सासूला मनातले कळते

Manatle Kalte
रेमश चे लग्न झाले आणि स्वाती घरात आली, मोठं घर तर पाहिले पण त्यात इतके मोठे घर ज्यात 4 नणंद आणि एक दिर तो ही लहान, त्याचे शिक्षण चालू होते ... काही वर्षांनी त्याला नौकरी मिळेल ती गोष्ट वेगळी ...पण आता तर तो मोठ्या भावाच्या कमाईवर शिकत होता....त्यात त्या चार नणंदे च ही करायचे असत... ते कोण करणार तर मोठा भाऊ..

स्वातीला तसे निभावून नेने काही नवीन नव्हते..... पण तरी तिचा स्वतःचा संसार... त्याला लागणारा खर्च.... पुढे तिची ही मुले मोठी होत होती.... शहरातला मोठा खर्च... त्यात भाड्याचे घर..... घरातल्यांचे आजारपण ,कुठे कुठे किती किती खर्च करायचा त्या एकट्या माणसाने.....

त्यात जर माणसाने सुट्टी घर भरले की सगळा खर्च ह्या मोठ्या जोडप्याने करायचा.... हा खर्च भागत  नाही म्हणून स्वातीने ही छोटी मोठी नौकरी धरली.....

लग्नाला आता काहीच वर्षे झाली ,दिराचे शिक्षण पूर्ण ही झाले पण बाबा अजून काय आईचा पदर सोडायला तयार नव्हता.... आई म्हणत लागेल हो नौकरी त्याला ही...दिवस थोडीचं बसून रहातात....

एकडे दिवाळी ,असो वा नणंदेच्या घरचे काही कार्यक्रम यांना नेहमीच खर्च असत....आला तो पगार तर जाईच हो पण स्वातीचा पगार ही पुरत नसत ह्या खर्चात...

त्यांना आता जास्त tension येई की इतके कमवून ही आपली मात्र काही हौस मौज तर नाहीच पण आपले स्वतःचे ही खर्च भागत नाहीत... आता त्याने ठरवले दिराला नौकरी करण्याशिवाय पर्याय नाही....त्याचा खर्च मी उचलणार नाही....

आता स्वातीला सांगणार की निदान तुझा पैसा तरी आपण saving मध्ये लावू ,आणि माझा काही पैसा पोस्टात टाकू, आणि बाकी खर्च नियंत्रणात आणू.... सगळ्या नणंदाला ही आता मिळून करत जाऊ....

हर त्याने त्याच्या आईच्या कानावर घातले.... आई म्हणाली 4 नणंद आहेत आणि त्यांचे करणे ,हे तुझे कर्तव्य आहे... फार काही तू करत नाहीस... स्वाती तिथेच त्यांचे बोलणे ऐकत होती.... त्या तिला सांगत होत्या, तुला माझ्या मुलींचे करणे हे जड जायला लागू नाही...

स्वातीला आता त्यांचा राग आला होता पण तिने तो गिळला, नको वाद म्हणून शांत राहिली...

काही दिवस गेले.... त्यांची मोठी नणंद घरी आली ....तिच्या मोठ्या मुलीला चांगले स्थळ आले आहे पण तिला तीन नंदा आहेत हे म्हणत होती आणि तिच्या नवऱ्याला त्यांचे सगळे खर्च उचलावे लागतात, मग विचार करत आहोत की तिला इथे द्यावं की नाही ते....

आता स्वातीने ताईसाठी छान चहा नाष्ता केला होता,त्यांच्या गप्पा ती ऐकत होती,बघत होती की सासू तिला काय सल्ला देत आहेत ते.....

सासू लगेच आपल्या मुलीला सांगत होती की, बाई कश्याला असे घर बघतेस जिथे इतक्या नंदा आहे, जिथे तिलाच ह्या सगळ्यांचे करण्यात आयुष्य जाईल, त्या मोठ्या माणसाचे मोठेपण करून किती हाल होतात हे त्याचेच त्याला माहित आहे..... त्याचा ही संसार असतो....
त्याचे ही काही स्वप्न असतात..... त्याला त्या स्वप्नांना ही मुरड घालावी लागते..... आता तुझ्या दादाच बघ तो मोठा आहे म्हणून सगळे त्याच्या माथी म्हटले जाते.... तुम्ही 4 जणी तुमचे खर्च....माझा खर्च.....प्रवीण नौकरी करत नाही त्याचा खर्च ...आता तर स्वाती ही नौकरी करते ...ही ही मर मर राबते तेव्हा कुठे चार पैसे पदरात पडतात... ते ही कधी कधी जपून न ठेवता ती आपल्या घराला देते...

खूप वाईट वाटते ग त्याची आणि स्वातीची धडपड बघून, पण तरी मी तिला म्हणून गेले काय फरक नाही पडत जर तुम्ही जरा घरासाठी काही केले तर...पण तुला सांगते त्या दोघांची काही तक्रार नाही....त्यात त्यांना कधी ही एकत्र कुठे फिरायला गेले हे पहिले नाही..... त्यांच्या मुलांचे वाढदिवस मोठे साजरे केले हे मी पाहिले नाही....

खरंच इतके लोक घरात असतील आणि खर्च सगळा दोन हातांनी करायचा हे मनाला कधीच पटलं नाही...त्यात तिला म्हणत असते हे तुझेच कर्तव्य आहे... आणि ती ही निमूठ ऐकून घेते....

हो आता मी प्रवीण ला ह्या महिन्याचा कालावधी दिला आहे..... ह्या नंतर त्याने ही तितकाच घराचा भार उचलायचा आहे जितका दादा उचलत आहे .. आयते मिळणार नाही.... निदान तुझा आणि माझा तरी खर्च तूच करायचा आहे.... नाही जमलं तर घर सोडायचे ..


हो पण तुझ्या पोरी मात्र स्वाती इतके जर मोठेपण करू शकणार नाही..... पण जर तू तिला सांगितले की हे तुझे कर्तव्ये आहे.... आणि हे तुला चुकणार नाही तर 3 काय कितीही नाते असो ती कमी पडणार नाही..


स्वातीला आता कुठे पटले होते की आईला माझ्या मनातले ही कळते.... मी त्यांना चुकीचे समजत होते.... निदान त्यांनी आमच्या कष्टा ची कदर केली....आमचा होणारा त्रास  ,त्यांच्या पासून लपून नाही पण त्या ही काही करू शकत नाही... आणि नाते आहेत पण फक्त पैस्या अभावी किंवा त्रास होतो म्हणून तोडून टाकणे ही कितपत योग्य आहे हे स्वातीला समजत होते..... हे ही दिवस निघून जातील  ....कोणाला तरी जण आहे ह्यातच सुख आहे.


त्यात सासूबाईंनी स्तुती केली असती तर वाटले असते की त्यात खोटं बोलत आहेत ,पण त्यांनी आज ह्या जाणिवेने त्यांच्या लहान मुलाला ही ताकीद दिली होती की तुला आयते मिळणार नाही, नौकरी नाही तर घरात ही रहायचे नाही.... आई ने सगळ्या बाजू लक्षात घेऊन चौफेर विचार करावा.... फक्त मुली लाडक्या आहेत...मुलगा लाडका आहे म्हणून उगाच लाडाचे कोड करू नये....