist

i like to express my thoughts through writting...