साथ दे तू मला 1

काय होईल पुढे??? कोण असेल संयोगीताच्या नशिबात??

संयुच्या शाळेचा पहिलाच दिवस होता खूप खुश होती ती आणि थोडी भीती ही होती.आता गावातील छोट्या शाळेतुन मोठ्या  शााळेत ऍडमिशन मिळाले होते, वडील सरकारी नोकरीला होते . घरी आई आणि एक मोठा भाऊ. भाऊ पण अभ्यासात खूप हुशार त्याला मोठे होऊन इंजिनिअर बनायचे होते. संयु पण तशी अभ्यासात बरी होती पण तिला अभ्यासव्यतिरिक्त खेळणे, पळणे, पोहणे, नवीन गोष्टी शिकण्यात खुप इंटरेस्ट होता. संयु एकदा वडिलांसोबत सामान आणण्यासाठी दुकानात गेली तर दुधाच्या पिशवीचे एक्सपायरी मुदत संपली असताना ही विकण्यास ठेवली होती,संयुने ते पाहिले ती तशीच दुकानदाराकडे गेली आणि विचारणा केली तर तो तिलाच ओरडू लागला,"घ्यायचे तर घ्या नाहीतर निघा इथून",.तिने तशीच पिशवी त्याच्या तोंडावर फेकली आणि तिथून पळाली. वडिलांनी सर्व प्रकार बघितला ते तिच्या मागे गेले. संयु खूप रडत होती, या सगळ्या प्रकारात तिची काहीच चूक नव्हती.  हे वडीलांना पण कळत होते, ते संयुजवळ गेले तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले आणि समजावू लागले, " बाळा असं चिडून राग व्यक्त करून काय होणार आहे? त्यासाठी तुला त्या लायक व्हावे लागणार आहे, तुला ती ताकद मिळवावी लागेल म्हणजे तूला अशा लोकांना सुधारवता येईल, त्यासाठी तुला एक उच्च पदावर जावे लागेल, IAS, IPS व्हावे लागेल तरच तूला बदल घडवता येईल..खूप अभ्यास कर बाळा.. त्यावर संयु म्हणाली ठीक आहे बाबा मी खूप अभ्यास करेन आणि एक खरी पोलीस ऑफिसर होणार.... चला चला पटकन घरी जाऊन आईला सांगायचंय मला..

        अशीच वर्षांमागे वर्ष गेले, अन संयुच्या IPS ऑफिसर बनण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल असे वाटू लागले.  संयु आता 21 वर्षाची झाली होती, घरातील एकंदरीत वातावरण अभ्यासाचे होते. संयुला घरातील काही काम येत नव्हते आणि विशेष आवडही नव्हती.. 

         संयुचा आज ग्रॅज्युएशनचा रिझल्ट होता आणि अपेक्षेप्रमाणे तिला distinction मिळाले होते.  भावाचे लग्न नुकतेच झाले होते आणि आता तिचाच नंबर होता लग्नासाठी.  संयुच्या भावाच्या ओळखीतून तिला एक स्थळ चालून आले. भाऊ तिच्यासाठी गुड न्युज घेऊन आला की "एक प्रतिष्ठित घरचे स्थळ संयुसाठी  चालून आले आहे.मुलगा खूप शिकलेला आहे. मुलाचा  मोठा व्यवसाय आहे आणि तो एकटाच सांभाळतोय, हा बघ फोटो!"

संयु खुप चिडली" तुम्हाला मी सांगितलं ना मला IPS ऑफिसर बनायचं, काय करु मी फोटो बघून! मला लग्नच नाही करायचं!  मला आता फक्त IPS exam वर फोकस करायचं आहे त्यावर सचिन तिचा भाऊ चिडला" काय करणार IPS होऊन? नवरा कमवेल तू महाराणीसारखी एशोआरामाचे जीवन जगायचे सोडून काय सुरू केलस हे! आणि जरी ही EXAM पास झालीस तरी training किती अवघड असते, कसं करणार तू हे सगळं manage??  पण संयुने सरळ सांगितले की "मला आत्ता लग्न करून कोणाच्या घरची शोभेची बाहुली बनायचे नाही! दादा तुला माहीत आहे IPS बनायचे स्वप्न मी काय आता बघितले नाही!

त्यावर सचिन ,-"काय घेऊन बसली IPS ? तू जर हे लग्न केलस तर मला विदेशात नोकरी मिळून मी सेटल होऊन जाईन.."

त्यावर संयु," तू तुझ्या विदेशातील जॉब स्वतःच्या qualification वर मिळावं, मी माझा निर्णय बदलणार नाही!त्यावर सचिन- "आई बाबा तुम्हाला काय म्हणायचे आहे यावर?"
बाबा-,"मी सहमत आहे संयुशी!"
आई-,"मी पण ... मला गर्व आहे माझ्या मुलीवर!  इतक्या कमी वयात तिला किती समज आहे!" 
सचिन- " छान सगळे एक झालेत! पण IPS ऑफिसर साठी मुलगा कोठून आणणार??"
बाबा-"एकदा तिला IPS होउदे मग बघा कसा लाखात एक मुलगा शोधून आणतो माझ्या संयोगीतासाठी!" खूप शिकलेला, खूप हुशार, लोक त्याला भेटण्यासाठी रांगा लावतील असा मुलगा शोधून आणेल"
शिल्पा वहिनी- हो नक्कीच तो एखादा IAS किंवा मोठा न्यायाधीश असेंन...

🎭 Series Post

View all