Aug 16, 2022
कथामालिका

सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग - ८

Read Later
सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग - ८
सासुची कमाल सुनेची धम्माल.. भाग - ८


आई!.... आता रिक्षात जाऊ ना?...


हो ग! ब्लॅकबेल्ट ! ...या पिशव्या तर मलाच घ्याव्या लागतील..... तुला तर सांगुही शकत नाही!...


आई!.... एक! एक!!.....मीराने सेल्फी साठी मोबाईल पुढे धरला....

...ब्लॅक बेल्ट ! पण माझ्या दोन्ही हातात पिशव्या आहेत ना?....


आई!... म्हणूनच तर सेल्फी काढते.... वाटायला पाहीजे नां!... तुम्ही माझ्यासाठी किती त्रास घेताय ते!...नंतर. माझ्या आईलाही सेंट करते.....


अस!.... मग ठीक आहे!... शांता जरा आनंदात.....


मीरा ने विक्टरी ची दोन बोट दाखवत आणी काहीसा वेडा वाकडा चेहरा करून दोन चार सेल्फी घेतले......


शांताला देखिल विक्टरीच चिन्ह दाखवत सेल्फी काढायचा होता.... पण तिच्या दोन्ही हातात पिशव्या असल्याने ते शक्य झाल नाही...... त्यामुळे शांताने वेड्या वाकड्या चेहऱ्यावच भागवले....
आई!..... आज .पितृ अमावस्या नां?...


हो!.... का..ग! ब्लॅकबेल्ट ?


काही नाही तुम्ही जर वरती गेला असता... तर आज मी तुम्हांला चांगले चांगले... चमचमीत... गोडधोड ..खायला ताटात ठेवले असते... मग तुम्ही कावळी होऊन आला असता आणि ते सगळे खाल्ल असत....मीरा गंमतीने.....


ब्लॅकबेल्ट !.....तूझ्या जिभेला काही हाड?..... अग माझी वर जायची वाट पाहुन आहेस होय?...... मला जीवंतपणी साधे कांदेपोहे कधी करून दिले नाहीस!...... आणि मी मेल्यावर ..चमचमीत व गोडधोड दिल असते म्हणे!..... शांता जरा रागात...आणि ब्लॅकब्लेड ! ...तुला कस माहीर्ती की, मी कावळी बनेन? ..


आई!.... तुम्ही लेडीज आहात नां!.... मग कावळा कस बननार? ...तुम्हांला कावळीच बनाव लागेल!...ब्लॅकबेल्ट !....ही लोकं या दिवशी... आपल्या आई वडिलांना इतके वेगवेगळे पदार्थ बनवुन ताटात ठेवतात.... ते पदार्थ त्यांनी आई वडील जीवंत असताना दिले असतील का?.... शांता काहीशी भाऊक होत....


आई!.... खरं आहे.... मेल्यावर काय होत असेल ते नक्की कुणाला माहिती नाही!.... पण जीवंतपणी आई वडिलांना मुलांनी चांगले खायला दिले पाहीजे!... मीराही भाऊक.....


आई!...... पण तो घास खायला कावळेच का येत असतील?... बाकी पक्षी का नाही?......ब्लॅकबेल्ट !.....तेथे कावळे येणार नाही तर काय तूझ्या सारख्या घारी येतील?..... अग!.... पूर्वजांनी तयार केलेली प्रथा आहे ती!... त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल!..


आई!... पण नक्की काय कारण असेल?...


ब्लॅकबेल्ट ! मी काय पूर्वज आहे ?... मला विचारतेस! तु वर गेलीस की समजेल तुला !.... शांता जरा चिडवत......आई!... आज पितृअमावस्या आहे ना!.... मग चला आपण आज.... चमचमीत.... गोडधोड...... सगळ - सगळं बनवू.... मी तुम्हांला मदत करते...... मस्तपैकी सगळं बनवू....आणि..आपणच खाऊ! ..यांवर दोघींही एकमेकांच्या हातावर टाळी देत.... जोर जोरात हसल्या...


रात्री जेवणाच्या टेबलवर बरेचसे पदार्थ पाहुन समीर व बाबांना आश्चर्य वाटले....मीरा!.... आज काय एकदम शाही जेवण!.... कोई खास बात?.....


काही नाही!.... आज पितृअमावस्या आहे ना!.... मग.... आई आणि मी..... आम्ही.. आजपासून नवीन प्रथा चालु केली आहे!.....


नवीन प्रथा?... समीरने आश्चर्याने विचारले....


समीर!..... अरे!... मेल्यावर कोणी... काय.. पाहिलय?..... त्यामुळे आजच्या दिवशी जिवंतपणी हे सगळं खायच...आणि अजुन एक महत्वाचे म्हणजे आजचा बराचसा स्वयंपाक....हा . ब्लॅकबेल्टने केला आहे ....आई वडिलांना जीवंतपणी चांगले खायला मिळावे म्हणून!.... शांता... मीराच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली...क्रमशः..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक