Sep 25, 2020
प्रेम

साथ

Read Later
साथ

 

भाग 1

 राधे राधे .....

ओळखीचा आवाज ऐकून राधानी मागे पाहिलं स्वाती तिला हाक मारत होती अगदी कॉलेज style नी, राधा ओळखल का?
"काय बोलतीयेस स्वाती, माझ्या बेस्ट फ्रेंड ला मी काशी विसरेन?"

किती वर्षांनी भेटतोय , राधे आहेस कुठे ?
अग मी इथेच असते पुण्यातच , आणि स्वाती तू?

मी ऑस्ट्रेलिया ला असते, तुला अक्षय माहितीये ना माझा चुलत भाऊ? त्याच आत्ताच लग्न झाल. म्हणून आलीये.

बापरे किती वर्ष गेली ग स्वाती, सगळे आपण मोठे झालो आपल्या पेक्षा लहानांची पण लग्न झाली. 

कसे आहेत सगळे ग , मला सगळ्यांची खूप आठवण येते .

राधा तू असा करतेस का? परवा ये ना घरी. मी कोणालाच काही सांगत नाही surprise. सगळे इतके खुश होतील ना तुला पाहून की बस्स.
मला फोन  नंबर दे .

चल बाय....भेटू ग म्हणून स्वाती जाते.

जुनी मैत्रीण भेटल्याचा आनंद राधाला सुखावून जातो.

घरची बेल वाजवली.
 काय ग राधा किती उशीर , पीहू कधीची वाट पाहितीये तुझी.
आहो आई आज स्वाती भेटली माँल मध्ये माझी खूप जून मैत्रीण मी नेहमी सांगत असायचे बघा.

तिच्या घरी मी पण कायम एक घरचीच सदस्य असल्यासारखी वागायचे. परक काही वाटायचंच नाही. मोठी आई म्हणजे तिची मोठी काकू तर खुप मायेने वागवायच्या. तीच्याशी बोलण्यात वेळ कसा गेला कळलच नाही सॉरी आई.
असू दे ग..काही हरकत नाही ...

राधाच्या सासूबाई आणि राधाच्या नात अगदी माय लेकी प्रमाणेच. कधी काही लपवून ठेवलं नाही. विक्रांत गेल्यापासून राधाच् त्यांचा आधार होती आणि पीहू त्यांचं जग.

तेव्हढ्यात पिहू पळत पळत येउन राधाला बिलगली आणि त्या दोघींचं संभाषण अर्धवटच राहील.
मम्मा मी सांगितलेल सगळं आणल्यास व्वा.....किती  गोड गोड आहे मम्मा तू...

दिवस कुठे संपला कळलच नाही. बेड वर पडल्या पडल्या राधा विचार करत होती .

मनातल्या मनात विक्रांत ला विचारत होती...का असा सोडून गेलास रे ...आई आणि बाबा ची भूमिका बजावताना कसरत होते रे माझी. तू नाहीस तर माझ जीवन नकोस वाटत रे..फक्त पिहू कडे बघून मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतेय. विचार करत करत च राधाच्या डोळा  लागला .

क्रमशः


-©️®️ सौ गौरी जोशी

 

Circle Image

Mrs Gauri Joshi

Homemaker

I am homemaker, mother, and pharmacist by education but not working now a days. Reading is my passion.